(हवाबाण हरडे)

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
16 Jan 2009 - 7:52 pm

काल आम्ही नेहमी प्रमाणे चौपाटीवर फिरायला गेलो . तेथे आम्ही दोन अजोबांच्या चाललेल्या गप्पा ऐकल्या आणि नंतर जे काही झाले त्याने आमची हसून हसून मुरकुंडी वळाली.......

चौपाटीवर जमले होते काल दोन थेरडे
गार्‍हाणी आणि सांगत होते एकमेकांकडे

एक म्हणाला राहून गेली पुजा तरुणपणी
दुज्या म्हणाला पुजेवाचून अडले कोणीकडे?

पुजा पण ती पूर्णं करावी मनात आहे आता
बावीस वर्षांनी देवीला घालावे साकडे

बेत ठरवला जंगी अन, अग्निरथाचा आम्ही
बतावणी ही करून झाली लगेच सगळीकडे

दुसरा हसला आणि म्हणाला जरा काळजी घ्या
प्रवास, पुजा म्हणजे दमणूक तुटेल कंबरडे

खाण्याची ही आबाळ होईल प्रवासात तुमची
उपाय यावरी जवळ बाळगा हवाबाण हरडे

पहिला म्हटला नका काळजी तब्बेतीची करू
व्यायामाने मजबूत कोठा मजबूत ही हडे

सात्त्विक गप्पा दोघाच्या रंगल्या होत्या अशा
ऐकत मी होतो पकडून शेजारील बाकडे

तितक्यातच अन तेथे आला हलकट वेडा कुणी
आणि फेकला दगड तयाने त्या दोघ्यांच्याकडे

सल्ला देणार्‍याला बसला दगड नेमका शिरी
टेंगूळ आला टकलावरी म्हणून तो चरफडे

थयथयाट मग त्याने केला चौपाटीच्यावरी
निषेध ही त्याने केला चौपाटीवाल्याकडे

बघून सारा थयथयाट तो वळली मुरकुंडी
हसता हसता "केश्या" आणिक बाकावरुनी पडे

कविता

प्रतिक्रिया

प्राजु's picture

16 Jan 2009 - 9:36 pm | प्राजु

नाना, आता सांगा केसु गुरूजींना.
जबरदस्त लिहिली आहे गोष्ट तुम्हा दोघांची. नहले पे दहला..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

लिखाळ's picture

16 Jan 2009 - 9:40 pm | लिखाळ

आम्ही बाकाखाली निवांत झोपलो होतो..तुम्ही खाली पडून फुकट आमची झोपमोड केलीत :)
(बरेचदा चौपाटीवर दंगा होतो तेव्हा आम्ही झोपलेलो असतो. मग जाग आली की खरडवह्या धुंडाळत बसायला लागते:) )

कविता छानच.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
आम्हाला खरेतर दर्जेदार लेखक बनायचे होते. पण जालावर फुटकळ आणि अवांतर प्रतिसादच देत बसलो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Jan 2009 - 9:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

झकास ...

चौपाटीवर जमले होते काल दोन थेरडे
दोन थेरडे ... =))

बघून सारा थयथयाट तो वळली मुरकुंडी
हसता हसता "केश्या" आणिक बाकावरुनी पडे

हसून पडायची वेळ आम्हां वाचकांवर आलेली आहे.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

अनामिक's picture

16 Jan 2009 - 9:46 pm | अनामिक

च्या मारी धरुन धूम फट्या़क!
=))

अनामिक!

चतुरंग's picture

16 Jan 2009 - 10:03 pm | चतुरंग

कमाल झाली केशवसुमार!
चौपाटीवरील हवाबाण ह(थे)रडे वाचून आमच्या नरड्यातून आवाज फुटेना! हसून लोट्पोट!! =)) =)) =))

चतुरंग

मुक्तसुनीत's picture

17 Jan 2009 - 2:29 am | मुक्तसुनीत

हेच म्हणतो !

कोलबेर's picture

16 Jan 2009 - 10:14 pm | कोलबेर

धमाल विडंबन!

हेच विडंबन इथेही वाचले. तिकडचे केशवसुमार आणि तुम्ही एकच काय?

तसे असल्यास सदर संकेतस्थळ मिपावर ब्ल्याक लिष्ट मध्ये आहे ह्याची नोंद घ्यावी.

तुम्ही इथले संपादक आहात तेव्हा मी तुम्हाला अधिक काय सांगणार?

नंदा प्रधान's picture

16 Jan 2009 - 11:29 pm | नंदा प्रधान

>>तसे असल्यास सदर संकेतस्थळ मिपावर ब्ल्याक लिष्ट मध्ये आहे ह्याची नोंद घ्यावी.

ते का म्हणे? मिपाची अशी ब्ल्याक लिष्ट कुठ पहायला मिळेल?

नंदा

विसोबा खेचर's picture

17 Jan 2009 - 1:11 am | विसोबा खेचर

तसे असल्यास सदर संकेतस्थळ मिपावर ब्ल्याक लिष्ट मध्ये आहे ह्याची नोंद घ्यावी.

गैरसमज!

