मला ना तुझ्या प्रेमाचं गणितच कळत नाही,

जगप्रवासी's picture
जगप्रवासी in जे न देखे रवी...
14 Jun 2016 - 2:15 pm

काल जुनी अडगळ साफ करताना कॉलेज मध्ये असताना ट ला ट जोडून लिहिलेली कविता सापडली. जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि रात्री ४ वाजेपर्यंत बायकोशी गप्पा मारत बसलो. सहज तुमच्याशी शेअर करावी वाटली म्हणून इथे टंकली.
पहिली कविता मी लिहिलेली, माझ्या बायकोला (तेव्हा गर्लफ्रेंड होती) एका साध्या कागदावर लिहून गुलाबा सोबत दिलेली. तिने तो कागद अजून जपून ठेवला आहे.

मला ना तुझ्या प्रेमाचं गणितच कळत नाही
तुझी प्रेम करण्याची रीत मला कळत नाही

सांगता येत नाही कधी रुसशील
आणि कुठल्या गोष्टीवरून खुदकन हसशील
हसता हसता माझ्यात हरवून जाशील
हरून सुद्धा सगळ जिंकून जाशील
माझ्यासाठी कोणाशी भांडशील
याचा काही भरोसा नाही
मला ना तुझ्या प्रेमाचं गणितच कळत नाही

माझ्या आयुष्यातील क्षण मला आठवत नाहीत
पण तू तर त्या क्षणांची तारीख पण विसरत नाहीस
सगळ्या गोष्टी तुला काल घडल्यासारख्या आठवतात
माझ्यापुढे स्वतःच्या अस्तित्वाचा विचारही करत नाहीस
खर सांगतो मला ना तुझ्या प्रेमाचं गणितच कळत नाही

याला उत्तर म्हणून तिने देखील जे सुचल ते लिहून मला दिलं होत.

कधीतरी पहाटे
एखाद्या भयानक स्वप्नातून जाग यावी
आणि दचकून उठताना
तुझी मिठी अजूनच घट्ट व्हावी
यासारख सुख ते काय……

कधीतरी भांडताना एखादी गोष्ट
तू नकळत बोलून जावी
आणि ती छोटी जखम
दिवसभर छळत राहावी
यासारख दुःख ते काय……

कधीतरी रविवारी
सगळ घर पसरलेलं
आणि दुपार नुसती पडून
आळसात घालवावी
यासारखी मजा ती काय……

कधीतरी रडताना
तू एखाद वाक्य बोलाव
आणि मी रडता रडता हसले
कि पटकन कवेत घ्याव
यासारखा आधार तो काय……

कधीतरी लढताना
सगळे माझ्या विरुद्ध
आणि तुझ्याकडे आशेने पाहिल्यावर
एका नजरेत समर्थन मिळाव
यासारख बळ ते काय ……

कधीतरी चुकताना
मला तू वेळोवेळी बजावाव
आणि तू सांगूनही मी चुकल्यावर
पुन्हा एकदा समजून सांगाव
यासारख प्रेम ते काय…….

कधीतरी हसताना
तुझ्या डोळ्यात पहावं
आणि आज पर्यंतच्या सर्व कष्टांच
सार्थक झाल अस वाटावं
यासारख समाधान ते काय …….

कधीतरी कातरवेळी
जुन्या आठवणींना जागवाव
आणि जे हव ते सर्व तू दिलस
अस म्हणता याव
यासारख आयुष्य ते काय …….

जगप्रवासी

फ्री स्टाइलमुक्तक

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

14 Jun 2016 - 5:19 pm | अभ्या..

अरेवा,
मस्तच की.
तुमच्या मिशेशची कविता जास्त विशेश आहे.

पद्मावति's picture

14 Jun 2016 - 5:37 pm | पद्मावति

सुंदर!!

तुमच्या मिशेशची कविता जास्त विशेश आहे.

:) सहमत.

जव्हेरगंज's picture

16 Jun 2016 - 11:59 am | जव्हेरगंज

तुमच्या मिशेशची कविता जास्त विशेश आहे.

