मी गेल्या वर्षी पूल, इंग्लंड येथे काही महिने होतो. तेव्हा पूल पासून जवळच डर्डल डोअर हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे असे समजले. मग असेच एका दिवशी तिकडे जायला निघालो. पूल वरून वूल ला जाणारी ट्रेन पकडली. पूल वरून वूलला जायला फक्त १८-२० मिनिटे लागतात ट्रेनने. वूल स्टेशनच्या बाहेरून taxi मिळते डर्डल डोअरला जायला. तिने अवघ्या १५ मिनिटात डर्डल डोअर जवळ पोचलो. जिथे taxi सोडते तिथेच एक हॉटेल आहे जिथे राहण्याची आणी जेवणाची व्यवस्था होऊ शकते. बरीच लोक कॅराव्हान घेऊन आली होती आणी त्या कॅराव्हान मधेच राहत होती. त्या हॉटेल पासून अंदाजे 10 मिनिटाची पायवाट आहे डर्डल डोअर पर्यंत पोचायला.
डर्डल डोअर हे चूनखडीने बनलेले नैसर्गिक ठिकाण आहे. ज्युरासिक कोस्टचा एक भाग तसाच समुद्रात गेलेला आहे आणी त्याला मध्ये एक छिद्र तयार झाले आहे समुद्राच्या पाण्यामुळे. प्रत्यक्षात ही जागा खाजगी मालकीची आहे; तरी सर्वाना तिथे जायला परवानगी आहे.
taxi जिथे सोडते तिथून एक तीव्र उतार आहे डर्डल डोअरला जायला.
taxi stand पासून डर्डल डोअरकडे जाणारी पायवाट.
ही पायवाट एका ठिकाणी संपते आणी तिथून पुढे थोड्या पायऱ्या आहेत ज्या तुम्हाला सरळ डर्डल डोअरच्या समोर घेऊन जातात.
वरून काढलेले काही फोटो.
डर्डल डोअरचे काही फोटो खाली जावून एकदम जवळून काढलेले.
समुद्राचे पाणी खूपच थंड असल्याने पाण्यात जाण्याची हिम्मत झाली नाही.
जवळपास २ तास तिथे राहिलो आणी मग पुन्हा पायऱ्या चढून वर आलो. ज्या पायवाटेने डर्डल डोअरला आलो होतो तिने चालत चालत लुल्वर्थ कोवला जायला निघालो. हे अंतर अंदाजे २ की.मी आहे. पूर्ण पायवाट समुद्राच्या कडेने जाते. एका बाजूला अथांग समुद्र आणी दुसऱ्या बाजूला सुंदर हिरवळ.
लुल्वर्थ कोवच्या अगोदर एक सुंदर डोंगर दिसला समुद्रात. त्याचा फोटो.
लुल्वर्थ कोव म्हणजे नैसर्गिक रित्या तयार झालेले एक वर्तुळ म्हणू शकतो. तुम्ही अगदी कोवच्या मुखाशी जावू शकता. पण मुखाशी जाण्यापेक्षा डोंगरावरूनच फार सुंदर दिसते हे ठिकाण.
इथे काही हॉटेल्स आहेत आणी बाथरूमची सोय आहे.
लुल्वर्थ कोवचे काही फोटो.
तिथे काही लोकांची घरे देखील आहेत. इतक्या सुंदर ठिकाणी रहायला मिळत असल्याचा हेवा वाटला.
मग तिथे काही वेळ घालवला नी परत पूलला आलो.
अतिशय सुंदर जागा आहेत दोन्हीही. किमान एकदा तरी भेट द्याव्यात अश्या.
प्रतिक्रिया
19 Jun 2016 - 9:05 pm | पद्मावति
वाह! अप्रतिम.
19 Jun 2016 - 10:37 pm | आदूबाळ
चहा आणि मारी! जबरदस्त जागा!
20 Jun 2016 - 7:38 am | टवाळ कार्टा
भारीये
20 Jun 2016 - 9:32 am | श्रीरंग_जोशी
निसर्गाचे स्वर्गीय सौंदर्य अनुभवले आहे तुम्ही. दोन - अडीच वर्षांंपूर्वी हे ठिकाण बिंगच्या होमपेजवर पाहिले तेव्हापासून आयुष्यात एकदा तरी या ठिकाणी जायचे असा निश्चय केला आहे.
हा अनुभव आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल खूप आभार.
20 Jun 2016 - 10:57 am | अजया
फोटो पाहिल्यापासून हे ठिकाण places to visit before you die मध्ये टाकलेले आहे!
छान फोटो आणि माहिती.पूल आणि वूल मजेशीर आहे!
20 Jun 2016 - 12:40 pm | नीलमोहर
मस्त !!
20 Jun 2016 - 1:20 pm | पक्षी
अतिशय छान आणि नेटकं वर्णन.
अतिशय सुंदर जागा
20 Jun 2016 - 2:21 pm | मेघना मन्दार
आमच्या लंडन वारीला इथे जायची इच्छा खूप होती पण वेळे अभावी नाही जाता आल इथे. पुढच्या ट्रिप च्या वेळी नक्की जाणार . फोटो खूप सुंदर !!
20 Jun 2016 - 9:10 pm | जुइ
दोन्ही ठिकाणे अतिशय सुंदर आहेत. एकदा तरी जायलाच हवे येथे.
20 Jun 2016 - 9:36 pm | स्रुजा
वाह ! पारणं फिटलं डोळ्याचं !
20 Jun 2016 - 10:42 pm | प्रचेतस
अतिशय सुंदर छायाचित्रं आहेत.
20 Jun 2016 - 10:42 pm | मनिमौ
आकाशाची निळाई अप्रतिम टिपली आहे. डर्डल डोअर चा आकार बघुन मला हत्ती च्या सोंडेचा भास झाला. अशक्य सुंदर जागा आहेत
5 Jul 2016 - 3:35 am | बंड्याभाय
फारच सुंदर जागा आहे, फोटोज़ सुद्धा मस्त आलेत.
5 Jul 2016 - 2:12 pm | शान्तिप्रिय
अतिशय छान फोटो आणि व्रुत्तांत!
5 Jul 2016 - 6:50 pm | यशोधरा
सुंदर!
5 Jul 2016 - 7:59 pm | विद्यार्थी
लै भारी!!!
6 Jul 2016 - 1:16 pm | भम्पक
सुरेख ठिकाण. एक विनंती....जर आपण तेथेच असाल तर कृपया एखाद्या टुमदार घराचा आतून बाहेरून फोटो पाठवू शकाल का..?
7 Jul 2016 - 2:18 am | महामाया
सुंदर आहेत जागा...
7 Jul 2016 - 2:25 am | खटपट्या
स्वर्गच आहे जणू
14 Sep 2016 - 1:44 am | भडकमकर मास्तर
10 Oct 2017 - 6:24 pm | नया है वह
..