आज सकाळीच वंदना विटणकर याचे परिकथेतील राजकुमारा हे सुरेल गीत ऐकल आणि संध्याकाळी आम्हाला 'अल्पवयीन, संपुर्ण शारिरीक वाढ झालेला पण बौद्धिक वाढ अपुर्ण असलेला' अ.शे.मोगलगिद्दिकर यांचे ऐतिहासीक दस्ताऐवजांचा आभ्यासपुर्वक रुमाल वाचायला मिळाले.. आणि न राहून आम्ही हे गाणे गुणगुणायला लागलो
परिकथेतील राजकुमारा
खरडी सार्या बघशील का?
काय चालले तरी मिपावर
लेख तयाचा लिहिशील का?
या नावांचे गूढ इशारे
बघ ते वाचून जाणून सारे
'काल्पनिक ही' जरी म्हणोनी,
तर्री आम्हा देशील का?
खरडवही ही कुणी खरडली
दिवसा रात्री नित्य उघडली
त्या चर्चाची साक्ष अम्हाला,
'रुमाला'तूनी देशील का?
हसून तुजला देतील टाळी
प्रतिसाद ही देतील खाली
कविजनांची एक सुपारी,
हाता सरशी घेशील का?
लाजवाब ही तुझी लेखणी
दाखविले तू चित्र लोचनी
नवटाकी या "केश्या"ची ही,
कधी हजामत करशील का?
केशवसुमार
प्रतिक्रिया
20 Jan 2009 - 3:44 am | लिखाळ
दंडवत !
-- लिखाळ.
20 Jan 2009 - 7:00 am | घाटावरचे भट
कोपरापासून...
20 Jan 2009 - 11:21 am | परिकथेतील राजकुमार
आपल्या अगाध प्रतिभेला आणी स्वतःवरील विनोद अत्यंत खेळीमेळीने घेण्याच्या वृत्तीला आमचे लाख सलाम
___/\___
अतिशय सुंदर पद्य !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
20 Jan 2009 - 3:46 am | चतुरंग
तुमच्या परिकथामय प्रतिभेला आमचा साष्टांग नमस्कार! :) :)
चतुरंग
20 Jan 2009 - 6:23 am | समिधा
खुपच छान झालिय कविता,खरच परिकथेतील राजकुमार अवतरला तर हे सगळ नक्की करेल. :)
त्याला ही आपल्या बरोबर मि. पा. वर यायला आवडेल. 8>
20 Jan 2009 - 7:34 am | अनिल हटेला
नवटाकी या "केश्या"ची ही,
कधी हजामत करशील का?
=)) =))
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
20 Jan 2009 - 7:52 am | आनंदयात्री
गद्यलेखनावर कविता !!
गध्य कविता असे या लेखनप्रकाराचे नामकरण करण्यास हरकत नसावी !!
20 Jan 2009 - 9:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
एक लंबर कविता.
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
20 Jan 2009 - 8:06 am | सहज
केसुं समोर बहुतेक काही बोलायची पंचाईत होणार आहे.
तुमच्या परिकथामय प्रतिभेला आमचा साष्टांग नमस्कार!
हेच म्हणतो.
:-)
20 Jan 2009 - 8:41 am | मुक्तसुनीत
सहमत !
20 Jan 2009 - 9:26 am | अवलिया
सहमत
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
20 Jan 2009 - 9:06 am | अमोल केळकर
सह्ह्ही, खुप छान
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
20 Jan 2009 - 9:09 am | प्राजु
आपले पाय कुठे आहेत?? काढून ठेवा .. आम्हांला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. :)
गुरूजी........ यू रॉक!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
21 Jan 2009 - 11:29 am | मैत्र
हे मस्त प्राजुताइ :D
केसुभौ..
अशक्य आहात. लै भारी... आपल्या प्रतिभेला दंडवत..
20 Jan 2009 - 10:33 am | झेल्या
आपण एकदम 'ओरिजिनल' 'विडंबन'कार आहात..!
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
20 Jan 2009 - 6:14 pm | शितल
सहमत.
20 Jan 2009 - 10:50 am | केवळ_विशेष
___/ \___ :)
20 Jan 2009 - 11:42 am | विसोबा खेचर
नवटाकी या "केश्या"ची ही,
कधी हजामत करशील का?
हा हा हा! :)
20 Jan 2009 - 12:28 pm | श्रावण मोडक
...हा केशवसुमार. पावलांची प्रतिमा पाठवून द्या.
चांगले विडंबन. पण याहीपलीकडे जा. मूळ रचना इतकी सुरेख आहे की, तिचे विडंबन अधिक व्यापक विषयाला धरून चांगले करू शकाल. हे विडंबन चांगले, पण संदर्भचौकट अत्यंत विशिष्ट स्वरूपाची आहे. मिपाव्यवहार न कळणाऱ्यांना हे विडंबन काय कळायचे? तुमची प्रतिभा इथं कुठं अडकून पडू लागली?
20 Jan 2009 - 4:40 pm | केशवसुमार
20 Jan 2009 - 4:44 pm | लिखाळ
हा हा हा .. मी हाच फोटो डकवणार होतो.
-- लिखाळ.
20 Jan 2009 - 7:10 pm | श्रावण मोडक
सुरू केली आहे. हळद-कुंकू, तूप, वाती, उदबत्ती, नैवेद्य असा खर्च वाढला आहे. पूजेची सधने माझ्याकडे आहेतच. पुण्यात कधी येताहात? भेटून हा महत्त्वाचा प्रश्न सोडवून टाकू. :)
20 Jan 2009 - 5:05 pm | वाहीदा
वल्लाह क्या बात है !
~ वाहीदा
20 Jan 2009 - 5:13 pm | वाहीदा
जशी ईतरांची पत्रे वाचु नये असे म्हणतात तशी ईतरांची खरड वाचणे हे योग्य नसावे.
बाकी खरड ही सार्वजनीक असते but somewhere it is wrong unless it is been advised so
~ वाहीदा
20 Jan 2009 - 6:17 pm | सखाराम_गटणे™
ह्यावर व्यापक चर्चा होउ शकते.
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
22 Jan 2009 - 1:33 am | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार
(आभारी)केशवसुमार