इंडीयाचे नाव बदलावे का

कपिलमुनी's picture
कपिलमुनी in काथ्याकूट
31 Mar 2016 - 5:00 pm
गाभा: 

आपल्या देशाचे सध्याचे नाव रिपब्लीक ऑफ इंडिया आहे. स्वातंत्रांनंतर हे नाव घेण्यात आले. सर्वसाधारणपणे आपला देश ' इंडिया' म्हणून ओळखला जातो.

ब्रिटीशांनी ठेवलेले इंडिया नाव बदलावे का ? काहीजण हिंदुस्थान नाव वापरतात पण सर्वसमावेशक भारत हेच योग्य वाटते .
श्रीलंकेने सिलोन हे नाव बदलले , बॉंबे, मद्रास , कलकत्ता यांची नावे बदलली तसे इंडियाचा भारत करावे का ?

प्रतिक्रिया

एस's picture

31 Mar 2016 - 5:01 pm | एस

नो! नॉट अगेन...

कपिलमुनी's picture

31 Mar 2016 - 5:10 pm | कपिलमुनी

का ब्र ?
देशभक्त सरकारकडून एवढी अपेक्षा करणे चूक आहे का ?

इंडिया हे ब्रिटीश गुलामगिरीचे प्रतीक असलेले नाव बदलायला हवे

टवाळ कार्टा's picture

1 Apr 2016 - 10:21 pm | टवाळ कार्टा

देशभक्त सरकारकडून एवढी अपेक्षा करणे चूक आहे का ?

म्हणजे आधीची सरकारे देशभक्त नव्हती????

इंडिया हे ब्रिटीश गुलामगिरीचे प्रतीक असलेले नाव बदलायला हवे

हे काम ६० वर्षांपूर्वीच व्हायला हवे होते

*काड्या कमी पडल्या तर कळव...परत येतो =))

जय हिंद! हिंदुस्थान जिंदाबाद!

मराठी कथालेखक's picture

31 Mar 2016 - 5:11 pm | मराठी कथालेखक

हरकत नाही.
पण नवीन (म्हणजे बदली) पासपोर्ट सरकारी खर्चाने आणि खेटे न घालता मिळावा ही अपेक्षा :)

स्पा's picture

31 Mar 2016 - 5:14 pm | स्पा

भारतच नाव हवे

अत्रुप्त आत्मा's picture

1 Apr 2016 - 8:41 am | अत्रुप्त आत्मा

+ वण टू पां डुब्बा!

गरिब चिमणा's picture

31 Mar 2016 - 5:15 pm | गरिब चिमणा

इंडीया हे नाव बदलावे,त्याच बरोबर पोर्तुगीजांनी आणलेली मिरची खाणे सोडून द्यावे,त्याऐवजी काळीमीरी वापरावी.मिरची खाणे पोर्तुगिजांच्या गुलामगिरीचे प्रतिक आहे.

मं ते गोवेकरांनी सोडावं, बाकीच्यांनी कशाला?

हा प्रश्न कोर्टाने नुकताच सोडवलेला आहे।

The Supreme Court today dismissed a plea demanding changing the name of 'India' to 'Bharat' as it took strong exception to the petitioner asking him whether he thinks it has nothing else to do and reminded him that Public Interest Litigations (PILs) are meant for "poor".

http://m.ndtv.com/india-news/supreme-court-dismisses-plea-seeking-changi...

कपिलमुनी's picture

31 Mar 2016 - 5:59 pm | कपिलमुनी

कोणी व्यक्तीं नाही पण संसद हा निर्णय घेऊ शकते

अमृता_जोशी's picture

31 Mar 2016 - 5:38 pm | अमृता_जोशी

पण नेमके कशासाठी? फक्त नावच का बदलायचे?

चौथा कोनाडा's picture

31 Mar 2016 - 5:39 pm | चौथा कोनाडा

का बदलावे ?
का बदलु नये ?
काय हरकत आहे बदलायला ?
माणसे, सनस्था, कंपन्या, रस्ते, शहरे, देश नावे बदलतात,
काय प्रॉब्लेम येतो? थोड्याच दिवसानी लोक नविन नावानी ओळखतात. नावात बदल ही एक मोठी इतिहास खुण होवुन जाईल इंडियाच्या वाटचालीत.

बदलाच एकदा नाव, हौ द्या राडा, हौ द्या खर्च !
आपला देश महासत्ता होण्या पुर्वी (इस 2020 ) बदलाच.
म्हंजे महासत्ता झाल्यावर नाव बिव बदलायच्या किरकोळ अक्टिव्हिटी मध्ये वेळ घालवत बसायला नको.

