(इच्छा अधूरी..)

नीलमोहर's picture
नीलमोहर in जे न देखे रवी...
3 May 2016 - 11:34 am

शून्य मनाने बसलो होतो अंधारात
आला तो तिकडून!
सांगितले खुणावत
येतीय भेटाया तुला!

किती आसुसलो मी!
निव्वळ चखण्यावर न भागणार
एकेका घोटा तहानलो मी!
आज आस सारी मिटणार

दिसली ती नजरेस
बनली जी माझी होण्यासाठी!
आता रिता झाला गिलास
नवा पेग भरून घेण्यासाठी!

थांब बे पेताडा
मालक गरजला!
बिल भरशील?
पेग भराया निघाला!

सा* गरिबी आड आली
क्वार्टरही हाती न लागली!
खंबा लावायची इच्छा
इच्छा अधुरीच राहिली!

बाटली गेली माघारी
बेवड्याचा संताप झाला!
आणि दारू सोडून
बेवडा बार बाहेर निघाला!

___________________
प्रेरणा: __/\__

** डेडपूल, प्रथम तर इतक्या सुरेख संकल्पनेचे बारा वाजवल्याबद्दल माफी असावी. मात्र एखाद्या रचनेचे विडंबन म्हणजे ती रचना उत्तम असल्याची पावती असते (आणि नाईलाजास इलाज नसतो ;) तेव्हा कृपया राग मानू नये. धन्यवाद.

कॉकटेल रेसिपीविडंबन

प्रतिक्रिया

स्पा's picture

3 May 2016 - 11:36 am | स्पा

के

मिपावरची काही जुनी चागली विडंबने आपण वाचावीत हि नम्र विनंती

विजय पुरोहित's picture

3 May 2016 - 11:43 am | विजय पुरोहित

नीमो अतिशय झकास जमले आहे विडंबन.
बाटली गेली माघारी
बेवड्याचा संताप झाला!
आणि दारू सोडून
बेवडा बार बाहेर निघाला!
अगदी दणदणीत एंड जमलाय.

DEADPOOL's picture

3 May 2016 - 11:45 am | DEADPOOL

एक नं जमलय!

बाबा योगिराज's picture

3 May 2016 - 11:52 am | बाबा योगिराज

झक्कास, आवड्यास.

पेत्ताड बाबा.

विजय पुरोहित's picture

3 May 2016 - 11:53 am | विजय पुरोहित

अजून पैजार माऊली यायचे आहेत "बैठकीत"
मग खूब जमेगा रंग... ;)

टवाळ कार्टा's picture

3 May 2016 - 12:02 pm | टवाळ कार्टा

बाबौ...मस्त जमेश =))
बाकी स्पा म्हणाला तसे इडंबने बघायची असतील तर बुवा फ्याण क्लबातल्या लिलाधर यांची विडंबने वाचावीत

लीलाधर हे विडंबने करीत नसतात.
त्यांची स्वतंत्र प्रतिभा फळा, कट्ट्यावरी, साय, आण्णा, किसमिस अशा विविध रुपांनी बाहेर पडत असते.

कवि लिलाधर यांच्या एकेक कवितेवर PhD होउ शकेल.

सुरवंट's picture

3 May 2016 - 2:36 pm | सुरवंट

विडंबणे करा
पण दारुवर नको
चावून चोथा झाला तो विषय