हल्लीच मधुर जाफरी यांच्या पुस्तकात एक वाक्य वाचून आश्चर्य वाटले.
(एका हिंदी शिक्षकाबद्दल) "मला वाचनाचे प्रेम आहे हे जाणून, त्याने मला आमच्या अभ्यासक्रमाच्या अगदी बाहेरील हिंदी कादंबर्या आणि कविता वाचायचे सुचवले, ... जशी आमच्या स्वातंत्र्यलढ्याविषयीची हरिवंश राय बच्चनांची कविता, मधुशाला." (पुस्तक नाव : क्लाइंबिंग द मँगो ट्रीज़, २००५)
"मधुशाला" ही हरिवंश राय बच्चनांची कविता मी पूर्ण कधीच वाचलेली नाही. पण काही थोडी कडवी मन्ना दे यांनी चाल लावून म्हटली आहेत ती ऐकलेली आहेत - तीही शब्दांच्या अर्थाकडे लक्ष न देता त्या मस्त ओघात गुंग होऊन डुबल्यासारखे, आणखी काही नाही.
त्यामुळे, या कवितेचा विषय उमर खय्यामच्या रुबायांसारखा काहीसा असावा, साधारण सूफी प्रकारचेच तत्त्वज्ञान फारसी-उर्दूऐवजी हिंदुस्तानी-हिंदीत सांगितले आहे, अशी माझी धारणा होती.
आताच या कवितेवर या ठिकाणी नजर भिरभिरवली (दुवा) :
तर पहिली काही कडवी माझ्या आधीच्या कल्पनेला पोषक होती, उदाहरणार्थ,
...
प्रियतम, तू मेरी हाला है, मैं तेरा प्यासा प्याला,
अपने को मुझमें भरकर तू बनता है पीनेवाला,
मैं तुझको छक छलका करता, मस्त मुझे पी तू होता,
एक दूसरे की हम दोनों आज परस्पर मधुशाला।।३।
...
पण येथे हे फार पुढचे कडवे घ्या :
हिम श्रेणी अंगूर लता-सी फैली, हिम जल है हाला,
चंचल नदियाँ साकी बनकर, भरकर लहरों का प्याला,
कोमल कूर-करों में अपने छलकाती निशिदिन चलतीं,
पीकर खेत खड़े लहराते, भारत पावन मधुशाला।।४४।
आणि हे :
धीर सुतों के हृदय रक्त की आज बना रक्तिम हाला,
वीर सुतों के वर शीशों का हाथों में लेकर प्याला,
अति उदार दानी साकी है आज बनी भारतमाता,
स्वतंत्रता है तृषित कालिका बलिवेदी है मधुशाला।।४५।
...
तर या कवितेच्या इतिहासाबद्दल कोणी मला सांगू शकेल काय? "स्वातंत्र्यलढ्याबद्दलची कविता" असे ढोबळ विवरण बरोबर आहे काय?
प्रतिक्रिया
21 Jan 2008 - 6:48 pm | विसोबा खेचर
धन्याशेठ,
खुद्द बच्चनसाहेबांनी याची काही कडवी गायली आहेत, ती इथे ऐका..
मधुशालेतील काही कडवी मलाही खूप आवडतात. जसे,
एक बरस में एक बार ही
जगती होली की ज्वाला
एक बार ही लगती बाजी
जलती दीपों की माला
दुनियावाले किन्तु किसी दिन
आ मदिरालय में देखो
दिन को होली, रात दिवाली
रोज मनाती मधुशाला!
क्या बात है..:)
अर्थात, ही कविता नक्की कुठल्या संदर्भात लिहिली गेली आहे हे जाणून घ्यायला मीही उत्सुक आहे. मला वाटतं, धोंड्याशेठ या विषयावर अधिक काही प्रकाश टाकू शकतील. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा बर्यापैकी अभ्यास आहे मधुशालेचा.
असो!
धन्याशेठ, इतका सुंदर विषय मिपावर चर्चेला आणल्याबद्दल मी तुझे अभिनंदन करतो...
आपला,
(मधुशालाप्रेमी) तात्या.
21 Jan 2008 - 6:51 pm | नंदन
गूगलून येथे, येथे आणि येथे तुरळक माहिती मिळाली.
पहिल्या पत्नीचे (श्यामा) निधन झाल्याने आलेली विमनस्कता ही या कवितेमागची प्रेरणा असावी. तसेच तिसर्या दुव्यात म्हटल्याप्रमाणे, एकाच रुपकाचा वेगवेगळ्या कडव्यांत वेगवेगळा उपयोग करून घेतलेला दिसतो आहे.
बाकी, याबाबत काही विशेष माहिती नाही. तात्याने म्हटल्याप्रमाणे, धोंडोपंतांसारख्या जाणकारांकडून या कवितेबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
21 Jan 2008 - 9:52 pm | धोंडोपंत
मधुशाला इथे आणल्याबद्दल धन्यवाद.
नंदनरावांनी व्यक्त केलेल्या विचारांशी आम्ही सहमत आहोत. श्यामाजींच्या मृत्यूनंतर अत्यंत खिन्न अवस्थेत असलेल्या हरिवंशरायजींकडून हे "महाकाव्य"लिहून झाले.