नाव आडनाव's picture

31 Mar 2016 - 5:43 pm | नाव आडनाव

आपला देश महासत्ता होण्या पुर्वी (इस 2020 )

हे कधी ठरलं?

चौथा कोनाडा's picture

31 Mar 2016 - 6:03 pm | चौथा कोनाडा

बास्स का राव? येवड्यात विसरलात ?
मा. अब्दुल कलाम भारतीय जनतेला एक भाबडे स्वप्न देवुन गेले "भारत 2020 साली/पर्यंत महासत्ता होणार.
त्यांचे हे वाक्य पकडुन, तेच ढोल बडवुन सत्तास्थानी आले! )
मग आता कलामांचं स्वप्न नको पुर्ण करायला ?
आता, आमी बी घोषणा देतोय
इंडियाचा भारत करा, भारताला महासत्ता करा"

उगा काहितरीच's picture

31 Mar 2016 - 5:42 pm | उगा काहितरीच

ते "Independent Nation Declared In August" वगैरे तर वाचून हा धागा नाही काढला ना ?
;-) तसं असेल तर आपला पास...
तसं नसेल तर काय ठेवायचं नाव ?
भारत ? हिंदुस्थान ? हिंदुस्तान ? भारतवर्ष ? आर्यावर्त ? रच्याकने बाकी मुघलांच्या काळात काय म्हणत होते ?

कपिलमुनी's picture

31 Mar 2016 - 5:56 pm | कपिलमुनी

धागा काढला नाही.

गॅरी ट्रुमन's picture

31 Mar 2016 - 6:09 pm | गॅरी ट्रुमन

आपल्या देशाचे सध्याचे नाव रिपब्लीक ऑफ इंडिया आहे. स्वातंत्रांनंतर हे नाव घेण्यात आले. सर्वसाधारणपणे आपला देश ' इंडिया' म्हणून ओळखला जातो.

भारताच्या राज्यघटनेतील पहिलेच कलम-- १(१) पुढीलप्रमाणे आहे : "India, that is Bharat, shall be a Union of States." म्हणजेच राज्यघटनेप्रमाणे देशाचे नाव भारत असेही आहेच. त्यामुळे मुद्दामून भारत असे नाव ठेवायची गरज नाही. लोक काय नाव वापरतात हा सवयीचा भाग झाला त्याविषयी फार काही करता येणार नाही-- संसदेला तर अगदीच काही नाही.

बाकी चालू द्या.

हिंदूंचे राज्य :D

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

31 Mar 2016 - 6:10 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

भारत हे नाव असावे.
इंडिया असेल, हिंदूस्थान असेल किंवा आर्यावर्त असेल ही सगळी परकीयांची देण आहे.

परदेशी / परकीय पक्षाध्यक्ष आणि उपाध्यक्ष चालतात तर इंडिया हे परकीयांचे देणे का चालत नाही?

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

31 Mar 2016 - 6:21 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

पक्ष्याध्यक्ष परकिय हे एकवेळ ठीक,
पण उपाध्यक्ष परकिय हा जावाईशोध कुठून लावलात??

काडी टाकायला काहीही चालते हो. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Mar 2016 - 11:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

एका परकीय कंपनीत डायरेक्टर होताना त्यांनीच तसं अर्जात लिहून दिलंय अशी चर्चा टिव्हीवर झाली होती ! ;) :)

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

31 Mar 2016 - 11:42 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

ते होय,
पोर अजून मॅच्युअर नाही ना!!फक्त 46 वर्षाचं आहे:'(
बाकि निवडणूकीच्या उमेदवारी अर्जामध्ये भल्याभल्यांनी(?) फेरफार केलेत:-(

भल्याभल्यांनी फेरफार केले म्हणून युवारत्नाने केलेले फेरफार चालवून घ्यावेत असे काही आहे का? ;)

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

1 Apr 2016 - 8:55 am | खालीमुंडी पाताळधुंडी

तसे काही नाही,पण सिलेक्टिव फेरफार दिसू नयेत हीच कामना!
:
:
:
(ना भक्त ना द्वेष्टा-खामुपाधुं)

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Apr 2016 - 6:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रश्न सिलेक्टीव्ह होता ना ? की जगातल्या सर्वच उपाध्यक्षांची जंत्री मागितली होती ??? =)) =)) =))

*** अरे देवा (नास्तिक किंवा अज्ञेयवादी असल्यास, फक्त... अरेरे), काय दिवस आलेत. सरळ प्रश्नाला सरळ उत्तर दिले तर लोकांना त्यातही तिरकेपणा दिसू लागतो ! =))

नाव बदलल्याने काय होणार आहे?
काही पुरक कारणे तर द्या.

