✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

... काय म्हणतील!

र
रातराणी यांनी
Sat, 05/14/2016 - 13:58  ·  लेख
लेख
... काय म्हणतील! आमच्या बायकोचा हा पेटंट डायलॉग. टिम्बटिम्ब च्या जागी कधी आई (माझी आई, तिची सासू. तिला आई म्हणायची कल्पना तिचीच. कारण आई काय म्हणतील!), कधी शेजारी, कधी भाउजी, कधी मैत्रीण असे सगळे आलटून पालटून हजेरी लावत असतात. मी काय म्हणेन याचं जर का एक शतांश जरी टेंशन माझ्या बायकोला कधी आलं असतं ना तर शपथ हा लेख/मनोगत/मुक्तक/दर्दभरी कहाणी लिहलीचं नसती. पण तेवढे आमचे ग्रह काय मजबूत नाहीत. एका अर्थाने तेही बरंच आहे म्हणा, म्हणजे मी तिच्या रडारवर सहसा नसतो असा मी त्याचा सोयीस्कर अर्थ लावून घेतला आहे. समजा चुकून तुम्ही रडारवर आलात, तिकडची फ्रीक्वेंसी- इकडची फ्रीक्वेंसी नाही जुळली तर कमीत कमी 2 दिवस आणि जास्तीत जास्त आठवडाभर खड़खडाट ऐकण्याची तुमची तयारी असली पाहिजे. नॉइज कॅनसलेशन साठी मग काही कारण नसताना शॉपिंगला घेऊन जाणे, पैसा नाम शोहरत सब मोहमाया है हे स्वतःला बजावून एखादी सरप्राइज सहल काढणे, त्यात डिनरला बाहेरच थांबणे ( सरप्राईज सहलीला नेल्यावर परत येताना काही नाही रात्री खिचडीच केलीस तरी चालेल असं म्हणणं म्हणजे आतापर्यंत कमावलेल सगळ पुण्य अक्कलखाती जमा करणे) अशी सगळी कसरत करावी लागते. एका गोष्टीच मला आश्चर्य वाटतं एरवी घरात या भिंतीच त्या भिंतीला ऐकू जाणार नाही ही काळजी घेणाऱ्या बायका नवऱ्याशी भांडताना मात्र कोण काय म्हणेल याच्याशी त्यांना अजिबात घेणंदेणं नसतं. अशा एखाद्या अनुभवातून गेलेले सगळे नवरे लोक मंदिरात देवापुढे शांत हात जोडून नमस्कार करतात. मनोभावे प्रार्थना करतात तुझं सुरक्षाकवच असंचं बरोबर राहू दे. तिथं जर तुम्ही सुंदर दिसते म्हणून बायकोकडे ( किंवा इतर कुठे) टक लावून बघत बसलात तर तिथल्या तिथे "अहो काय हे मंदिरात आलोय आपण. देव/देवी काय म्हणेल?" असा प्रश्न कम विधान आलंच म्हणून समजा. हा प्रश्न आहे असं चुकूनही समजू नका. आजकाल मी माझ्या बायकोशी बोलताना ती मला प्रश्न विचारत नाही, विधानचं करतीये असं ग्रुहीत धरतो. त्यामुळे माझे बरेच प्रश्न सॉल्व झालेत असं मला वाटतं. तर या काय म्हणतील अध्यायात बरेचदा लोक काय म्हणतील हे आवर्तन येतं. यात लोक म्हणजे कोण हे मला आजतागायत कळलेले नाही. म्हणजे बघा बायकोला आवडती म्हणून कधी भेळ घेऊन या घरी. त्याचं कौतुक नसतं त्यांना. त्यांना काळजी कुठल्या गाडीवरून आणली, लिफ्टमधुन येताना वरच्या मजल्यावरच्या सोनीनी तर नाही पाहिले, दार उघडताना शेजारनीने तर नाही पाहिले या. बर आता या काय समस्या आहेत का? तुम्हीच सांगा ऑफीसजवळच्या गाडीवरून आणली म्हणाव तर काय म्हणतील ऑफीसमधले लोक. घराजवळच्या गाडीवरून आणली तर काय म्हणतील बिल्डिंगमधले लोक! सोनीसारखी फिगर नाही म्हणून सोनीजवळ रडताना तिन सांगितल म्हणून जंक फुड टाळायचं माझ्या बायकोने