हिरव्या डोंगराच्या
कुशीत विसावणारा !
खळखळणार्या नद्यांच्या,
काठावर वसणारा !!
मंदिरातील घंटानादातून,
चैतन्य फुलवणारा !
साग्रसंगीत पूजेच्या,
सुगंधात रमणारा !!
परंपरांची कास धरणारा,
रिवाजांचा मान ठेवणारा !
नव्या युगाचे स्वागत ,
उत्साहाने करणारा !!
निसर्गाचे उपकार मानणारा,
निसर्गाचा ठेवा जपणारा !
मुक्या जीव-जनावरांना,
प्रेमाने वाढवणारा !!
सत्याचा मान राखणारा,
अन्यायाला ठेचणारा !
आणि उदार मनाने,
क्षमा करणारा !!
स्वाभिमान जपणारा,
मान - सन्मान देणारा !
दुःखितांच्या वाटेवरही,
फुले पसरवणारा !!
*****----------******-------------
Written by - Nilam Buchade.
प्रतिक्रिया
14 May 2016 - 2:23 pm | प्रचेतस
अहाहा...!
सुंदर कविता.
14 May 2016 - 2:46 pm | चांदणे संदीप
आसं नै करायच वल्लीदा! आम्हांला हळूच हसू येत ना मग...!
खिक्क!
Sandy
14 May 2016 - 2:51 pm | किसन शिंदे
मला पण एक काव्य(?) सुचतेय..
पाहून तिला त्याची कळी खुलताना
जवळ येता ती मनास आनंद होताना
त्या दोघांचे प्रेम बहरत असताना
बाप येतो तिचा, मनात नसताना
कानाखाली आवाज निघतो त्याच्या
काही कारण नसताना
माननीय प्रचेतस सरांच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत...
14 May 2016 - 3:30 pm | ज्ञानोबाचे पैजार
गोल फिरणार्या खुर्चीत
ऐटीत बसणारा
भल्या मोठ्या टेबला मागुन
वसकन ओरडणारा
येताजाता उगीच
समोरच्याची लायकी काढणारा
स्वतःच्याच विश्र्वात
रममाण रहाणारा
समोर काय आहे
ते कधीही न बघणारा
समोर काय नाही
ते सतत शोधणारा
भल्या मोठ्या डेटाशीट वरच्या
चुकीच्या आकड्यावरच बोट ठेवणारा
उशीरा पर्यंत थांबायचे असले
की गोडगोड बोलणारा
समोरचा माणुस काय सांगतो
ते कधिही न ऐकणारा
आणि जे काम ठरले नाही
ते झाले कसे नाही? असे विचारणारा
हाताखालच्या लोकांसमोर
बढाया मारणारा आणि
मोठ्या साहेबांच्या समोर
शेपुट पायात घालणारा
भर उन्हाळ्यात कोट आणि टाय
घालुन फिरणारा
शिल्लक राहिलेल्या चार केसांनी
टक्कल झाकाचा केविलवाणा प्रयत्न करणारा
भले मोठे पोट
पट्याने घट्ट आवळणारा
सासुबाई आजारी आहेत असे सांगुन
आयपीएल बघायला जाणारा
बाकिच्यांनी रजा मागितली की
पेंडिंग कामाची यादी दाखवणारा
पैजारबुवा,
14 May 2016 - 3:33 pm | किसन शिंदे
=)) =))
14 May 2016 - 3:49 pm | संजय पाटिल
=)=)
14 May 2016 - 4:55 pm | चांदणे संदीप
ते अन्यायाला ठेचणारा आणि उदार मनाने क्षमा करणारा, ह्या क्याटेग्रीत येत नै का तुमचा बॉस?
Sandy
14 May 2016 - 4:58 pm | प्रचेतस
आहाहाहा...!!!
पैजारबुवांची कविता डब्बल सुंदर
14 May 2016 - 9:56 pm | कानडाऊ योगेशु
पण नक्की हा गाव कुठला नदीच्या काठी?