गाभा:
महाभारत घडून गेल्यावर भगवान श्रीकृष्णाच्या वृद्धावस्थेत नारद त्यांना भेटायला आले होते . त्याचे सविस्तर वर्णन बहुधा भागवतात आहे. त्यावेळी श्रीकृष्ण व नारद यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली . त्यामध्ये कृष्णाने आपले मुलगे आपले ऐकत नसल्याबद्दल व बहुधा प्रद्युम्न या कृष्णपुत्राच्या उच्छृंखल पणा बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती . त्यावर नारदानी आता आपले अवतारकार्य संपत आलेले असून पृथ्वीवरील मानवासारखे आपण पुत्रादिकांची चिंता करणे सोडून निजधामी गमन करण्याची तयारी करावी असा उपदेश केला . हा बहुधा कलियुगाच्या प्रारंभीचा काल असावा .
या सर्व प्रकाराबाबत मराठी वेबसाईट वर अथवा साहित्यात कुठे उल्लेख /चर्चा झालेली आहे का ? मिपाकरांपैकी कोणास याबाबत काही माहिती असल्यास जरूर चर्चा करावी . केवळ जिज्ञासेपोटी हा धागा काढत आहे.
धन्यवाद
प्रतिक्रिया
17 Jun 2016 - 10:45 am | स्पा
o I c
17 Jun 2016 - 10:59 am | टवाळ कार्टा
त्याकाळात मिपाकरांपैकी कदाचित फक्त मैच होत्या =))
17 Jun 2016 - 11:58 am | नाखु
चिनार्या जाणार आहे या विकांती माईंकडे,आंबेहळद घेऊन.
आणेल माहीती कात्रीशीर. बाकी मंदार भाऊंचा लेख बरेच दिवसांनी आला मिपावर.
पु भा प्र
मिपा "वार"करी नाखु
17 Jun 2016 - 2:00 pm | चिनार
हो नाखुकाका...एक प्रश्नावलीच घेऊन जाणार आहे माईकडे..दोन चार नमुनेदाखल प्रश्न खालीलप्रमाणे..
१. डायनासोर पृथ्वीवरून नष्ट झालेत तेंव्हा नेमकं काय घडलं होतं?
२. अश्मयुगीन मानव सागरगोट्या खेळायचे का ? व कसे ?
३. महासागर भरायला नेमकी किती वर्ष लागलीत ? व त्याआधी माई पाणी कुठून भरायच्या?
४. कृष्णानी सांगितलेली ओरिजिनल गीता किती श्लोकांची होती ?
५. कटप्पाने बाहुबलीला का मारले ?
17 Jun 2016 - 2:06 pm | चिनार
एक राहिला अजून
६. महाभारतकालीन मिपा चे स्वरूप कसे होते ?
17 Jun 2016 - 2:45 pm | अभ्या..
काही फरक नसावा. सूत्रधार नीलकांतच होता त्यावेळीही. ;)
.
.
.
.
मालक आता शुअर हाकलतेत मला ;)
17 Jun 2016 - 3:22 pm | वाल्मिक
तेव्हा नारदा मिपावर वावरत होता
मी पण निघतो
17 Jun 2016 - 11:03 am | स्पा
युद्ध युद्ध खेळून मी इतका दमलेलो, शिवाय त्याचा वृतांत मिपावर टाकायचा होता त्यामुळे उगाच कृष्ण नारदाला डिस्टर्ब करायला गेलो नाही
17 Jun 2016 - 1:09 pm | प्रसाद गोडबोले
ह्म्म्म.
नारद मला भेटायला आले तेव्हा माझे वय ९० च्याही पुढे गेले होते. महाभारतीय युध्द होवुन जवळपास १० १५ वर्षे उलटुन गेली होती. तिकडे उत्तरेत पांडवांचे अन इथे आमचे असे स्थिर राज्य स्थापन झाले होते. पोरांचीही वयं आता पनाशीत आलेली होती.
आमच्या नेहमीच्या चहापाण्याच्या गप्पा झाल्या. त्यांना म्हणालो पोरं ऐकेना झाली राव. उगाच ह्यांना काय नको व्ह्यायला म्हणुन युध्दात घेवुन गेलो नाही , पण युधात तिकडे माझ्या अर्जुनाचा बिचारा अभिमन्यु गेला. कृष्णेची पाच पोरेंही गेली . पण आता तेच नशीबवान वाटय्ला लागलेत इतका वात आणल्याय ह्या कार्ट्यांनी . काही तरी उपाय सुचवा राव. प्रद्युम्न तसा युवराज नाय पण त्याला तोडीस तोड असे दुसरे कोणी नसल्याने त्याचेच राज्य चालल्यासारखे होते. आधीच तो कामदेवाचा अवतार अन त्यातुन दिसायला क्युट . पण तरीही शांत होता , सज्जन होता बिचारा !
