संतश्रेष्ठ (देवद्वार छंद)

संदीप चित्रे's picture
संदीप चित्रे in जे न देखे रवी...
24 Jan 2009 - 2:22 am

'देवद्वार' छंदाची ओळख करून दिल्याबद्दल धोंडोपंतांचे आभार !
-----------------------------------------------------
ज्ञानियाचा राजा
त्याची ज्ञानेश्वरी
या भव सागरी
नौका होई

तुकोबा तो सांगे
आम्ही देऊ छाटी
नाठाळाला काठी
हाणू माथी

एकनाथ गाती
रचूनी भारूड
लोकांसी गारूड
झाले ऐसे

नामा म्हणे देवा
म्हणतो अभंग
तुझी भक्ती दंग
करितसे

लिहिणे हे काव्य
केवढा आनंद
साथ देई छंद
देवद्वार

कविता

प्रतिक्रिया

घाटावरचे भट's picture

24 Jan 2009 - 2:43 am | घाटावरचे भट

मस्त!!!

अवलिया's picture

24 Jan 2009 - 7:32 pm | अवलिया

असेच म्हणतो

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

मनीषा's picture

24 Jan 2009 - 6:52 pm | मनीषा

कविता .. आवडली

लिहिणे हे काव्य
केवढा आनंद
साथ देई छंद
देवद्वार ...............सुंदर

चिंतामणराव's picture

24 Jan 2009 - 7:17 pm | चिंतामणराव

वा वा.....सुंदर.....

संतांची महती
चित्र्यांच्या चित्ती
वाहिली सुमती
देवद्वारी

राघव's picture

24 Jan 2009 - 9:34 pm | राघव

वाहवा :)
खूप छान. संतांचे वर्णन मला तसेही आवडतेच.
पण तुम्ही खरेच छान लिहिलेत! शुभेच्छा!!

मुमुक्षु

कपिल काळे's picture

24 Jan 2009 - 9:38 pm | कपिल काळे

सुंदर

प्राजु's picture

24 Jan 2009 - 10:58 pm | प्राजु

अतिशय सुंदर आहे अभंगवाणी..
प्रासादिक.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

लिखाळ's picture

24 Jan 2009 - 11:13 pm | लिखाळ

वाचूनी कविता
आनंद जाहला
म्हणूनी लिहिला
प्रतिसाद !
:)
-- लिखाळ.

धनंजय's picture

26 Jan 2009 - 6:50 am | धनंजय

असेच म्हणतो -
प्रयत्न पहिला
अव्वल जाहला
संदीपांचा

विसोबा खेचर's picture

26 Jan 2009 - 12:52 am | विसोबा खेचर

वा! साधं परंतु तेवढंच सुंदर काव्य..!

तात्या.

संदीप चित्रे's picture

26 Jan 2009 - 6:24 am | संदीप चित्रे

राम राम मंडळी...
'देवद्वार'छंदातील माझ्या पहिल्या प्रयत्नाचे कौतुक केल्याबद्दल धन्स :)

शितल's picture

26 Jan 2009 - 8:48 am | शितल

संदीप,
सुंदर काव्यरचना. :)

फारएन्ड's picture

26 Jan 2009 - 8:55 am | फारएन्ड

संदीप, देवद्वार छंद माहीत नाही, पण वाचायला अतिशय चांगली वाटली.