रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा

अभ्या..'s picture
अभ्या.. in मिपा कलादालन
27 Mar 2016 - 11:40 pm

rp

सर्व मिपाकरांना, वाचकांना आणि हितचिंतकांना रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा!

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

28 Mar 2016 - 2:56 pm | टवाळ कार्टा

नंब्र कुटं हायेत???

नीलमोहर's picture

28 Mar 2016 - 3:33 pm | नीलमोहर

ट्रेझर हंट ची कल्पना भारीच..

रिडर्स डायजेस्ट आणि इतरही पुस्तकांमध्ये अशी चित्रकोडी असायची ते आठवलं, चित्रात लपलेले शब्द किंवा वस्तू शोधायचे.
(बक्षीस मिळेल ना पण ;)

मस्त आहे रे चित्र अभ्या. खास.

बारकाव्यांसाठी कौतुक आणि अभिनंदन टाळी.

नाव आडनाव's picture

28 Mar 2016 - 11:37 am | नाव आडनाव

सगळे कार्यकर्ते पांढर्‍या कपड्यात म्हणजे सगळे "खबीस का बच्चा / दुबई का शेख" असतील नाहीतर सगळे जितेंद्रचे फॅन :)
सगळे आयडी सारखे असा अर्थ आहे हे जास्त बरोबर वाटतंय (पण असं आहे का खरं :) ).

टवाळ कार्टा's picture

28 Mar 2016 - 1:11 pm | टवाळ कार्टा

खत्रा....वर्चे आगोबाचे परिक्षण वाचून आधी परिक्षण लिहिले आणि त्याप्रमाणे अभ्याने चित्र बन्वले असे वाटून गेले ;)

अत्रुप्त आत्मा's picture

28 Mar 2016 - 1:22 pm | अत्रुप्त आत्मा

@आधी परिक्षण लिहिले आणि त्याप्रमाणे अभ्याने चित्र बन्वले असे वाटून गेले ;) >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif तसेच असणार! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

गुर्जींनी माझ्या कलेवर असा विश्वास दाखवून पार कलेवर केले. :(
असो. सध्या कुणालाच दुखवायचे धोरण नसल्याने फक्त दूदूदूदूदूदूदू

अत्रुप्त आत्मा's picture

28 Mar 2016 - 2:39 pm | अत्रुप्त आत्मा

हहुं! दु दु दु दु दु https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif तू कशाला अंगाव घ्येटल्स? https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

नाखु's picture

28 Mar 2016 - 3:10 pm | नाखु

अभ्या चित्र रेखाट्णार। वल्ली तयां रसग्रहण करणार।
मिपाकरें पुड्या टाकणार। चर्चा चर्हाट निश्चित।।

मिपाची वाट आणि वाटचाल या शोधनिबंधातून साभारः

लेखक ४-५ जण असल्याने एकाचेच नाव देऊन आम्ही स्वतःच्या आत्महत्येची सुपारी देऊ ईच्छीत नाही

असंका's picture

28 Mar 2016 - 1:38 pm | असंका

+१...

सत्याचे प्रयोग's picture

28 Mar 2016 - 1:16 pm | सत्याचे प्रयोग

मिपानगरी लय भारी

बंकू's picture

28 Mar 2016 - 1:26 pm | बंकू

हेच म्हणतो...

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Mar 2016 - 1:53 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्त कल्पक चित्र आणि त्यावरचे वल्ली आणि संदिप सरांचे झकास रसग्रहण.
मगर आणि हत्ती कशाची प्रतीके आहेत ते समजले नाही.

पैजारबुवा,

अत्रन्गि पाउस's picture

28 Mar 2016 - 2:15 pm | अत्रन्गि पाउस

नदीत मगर आहे तिचे काय बरे प्रयोजन ??

टवाळ कार्टा's picture

28 Mar 2016 - 2:19 pm | टवाळ कार्टा

मगरीला आणि शार्कला मागल्या दाराने प्रवेश आहे ;)
आणि मागले दार नेमके....असो... =))

अत्रन्गि पाउस's picture

28 Mar 2016 - 2:25 pm | अत्रन्गि पाउस

तर मगर आ वासून जीव घेऊन पळते आहे असाही भास होतो :D

टवाळ कार्टा's picture

28 Mar 2016 - 2:57 pm | टवाळ कार्टा

कदाचित स्वतःपेक्षा पाशवी काहीतरी बघीतले अस्णार =))

मदनबाण's picture

28 Mar 2016 - 2:17 pm | मदनबाण

मस्त... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तू माझी मँगो डॉली... ;) :- गुरु

हत्तीच्या शेजारी डोंगर कशाचा आहे?

मगरीच्या बाजूला तटबंदी नाही तिथून कोणी घुसखोरी करायचा प्रयत्न केल्यास मगरीकडून शिकार होणार.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Mar 2016 - 2:23 pm | अत्रुप्त आत्मा

@हत्तीच्या शेजारी डोंगर कशाचा आहे? >>> त्या डोंगरात लेणी असतील एखादी प्राचीन! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing007.gif

त्या डोंगरात लेणी असतील एखादी प्राचीन!