एच्टूओ's picture

31 Mar 2016 - 6:16 pm | एच्टूओ

१.काय फरक पडणारे ? भारतीयांच्या राहणीमान, विचार आणि civic sense मध्ये त्यामुळे सुधारणा होईल का ? तसेच सध्या लोकांना देशाबद्दल (कायदेपालन करण्यासाठी)वाटणारे प्रेम जास्त किंवा कमी होईल ?

२. बदलानंतर असंख्य सरकारी/निमसरकारी पाट्या, कागदपत्रे, सरकारी स्टेशनरी, कायदे अशा अनेक गोष्टींमध्ये सुधारणा करावी लागेल. त्यासाठी होणारा अधिक खर्च सरकारी तिजोरीतून द्यावा का?

चौथा कोनाडा's picture

31 Mar 2016 - 9:58 pm | चौथा कोनाडा

1. काय फरक पडणार आहे हा संबंध इथे कशाकरता जोडायचा ? सुधारणा होण्यासाठी करण्यासाठी देशाचे नाव बदलायची वाटpपहायची ? भुमीपुत्र म्हणुन आपल्या भुमीचे नाव धारण करण्यात देशप्रेम वाढणे इ. अवांतर बाबी आहेत. राहणीमान, शिस्त हे एरवीही हवे

2, हो. नाही तर कोण मल्या अथवा सहारा कंपनी देणार का? सरकारी तिजोrरीतून म्हंजे आपल्या सारख्या नागरिकांच्याच खिशातून जाईल. सुधारणा टप्प्या टप्प्याने दिर्घ कालावधीय होइल. उदा. इंडियाच्या जागी भारत म्हणायला सुरुवात केली उद्यापासून 01 अप्रिल 2016 तर 2022 परयंत प्रक्रिया पुर्ण होइल. काही आधीच्या मॉडेल्सचा ( उदा..ब्रह्मदेश चे म्यानमार) aअभ्यास करुन कमीत कमी खर्चात करणे अशक्य जाऊ नये.
साधारण पणे 2062 पर्यंत इंडिया हे नाव पुर्णपणे पुसट झाले असेल. त्यावेळी मी "भारत विहंग" या कंपनीच्या विमानाने प्रवासkकरत असेन! :-)

प्रदीप साळुंखे's picture

31 Mar 2016 - 6:18 pm | प्रदीप साळुंखे

व्वा काय स्ट्राईक रेट आहे!!
तासाभरात 22 प्रतिसाद तेही 52 शब्दांच्या धाग्यावर!!
त्या विषयात ताकदच तेवढी अचाट आहे=((

प्रियाभि..'s picture

14 Feb 2018 - 3:19 pm | प्रियाभि..

काही नाही हो.. पंचवीस लोकांना काही काम नाही काड्या करण्याशिवाय..पाहिले हे धागा बनविणारे, २२ प्रतिसाद देणारे, आणि तुम्ही एक..आणि हो २५ वा मी बरं का..

भीमराव's picture

31 Mar 2016 - 6:22 pm | भीमराव

चक दे इंडीया, कमॉन इंडीया, यारो इंडीया बुला लीया आसल्या स्वांगांच पन पुनर्लेखन/गायन करावं लागल मंग त्याची बी कॉष्ट पडल की

श्रीगुरुजी's picture

31 Mar 2016 - 6:48 pm | श्रीगुरुजी

"मनुवर्त" हे नाव ठेवावे. तसाही आपला देश मनुस्मृतीनेच चालतो. म्हणून तर सारखे मनुस्मृती दहनाचे कार्यक्रम सुरू असतात.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

31 Mar 2016 - 6:57 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

मग जाळू देत ना!!
तुमको कुछ प्राॅब्लेम??

रमेश आठवले's picture

31 Mar 2016 - 7:19 pm | रमेश आठवले

पाकिस्तानच्या मते इंडिया चे नाव भारतच असावे असे आहे . त्यांच्या मते एक इंडिया देशाचे फाळणी नंतर दोन तुकडे झाले आणि त्या नंतर इंडिया नावाचा देश अस्तित्वातच राहिला नाही. म्हणून भारताने इंडिया नावाचा वापर करणे चूक आहे.
फक्त भारत नाव असावे याचा आग्रह करताना याचा विचार असावा.

