मन

पथिक's picture
पथिक in जे न देखे रवी...
28 Apr 2016 - 5:16 pm

मन धावून धावून जातं
आणि बिलगतं -
पानाफुलांना,
वृक्षवेलींना, रानवाटांना,
डोंगरदऱ्यांना.

मन पंख उघडतं
आणि झेपावतं
त्या सोनेरी उन्हानं भरलेल्या निळ्या आकाशात;
आणि तरंगत, उमलत राहतं
एखाद्या शुभ्र मेघासारखं.

मन चांदण्यात जाऊन बसतं
आणि अबोल रात्रीला पुसतं
तिच्या सौंदर्याचं त्याच्या व्याकुळतेशी असलेलं नातं.

मन वहिवाट सोडतं
आणि निघतं त्या वाटेने
ज्या वाटेवर पथदिवे नाहीत, मैलाचे दगड नाहीत,
दिशा आणि देशांचे फलक नाहीत;
जी वाट अमूर्त आहे, अथांग आहे, असीम आहे - मनासारखीच !

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 5:19 pm | विजय पुरोहित

काय सुंदर लिहिलेयस मित्रा.
वाचनखूण साठवलेली आहे...
अप्रतिम हा शब्द देखील अपुरा पडत आहे, इतकं सुंदर लिहिल आहेस...

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 5:21 pm | विजय पुरोहित

मन पंख उघडतं
आणि झेपावतं
त्या सोनेरी उन्हानं भरलेल्या निळ्या आकाशात;
आणि तरंगत, उमलत राहतं
एखाद्या शुभ्र मेघासारखं.

आहा!!!
एकदम क्लासिकच...
कातिल...
जीवघेणं...

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 5:22 pm | विजय पुरोहित

sun

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 5:23 pm | विजय पुरोहित

या कवितेच्या शब्दांना सूट होणारं एक चित्र आंजावरुन साभार...

पथिक's picture

29 Apr 2016 - 9:44 am | पथिक

छान आहे चित्र...

पथिक's picture

29 Apr 2016 - 10:15 am | पथिक

_/\_

अभ्या..'s picture

28 Apr 2016 - 5:33 pm | अभ्या..

अहाहाहाहाहा.
अप्रतिम
केवळ अप्रतिम

नीलमोहर's picture

28 Apr 2016 - 5:45 pm | नीलमोहर

सुरेख...

जव्हेरगंज's picture

28 Apr 2016 - 6:37 pm | जव्हेरगंज

कडक!!!

एक एकटा एकटाच's picture

28 Apr 2016 - 8:19 pm | एक एकटा एकटाच

आवडली

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 8:38 pm | विजय पुरोहित

भांडकुदळ, फाटेफोडू काथ्याकुटांमुळे या सोन्यासारख्या कवितेकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून पुन्हा वर आणतो...

श्रीरंग_जोशी's picture

28 Apr 2016 - 8:42 pm | श्रीरंग_जोशी

ही कविता खूप भावली.

यशोधरा's picture

28 Apr 2016 - 8:43 pm | यशोधरा

सुरेख.

पथिक's picture

29 Apr 2016 - 9:43 am | पथिक

सर्वांना धन्यवाद !!! _/\_

परत एकदा हे अतिशय सुंदर काव्य वर आणतो... दंडवत घ्या इतक्या सुंदर रचनेबद्दल...

पथिक's picture

14 Sep 2016 - 3:15 pm | पथिक

_/\_

प्रभास's picture

14 Sep 2016 - 12:51 am | प्रभास

Misty mountain

थोडासा या वाटेवर चालण्याचा फील आला... :)

पथिक's picture

14 Sep 2016 - 3:14 pm | पथिक

चित्र दिसत नाहीये..

विवेकपटाईत's picture

14 Sep 2016 - 7:30 pm | विवेकपटाईत

मस्त कविता आवडली.