केलेलं प्रॉमिस मला कसं माहीत असेल. अशा वेळी तिला मी दिसलो भेळपुरीचं पुडक नाचवताना तर ती टवळीची आपलं ते हे चवळीची शेंग म्हणजे सोनी काय म्हणेल. शेजारीन तर टपलेलीचं असते टोमणे मारायला. "काय ग लकी आहेस! तुझ्या ह्यांच्या बरं बाई लक्षात रहात असं काहीबाही आणायला. आमचे हे तर कुठं म्हणून वाट वाकडी करत नाहीत." आता यात टोमना काय आहे? चांगली नवऱ्याची स्तुती ऐकून कॉलर ताठ करायची सोडून ही माझ्याकडे खाऊ का गिळू नजरेने बघते आणि शेजारनीची तोंडभर हसून बोळवण करते. च्यामारी पैसे माझे, भेळपुरी माझी, घर माझं, फिगर माझी आपलं ते हे माझ्या बायकोची आणि हे कोण लोक काय म्हणतील म्हणून आम्ही भेळ खायची नाही. शुद्ध अन्याय आहे हा. या काय म्हणतील अध्यायात अजून एक कष्टदायक प्रकार म्हणजे घरी कुणी येणं. तुम्हाला सांगतो माझी बायको लहान होती अगदी तान्ही तेव्हा रहायची त्या चाळीतल्या एक काकू त्यांच्या मावस भावाच्या मुलाच्या की मुलीच्या दिराच्या लग्नाला जवळच येणार आहेत म्हणल्यावर हिने सरळ घर स्वच्छ केले पाहिजे हा फतवा काढला. बरं आता त्या नक्की घरी येतो असंही काही म्हणाल्या नसताना एवढा त्रागा करून घर आवरायची काय गरज? पण काकू काय म्हणतील असं घर बघून हे पालुपद ऐकवत बायको घरभर फिरते आणि झाडू घेऊन मी मागे मागे. बरं यावर माझ्या सुपीक डोक्यातून निघालेली कल्पना म्हणजे लग्नाच्या दिवशी काकुंचा फोन आला की सांगून टाकायचे जरा काम आलं म्हणून बाहेर आलोय. वेळ होईल थोडा. (तुम्ही निघा हे सबटायटल असतं या संवादाचं). अरे हाय काय नाय काय. बात खतम. पण नाही हा उपाय सुचेपर्यंत बायकोच्या डोक्यात स्वच्छता अभियानाचा किडा भिनलेला असतो त्यामुळे "बरं दिसतं काते" एवढ्या तीन शब्दात माझ्या सुपीक कल्पनेला नापाक केलं जात. काय म्हणतील नंतर बरं दिसतं काते आलं की तुमच्या डोक्यात धोक्याची घंटी वाजलीचं पाहिजे. माझे कुणी नातेवाईक आले की काय होतं याचं वर्णन मी अजिबात करत बसणार नाही. तर मुद्दा हा आहे की मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे असं कुठल्याशा पुस्तकात मी वाचलंय. तर अशा या प्राण्याने उठसुठ हा काय म्हणेल तो काय म्हणेल असं विचार करत बसण्यापेक्षा सरळ बस्तान बांधून हिमालयात जावे. त्यातल्या त्यात आजुबाजुला कमी मनुष्यप्राणी असतील अशा ठिकाणी जाऊन रहावे. हे मी माझ्या बायकोला तोंडावर नाही ना सांगू शकत. पण ते महत्वाचं नाही. मनातल्या भावना व्यक्त होणं महत्वाचं आहे. एक विनंती आहे माझ्या बायकोला यातलं काही कळू देऊ नका. अहो उद्या ती माझ्या गळ्यात पडून म्हणाली, "एवढी का मी दुष्ट आहे?" तर ... काय म्हणतील? बरं दिसतं काते?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
इतिहास
विनोद
जीवनमान
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
मत
सल्ला
माहिती
संदर्भ
मदत
वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
17593 वाचन