पाकीस्तान काहीही म्हणाले तरीही त्यांच्या म्हणण्यात लॉजीक नाही, भारत म्हटले तरीही पाकीस्तान प्राचीन भारताचा भाग होता हा इतिहास आणि पुन्हाही असेल हे भविष्य ते बदलू शकणार नाहीत. त्यामुळे पाकीस्तानी राज्यांनी भारतीय राज्यघटनेचा स्विकार करुन आपापली मते अवश्य मांडावीत.

राहता भाग ब्रितीशांच्या परक्या सत्तेच्या बळावर का होईना भारतास जेवढा भौगोलीक एकसंघत्वाचा वारसा स्वातंत्र्योत्तर आला त्याची जोपासना होण्याच्या दृष्टीने भारत अथवा इंडीया हे शब्द असोत किंवा त्यासोबत येणार्‍या वारसा हा एकात्म इंडीया/भारताचा वारसा आहे इंडीया नावावर कोटीकरुन अखंड देशाचा वारसा पुसता येत नसतो. भारत अथवा इंडीयाच्या वारश्यात शेअर हवा असेल तर त्यासाठी भारतीय राज्यघटना आपलीशी करावी लागते.

रमेश आठवले's picture

1 Apr 2016 - 8:15 pm | रमेश आठवले

पाकिस्तान च्या निर्मिती नंतर काही वर्षांनी तेथील सरकारने या नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले आहे .
Five thousand years of Pakistan : an archaeological outline - by R.E.M. Wheeler.

गॅरी ट्रुमन's picture

1 Apr 2016 - 9:16 pm | गॅरी ट्रुमन

Five thousand years of Pakistan : an archaeological outline - by R.E.M. Wheeler.

बापरे-- पाकिस्तानची ५ हजार वर्षे? मला तर स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचा पाकिस्तानात १५० वर्षे हा बोर्ड बघूनच आश्चर्य वाटले होते :)

Stan C

टवाळ कार्टा's picture

1 Apr 2016 - 10:21 pm | टवाळ कार्टा

तुम्ही कधी तिकडे गेलेलात???

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Apr 2016 - 10:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

पाकिस्तानी पाठ्यपुस्तकाप्रमाणे Previously India was part of Pakistan. आता बोला !!! =)) =)) =))

श्रीगुरुजी's picture

2 Apr 2016 - 3:06 pm | श्रीगुरुजी

पाकिस्तानी पाठ्यपुस्तकाचा दावा खांग्रेजींना अगदी पटलेला आहे. म्हणून तर मण्या अय्यर, खुर्शीद इ. खांग्रेजी भारताचा थोरला भाऊ असलेल्या पाकिस्तानमध्ये जाऊन "मोदींना घालवा" असे तेथील राज्यकर्त्यांना साकडे घालून आले.

नाना स्कॉच's picture

3 Apr 2016 - 9:57 am | नाना स्कॉच

कसले देशद्रोही आहेत लेकाचे! मणिशंकर तर जास्तच खुर्शीद तिप्पट

"अखंड पाकिस्तानात" भारत जोडायला कोणाला भेटावे हे ही त्यांना कळत नाही देशद्रोही कुठले

ते फ़क्त वेद प्रताप वैदिक ह्यांच्यासारख्या राष्ट्रभक्तांस कळते अन ते थेट हफ़ीज़ सईद ला भेटतात! काय ते देशप्रेम! वाह!!

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2016 - 3:43 pm | श्रीगुरुजी

वेद प्रताप वैदिक या पत्रकाराने हफिझ सईदच्या घेतलेल्या मुलाखतीची व मण्या आणि खुर्शीद पाकिस्तानात जाऊन जे बरळले त्याची तुलना कशी होऊ शकते? पत्रकार कोठेही जाऊन कोणाचीही मुलाखत घेऊ शकतो. श्रीलंकेतील प्रभाकरनच्या सुद्द्धा अनेक पत्रकारांनी मुलाखती घेतलेल्या आहेत. वैदिक तिथे जाऊन मोदींना हटवा असे सईदला म्हणाले होते का?

नाना स्कॉच's picture

4 Apr 2016 - 3:01 pm | नाना स्कॉच

पत्रकार कोठेही जाऊन कोणाचीही मुलाखत घेऊ शकतो.

हे तुमचे विधान आहे अन हे बरोबर आहे न??

श्रीगुरुजी's picture

4 Apr 2016 - 3:07 pm | श्रीगुरुजी

यात काही चूक आहे का?

