बारा अमावास्यांचे अंधार

पालीचा खंडोबा १'s picture
पालीचा खंडोबा १ in जे न देखे रवी...
25 May 2016 - 4:12 pm

संभोगावेशात मला तू
एकट्याला सोडून गेलीस
तेव्हा
बारा अमावास्यांचे अंधार
भोवती दाटून आले
अन् आठ दिश्यांची वादळे
अंगात भरून राहिली
मग
अनामिक ग्लानीने मी
कोसळून पडलो.

तू दिलेल्या सुगंधी सहवासाची
आवर्तने भोवती रुंजी
घालू लागली
अन्
मनात दाटले वासनामृग
आवेशी गवतांचे भाले
कुरतडू लागले,
सारी हिरवळ नष्ट होवून
मातीला सूर्य दिसू लागला
पण
माझ्याभोवती दाटलेल्या
अंधाराला माझी दया आली नाही.

तू नकारघंटा वाजवल्यानंतर
मी तुकड्या तुकड्यात पसरलो
अन् पाठीवर तू वर्षावलेल्या
चुंबनांचे भाजले फुगे झाले,
त्यातून स्त्रावला द्रव
पाठ जाळू लागला
मग
मला जळत्या सूर्याची
जाणीव झाली.

तुझ्या कोरीव शरीरावर
मी काही चुंबनकाव्ये सोडली
होती त्याच्या आता विराण्या
झाल्यात,
माझ्यात स्वप्नांचे मनोरे
कोसळले
आता मला
वंशविच्छेदाची आठवण झाली.

तू म्हणालीस त्या वृक्षाखाली
हि भेट शेवटची
तेव्हा वर आभाळझाकल्या
वृक्षाची सावली नष्ट होवून
सूर्यकिरणे मातीला भिडली ,
तिच सावली अंतर्धान
पावून मी सावलीविना
एकटाच उरलो
जळणा-या सूर्यप्रखरात.

आता उरल्यात त्या फक्त
आठवणी
अन् त्या आवर्तनात अडकलेला मी
आता आठ दिश्या नष्ट झाल्यात
उरल्यात त्या बारा
पौर्णिमा
अंधाराने झाकोळलेल्या.

तेव्हा मला माझ्याच
बहिणीने जन्म दिलेल्या
गौरीची आठवण येते
ती सांगत असते
मी तुझ्यासाठी उज्वल भविष्य
घेवून आले आहे ,
मी मात्र
अंधारनशेचे रान तुडवत
दिवस उन्हात जळतो
अन्
माझ्या रात्री बारा अमावास्येना
शरण जातात .

माझी बहिण सांगतच राहते
पाउलवाटा बदल
मी मात्र बहकतो अगतिकतेने
अन् तुझ्या न येणा-या फोनची
वाट बघतो
न संपणा-या ऑक्टोबरमधल्या उन्हाळ्यात.

न तुझा फोन येतो
अन् माझ्या फोनची रिंग
वाजूनही माझ्या बहिणीस
प्रतिसाद मिळत नाही.

तिचे आश्रू,
माझे एकटेपण,
तुझे नाकारलेपण,
अपूर्ण संभोग
ह्या सगळ्यांची भेळ होवून
.
.
.
मी निर्भेळ असा
विमनस्कपणे बारा अमावास्येच्या अंधारात
फिरत राहतो.....

विजयकुमार कणसे ......... 9/11/2012
कलंगुट , गोवा.

कविता

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

25 May 2016 - 4:27 pm | जव्हेरगंज

वेलकम ब्याक कणसे !!!

चांदणे संदीप's picture

25 May 2016 - 5:24 pm | चांदणे संदीप

वेलकम ब्याक

एवढेच म्हणू शकतो आत्तातरी... पुन्हा परत येईन!

Sandy

सूड's picture

25 May 2016 - 6:04 pm | सूड

.

प्रसाद गोडबोले's picture

25 May 2016 - 7:11 pm | प्रसाद गोडबोले

~

नाखु's picture

26 May 2016 - 10:36 am | नाखु

#

भाई खंडोबा, आखिर कहना क्या चाहते हो?

मारवा's picture

26 May 2016 - 10:47 am | मारवा

विजयकुमार भयंकराच्या दारात उभे आहात हो तुम्ही

पालीचा खंडोबा १'s picture

26 May 2016 - 4:59 pm | पालीचा खंडोबा १

हा हा हा