+१

आनंद कांबीकर's picture

14 Jun 2016 - 5:38 pm | आनंद कांबीकर

आवडली

नाखु's picture

14 Jun 2016 - 5:40 pm | नाखु

कधीतरी लढताना
सगळे माझ्या विरुद्ध
आणि तुझ्याकडे आशेने पाहिल्यावर
एका नजरेत समर्थन मिळाव
यासारख बळ ते काय ……
+
कधीतरी कातरवेळी
जुन्या आठवणींना जागवाव
आणि जे हव ते सर्व तू दिलस
अस म्हणता याव
यासारख आयुष्य ते काय ……

.

प्रचेतस's picture

14 Jun 2016 - 6:03 pm | प्रचेतस

सुरेख लिहिलंय.

मराठी कथालेखक's picture

14 Jun 2016 - 6:47 pm | मराठी कथालेखक

छान... दूसरी कविता जास्त आवडली, ती पण जूनीच आहे की आताची ?

बायकोची कविता जास्त आवडली.

सौन्दर्य's picture

15 Jun 2016 - 5:07 am | सौन्दर्य

दोन्ही कविता एकदम मस्त. मनातले सगळेच जणू कागदावर अवतरले. सहज विचारतो, किती वर्षांपूर्वीच्या आहेत ह्या ?

विवेकपटाईत's picture

15 Jun 2016 - 8:14 am | विवेकपटाईत

दोन्ही कविता आवडला. बाकी लग्नाला ३० वर्ष होत आले अजूनही तिच्या प्रेमाचे गणित कळले नाही... शिवाय तिला कविता हि करता येत नाही.. कस होईल???

आणि या दोन्ही कविता साधारण/९/१० वर्षापूर्वीच्या आहेत.

दुसर्‍या कवितेचा आशय वाचुन ती १० वर्षापुर्वीची असेल असे वाटत नाही.

टवाळ कार्टा's picture

15 Jun 2016 - 8:37 am | टवाळ कार्टा

मस्तय

जगप्रवासी's picture

15 Jun 2016 - 10:32 am | जगप्रवासी

सर्वांचे धन्यवाद

रातराणी's picture

15 Jun 2016 - 11:01 am | रातराणी

दूसरी कविता अप्रतिम आहे! तुमच्या अर्धांगीनीला लिहिते ठेवा!

विअर्ड विक्स's picture

16 Jun 2016 - 12:20 pm | विअर्ड विक्स

दुसरी कविता जास्त आवडली ……

तोडीस तोड आहे …

बाकी कवितेस कवितेने प्रतिसाद मिळणे म्हणजे अहोभाग्यच !!!!

जगप्रवासी's picture

16 Jun 2016 - 3:09 pm | जगप्रवासी

पण आम्ही दोघे कधीतरी मेसेजवर बोलताना एकमेकांना टाइमपास म्हणून चारोळ्या लिहून पाठवायचो (म्हणजे अजून पण पाठवतो).
ती खूप छान लिहिते मी त्याबाबतीत दगड आहे, अजून पण तिच्या डायरीत कविता लिहिते. वेळ मिळाला की एक एक करून इथे टंकत जाईन.
सर्वांचे धन्यवाद

त्यांनाच का नाही बोलवत इथे?
हाच तो सुर्य अन हा जयद्रथ...

अभ्या..'s picture

16 Jun 2016 - 5:01 pm | अभ्या..

वपाकृष्णा, वपासूदना
ह्या अर्जुनाला तरी सोडा, का धर्मसंकटात टाकतायसा?

चांदणे संदीप's picture

17 Jun 2016 - 11:08 am | चांदणे संदीप

+१

तुमच्या मिशेशला कविता आवडते आणि कवितेतूनच प्रतिसाद देता येतो हे परमविशेश आहे!

Sandy

सुचिकांत's picture

16 Jun 2016 - 5:13 pm | सुचिकांत

दोघांच्या कविता छानच ..

दीपा माने's picture

16 Jun 2016 - 5:35 pm | दीपा माने

दोन्ही कविता तोडीस तोड आहेत. दोघांनीही आपापल्या कविता पुरूषप्रधान (तुम्ही) आणि स्रीप्रधान (मिसेस) भावनांसह तंतोतंत लिहील्या आहेत.
आणखीही तुम्हा उभयतांच्या कविता वाचायला नक्कीच आवडतील.

अगदी आमचीच ष्टुरी लिहिलीयं तुम्ही लोकांनी! लयंच भारी! आवडली. :-)