नाना स्कॉच's picture

4 Apr 2016 - 3:44 pm | नाना स्कॉच

माझ्यालेखी नाही, पण ही व्यावसायिक स्थितप्रज्ञता दाखवताना सुद्धा काही लोक सेलेक्टिव होतात! उदा बघा , बरखा दत्त नवाज़ शरीफ ह्यांचा इंटरव्यू घ्यायला गेली होती, तिथे नवाज़ ह्यांच्या दोन्ही कन्या हजर होत्या, साहजिक इंटरव्यू नंतर एक फ़ोटो झाला , तर त्या फ़ोटोची यथेच्छ खिल्ली उडवली गेली होती "Nawaz Sharif with his THREE daughters" म्हणुन (बहुतेक ट्विटर वर जास्त) आता बघा

1 बरखा पत्रकार आहे, बरोबर?

2 तिने शरीफ ह्यांचा इंटरव्यू घेताना मोदी हटाव वगैरे काही म्हणले नाही

3 पत्रकार मुलाखतीघ्यायला जाणारच , बरोबर?

मग त्या उडवलेल्या खिल्लीचा आपण निषेध कराल की सबबी देऊन त्याला रास्त ठरवाल इतके सांगा!

हा तो फ़ोटो

.

कपिलमुनी's picture

4 Apr 2016 - 4:16 pm | कपिलमुनी

धाग्याशी संबंधित मुद्द्यांवर लिहावे ही विनंती

श्रीगुरुजी's picture

4 Apr 2016 - 6:19 pm | श्रीगुरुजी

बरखा ही पत्रकार म्हणून अत्यंत पक्षपाती आहे. तरीसुद्धा पत्रकार या नात्याने मुलाखत घेणे हा तिचा हक्क आहे. त्यामुळे मी या खिल्लीचा निषेध करतो.

रमेश आठवले's picture

4 Apr 2016 - 8:20 pm | रमेश आठवले

बुरखा दत्त हिनी mass communication ची पदवी जामिया मिलिया इस्लामिया या विद्यापीठातून घेतली आहे. तिचा विवाह आधी मीर नावाच्या आणि नंतर हसीब दाब्रु नावाच्या गृहस्थांशी झाला होता . हे दोघेही कश्मीरी मुसलमान आहेत अशी माहित नेट वरून मिळते .

नाना स्कॉच's picture

4 Apr 2016 - 11:47 pm | नाना स्कॉच

तिचे 20 नवरे असुदेत, ती काही देव नाही ! तिच्या वैयक्तिक जीवनात हात घालायचा खरेतर आपल्याला कोणालाच हक्क नाही अन समजा FoE वापरून असला आगाऊपणा केलाच तर काय होते म्हणे नेमके आठवले सर?

1 बरखा चा पत्रकार म्हणून मुलाखती घ्यायचा हक्क हिरावला जातो?

की

2 तिला शरीफ ची तिसरी बेटी वगैरे म्हणणे वैलिड होते??

वैदिक बायस्ड नाहीत ह्याची हमी आपण घेता का? कुठल्याच बाबतीत? जर वैदिक बायस्ड असतील असे आपण शक्यतेत जरी मानत असलात तरी मग शिव्या फ़क्त बरखालाच का म्हणे? ते ही नावाचे बुरखा वगैरे विकृतीकरण करून??

रमेश आठवले's picture

5 Apr 2016 - 5:01 am | रमेश आठवले

कोणत्याही पत्रकाराची मते वाचताना किंवा ऐकताना त्याच्या मांडणी मागे त्याचे पूर्वग्रह काय असतील हे समजले तर बरे असते. नवर्यांची संख्या महत्वाची नाही पण पत्रकाराने कोण कुठले निवडले हे जाणून घेण्याने पूर्वग्रह समजण्यास मदत होते

नाना स्कॉच's picture

5 Apr 2016 - 7:28 am | नाना स्कॉच

असेच बॅकग्राउंड चेक जर मी वैदिक ह्यांचे करायचे ठरवले तर तो हक्क मला मिळेल काय??

रमेश आठवले's picture

5 Apr 2016 - 7:48 pm | रमेश आठवले

मला वैदिक कोण हे माहीत नाही..
आपण मनमोहन सिंग यांचे नाव मौनमोह्न सिंग असे उच्चारलेले किंवा लिहिलेले पाहिले असेलच.

शान्तिप्रिय's picture

31 Mar 2016 - 10:43 pm | शान्तिप्रिय

आपल्याला कितिहि वाटत असले तरी तसे होणार नाही
कारण मूर्ख क्रिकेट्पटु , हिंदी अभिनेते , अमेरिकेतील भारतीय , कोन्व्हट्ट मधील मुले भारत म्हणणे कमिपणाचे
समजतात. आणि या लोकांना सामान्य माणसे आदर्श समज्तात.