स्वातंत्र्यलढ्याशी याचा संबंध काय?
मधुशालेचा थेट संबंध उमर ख़य्यामशी जोडला जातो. आम्हाला स्वत:ला ते पटत नाही. उमर ख़य्याम ही मधुशालेमागची प्रेरणा असू शकेल, पण प्रतिभा ही हरिवंशरायजींचीच आहे. ही उमर ख़य्यामच्या रूबाईयांची नक्कल नव्हे.
केवळ हाला, प्याला, डाला, साक़िबाला, वाला, आणि मधुशाला एवढ्या यमकांवर जे भावविश्व हरिवंशरायजींनी उभे केले ते अजब आहे.
त्यांच्या प्रतिभेला आमचा दंडवत.
यदि इन अधरोंसे दो बातें
प्रेमभरी करती हाला;
यदि इन सूने हाथोंका जी
पलभर बहलाता प्याला;
हानि बता जग तेरी क्या है?
व्यर्थ मुझे बदनाम न कर,
मेरे टुटे दिल का है बस
एक खिलौना मधुशाला....
आपला,
(प्रभावित) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
23 Jan 2008 - 5:19 am | धनंजय
ज्वाला, छाला, माला, ताला, काला...
अशी यमकेही आहेत :-)
पण तरीही त्या थोड्यांच यमकांची मर्यादा न होता पुरेपूर अर्थ छलकतो.
21 Jan 2008 - 10:38 pm | मुक्तसुनीत
मधुर जाफरी यांच्या गोस्ट रायटरची ही डुलकी असू शकते ;-)
23 Jan 2008 - 5:26 am | धनंजय
ती तुरळक थोडी कडवी सोडलीत तर भारतमातेचा, स्वातंत्र्यलढ्याचा संदर्भ लागत नाही.
कवीच्या तल्लीनतेचा देशभक्ती म्हणून अर्थ लावून पुष्कळ कडवी वाचता येतात, पण तो अर्थ ओढल्या-ताणल्यासारखा भासतो. आता १९३५ मध्ये उल्लेख छुपेच असणार असे कोणी म्हटल्यास त्याला काय उत्तर द्यावे?
तरी श्यामा यांच्या निधनामुळे झालेला शोक ही स्फूर्ती असल्याचा उल्लेख हाच अधिक सयुक्तिक वाटतो.
23 Jan 2008 - 5:13 am | धनंजय
मेंहदी रंजित मृदुल हथेली पर माणिक मधु का प्याला,
अंगूरी अवगुंठन डाले स्वर्ण वर्ण साकीबाला,
पाग बैंजनी, जामा नीला डाट डटे पीनेवाले,
इन्द्रधनुष से होड़ लगाती आज रंगीली मधुशाला।।१२।
येथे तिसर्या ओळीचा अर्थ काय?
पाग : ?मिठाईचा प्रकार?
जामा : ?वस्त्र? (साकीबालेचे?)
डाट : बूच (सुरईचे बूच)?
इंद्रधनुषी विविधरंग कळण्यासाठी या वस्तू आणि त्यांचे रंग कळणे आवश्यक वाटते.
अवांतर : आताच्या बारगर्ल्स सोडा, पण १९३५ काळात (पाश्चिमात्य न झालेले) हिंदुस्थानी जात त्या गुत्त्यांत मुली वेटरकाम करत काय? गोव्यातील बारमध्ये पूर्वी केवळ पुरुष वेटर असत. की ही मधुशाला कोठ्याचे चित्रण आहे (रूपकात्मक, उपमास्वरूप, काही असो), असे मानावे?
23 Jan 2008 - 9:32 am | चतुरंग
पाग = फेटा/डोक्यावरील वस्त्र
बैंजनी = जांभळा
जामा = साकीबालेचे वस्त्र
डाट = बूच
डटे = जमकर
ता (तांबडा = मेंदी) -ना (नारिंगी = ?) पि (पिवळा = स्वर्ण वर्ण) हि (हिरवा = अंगूर) -नि (निळा = वस्त्र) -आ (आकाशी = ?) जा (जांभळा = फेटा)
मेंदी रंगित नाजुक हाती घेउन तो प्याला
सोमरसा त्या पुरवितसे ती स्वर्ण वर्ण बाला
नील-जांबु त्या वसनांसंगे वारुणि 'तो प्याला'
सप्तरंगही फिकेच पडतिल आज रंगण्या मधूशाला
चतुरंग
25 Jan 2008 - 12:21 am | धनंजय
- सुंदर अनुवाद!