आसपासच्या भुंकणार्‍या कुत्र्यांसारख्या किरकोळ गोष्टींकडे लक्ष द्यायला मिपाला वेळ नाही..ब्ल्याक लिष्ट वगैरे तर फारच दूर!

बाय द वे, मिपावरून तडीपार केलेली मंडळी तिकडे एकत्र जमली आहेत असे ऐकून आहे! असो..

विषयांतराबद्दल क्षमस्व..

तात्या.

कोलबेर's picture

17 Jan 2009 - 2:10 am | कोलबेर

तात्या, म्हणजे तुम्ही येणार नाही का तिकडे 'लो वेष्ट' जीन्स घालून ? इकडची तडीपार न झालेली चिक्कार टाळकी पण तिकडे बघीतली म्हणून विचारले..

घाटावरचे भट's picture

17 Jan 2009 - 2:18 am | घाटावरचे भट

आम्ही तर तात्यांनाही बघितलं तिकडे. आता तात्या खरंच होते की त्यांच्यासारखा आयडी घेऊन कोणी आणखी होतं ते ठावकी नाही बॉ...

विसोबा खेचर's picture

17 Jan 2009 - 9:05 am | विसोबा खेचर

"विकृत चित्त" हा आयडी घेऊन आम्ही काल तिथे लॉगीन झालो होतो. पण हाय रे कर्म! तो आयडी लगेचंच उडवला गेला! :)

बाकी तेथील विसोबा खेचर आम्ही नाही. आमच्या आयडीवर जगणारा तो कुणी अन्य जीव आहे! :)

असो,

मायमराठीच्या सेवेत दाखल झालेल्या त्या नवीन संस्थळाला आमच्या संपूर्ण मिपा परिवाराच्या अनेक शुभेच्छा! तात्याचा आणि मिपाचा द्वेष त्यांनी जरूर करावा परंतु त्या पलिकडे जाऊनही काही करावे.. तात्या आणि मिपा या एककलमी कार्यक्रमावर एखादं संस्थळ उभं राहू नये असं वाटतं! अन्यथा, अस्तित्वाकरताची ती त्या मंडळींची शेवटचीच लढाई ठरेल!

पुन्हा एकदा शुभेच्छा!

तात्या.

कोलबेर's picture

17 Jan 2009 - 9:35 am | कोलबेर

विकृत चित्त" हा आयडी घेऊन आम्ही काल तिथे लॉगीन झालो होतो. पण हाय रे कर्म! तो आयडी लगेचंच उडवला गेला!

कसा ठेवतील? अहो ते मालक आहेत तिथले असे ऐकतो आहोत.

उद्या 'हागरा तात्या' असला विकृत आयडी कुणी इथे काढला तर तुम्ही देखिल त्याला डीलीट बटण दाखवालच की/दाखवावे हे उत्तम!! :)

असो..तुम्ही दिलदार पणे दिलेल्या शुभेच्छा आवडल्या.

तुमच्या संपादक मंडळाने तो मूळ प्रस्ताव उडवल्याने हे स्थळ ब्ल्याक लिष्ट मध्ये आहे की काय असा गैर समज झाला होता पण स्वतः तुम्ही शुभेच्छा दिल्याने तो दूर झाला. धन्यवाद! :)

चापलूस's picture

17 Jan 2009 - 3:24 pm | चापलूस

मी आधी विसोबा खेच्रांशी सहमत आहे. संकेतस्थळाचे मालक असुन त्यांनी दाख्वलिलेला मनाचा मोटेपणा स्तुत्य आणि अनुकर्णीय आहे. त्यानंतर कोलबेर यांच्याशीही सहमत आहे. आमचे सगळे गैरसमज दुर झाले. माझे नाव घेवुनही तिथे कोणीतरी वावरतो आहे.

विनायक प्रभू's picture

17 Jan 2009 - 9:20 am | विनायक प्रभू

तुम्ही माझ्या व्हाईट लिस्ट मधे आहात.
चावट थेरडा
वि.प्र.

घाटावरचे भट's picture

16 Jan 2009 - 10:43 pm | घाटावरचे भट

झकास, षटकारांवर षटकार चाललेत...

बट्टू's picture

17 Jan 2009 - 4:25 am | बट्टू

तो बाजूचा लेख वाचला तेव्हा कळलं. थेरडे!!!! ;)

सहज's picture

17 Jan 2009 - 6:21 pm | सहज

केसु काव्यात कथा सहीच!

अवलिया's picture

17 Jan 2009 - 6:55 pm | अवलिया

केसु शेठ

मस्त :)

अवांतर - पाध्ये पण खुश झाले अशी अफवा आहे. असो.

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

केशवसुमार's picture

18 Jan 2009 - 10:51 am | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी) केशवसुमार

कोलबेर's picture

18 Jan 2009 - 11:26 am | कोलबेर

तिच्यायला प्रतिसाद न देणार्‍या फुकट्यांचे पण आभार.. म्हणजे आमचा प्रतिसाद फुकटच गेला की! :)

बाकी सगळ्यांचेच आभार मानायचेच आहेत तर प्रतिसाद दिलेले काय न दिलेले काय? नुसतेच सर्वांचे आभार म्हणा की!!

हलके घ्या म्हणून परके करत नाही ;)

-कोलबेर