दिग्विजय भोसले's picture

31 Mar 2016 - 10:48 pm | दिग्विजय भोसले

मूर्ख क्रिकेट्पटु ,
>>> भारत हरलाय म्हणून अशी प्रतिक्रिया आली असावी.

गामा पैलवान's picture

31 Mar 2016 - 11:32 pm | गामा पैलवान

कपिलमुनी,

हिंदू या नावाप्रमाणे इंडिया हे नाव देखील सिंधू नदीवरून पडलेले आहे. इंडस्ट्री आणि इंडीजिनस हे शब्ददेखील सिंधू नदीच्या पूर्वेस असलेल्या प्रदेशांवरून पडलेले आहेत.

भारत हे नाव दुष्यंत व शकुंतलेच्या भरत या पुत्रावरून पडलेले आहे.

अर्थात, इंडिया हे नामदेखील भारत या नावाइतकेच जवळचे आहे. बदलायचे झाले तर हिंदवीय असे बदलावे. जेणेकरून भारताचा हिंदूंशी असलेला गाढ संबंध व्यक्त व्हावा.

आ.न.,
-गा.पै.

नन्द्या's picture

31 Mar 2016 - 11:48 pm | नन्द्या

इथे कॅलिफोर्निया मधे एक प्रस्ताव आहे की या इंडिया ला साऊथ एशिया असे नाव पाठ्यपुस्तकात असावे.

हळू हळू भारतातले लोकहि भारत इंडिया विसरून साऊथ एशिया असेच म्हणू लागतील.

पण जर ट्रंप राष्ट्राध्यक्ष झाला तर तो भारतातील कॉल सेंटर व एच १ बी विसा यात खूप कपात करेल. मग भारतातल्या लोकांना तसे म्हणण्याचा मोह होणार नाही.
:)

भाऊंचे भाऊ's picture

1 Apr 2016 - 12:01 am | भाऊंचे भाऊ

इंडिया नाव सुरेख आहे सगले रिटर्न भरणारे सुध्दा मी इंडियन आहे असे जाहिरातीत अभिमानाने म्हणतात.

'इंडीया' हा आयडी उडाला की मग 'भारत' हा डु आयडी घेता येईल.

तर्राट जोकर's picture

1 Apr 2016 - 6:36 am | तर्राट जोकर

माझा एक छोटासा र्पश्न विचारौन घेतो. प्रश्न विचारण्याची हीच खरी जागा आहे म्हणून इथे नैतर तिथे अ‍ॅपच्या धाग्यावर अवांतर काय करतो म्हणुन..... असो.

http://www.misalpav.com/comment/823866#comment-823866

IIT Bombay हे जागेचे नाव नसून विशेष नाम आहे. शहराचे नाव बदलले म्हणून इतर विशेष नामे बदलली जातातच असे नाही.

जागेचे नाव हे विशेषनाम असते की नसते? आणी श्रीदेवीचा प्रश्नही, ते द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका चा द कशासाठी?

अभिजितमोहोळकर's picture

1 Apr 2016 - 7:27 am | अभिजितमोहोळकर

द अनेक ठीकाणी वापरले जाऊ शकते. त्यातील एक वापर म्हणजे

Use "the" with countries that include the words "republic", "kingdom", or "states" in their names.

ह्यानुसार जर भारताचा वा इंडिया ह्या नावाचा उल्लेख रिपब्लीक ऑफ इंडीया असा केला तर द वापरावे लागेल म्हणजे द रिपब्लीक ऑफ इंडीया असे म्हणावे लागेल.

द च्या वापराबाबत ह्या दुव्यावर चांगली माहीती आहे

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Apr 2016 - 10:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

अमेरिकेत (अमेरिका खंडात) इतरही अनेक राष्ट्रे (उदा कॅनडा, मेक्सिको, इ) आहेत... त्यातली एकाच राष्ट्राच्या झेंड्याखाली एकत्र झालेली राष्ट्रे म्हणजे "द ('ती राष्ट्रे' या अर्थाने) युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका".

तर्राट जोकर's picture

1 Apr 2016 - 10:48 pm | तर्राट जोकर

@ अभिजित व म्हात्रेसर, धन्यवाद. एक प्रश्न क्लिअर.

दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर मिळेल काय - जागेचे नाम हे विशेष नाम का काय ते?

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Apr 2016 - 11:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

जागेचे विषेशनाम बदलले तर त्यावरून तयार झालेली नावे सर्वसाधारणपणे बदलली जातात. त्यात बदला म्हणणार्‍यांच्या आणि नको म्हणणार्‍यांच्या रस्सीखेचीत जो गट यशस्वी होतो त्याप्रमाणे घडते.