25 Jan 2008 - 12:32 am | ऋषिकेश
मेंदी रंगित नाजुक हाती घेउन तो प्याला
सोमरसा त्या पुरवितसे ती स्वर्ण वर्ण बाला
नील-जांबु त्या वसनांसंगे वारुणि 'तो प्याला'
सप्तरंगही फिकेच पडतिल आज रंगण्या मधूशाला
वाह क्या बात है चतुरंगराव! आवडलं
-ऋषिकेश
25 Jan 2008 - 12:44 am | धनंजय
म्हणजे तसे विभाग नाहीत. पण असे दिसते की एका-एका विशाल रूपकाची छोटी छोटी रूपके करून सांगणार्या रुबाया एकत्रित केलेल्या आहेत. त्यामुळे एक रूपक काही रुबायांसाठी समर्पक दिसते, मग पुढच्या काही रुबायांत रूपक बदलत जाताना आपल्याला दिसते. इतकेच काय, पूर्वार्धातील रूपकांत मधुशाला ही चांगल्या अशा कुठल्या-कुठल्या ध्येयाचे, ध्यासाचे, नैसर्गिक कल्पनेचे रूपक आहे. उत्तरार्धात मधुशाला नाशिवंत सौख्य देणारी फसवी आहे, अशी रूपके आहेत. त्यामुळे प्रत्येक रुबाई स्वतंत्र असली तरी क्रमाला काही अर्थ आहे, त्या क्रमात वाचल्याने काव्याची काही अधिक अनुभूती होते.
येथे जरी मी कल्पनेने "विभाग" पाडत असलो, तरी कल्पना एकातून पुढची खुलत जाते - विभागांच्या मध्ये स्पष्ट सरहद्दी नाहीत...
---
१.ते ५. (माझ्या मते प्रास्ताविक रुबाया)
मृदु भावों के अंगूरों की आज बना लाया हाला,
प्रियतम, अपने ही हाथों से आज पिलाऊँगा प्याला,
पहले भोग लगा लूँ तेरा फिर प्रसाद जग पाएगा,
सबसे पहले तेरा स्वागत करती मेरी मधुशाला।।१।
...
मधुर भावनाओं की सुमधुर नित्य बनाता हूँ हाला,
भरता हूँ इस मधु से अपने अंतर का प्यासा प्याला,
उठा कल्पना के हाथों से स्वयं उसे पी जाता हूँ,
अपने ही में हूँ मैं साकी, पीनेवाला, मधुशाला।।५।
या पाच रुबायांत मधुशाला हे कवीच्या काव्यासाठीच रूपक म्हणून योजले आहे. पण प्रथम वाचकाला पिलवणारा साकी कवी आहे, तर शेवटी काव्यमय हाला पिलवणारा आणि पीणारा खुद्द कवीच आहे. श्रोत्याला काव्य सुनवता-सुनवता कवीच अंतर्मुख होतो. या प्रकारे या प्रास्ताविकातून या कल्पनेने पुढच्या आत्मचिंतनात्मक/तत्त्वबोधी रुबायांच्या उंबरठ्यावर बच्चन आपल्याला आणून सोडतात.
25 Jan 2008 - 12:45 am | प्राजु
चतुरंग राव,
आपण संपूर्ण मधुशाला का नाही अनुवाद करत..? कराल का? आवडेल आम्हाला.
- प्राजु.
25 Jan 2008 - 1:08 am | चतुरंग
हे भलतं अवघडच च्यालेंज टाकलत की हो समोर.
अहो डॉ. बच्चन साहेब कुठे आम्ही कुठे?
...पण तरीही हरकत नाही.....पुलंच्या भिकंभट काकांसारखे मी ही म्हणेन "राजहंसाचे चालणे, असेल देखणे.. पण म्हणोन ह्या भिकंभटाने चालोचि नयें ऽऽ कांय!!"
असो, ह्यात काही प्रगती करु शकलो तर मि.पा.वर लिहीनच.
चतुरंग
26 Jan 2008 - 2:14 am | धनंजय
रुबाया ६ ते १० (हरवलेल्या, इच्छुक मतवाल्याने मधुशालेपर्यंत कसे पोचावे)
मदिरालय जाने को घर से चलता है पीनेवला,
'किस पथ से जाऊँ?' असमंजस में है वह भोलाभाला,
अलग-अलग पथ बतलाते सब पर मैं यह बतलाता हूँ -
'राह पकड़ तू एक चला चल, पा जाएगा मधुशाला।'। ६।
...
सुन, कलकल़ , छलछल़ मधुघट से गिरती प्यालों में हाला,
सुन, रूनझुन रूनझुन चल वितरण करती मधु साकीबाला,
बस आ पहुंचे, दुर नहीं कुछ, चार कदम अब चलना है,
चहक रहे, सुन, पीनेवाले, महक रही, ले, मधुशाला।।१०।
मागच्या विभागात मधुशाला हे काव्याचे रूपक होते. येथे ते गंतव्य ठिकाणाचे रूपक आहे. तिथे पोचायची इच्छा असली तरी जाणार्याला रस्ता ठाऊक नाही. "चालायला लाग, आपोआप पोचशील", असा कृतीशील संदेश वेगवेगळ्या प्रकारे या पाच कडव्यांत बच्चन देतात. यात शेवटच्या कडव्यात कानांना मधुशालेतली रुणझुण आणि कलकल, छलछल ऐकू येते आहे. यातून पुढच्या विभागाच्या उंबरठ्यावर पोचतो, जिथे पोचल्यानंतर मधुशालेच्या दृश्य, श्राव्य अनुभवांचे वर्णन आहे.