सांब मात्र एकदम प्रिन्सभाऊंसारखा राडा करुन र्हाईला होता. नुसता माज ! माझ्या जुन्या मित्र नारदांचीही चेष्टा करायचा नालायक कुठला ! तो पण दिसायला एकदम डुड ! तो सारखा क्रीडा करण्यात रत असायचा ! त्याला पाहुन पोरी सुध्दा एकदम हीटवर आल्यागत करायच्या ,
एतस्मिन्नंतरे तत्र यास्तु वै चाल्पसात्त्विकाः ॥
ता दृष्ट्वा सहसा सांबं सर्वाश्चुक्षुभिरे स्त्रियः ॥ २५ ॥
न स दृष्टः पुरा याभिरंतःपुरनिवासिभिः ॥
मद्यदोषात्ततस्तासां स्मृतिलोपात्तथा बहु ॥२६ ॥
स्वभावतोऽल्पसत्त्वानां जघनानि विसुस्रुवुः ॥
श्रूयते चाप्ययं श्लोकः पुराणप्रथितः क्षितौ ॥ २७ ॥
ब्रह्मचर्येऽपि वर्त्तंत्या योगिन्या वा प्रमादतः ॥
प्रकृष्टं पुरुषं दृष्ट्वा वरांगं क्लिद्यते स्त्रियाः ॥ २७ ॥
लोकेऽपि दृश्यते ह्येतन्मद्यस्याप्यथ सेवनात् ॥
लज्जां मुंचंति निःशंका ह्रीमत्यो ह्यपि च स्त्रियः ॥ २९ ॥
समांसैर्भोजनैः स्निग्धैः पानैः सीधुसुरासवैः ॥
गंधैर्मनोज्ञैर्वस्त्रैश्च कामः स्त्रीषु विजृंभति ॥ 7.1.101.३० ॥
मी आणी नारद भेटायला गेलो तेव्हा असाच नागड्या पोरींच्या घोळक्यात पडुन र्हाईला होता , ते पाहुन मला लई राग आला .
तासामथोत्थितानां तु वासुदेवस्य पश्यतः ॥
भित्त्वा वासांस्यनर्घाणि पात्रेषु पतितानि तु ॥३४॥
जघनेषु विलग्नानि तानि पेतुः पृथक्पृथक् ॥
तद्दृष्ट्वा तु हरिः कुद्धस्ताः शशाप ततोऽबलाः ॥ ३५ ॥
लय कावलो मी. तर मला कसा म्हणतोय -
अनिमित्तमहं तात भावदोषविवर्जितः ॥
शप्तो न मेऽत्र वै कुद्धो दुर्वासा नान्यथा वदेत् ॥ ४३ ॥
ओ फादर , उगाच तण तण करु नका ... वगैरे वगैरे
मी नारदांना म्हणलो , बघा हे कारटं असं हाता बाहेर गेलंय , काही तरी सांगा राव काय करु ?
नारद म्हणाले - ऑ. मला विचारताय ? हे असले सांसारिक प्रश्न आपल्याला झेपत नाहीत म्हणुनच तर आपण बालब्रह्मचारी राहिलो ना भाऊ ! तुम्ही असं करा पोरांला घेवुन एक ट्रिप काढा गोव्याला !
मी म्हणालो - ऑं गोवा ? लय लांब आहे राव , प्रभास ला जाऊन येवु म्हणतो . तेवढेच जरा पापक्षालन होईल !
असो. तिथे परत प्रभास क्षेत्रावर गेलो तिथं परत टांगा पलटी पार्टी झाली , सगळे एकदम लोडखोड ! त्यातनं सात्यकी अन कृतवर्म्याच्या किडा वळवळला, भेडीं साला दारुपिल्यावर मस्त एन्जॉय करुन गफ्फा हाणायच्या सोडल्या अन जुनेच उकरुन काढाला लागले . ह्यॅ . लय वैतागलो म्या अन निघुन गेलो . पुढंच काय झालं ते समद्यास्नी ठावं हैच .
ह्ये समदं त्या सांब्या च्या नादात झालय
दुत्त दुत्त सांब्या :-\
अवांतर : वरील कथेतील काही भाग काल्पनिक . उर्वरित सर्व भाग स्कंदपुराणातुन साभार !
17 Jun 2016 - 1:15 pm | किसन शिंदे
=)) =))
कथेची स्टाईल आवडली राव गिर्जा.
17 Jun 2016 - 1:17 pm | स्पा
लाैल
17 Jun 2016 - 1:59 pm | नाखु
कालच्या पंजाबीचा इतका परिणांम की थेट "नव(टा़क)साहीत्य्च !!!
भारी आणि जबरा
इतकेच म्हणतो.
जमली तर वेळ नाखु
17 Jun 2016 - 2:50 pm | प्रसाद गोडबोले
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ
तसं काही नाही नाखु !
अॅक्चुअली ह्या कथेत आमच्या कंपुच्या नावामागचे सुभाषित आहे ना म्हणुन आठवले लगेच... ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
ब्रह्मचर्येऽपि वर्त्तंत्या योगिन्या वा प्रमादतः ॥
प्रकृष्टं पुरुषं दृष्ट्वा वरांगं क्लिद्यते स्त्रियाः ॥ २७ ॥
17 Jun 2016 - 1:18 pm | स्पा
कात्रे काकांच्या बुलेट चा फॅण
- स्टिव
17 Jun 2016 - 1:34 pm | अभ्या..
हाण तेज्यायला.