💬 प्रतिसाद (50)

प्रतिक्रिया

लेख चांगला लिहिला आहे. काय

कानडाऊ योगेशु
Sat, 05/14/2016 - 14:09 नवीन
लेख चांगला लिहिला आहे. काय म्हणतील ह्यावरुन गुरु ठाकुरची ही कविता आठवली.पण लोक काय म्हणतील
  • Log in or register to post comments

काय हे? खुसखुशीत नाय तर नाय

रातराणी
Sat, 05/14/2016 - 14:19 नवीन
काय हे? खुसखुशीत नाय तर नाय गेला बाजार खिक्क तरी प्रतिसाद द्यायचा. श्या. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

बरं हे घ्या... खिक्क!!!

संजय पाटिल
Sat, 05/14/2016 - 15:20 नवीन
बरं हे घ्या... खिक्क!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

हाहा

चाणक्य
Sat, 05/14/2016 - 14:16 नवीन
छान हलकाफुलकं लिखाण. आवडलं.
  • Log in or register to post comments

धन्यवाद! :)

रातराणी
Sat, 05/14/2016 - 14:21 नवीन
धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य

हे हे हे !

सस्नेह
Sat, 05/14/2016 - 14:23 नवीन
हे हे हे !
  • Log in or register to post comments

चला आता मी डोळे मिटायला मोकळी

रातराणी
Sat, 05/14/2016 - 14:28 नवीन
चला आता मी डोळे मिटायला मोकळी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

एवढ्यात ? :)

सस्नेह
Sat, 05/14/2016 - 14:34 नवीन
एवढ्यात ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

कायमचे नाय गो. उगी उगी :)

रातराणी
Sat, 05/14/2016 - 21:01 नवीन
कायमचे नाय गो. उगी उगी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

स्फुट आवडले....

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 05/14/2016 - 14:52 नवीन
बरं दिसतं काते? ह्या तीन शब्दांऐवजी बरं दिसतं का ते? असे ४ शब्द असायला हवे होते. चार भिंतीतल्या गोष्टी अशा चारचौघात लिहिल्या तर लोक काय म्हणतील? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

वसुधैव कुटुम्बकम. त्यामुळे

रातराणी
Sat, 05/14/2016 - 21:07 नवीन
वसुधैव कुटुम्बकम. त्यामुळे आमच्या घराला भिंती नाहीत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

तुम्हांला हे कसं काय लिहिता

एस
Sat, 05/14/2016 - 14:54 नवीन
तुम्हांला हे कसं काय लिहिता आलं? बादवे, खिक्क्! :-)
  • Log in or register to post comments

शमतहे! ऎलतीरावरून पैलतीरावरचे

किसन शिंदे
Sat, 05/14/2016 - 15:14 नवीन
शमतहे! ऎलतीरावरून पैलतीरावरचे कसे पाह्यलेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

खिक्क...कुच तो गडबड है

टवाळ कार्टा
Sat, 05/14/2016 - 16:22 नवीन
खिक्क...कुच तो गडबड है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

काय नाय दुसरा चष्मा घातला ;)

रातराणी
Sat, 05/14/2016 - 21:08 नवीन
काय नाय दुसरा चष्मा घातला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

खुसखुशीत! खिक्क!

यशोधरा
Sat, 05/14/2016 - 15:27 नवीन
खुसखुशीत! खिक्क!
  • Log in or register to post comments

आयडीशी विसंगत लिखाण . ;-)

उगा काहितरीच
Sat, 05/14/2016 - 16:00 नवीन
आयडीशी विसंगत लिखाण . ;-) रच्याकने चांगलं लिहीलंय .
  • Log in or register to post comments

असं आप्ल्याआपल्यातले

अभ्या..
Sat, 05/14/2016 - 16:31 नवीन
असं आप्ल्याआपल्यातले चव्हाट्यावर आणू नये हो. बरे दिसते का हे?
  • Log in or register to post comments

