तू .....
काल yahoo चा mail box उघडला आणि मन भरभर दहा वर्षापूर्वी जाऊन उभं राहिलं...
इंजिनीरिंग कॉलेज.... होस्टेल लाईफ... अगदी मंतरलेले दिवस..... आणि तू सोबत...
तुला सांगू, स्वर्ग गवसल्याची अनुभूती होते ना तशी मला प्रेमात पडल्यावर झाली होती..
Online Chatting ने आपली झालेली ओळख.. बऱ्याचदा एकाच cyber कॅफेत बसून तू मला केलेले mails ... अर्थात तेंव्हा तू मला माहिती नव्हतास ...
नंतर माझा तुला भेटण्याचा आग्रह... आणि शेवटी बऱ्याच प्रयत्नां नंतर तू तयार...
आपली पहिली भेट... तू तुझ्या email id प्रमाणे blue jeans red shirt घालून आलेलास... मी मैत्रिणी सोबत... मी केलेल्या हजार चौकश्या .. जसा तू माझ्या तावडीत सापडलेला सराईत गुन्हेगार... त्यावर तू दिलेली प्रांजळ उत्तरं...
आणि मग पुढचा प्रवास... रात्र रात्र phone वर मारलेल्या गप्पा... कधी कधी तर उजाडे पर्यंत बोलणं सुरूच...
जमलं तर कधी कधी भेटणं ... कधी तर तुला भेटल्यावर झालेली गच्च मिठी मारायची इच्छा.. पण लगेच सावरलेलं मन...
अगदी वेगळंच जग... प्रेम...प्रेम... आणि फक्त प्रेम....
खरंतर प्रत्येक प्रसंग लिहिला तर एखादी कादंबरीच बनेल ह्याची... असो....
मग मन गलबलून टाकणारा विरह...
नंतरही तू mails मधून बोलणारा... पण मी मात्र आपल्याच दुनियेत व्यस्त... कदाचित पुढे काय होईल या जाणीवेने आधीच थोडं मागे घेतलेलं पाऊल... पण तू तसाच.. निरपेक्ष .... पण तरीही कुठल्याशा आशेवर...
आणि मग माझा तो mail .. " ज्या गोष्टी शक्य नाहीत त्याचा विचार करून काय उपयोग..." आणि त्यावर तू दिलेलं चार पानी स्पष्टीकरण ... खरंतर त्या भांडणा मध्ये एक मजा होती.. कित्ती भांडायचो आपण.. रोजचे रुसवे फुगवे. तू मला नालायक म्हणणं.. कित्येकदा दिलेल्या कुंभकर्णाच्या पदव्या... आणि सगळ्यात प्रेमळ ते lazy म्हणणं.. आपल्यावर कोणी इतका मनापासून प्रेम करतंय हे समजल्यावर आभाळ ठेंगणं व्हायला वेळ लागत नाही...माझीही तीच परिस्थिती...
आपली पुण्यातली भेट... एखाद्या picture मध्ये दाखवतात तशी केलेली मस्ती... आणि निघतानाचा तो sad climax ...
खरंतर आजच्या जमान्यात तसं जीवापाड आणि निरंतर प्रेम असतं तर संधी मिळाल्यावर दोन चार kissing scene पण नक्कीच झाले असते.. पण अंगाला स्पर्शहि न करता अनुभवलेल्या त्या प्रेमाला माझ्याकडे उपमा नाही... खरंच नाही...
तू केलेला पहिला I love you message ... भांबावलेली .... थोडी घाबरलेली आणि सुखावलेली मी.....
आज तुझे mails वाचले आणि मन भूतकाळात रममाण झालं...
बरं तुला वाटत असेल हे सगळं मी आजच का लिहिलंय....
सायंकाळी लवकर निघ ... आज मी घरून निघताना किल्ली घ्यायला विसरलीये... तुझा आवडता cake order केलाय.. तू पोहचेपर्यंत येईनच तो.. मी पण पोहोचतेय...
आज ५ एप्रिल ना.. आपल्या भेटीचा पहिला दिवस... पंधरा वर्षापूर्वी.....
प्रतिक्रिया
5 Apr 2016 - 2:36 pm | मराठी कथालेखक
प्रेमाची शोकांतिका (म्हणजे लग्न) झालेलं दिसतय :)
छान छान :)
6 Apr 2016 - 3:27 pm | अपरिचित मी
खरं सांगायचं झालं तर नाही ... पण मुद्दामहून शेवट दुख्खी नाही करावासा वाटला!!
6 Apr 2016 - 4:05 pm | अपरिचित मी
ज्यास्त मनावर घेऊ नका...मला अशी गुगली टाकायची सवय आहे... प्रतिक्रिया थोड्या मजेशीर बनाव्यात एवढाच प्रयत्न !!
बाकी एवढाच सांगेन शोकांतिका दुसरं काय ?? :)
6 Apr 2016 - 4:25 pm | मराठी कथालेखक
सुरुवार मीच केली त्यामुळे काय मनावर घेणार म्हणा :)
6 Apr 2016 - 4:58 pm | अपरिचित मी
आवडलं !!!
9 Apr 2016 - 2:55 pm | मितभाषी
ठ्ठो ..... =))
5 Apr 2016 - 2:39 pm | प्रचेतस
भावनांनी गलबललेल्या आठवणी.
5 Apr 2016 - 5:40 pm | मन१
+१
6 Apr 2016 - 3:28 pm | अपरिचित मी
प्रतिक्रिया आवडली
5 Apr 2016 - 5:02 pm | जव्हेरगंज
अले वा ! खुपच छान!!
6 Apr 2016 - 3:28 pm | अपरिचित मी
धन्यवाद
5 Apr 2016 - 5:44 pm | गवि
छान लिहीलंय.
6 Apr 2016 - 6:53 am | एक एकटा एकटाच
चांगलय
6 Apr 2016 - 6:56 am | मदनबाण
छान लिहलय...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ए सनम आँखों को मेरी खुबसुरत साज दे... :- रंगा पतंगा
6 Apr 2016 - 3:29 pm | अपरिचित मी
गाणं छान आहे
6 Apr 2016 - 7:29 am | अभय म्हात्रे
खुपच छान.
6 Apr 2016 - 9:17 am | शित्रेउमेश
मला पण गलबलून आलं...;)
6 Apr 2016 - 3:25 pm | अपरिचित मी
तुमची प्रतिक्रिया खूप आवडली
6 Apr 2016 - 3:49 pm | नाखु
सांगा सुख म्हणजे काय असतं हेच गाणं मुक्तकातून लिहिलेल वाटलं.
सत्य असल्यास आणखीच छान .......
नित वाचक नाखु
6 Apr 2016 - 4:10 pm | पैसा
रोमँटिक! लग्नाच्या १०-१५ वर्षानंतर एवढा रोमान्स? छान आहे!
6 Apr 2016 - 5:01 pm | अपरिचित मी
:)
7 Apr 2016 - 12:25 pm | उल्का
शेवट आवडला. छान लिहिलय.
8 Apr 2016 - 5:46 pm | दत्ताभाऊ गोंदीकर
अावडल.....
9 Apr 2016 - 2:35 pm | अपरिचित मी
धन्यवाद!!!