कोकणवारी - आंजर्ले आणि केळशी

मिंटी's picture
मिंटी in कलादालन
19 Jan 2009 - 1:07 pm

मागच्या शनिवार - रविवार कोकणात जाण्याचा योग आला..... हो नाही करता करता एकदा जायचं पक्कं केलं आणि शनिवारी रजा टाकुन निघालो....सकाळी ६.०० ला घर सोडलं...जायचं होतं हर्णे गावात....आणि २ दिवसात हर्णे, केळशी आणि अंजर्ले फिरुन आम्ही महाबळेश्वर मार्गे पुण्यात यायचं असं प्लॅनिंग होतं......जाताना भोरमार्गे वरंध घाटातुन जाऊयात असं ठरलं....साधारणतः १२.०० ला हर्णेला पोचलो.... हर्णे बंदर असल्यानी गेल्या बरोबर लगेच भरपुर बोटी दिसायला लागल्या.... हर्णेला फिश मार्केटमधे चालणारा लिलाव खुप फेमस आहे....रोज संध्याकाळी असतो हा लिलाव...आम्ही गेलो त्यावेळी भरपुर गर्दी असल्यानी फोटो नाही काढता आले.असो.
पहिल्यांदा आम्ही अंजर्ले गावात जायचं ठरवलं.अंजर्ले गावाचा कड्यावरचा गणपती प्रसिद्ध आहे. हे मंदिर पेशवेकालीन आहे. कड्यावरच्या गणपतीला जायचा रस्ता पण फार सुरेख आहे

अंजर्लेला जाताना खाडी पुल ओलांडावा लागतो....

अंजर्लेचं प्रसिध्द मंदिर :

कड्यावरचा गणपती :

अंजर्ले गावातुन आम्ही केळशीला निघालो.केळशीला जाणारा हा रस्ता पुर्णपणे समुद्रकिनार्‍यालगत जातो.......ईथुन दिसणारा हा नजारा :-

अंजर्ले - केळशी अंतर तसं फक्त २५ किलोमिटर आहे....पण अरूंद रस्ते असल्यानी जायला वेळ लागतो. केळशीच समुद्र किनारा अतिशय स्वच्छ आहे आणि जास्त पर्यटक नसल्यानी प्रायव्हेट बीच असल्यासारखाच आहे.आम्ही पोचलो त्यावेळी तर किनार्‍यावर कोणीच नव्हतं.....
हा केळशीचा समुद्र किनारा:

केळशीचा सनसेट :

मावळत्या दिनकराला नमस्कार करुन आम्ही परत हर्णेला यायला निघालो. :)

छायाचित्रण

प्रतिक्रिया

सुनील's picture

19 Jan 2009 - 1:12 pm | सुनील

अप्रतिम फोटो.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दिपक's picture

20 Jan 2009 - 11:42 am | दिपक

अप्रतिम फॊटो

:)

सोनम's picture

19 Jan 2009 - 1:20 pm | सोनम

फोटो छान आहे.
१ चा फोटो अतिउत्तम

राघव's picture

19 Jan 2009 - 1:52 pm | राघव

सुंदर फोटू!
शेवटचा लय भारी!! विशेषतः सोनेरी संधीप्रकाश, समुद्राला टेकलेला सूर्य अन् ढग हे कॉम्बिनेशन क्वचितच मिळते. समुद्राचा रंग खरेतर जाणवायला नको, पण तोही जाणवतोय! खूप छान काढलाय फोटू . अभिनंदन :)

केळशीच्या बीचच्या लगत, जी झाडे आहेत त्यांचे फोटू नाही काढलेत??

मुमुक्षु

अमोल केळकर's picture

19 Jan 2009 - 2:07 pm | अमोल केळकर

सर्व फोटो अप्रतीम
इतर माहिती असल्यास द्यावी म्हणजे रहाण्याची / खायची ठिकाणे. इ.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

मिंटी's picture

19 Jan 2009 - 2:37 pm | मिंटी

अमोल तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद :)

केळशीला रहायची व खायची सोय होऊ शकते पण ती घरगुती असेल....केळशी अजुन तेवढं कमर्शीयल नाही झालेलं त्यामुळे तिथे हॉटेल उपलब्ध नाहीत.आम्ही हर्णेला रहायलो होतो जे केळशीपासुन फक्त २५ किमी वर आहे. हर्णेमध्ये रहायची आणि जेवणाची उत्तम सोय होऊ शकते.ईथे हॉटेल्स उपलब्ध आहेत. :)

ज्ञ's picture

19 Jan 2009 - 4:19 pm | ज्ञ

केळशी मधे मला माहिती असलेले हॉटेल - एन्-गुलमोहोर - रामाच्या मंदिराजवळ...