सुरुवात वाचून मला वाटलं एखादा

जव्हेरगंज
Sat, 05/14/2016 - 16:50 नवीन
सुरुवात वाचून मला वाटलं एखादा डुआय उघडा पडला की काय ;)
  • Log in or register to post comments

खिक्क असा प्रतिसाद देणाऱ्या

रातराणी
Sat, 05/14/2016 - 21:22 नवीन
खिक्क असा प्रतिसाद देणाऱ्या सर्व वाचकांचे आभार. खुसखुशीत असा प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना डब्बल धन्यवाद. आणि बरं दिसतं का असा अवघड प्रश्न विचारणार्या सर्वांना नंतर बघून घेणेत येईल. ;)
  • Log in or register to post comments

लिहिताना

पैसा
Sat, 05/14/2016 - 21:27 नवीन
बायकोची परवानगी घेतली होती का?
  • Log in or register to post comments

आणि बायकोनेच लेख लिहून घेतला

टवाळ कार्टा
Sat, 05/14/2016 - 21:29 नवीन
आणि बायकोनेच लेख लिहून घेतला असेल तर???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अर्रर्र

पैसा
Sat, 05/14/2016 - 22:13 नवीन
रातराणी तै लेखिका हे पाह्यलेच नाही. मला वाटले कोणतरी बुवा आहे लेखक! मग शक्य आहे. डिक्टेट करून लिहून घेतला असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

डिक्टेट करून लिहून घेतला असेल

टवाळ कार्टा
Sat, 05/14/2016 - 22:24 नवीन
डिक्टेट करून लिहून घेतला असेल.
ख्याक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

डिक्टेट हा शब्द आधी डिटेक्ट

कानडाऊ योगेशु
Sat, 05/14/2016 - 22:44 नवीन
डिक्टेट हा शब्द आधी डिटेक्ट असा वाचला.! खिक्क! ख्वॉक्क!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

=))

पैसा
Sat, 05/14/2016 - 23:07 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

पैसा तै नी मला रातराणी तै

रातराणी
Sun, 05/15/2016 - 21:06 नवीन
पैसा तै नी मला रातराणी तै वगैरे म्हणलेले पाहून डोळे पाणाव्ले. पुढचं काही मी वाचलं नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हीहीही!

पैसा
Mon, 05/16/2016 - 14:30 नवीन
तुम्ही मुल्गी आहात असे म्हणता ना, म्हणून तै म्हटलं. नको तर राह्यलं. "अरे दादुस" म्हणेन. हाकानाका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

तेच तर तुमच्या मनातला सौंशय

रातराणी
Mon, 05/16/2016 - 22:50 नवीन
तेच तर तुमच्या मनातला सौंशय इतक्या लवकर मिटल्याचे पाहून डोळे पाणावले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

=))))) छान आहे डिक्टेशन ;)

अजया
Sun, 05/15/2016 - 10:10 नवीन
=))))) छान आहे डिक्टेशन ;)
  • Log in or register to post comments

रातराजातैंनी

बोका-ए-आझम
Sun, 05/15/2016 - 10:27 नवीन
चांगलं लिहिलं आहे.
  • Log in or register to post comments

हीही हाच डुआयडी घेऊन लिहणार

रातराणी
Sun, 05/15/2016 - 21:02 नवीन
हीही हाच डुआयडी घेऊन लिहणार होते. पण आहेत तेच सांभाळताना नाकी नऊ आलेत आणि रातराजा तर फारच ऑब्वियस झाला असता ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

बरं लिहीलंय,

नीलमोहर
Mon, 05/16/2016 - 14:15 नवीन
अन झेपत नाहीत तर घ्यावे कशाला सत्राशेसाठ डुआयडी ? त्यात आणि बेअरिंग सांभाळायचीही मारामार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

तुम्ही क्लास घेणार का? ;)

टवाळ कार्टा
Mon, 05/16/2016 - 14:25 नवीन
तुम्ही क्लास घेणार का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

