झोंबू लागे सुखद गारवा, मंदसा पाऊस झाला
जाऊ या लोणावळ्याला, सखीस इशारा केला
.
मारली दांडी ऑफिसला, अन तिने हि कॉलेजला
ठरे भेटायचे ,सकाळीच, जिमखान्याच्या स्टॉपला
.
लो वेस्ट जीन वर, स्लीव्हलेस टॉप शोभत होता
तिच्या मधाळ स्मिताने ,मूड रोम्यान्टीक होता
.
नेली फटफटी पंपावर, म्हटले कर टाकी फुल्ल
सुटे गाडी भन्नाट,बुंगाट .असे वातावरण कूल
.
चाले रस्ता ,धावे रस्ता, गावे मागे पडू लागली
टेकले उरोज पाठीला, मिठी तारुण्याची घातली.
.
लय भारी, क्षण भारी, रक्त तारुण्याचे सळसळे.
पुणेमुंबई रस्ता आहे , थांबव हे यौवनाचे चाळे
.
घालून हातात हात ,मस्त हिंडलो लोणावळ्याला
केले, न सांगण्याजोगे, माहीत आमच्याच मनाला
.
परतिचा प्रवास सुरू झाला,वेळ निरोपाची आली
घेताना निरोप कॉफी शॉप मध्ये, घालमेल झाली
.
निरखताना समजले, डाव्या कानातले दिसत नव्हते
झटापटीत बहुदा ,कर्ण भूषणं कुठेतरी पडले होते.
.
सांगताच सुंदरीने घाईने ,चाचपली कानाची पाळी
लाजली ,डोळ्यानेच म्हणाली, आळी मिळी गुप चिळी
प्रतिक्रिया
4 Jun 2016 - 10:40 pm | एकुलता एक डॉन
मी पयला
5 Jun 2016 - 11:21 am | भरत्_पलुसकर
झकास!
5 Jun 2016 - 11:35 am | जव्हेरगंज
भारीए!
5 Jun 2016 - 3:22 pm | चाणक्य
मस्तच.
5 Jun 2016 - 10:11 pm | डायवर
"टेकले उरोज पाठीला, मिठी तारुण्याची घातली."
केवळ हेच अनुभवण्यासाठी मी कित्येक वेळा गरज नसताना कचाकच दाबलेले ब्रेक्स आठवले.
आणि बर्याच वेळा फोरप्ले मध्ये सुद्धा सेक्स एवढा आनंद मिळू शकतो, हे अनुभवले आहे.
"झटापटीत बहुदा...."
सार्वजनिक ठिकानी झटापट करण्याची हिम्मत माझ्यात कधी येणार, देव जाणे.
आमची सारी झटापट बंद दरवाज्य आडच.
5 Jun 2016 - 10:48 pm | किसन शिंदे
आंग्गाशी! अकुकाकांचे असे लिखाणच आवडते आपल्याला..
6 Jun 2016 - 12:06 am | रमेश भिडे
लो वेस्ट जीन्स, स्लीवलेस टॉप आणि कर्णभूषण का? अंबाडा किंवा खोपा नव्हता ना???
13 Jun 2016 - 1:39 pm | रातराणी
तुमचं आपलं कै तरीच भिडे काका, स्लीव्लेस टॉपवर मोकळे केस छान दिसतात.
6 Jun 2016 - 7:54 am | सांजसंध्या
अविकाका स्पेशल कविता !
12 Jun 2016 - 1:43 pm | एक एकटा एकटाच
मस्त च
13 Jun 2016 - 1:31 pm | टवाळ कार्टा
भारिये ;)
13 Jun 2016 - 1:37 pm | रातराणी
वा वा अकुकाका फॉर्मात!