नमस्कार,
समस्त मिपाकरांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा!!
तर या नवीन वर्षात नवीन उपक्रम घेऊन येत आहोत १ मे या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने.
बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा।
अशा आपल्या महाराष्ट्र देशाच्या काल आज आणि उद्याचा आढावा, महाराष्ट्राचे देशाला योगदान हे या निमित्ताने मिपावर यावे या हेतूने साहित्य संपादक मंडळ घोषित करत आहे महाराष्ट्र दिन २०१६ लेखमाला.
या उपक्रमात खालील विषयावर लेख लिहून मिपाकर भाग घेऊ शकतात.
१. महाराष्ट्र काल, आज आणि उद्या (उदा. चित्रकला, खेळ, विज्ञान, वैद्यक शास्त्र, अर्थकारण, समाज यात होत गेलेले बदल्/प्रगती असे काही)
२. महाराष्ट्राचे भारताप्रती योगदान
३. महाराष्ट्रातील स्वातंत्र्ययोद्ध्यांचे योगदान (यातही काही अपरिचित व्यक्तींविषयी लिहिल्यास अधिक उत्तम)
४. महाराष्ट्राचा भारतीय राजकारणातील प्रभाव ( याशिवाय अर्थकारण, समाजकारण किंवा साहित्य यातील प्रभाव याबद्दल देखील लिहिता येईल.)
५. मराठी सण आणि संस्कृतीत इतर भाषिक महाराष्ट्रीय लोकांचा सहभाग
६. हिंदी चित्रपटजगतावरचा मराठी ठसा
७. महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र (महाराष्ट्राबाहेर राहणार्या लोकांचे अनुभव - भारतातील इतर राज्य, परदेशातील महाराष्ट्र मंडळ इत्यादी)
लेख २५ एप्रिलपर्यत साहित्य संपादक या आय डीला व्यनि करावेत.
नेहमीप्रमाणेच आपल्या भरघोस प्रतिसादाच्या प्रतीक्षेत
-साहित्य संपादक मंडळ
प्रतिक्रिया
8 Apr 2016 - 4:26 am | यशोधरा
वा! मस्त विषय. लेखांची वाट बघते.
8 Apr 2016 - 6:44 am | रामदास
स्तुत्य उपक्रम.
8 Apr 2016 - 12:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर कल्पना ! अनवट रोचक लेखनाच्या प्रतिक्षेत !
8 Apr 2016 - 6:39 pm | अजया
नेहमीप्रमाणेच लेखमाला उत्तम होणार. मिपाकरांना महाराष्ट्र दिनी वाचन मेजवानी मिळणार!
प्रतीक्षेत ..
18 Apr 2016 - 12:47 am | साहित्य संपादक
२५ एप्रिल पर्यंत लेख अवश्य पाठवा. काही शंका किंवा अडचणी असल्यास साहित्य संपादक या आयडीला व्यनि करावा.
लेखांच्या प्रतीक्षेत.
18 Apr 2016 - 1:14 am | एकुलता एक डॉन
महाराष्ट्राचा भारतीय राजकारणातील प्रभाव
कृपया यात अर्थकारण ,समाजकारण आणि साहित्य पण समाविष्ट करावे
तसेच maharashtrach vibhaajan vhave ka ka jawlalant mudda ghyava ka he tumchywar
18 Apr 2016 - 7:00 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
वेगळ्या विदर्भ वगैरे प्रश्णावर औचित्य ठेउन चर्चा होणार नाही ह्याची खात्री आहे. लोकं ताळतंत्र सोडणार.
18 Apr 2016 - 5:49 pm | एकुलता एक डॉन
मिपावर त्यात नवीन काय ?
ठीक आहे ,बाकी विषय निदान एकदा विचार करावा
19 Apr 2016 - 2:02 am | साहित्य संपादक
अर्थकारण ,समाजकारण आणि साहित्य हे चालेल. विभाजन हा मुद्दा नको.
18 Apr 2016 - 5:23 pm | सूड
वाट बघत आहे.