अमोल केळकर's picture

19 Jan 2009 - 5:09 pm | अमोल केळकर

केळशीला रहायची व खायची सोय होऊ शकते पण ती घरगुती असेल....
अहो मग मस्तच की
-------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

शंकरराव's picture

19 Jan 2009 - 2:08 pm | शंकरराव

कोकणातल्या निसर्ग सौंद-याला तोड नाही
अप्रतिम फोटो

परिकथेतील राजकुमार's picture

19 Jan 2009 - 2:33 pm | परिकथेतील राजकुमार

बसल्या जागी आम्हाला एक छानशी सहल घडवुन आणल्याबद्दल धन्यवाद. खुपच छान आले आहेत सगळे फोटो.

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Jan 2009 - 2:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्तच फोटो.

अवांतरः तुम्हाला शनिवारी सुट्टी नसते म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा!

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

मनस्वी's picture

19 Jan 2009 - 2:46 pm | मनस्वी

के व ळ अ प्र ति म फोटो
मिंटे.. मस्तच आहेत सगळे फोटो!

टारझन's picture

19 Jan 2009 - 10:23 pm | टारझन

के व ळ अ प्र ति म फोटो

प्रतिक्रिया परवाणगीशिवाय वापरली .. णिशेध .. पण असेच म्हणायचे होते .. म्हणून सहमत

- टारझन

मिन्टे, मस्तच आहेत गं सगळेच फोटो!

खाडीचा फोटो मस्त!!!!!!!! आहे.,

सनसेट चे सगळे फोटो लाजवाब!
(इस्पेशली ढगांच्या मागचा "रवि" निव्वळ सुन्दर दिसतोये.)

अवान्तर : केळशी - अंजर्ल्याला पिक्निक काढायचा विचार करतेय.

या वेळी तुझा आणि पंतांचा फोटो दिसत नाहीये :-? :( बॅकग्राउन्ड एवढी मोहक असताना, तेथे फोटो काढायचा मोह तुम्ही कसा काय टाळलात?
(की काढला आहे पण, येथे डकवलेला नाहीये. :-? )

अजून येऊ देत. (पंतांना परत केळशीच्या खाडीवर घेऊन जा, बघ कसे खडखडीत बरे होतील!!! )

:)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

मिंटी's picture

19 Jan 2009 - 3:24 pm | मिंटी

या वेळी तुझा आणि पंतांचा फोटो दिसत नाहीये बॅकग्राउन्ड एवढी मोहक असताना, तेथे फोटो काढायचा मोह तुम्ही कसा काय टाळलात?
(की काढला आहे पण, येथे डकवलेला नाहीये. )

मोह आवरला नाही गं.....फोटो काढले पण इथे नाही डकवले.... :)

मृगनयनी's picture

19 Jan 2009 - 3:39 pm | मृगनयनी

मोह आवरला नाही गं.....फोटो काढले पण इथे नाही डकवले....

ह्म्म्म्म..... मग डकव ना!
मिपाची बैन्डविड्थ मोठी आहे गं.
;)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

ब्रिटिश टिंग्या's picture

19 Jan 2009 - 3:28 pm | ब्रिटिश टिंग्या

पहिला फोटो उच्च आहे!

- टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

शितल's picture

19 Jan 2009 - 7:02 pm | शितल

सहमत.

शाल्मली's picture

19 Jan 2009 - 3:52 pm | शाल्मली

वा! मस्तच आले आहेत सगळे फोटो.
पहिला आणि शेवटचा फोटो विशेष आवडला.
आणि हो.. गणपती पण छान आहे.
अजूनही येऊ दे..

--शाल्मली.

लिखाळ's picture

19 Jan 2009 - 4:40 pm | लिखाळ

वा ! चित्रे छान आहेत. शेवटचा फोटो आवडला.
गणपतीसुद्धा एकमदम मस्त आहे :) बरेचदा गणपती उजव्या हाताने आशिर्वाद देत असतो आणि डाव्या हातात मोदक असतो. या मुर्तीच्या बाबत काही वेगळेच दिसते आहे.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

mamuvinod's picture

19 Jan 2009 - 4:43 pm | mamuvinod

सुंदर फोटू!

नजर पण छान आहे ताइ तुमची !

नीलकांत's picture

19 Jan 2009 - 5:05 pm | नीलकांत

नेहमी प्रमाणे तुझे फोटो सुंदर आलेले आहेत. सोबतच कोकणची सफर घडली.

नीलकांत

एडिसन's picture

19 Jan 2009 - 5:51 pm | एडिसन

फोटो अतिशय सुंदर आले आहेत..एकदा जायलाच हवं ह्या ठिकाणी..
एक विनंती..वरील फोटो ओरिजनल रिझॉल्यूशनमध्ये देऊ शकाल काय? वॉलपेपर म्हणून वापरण्याचा मोह आवरत नाहीये..

Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.

मिंटी's picture

20 Jan 2009 - 10:31 am | मिंटी

धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल. :)

तुम्ही म्हणल्याप्रमाणे तुम्हाला कुठल्या फोटोंच्या डिटेल्स हव्या आहेत हे कळालं तर बरं होईल.

आपला अभिजित's picture

19 Jan 2009 - 6:14 pm | आपला अभिजित

फोटो सुरेख आहेत. मजा आहे लेको!

दापोलीचा परिसर अप्रतिमच आहे.

श्री. ना. पेंडश्यांच्या कादंबरीत असलेली सगळी गावं, माणसं, वाड्या-वस्त्या इथे तंतोतंत भेटतात.

आंजर्लेतील कड्यावरच्या गणपतीला पुलावरून न जाता तरीने (होडीने) नदी ओलांडून मग गावातून घाटी चढून जाण्याची मजा काही वेगळीच!

दापोली-हर्णै मार्गावर कर्दे, आसूदबाग, पाळंदे, अशा अनेक ठिकाणी अप्रतिम समुद्रकिनारे आहेत. आणि अगदी निवांत! (आपल्याशिवाय काळं कुत्रं नसतं तिथे!!) जाम धमाल करता येते. पण पाण्यात पोहताना जरा माहिती घेऊन जायला हवं.
अनेक ठिकाणी समुद्रकिनाऱ्यांलगतच अगदी घरगुती लॉजेस किंवा रीतसर व्यावसायिक लॉजेसमध्ये राहण्याची उत्तम सोय आहे. सीझन सोडून गेल्यास, आठश-हजार रुपयांपर्यंत चांगली राहण्याची व्यवस्था होते.

बाय द वे अमृता,
आसूदबागला नाही गेलात तुम्ही? मग दापोलीच "मिस' केलीत! आसूदबागचा केशवराज पाहिला, की डोळ्याचं पारणं फिटणं म्हणजे काय, ते समजतं. डोंगरातून, गर्द झाडीतून, वस्त्यांतून, पाटाच्या पाण्यातून जाणारा चिंचोळा रस्ता आहे. वाटेत लाकडी पूल, ओढा, फार धमाल आहे. पाऊण एक तासाची वाट आहे ही. `गारंबीचा बापू'चं चित्रीकरण इथेच झालंय! एवढं चढून गेल्यावर गणपतीच्या मंदिरात निवांतपणा मिळतो. बारमाही वाहणारा झराही आहे तिथे. मी गेलो होतो, तेव्हा फोटो नाही काढले.

काही दिवसांपूर्वी "मिपा'करांसाठी याच ठिकाणची सहल काढण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याला फारच "उत्साही' प्रतिसाद मिळाल्याने मी आपली तलवार म्यान केली. असो.

मिंटी's picture

19 Jan 2009 - 6:23 pm | मिंटी

अभिजीत इतक्या डिटेल प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
केशवराजला जायची खुप ईच्छा होती पण काही कारणास्तव जाता नाही आलं...:(
पण पुढच्यावेळी मात्र नक्की जायचं असं ठरवुनच तिथुन निघालो आम्ही....बाकी कर्देला गेलो होतो पण प्रचंड गर्दी असल्यानी जास्त थांबलो नाही.तो निवांतपणा आम्हाला केळशीला मिळाला... :)

चित्रा's picture

20 Jan 2009 - 7:30 am | चित्रा

केळशी/आंजर्ले खूपच आवडले.

दापोलीच्या जवळील केशवराजाची टिपणीही अगदी पटली. कच्च्या पायर्‍यापायर्‍यांच्या रस्त्यातून लोकांच्या वाड्यांमधून उतरत-चढत, फुले गोळा करत मस्त चालत वरपर्यंत जाता येते.

आपला अभिजित's picture

19 Jan 2009 - 6:27 pm | आपला अभिजित

मजा आहे! पुन्हा जा!!

रेवती's picture

19 Jan 2009 - 9:41 pm | रेवती

किती गं ग्रेट फोटो काढलेस!
पहिला तर भारीच आहे.
तुमची मज्जा आहे बुवा!
घरगुती जेवण आणि ही भटकंती..... व्वा!
(मला कधी जायला मिळणार?)

रेवती

संदीप चित्रे's picture

19 Jan 2009 - 9:57 pm | संदीप चित्रे

नोव्हेंबर महिन्यात भारतात गेलो होतो तेव्हा ह्याच भागात एक ट्रिप केली.
दोन दिवस मुरूडला राहिलो होतो. कडयावरचा गणपती पहायला जाताना जे दृष्य दिसतं त्याला खरंच तोड नाही.

प्राजु's picture

19 Jan 2009 - 10:07 pm | प्राजु

खास करून..सगळ्यात पहिला आणि शेवटचे २... सुरेख..!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

19 Jan 2009 - 10:18 pm | मुक्तसुनीत

हा धागा उशीराच पाहिला. ऑफिसमधे पिकासा आणि इतर साईट्स बॅन्ड आहेत.

फोटो आवडले हे वेगळे सांगायची गरज नाहीच. पण त्यातही एक फार व्यक्तिशः जिव्हाळ्याचा भाग आहे. आमचे मूळ गाव आंजर्ले ! होय , केळशी-आंजर्ल्यापैकी. अंजर्लेचं प्रसिध्द मंदिर , गणपती , केळशी चा किनारा हे मी आयुष्यात एकदाच पाहिले आहे. आमच्या वाडीत खेळलोय , विहीरीवर आंघोळ केली आहे, पेज , आंबे खाल्लेत. एरवीचे पर्यटनस्थळाचे फोटो - अगदी कोकणातली इतर स्थळे सुद्धा त्यात आली - हे सुंदर वाटतात, एक तिर्‍हाइत म्हणून आपण दाद देतोच. पण या धाग्यातल्या फोटोतून पहाताना भूतकाळ तर आठवला. माझ्या आधीची पीढी गावातून शहरात आली आणि आता मी तर हजारो मैल दूर आलो तरी मूळगावाबद्दल , घराण्याबद्दल आता क्षीण झालेल्या का असेना , पण नात्याची प्रकर्षाने आठवण झाली. तुम्ही कितीही बदला , तुमच्या भूतकाळाशी , तुमचे पूर्वज जिथे राहिले त्या गोष्टींशी मनाने बांधलेले रहाता याची पुन्हा जाणीव झाली.

अमृता-अमित यांचे शतशः आभार.

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Jan 2009 - 10:26 pm | llपुण्याचे पेशवेll

माझे आजोळ केळशीचे. केळशीला गेल्यावर अनेक वाड्यांमधली बंद घरे पाहीली की आंतमधे कुठेतरी काहीतरी तुटते. असो.

केळशी, आंजर्ले, मुरुड(जंजिरा मुरुडवाले नाही हे दापोली जवळचे मुरुड), दापोली या चारही गावच्या यात्रा चैत्रात पाठोपाठ येतात. मजा येते फार. कधी जमले तर हा ही अनुभव घ्या.

पुण्याचे पेशवे
Since 1984

चतुरंग's picture

19 Jan 2009 - 10:55 pm | चतुरंग

फोटो सुरेखच. कोकणचे वैभव हे बर्‍याचदा चित्रातून बघितलेय. आमचे मूळ गाव राजापूर तालुक्यातले जानशी. एकदाच गेलोय. त्यावेळी पणजोबा रहात असलेली (आता पडलेली) समुद्रकिनार्‍यावरची वास्तू बघून गलबललं. मागं थोडे माड, पोफळी आणि आंबे होते असे स्थानिक रहिवासी सांगत होते. थोडी माती घेऊन आलो होतो. पोटाचा चिमटा आणि शिकण्याची जबर ओढ ह्या दोन्ही कारणांनी आजोबा देशावर आले ते कायमचेच. मागले बंध वाळल्या पानासारखे आपसूक अन अलगद गळून पडले असावेत (का हा आपला माझा अंदाज!?). त्यांच्या बोलण्यात कोकणचा उल्लेख बर्‍याचदा यायचा काही कडू, काही गोड आठवणींचा शिडकावा असे. मातीची ओढ ही अदिम असते. झाड वठलं तरी मुळं जिवंत असतात. असे फोटो बघून मनाला कधीतरी अवचित पालवी फुटते. पुन्हा जाऊन येण्याची ओढ दाटते!

ह्या लेखाबद्दल आणि चित्रांबद्दल अमृता-अमित ह्यांचे अनेक आभार!

चतुरंग

भाग्यश्री's picture

19 Jan 2009 - 10:49 pm | भाग्यश्री

मलाही पहीला आणि शेवटचे दोन अशक्य आवडलेत.. शेवटचा तर वरचा क्लास्स !!
मज्जाय बुआ, काय मस्त हिंडायला मिळतंय.. फोटोज पाहून कधी कोकणात जातेय असे झाले.. :(

http://bhagyashreee.blogspot.com/

सूर्य's picture

19 Jan 2009 - 11:06 pm | सूर्य

फोटो जबरा आलेले आहेत. त्यात पहीला आणि शेवटचा तर अप्रतिम.
अंजर्ले छानच आहे. हर्णे बीच सुद्धा मस्त आहे. लई भारी ट्रीप झाली तर :)

- सूर्य.

यशोधरा's picture

19 Jan 2009 - 11:25 pm | यशोधरा

सगळेच सुरेख फोटो अमृता!
गणपती तर किती सुंदर दिसतोय!

प्रभाकर पेठकर's picture

19 Jan 2009 - 11:35 pm | प्रभाकर पेठकर

वा:..! मस्त आहेत सर्व छायाचित्रं. अजून असतील तर तीही टाकावित मिपावर.
अभिनंदन.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

जृंभणश्वान's picture

20 Jan 2009 - 12:33 am | जृंभणश्वान

सगळ्यात बेश्ट

कड्या वरच्या गणपतिचा फोटो काढु नये अशी सूचना मराठित लिहली आहे मंदिरात.
तरी तुम्हि फोटो काढलात हे नवल आहे.

अंजर्ले च्या कड्या वरच्या गणपति चे फोटो काढु नये असे म्हणतात. का ते माहित नाहि.

केदार केसकर's picture

20 Jan 2009 - 11:21 am | केदार केसकर

फोटोज छान! आम्ही सुद्धा १ जानेवारी ते ४ जानेवारी दापोली, कर्दे, अन्जर्ले, हर्णे करुन आलो. हा जो अन्जर्ल्याचा रस्ता आहे ना पहिल्या फोटोमधे तो दुसरा रस्ता आहे. पहीला रस्ता गावातुन जातो. पण तो इतका निसर्गरम्य नाही. हाच रस्ता बेश्ट आहे. गाडी सावकाश चालवली म्हणजे झाल. नाहीतर साक्षात गणपतीचं दर्शन, कायमचचं!

विसोबा खेचर's picture

20 Jan 2009 - 11:25 am | विसोबा खेचर

झक्कास..! :)

दशानन's picture

20 Jan 2009 - 11:41 am | दशानन

जबरदस्त फोटो !

आवडले !

अश्विनि३३७९'s picture

31 Jan 2009 - 1:03 pm | अश्विनि३३७९

माझे माहेरचे गाव आन्जर्ले ..
अतिशय सुन्दर गाव आहे. हिन्दु मुसल्मान अशी मिश्र वस्ती असुन सुद्धा गाव अतिशय शान्त आहे .
उन्हाळयाची दर सुट्टी मजेत गेली आहे या गावात. गावात अजुन ही खुप देवळ आहेत.. ती सुद्धा छान आहेत.
देवीचे देउळ आणि देवीचा जत्रे तील रथ या गावातील मानच्या गोश्टी.
स्म्रूतिना उजाळ दिल्याबद्दल धन्यवाद!!

अनंत छंदी's picture

31 Jan 2009 - 4:50 pm | अनंत छंदी

अंजर्ले नव्हे त्या गावाचे नांव आंजर्ले आहे.

अनंत छंदी's picture

31 Jan 2009 - 8:13 pm | अनंत छंदी

नांवात सुधारणा केल्याबद्दल आभार!

मिंटी's picture

2 Feb 2009 - 3:19 pm | मिंटी

:)

मदनबाण's picture

2 Feb 2009 - 3:34 pm | मदनबाण

सगळेच फोटो मस्त आहेत...

कड्यावरचा गणपती :-- इतकी सरळ सोंड असलेला बाप्पा..मी पहिल्यांदाच पाहतो आहे !!! :)
मदनबाण.....

:) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.