विस्तारभयास्तव

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
27 May 2016 - 8:57 am

विस्तारभयास्तव
मी स्वप्नांची लांबीरुंदी कमी केली
गजराची धारदार कात्री वापरून
काटछाट केलेली ती स्वप्ने
गळत असतात पापण्यांमधून

विस्तारभयास्तव
कंटाळवाणा प्रवास टाळत गेलो
हा अधिकचा प्रवास दिला साठवून
आता प्रवास शक्य होत नाही
विस्ताराचे अजिबात भय नसून

विस्तारभयास्तव
कितीतरी विचारांना दिली जन्मठेप
काही पॅरोलवर सुटले कैदेतून
मी परत त्यांना कैदेत टाकतो
सावधगिरीचा उपाय म्हणून

विस्तारभयास्तव
घराला भिंतीमध्ये बंद केले
कहर केले त्याला छप्पर देऊन
आता खिडकीतून पाहत बसतो
वादळवारागारापाऊसऊन

----////-----------////-------

Self-censored:-

विस्तारभयास्तव
कविता लिहताना मात्रा मोजल्या
कादंबऱ्या लघुकथेत कोंबल्या
संपादकाच्या उत्तराची वाट कधी पाहिली नाही
स्वतःच लिहीले की अधिक खोलात जात नाही
विस्तारभयास्तव

-- स्वामी संकेतानंद

कविता

प्रतिक्रिया

चाणक्य's picture

27 May 2016 - 9:43 am | चाणक्य

भारी झालीये. पहिल्या दोन ओळींनी जी पकड घेतली ती शेवटपर्यंत.

नाखु's picture

27 May 2016 - 10:01 am | नाखु

विस्तारभयास्तव
कितीतरी विचारांना दिली जन्मठेप
काही पॅरोलवर सुटले कैदेतून
मी परत त्यांना कैदेत टाकतो
सावधगिरीचा उपाय म्हणून

हे ज्याम पटले

विचारभयास्तव
कितीतरी प्रतिसादांना दिली सुटका
काही नजरेतून सुटले अलगद,
मी परत त्यांना शोधत नसतो
न्युनगंडाला अपाय (नको)म्हणून.

स्वामी (चा) नजरबंदी नाखुस

प्रीत-मोहर's picture

27 May 2016 - 10:11 am | प्रीत-मोहर

वाह !!!

नाईकांचा बहिर्जी's picture

27 May 2016 - 10:42 am | नाईकांचा बहिर्जी

खरंच अप्रतिम कविता करता तुम्ही स्वामीजी ___/\___

भरत्_पलुसकर's picture

27 May 2016 - 11:02 am | भरत्_पलुसकर

वा!

स्वामीजी, क्या बात है!
चतुरंग's picture

27 May 2016 - 11:32 am | चतुरंग

सुरेख! _/\_

-रंगा

अत्रुप्त आत्मा's picture

27 May 2016 - 12:13 pm | अत्रुप्त आत्मा

स्वामीज्जी की महान रचनाएं!

घाटी फ्लेमिंगो's picture

27 May 2016 - 12:17 pm | घाटी फ्लेमिंगो

शेवटचं सुद्धा भारी आहे की रं स्वामी...!!

स्वामी संकेतानंद's picture

28 May 2016 - 9:32 pm | स्वामी संकेतानंद

धन्यवाद! ते कडवे पण कवितेचाच भाग आहे.

सस्नेह's picture

27 May 2016 - 2:16 pm | सस्नेह

जबरी कविता.

रमेश भिडे's picture

27 May 2016 - 3:38 pm | रमेश भिडे

बेष्ट कविता. स्वामी चं नाव दिसलं की वाचलं जातं आणि बऱ्याच वेळा आवडतं.

अभ्या..'s picture

27 May 2016 - 4:43 pm | अभ्या..

स्वामी. मुक्तक आवडले.

शिव कन्या's picture

28 May 2016 - 11:21 am | शिव कन्या

भयाचा विस्तार झाला कि विस्तारभय निर्माण होते!
आवडली कविता.

खूप सुंदर …. विस्तारभयास्तव अजून काही लिहित नाही

पैसा's picture

28 May 2016 - 8:18 pm | पैसा

क्लास!