आं आं अच्चं नाय कलाचं,

नीलमोहर
Mon, 05/16/2016 - 14:54 नवीन
अशे आप्ले शिक्रेत नाय ओप्न कलाचे.. ल्ल्लूलूउउऊऊ काय असेल ते :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अजून पर्यंत माझा एकही डूआयडी

रातराणी
Mon, 05/16/2016 - 22:55 नवीन
अजून पर्यंत माझा एकही डूआयडी कुणीही ओळखला नाहीये. ही हा हा. लावते का पैज ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

पैज लावायला पाहिजे होती

एस
Wed, 05/25/2016 - 21:43 नवीन
पैज लावायला पाहिजे होती नीमोंनी. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

हा हा हा सहिए

एक एकटा एकटाच
Sun, 05/15/2016 - 10:28 नवीन
हा हा हा सहिए
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

रातराणी
Sun, 05/15/2016 - 21:03 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments

खुसखुशीत!

पद्मावति
Mon, 05/16/2016 - 13:57 नवीन
खुसखुशीत!
  • Log in or register to post comments

कहानी

नाखु
Mon, 05/16/2016 - 14:08 नवीन
घर (चक्कर) घर की..... आणी खुस्खुशीत पणाला ही आमची दाद... टीएम्सींच्या प्रतिसाद प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments

फारच कर्णमधुर दाद! :)

रातराणी
Mon, 05/16/2016 - 23:01 नवीन
फारच कर्णमधुर दाद! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

खुसखुशीत आणि खिक्क खुप झाल्या

राजाभाउ
Mon, 05/16/2016 - 14:34 नवीन
खुसखुशीत आणि खिक्क खुप झाल्या मुळे आणि त्या लोकांचे अधीच अभार मानुन झाल्यामुळे अवडेश
  • Log in or register to post comments

तुमचे स्पेशल आभार :)

रातराणी
Mon, 05/16/2016 - 23:02 नवीन
तुमचे स्पेशल आभार :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

खलास भावनाकथन ! कसली आर्तता

वेल्लाभट
Mon, 05/16/2016 - 16:46 नवीन
खलास भावनाकथन ! कसली आर्तता आहे
हे मी माझ्या बायकोला तोंडावर नाही ना सांगू शकत
या वाक्यात.... दर्द आहे दर्द... हे वाक्यच या लेखाचा पाया आहे आणि कळसही. वा वा. पुरेपूर हसलो.
  • Log in or register to post comments

मला उनक मध्ये घेतल तर मी उनक

रातराणी
Mon, 05/16/2016 - 23:03 नवीन
मला उनक मध्ये घेतल तर मी उनक लोकांना अजून टिप्स देईन बर का ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

उनकसंस्थापक सध्ध्या सात्विक

टवाळ कार्टा
Wed, 05/25/2016 - 23:18 नवीन
उनकसंस्थापक सध्ध्या सात्विक आहार समीतीच्या मीटिंगमध्ये व्यस्त आहेत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

एका गोष्टीच मला आश्चर्य वाटतं

शाम भागवत
Wed, 05/25/2016 - 20:36 नवीन
एका गोष्टीच मला आश्चर्य वाटतं एरवी घरात या भिंतीच त्या भिंतीला ऐकू जाणार नाही ही काळजी घेणाऱ्या बायका नवऱ्याशी भांडताना मात्र कोण काय म्हणेल याच्याशी त्यांना अजिबात घेणंदेणं नसतं.
हे एकदम पटलं. पण हे दोन्ही बाजूंनी खरे आहे म्हणा. :-))
  • Log in or register to post comments

ठीकठाक जमलाय. दुसरा कुणाचा

मृत्युन्जय
गुरुवार, 05/26/2016 - 10:17 नवीन
ठीकठाक जमलाय. दुसरा कुणाचा असला असता तर छान म्हटले असते पण तुमच्याकडुन अपेक्षा जास्त आहेत :)
  • Log in or register to post comments

मस्त जमलाय !!!

चिनार
गुरुवार, 05/26/2016 - 11:24 नवीन
मस्त जमलाय !!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा