असा कसा काळ आला
बापाआधी बाळ गेला
असा कसा काळ आला
धर्माच्या नावाखाली घोळ साला
असा कसा काळ आला
खरं बोलणारा वाळ झाला
असा कसा काळ आला
काळा कावळा शहाळं प्याला
असा कसा काळ आला
गाढवाच्या गळ्यात माळ घाला
असा कसा काळ आला
पैसा जगण्याचं मूळ झाला
असा कसा काळ आला
माणूसच कूठे गहाळ झाला
भोसले जी.डी.
आत्मशोध काव्यसंग्रह
प्रतिक्रिया
30 Apr 2016 - 3:32 pm | gsjendra
होऊ द्या चर्चा
30 Apr 2016 - 4:16 pm | प्रचेतस
ळळीत काव्य.
30 Apr 2016 - 7:27 pm | कानडाऊ योगेशु
ह्या दोन ओळीत षटकार मारला आहे. गझलेच्या शेराची जातकुळी आहे.