हे प्रगो म्हणजे एक रत्नच आहे.
दंडवत घे रे बाबा.
17 Jun 2016 - 2:44 pm | ब़जरबट्टू
मस्तच...
एकदा पुर्ण महाभारत बघा जमते का असे ते.. :)
17 Jun 2016 - 3:11 pm | टवाळ कार्टा
रे कर्मा =))
17 Jun 2016 - 1:41 pm | धनंजय माने
कात्रेन्चा लिफ्ट भारी, प्रगोंचा smash वा भाई वा!
-volleyball बघणारा
17 Jun 2016 - 2:37 pm | मंदार कात्रे
कथा लय भारी मार्कस ऑरेलियस राव
:)
22 Jun 2016 - 8:22 pm | चंपाबाई
छान
22 Jun 2016 - 8:30 pm | रेवती
नका असले प्रश्न पाडून घेऊ. मी ल्ह्यायला गेले तर णावे ठेवली मेल्यांनी!
हा पुरावा!
23 Jun 2016 - 10:13 pm | बोलघेवडा
ह्या संदर्भात एक गोष्ट आज्जीकडून ऐकली होती. कृष्णाचा मुलगा सांब महा-आचरट होता. एकदा कृष्णाने कोणतातरी यज्ञ आयोजित केला होता. त्यावेळी सांबाने एका गर्भवती स्त्रीचे सोंग घेतले. तो आणि त्याचे काही मित्र आलेल्या पाहुण्यांसमोर जाऊन प्रत्येकाला विचारत की "सांगा पाहू हिला मुलगा होईल की मुलगी?".
तिथे आलेल्या एक ऋषींची थट्टा करण्याच्या हेतूने त्यांनी एका ऋषींना हाच प्रश्न केला. ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले की ही स्त्री नसून पुरुष आहे.
क्रोधीत झालेल्या ऋषींनी सांबाला शाप दिला की तुझ्या पोटी मुसळ जन्माला येईल आणि ते सर्व यादव कुळाचा नाश करेल. मग मात्र सांबाचे डोळे उघडले आणि त्याने ऋषींची दयायाचना केली. पण ऋषी द्रवले नाहीत.
यथावकाश सांबाच्या पोटी खरेच मुसळ जन्माला आले. भयभीत यादवांनी ते मुसळ उगाळून त्याचे चूर्ण करून समुद्रात टाकून दिले. मुसळ उगाळून संपल्यावर त्यातून एक लोखंडी त्रिकोणी तुकडा निघाला. तोही त्यांनी समुद्रात टाकून दिला. त्यांना वाटते की आता संकट टळले. पण पुढे निराळेच घडले. मुसळाच्या चूर्णातून सागरकिनारी नागरमोथ्याची झाडे जन्माला आली. तो लोखंडी तुकडा एक माश्याने गिळला. त्या माश्याला एका कोळ्याने पकडले.त्या माश्यातून मिळालेला तो लोखंडी तुकडा त्या कोळ्याने आपल्या शिकारी मित्राला दिला. त्या शिकाऱ्याने तो तुकडा आपल्या बाणाच्या टोकावर बसवला.
पुढे द्वारकेत अनेक अपशकुन घडू लागले. म्हणून कृष्णाने सर्व यादवांना प्रभास क्षेत्री जाऊन क्षेमशांतीसाठी यज्ञ-याग करण्यास सुचविले. त्याचबरोबर प्रभास क्षेत्री जाताना बरोबर शस्त्र आणि मद्य घेऊ नये अस सल्ला दिला. पण यादवांनी ते ऐकले नाही. प्रभास क्षेत्री समुद्रकिनारी मद्य घेताच त्यांच्यात मारामाऱ्या सुरू झाल्या. शस्त्रे नव्हती म्हणून त्यांनी नागरमोथ्याची झाडे उपटून युद्ध सुरू केले. त्यात संपूर्ण यादव सेनेचा संहार झाला. हताश कृष्ण एक वनात तपश्चर्येसाठी निघून गेले. तिथे काही काळ विश्राम करत असताना त्यांच्या पायाच्या तळव्याला हरीण समजून त्या शिकाऱ्याने बाण मारला ज्यावर तोच लोखंडी तुकडा बसवला होता. अशारितीने संपूर्ण यादव कुल नाश पावले.
23 Jun 2016 - 10:41 pm | अभ्या..
हो ना, मला वाटलेच होते.
तरी मी सांगत असतो, ऋषीमुनींची चेष्टा करत जाऊ नका.
ऐकत नाहीत मिपाकर.
23 Jun 2016 - 10:57 pm | धनंजय माने
हेलामा हे आधुनिक ऋषि आहेत बरं!
23 Jun 2016 - 10:32 pm | स्पार्टाकस
सांबाने ज्या ऋषींची चेष्टा केली ते म्हणजे शीघ्रकोपी दुर्वास!