उदा : "युनिव्हर्सिटी ऑफ पुना" चे "पुणे युनिव्हर्सिटी" झाले व नंतर "सावित्रिबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी" पण झाले; "युनिव्हर्सिटी ऑफ बाँबे" चे "युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई" झाले; पण "बॉम्बे हायकोर्ट" आपले तेच नाव राखून आहे :)

तर्राट जोकर's picture

1 Apr 2016 - 11:14 pm | तर्राट जोकर

धन्यवाद. उपयुक्त उत्तर. :)

हिन्दीया करा आणि हिंगील्श ला राष्ट्रभाषा !

बाय द वे ? लेखकांच्या हातात आहे का देशाचे नाव बदलणे (उपरोध)

नाखु's picture

1 Apr 2016 - 8:15 am | नाखु

नंदनवन असे नाव ठेवावे म्हणजे आनंदी-आनंद होईल.

नावालाच जागलेला मिपाकर नाखु

पण नंदनवन आणि चंदनवन हि दोन टोके झाली नं ?

अमित_निंबाळकर's picture

1 Apr 2016 - 5:40 pm | अमित_निंबाळकर

भारत नाव सर्वसमावेशक आणि साविधानिक आहे

पुंबा's picture

1 Apr 2016 - 6:35 pm | पुंबा

india that is Bharat हे आहे शासकिय नाव. संविधानात असाच उल्लेख आहे. republic of india असे आपल्या देशाचे नाव नाही(माझ्या माहितीनुसार).

फेरफटका's picture

1 Apr 2016 - 8:18 pm | फेरफटका

पासपोर्ट वर तरी असंच छापतात (Republic of India)

इरसाल's picture

2 Apr 2016 - 12:08 pm | इरसाल

हिंदुमुस्तान बरे पडेल !!!!!!

उगा काहितरीच's picture

2 Apr 2016 - 12:39 pm | उगा काहितरीच

हिंमुशीजैबुख्रीस्तान का नसावे मग ? हघ्या. ;-)
.
.
रच्याकने पहिल्या प्रयत्नात वाचता आले तर सांगावे . ;-)

इरसाल's picture

2 Apr 2016 - 2:14 pm | इरसाल

नवे सापडले

हिंदु, मुस्लिम, सीख, ईसाई वरुन

हिंमुसीई........हिंमुसीई.........हिंमुसीई.......!!!!!!!

इतर धर्मीय जर % ने वाढले तर ते बी अ‍ॅडवण्यात येतील. नोंद असावी.

माझीही शॅम्पेन's picture

2 Apr 2016 - 12:15 pm | माझीही शॅम्पेन

कम ओन् ... मिपाकर्स
भारत यू सी वेरी ओल्ड फॅशन यार ..... इंडिया साउंड्स सो कूल :)

तर्राट जोकर's picture

2 Apr 2016 - 12:35 pm | तर्राट जोकर

नो वे बडी... इंडिया साउंड्स लाईक थर्ड वर्ल्ड कन्ट्री. स्टेट्स इज कूल .... ;)

नाखु's picture

2 Apr 2016 - 3:46 pm | नाखु

"अरे कपील तुला काय इतक्यात ष्टांप व्हेंडरची एजन्सी मिळालीय का? असे हे विचारत होते कालच मोगाभाऊजींना, बाकी कसे चाललेय एकदा ये हितेस बरोबर चहाला"

सार्वकालीन माई

सुधीरन's picture

2 Apr 2016 - 10:36 pm | सुधीरन

>>>"India, that is Bharat, shall be a Union of States."

खरेतर 'इंडिया'च, तुम्हाला कळावे म्हणून 'भारत'!

विजुभाऊ's picture

3 Apr 2016 - 9:31 am | विजुभाऊ

भारताचे नाव "विदर्भ " असे करुयात.
अनुशेष संपून जाईल सगळा

उगा काहितरीच's picture

3 Apr 2016 - 10:23 am | उगा काहितरीच

और ये लगा सिक्सर....!

प्रसाद गोडबोले's picture

3 Apr 2016 - 10:44 am | प्रसाद गोडबोले

इंडिवृता हे नाव कसे वाटते ?

मालोजीराव's picture

4 Apr 2016 - 2:56 pm | मालोजीराव

नर्मदेच्या वरच्या भागाला हिंदुस्थान म्हणत पूर्वी , देशाला हिंदुस्थान नाव दिलं तर आपण दक्खनी लोकं काय करणार

मदनबाण's picture

5 Apr 2016 - 5:08 am | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कधी कधी नजर का भिजते... :- इरादा पक्का

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कधी कधी नजर का भिजते... :- इरादा पक्का

ब्रिटीशांनी ठेवलेले इंडिया नाव बदलावे का ?

नक्को.

यमक जुळायला सोपे पडते, उदा. "इंदिरा इज इंडिया"

भारत नांव ठेवले तर यमक कसे जुळणार? ;)

इरसाल's picture

5 Apr 2016 - 11:03 am | इरसाल

बघ,
एन्ना राऊला(सौथ इंड्यन स्टाइल) इस इंडिया !

बोल आता ???????

ओ, ते इंडियाच ऱ्हायला बगा. भारत आणायचय.

श्रीगुरुजी's picture

5 Apr 2016 - 2:50 pm | श्रीगुरुजी

यमक जुळायला सोपे पडते, उदा. "इंदिरा इज इंडिया"

भारत नांव ठेवले तर यमक कसे जुळणार? ;)

जमतंय की. "भागवत इज भारत"

प्रसाद गोडबोले's picture

5 Apr 2016 - 4:45 pm | प्रसाद गोडबोले

एकच नंबर =))))

सस्नेह's picture

5 Apr 2016 - 3:27 pm | सस्नेह

धागा आणि प्रतिसाद वाचून व्हिंदमाता लाजून कोनाड्यात तोंड लपवून आडवी झाली बघा !!

नाखु's picture

5 Apr 2016 - 3:29 pm | नाखु

शेवटी ठरलं तर

मिसळपाव

नाव ठेवायचे ते !

म्हणजे पाव इंग्रजांचे प्रतीक तर मिसळ सगळ्या भाषा/प्रांत संस्कृतीचे हा का ना का !!!!

प्रसाद गोडबोले's picture

5 Apr 2016 - 4:44 pm | प्रसाद गोडबोले

एकच नंबर नाखु =))))

नाखु's picture

5 Apr 2016 - 4:58 pm | नाखु

पाव चा हिंदीतला भावर्थ उमगून पाक झाल्याचे समाधान ते वेगळेच, हो का नाही ??

अर्थाने अचंबित नाखु

बिटाकाका's picture

14 Feb 2018 - 5:11 pm | बिटाकाका

ब्रिटीशांनी ठेवलेले इंडिया नाव बदलावे का ?

याला काही संदर्भ? मला कुठेतरी वाचल्याचं आठवतंतय कि अगदी ख्रिस्तपूर्व वर्षांपासून इंडिया हे नाव होतं. नंतर ते ज्यांनी राज्य केलं त्यानुसार येत जात राहिलं!

चौथा कोनाडा's picture

16 Feb 2018 - 2:50 pm | चौथा कोनाडा

...... कुठेतरी वाचल्याचं आठवतंतय कि अगदी ख्रिस्तपूर्व वर्षांपासून इंडिया हे नाव होतं.

पाश्चात्यांनी सिंधू नदी मधल्या सिंधूचा उच्चार इंडू व त्यावरून इंडस व त्यावरून इंडिया हे नाव तयार झाल्यांच म्हाइत्येय, पण वरिजलीच ख्रिस्तपूर्व वर्षांपासून इंडिया असल्यांच पहिल्यांदाच वाचतोय.

काही ठोस संदर्भ?

हतोळकरांचा प्रसाद's picture

16 Feb 2018 - 3:19 pm | हतोळकरांचा प्रसाद

मूळ लेख सापडत नाहीये, २-३ वर्षांपूर्वी असाच INDIA चा लॉन्ग फॉर्म इंडिपेंडंट नेशन डिक्लेर्ड इन ऑगस्ट वगैरे फॉर्वर्डस चालू होते तेव्हा वाचला होता. पण हे विकिपेडियाचं पेजही साधारण तसंच सांगतंय बहुतेक!

Indía in Koine Greek denoted the region beyond the Indus (Ἰνδός) river in the Pakistan, since Herodotus (5th century BC)

https://en.wikipedia.org/wiki/Names_for_India

चामुंडराय's picture

18 Feb 2018 - 10:59 pm | चामुंडराय

नाव बदलायला किती खर्च येईल?

नाव बदलावे कि नाही हा मुद्दा थोड्यावेळ बाजूला ठेवून या साठी किती खर्च येईल हे जाणण्याची उत्सुकता आहे.

काय काय बदलावे लागेल? स्टेशनरी, पाट्या, सर्व लिखित गोष्टी, जगभरातील दूतावासातील पाट्या.... इ. इ.

काही अंदाज??