गुर्जी, वल्ली आहेच आपल्याला सफर घडवायला. :)

अत्रुप्त आत्मा's picture

28 Mar 2016 - 2:41 pm | अत्रुप्त आत्मा

हत्तीच्या! कल्लाच नाय हो मला! ;)

मगरीच्या बाजूला तटबंदी नाही तिथून कोणी घुसखोरी करायचा प्रयत्न केल्यास मगरीकडून शिकार होणार.

राईट्ट्ट्ट बंडी. सो....देखो मगर प्यारसे ;)

मितभाषी's picture

28 Mar 2016 - 2:34 pm | मितभाषी

नाहीतर 'मगरमिठी' ;)

टवाळ कार्टा's picture

28 Mar 2016 - 3:05 pm | टवाळ कार्टा

देखो मगर प्यारसे

पैल्यांदा हेच्च ल्हिआयला आलेलो...पण मी लिहिले तर काहीजण त्याचा दूसरा अर्थ पहिल्यांदा डोक्यात आणतात :)

चिगो's picture

28 Mar 2016 - 2:25 pm | चिगो

एकदम भारीतलं कल्पक चित्रं.. दोन टिंब अभ्याजी, मानलं ब्वॉ तुम्हाल..
त्यातले बारकावे दाखवणार्‍या वल्लीदा, संदीपभौ आणि जोशीसाहेब ह्यांचे धन्यवाद..

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

28 Mar 2016 - 2:28 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

प्रवेशद्वाराच्या डावीकडे असणारा कंपू फारच मोठा आहे:'(

मितभाषी's picture

28 Mar 2016 - 2:32 pm | मितभाषी

ते कदाचित 'डावे' असावेत. =))

रंगपंचमीचे चित्र आणि त्या चित्रांचे सर्वांचे परिक्षण फारच छान. मला एक शंका आहे की प्रवेशद्वारावर स्वागत शब्दाच्याखाली जी आक्रुती आहे ती आत्मबंधु या पुरोहित आयडी वरून घेतली असावी पण त्या आक्रुतीच्या शेजारी जे चित्र आहे ते काय आहे व त्याचा अर्थ काय असावा? (मी चित्र ४ पट मोठे करून पाहिले.) परत एकदा सर्वाना शुभेच्छा!

प्रियाजी ते शिमीट कॉन्क्रीटात केलेले ग्यानबा तुकाराम हैत हो. कलर व्हायचेत अजून. ;(
बाकी ते पुरोहित आयडी आत्मबंधू नव्हेत हं. ते आत्मबंध. (उच्चारी आतनं बंद) ;)

प्रियाजी's picture

28 Mar 2016 - 5:01 pm | प्रियाजी

अभ्या, ओ.के. आणि सॉरी सुध्दा.

रंगपंचमीचे चित्र आणि त्या चित्रांचे सर्वांचे परिक्षण फारच छान. मला एक शंका आहे की प्रवेशद्वारावर स्वागत शब्दाच्याखाली जी आक्रुती आहे ती आत्मबंधु या पुरोहित आयडी वरून घेतली असावी पण त्या आक्रुतीच्या शेजारी जे चित्र आहे ते काय आहे व त्याचा अर्थ काय असावा? (मी चित्र ४ पट मोठे करून पाहिले.) परत एकदा सर्वाना शुभेच्छा!

सविता००१'s picture

28 Mar 2016 - 2:49 pm | सविता००१

चित्र आणि चित्रपरीक्षण अफाट सुरेख.
अभ्या, वल्ली __________/\___________

बरखा's picture

28 Mar 2016 - 3:02 pm | बरखा

मिपावर आल्यावर मिपाचे साम्राज्य बघुन मन प्रसन्न झाले. खुप छान आहे चित्र. चित्राचे जे रसग्रहण मांड्ण्यात आले आहे ते पण फार छान आहे.

बॅनर आत्ता थोडे समजले. सुंदर झालेय.

कंजूस's picture

28 Mar 2016 - 3:54 pm | कंजूस

pdf
लेखाच्या तळाची मुद्रणसुलभ आवृत्ती फक्त ब्यानरचाच उजेड पाडती पण प्रचेतस चूर्ण मिळत न्हाई.दुसय्रा अॅपमधून करून घेतली त्यामध्ये आतापर्यंतचे प्रतिसादही आलेत.७५० kb झाली pdf.

भाऊंचे भाऊ's picture

28 Mar 2016 - 3:56 pm | भाऊंचे भाऊ

ते मध्यवर्ती की काय नामक ठिकाण कुठे आहे ब्रे ?

मितान's picture

28 Mar 2016 - 4:28 pm | मितान

अतिशय कल्पक आणि आकर्षक चित्र !!!

मितान's picture

28 Mar 2016 - 4:28 pm | मितान

अतिशय कल्पक आणि आकर्षक चित्र !!!

सूड's picture

28 Mar 2016 - 4:53 pm | सूड

ब्यानरच्या बाबतीत अभ्याचा हात कोण धरुच शकत नाय राव!!

अन्नू's picture

28 Mar 2016 - 4:54 pm | अन्नू

हैयाव!! मनुबा खुश हुआ!.. =)) =))
रंगपंचमीचं चित्र लै'भारी, आणि त्याचं परिक्षण तर- त्यापेक्षा डबल भारी. ;)
बादवे- ते उजव्या बाजुनं शॉर्टकट मधून (शार्कच्या वाटेनं) येणारे चारजणं कोण आहेत?

टवाळ कार्टा's picture

28 Mar 2016 - 4:57 pm | टवाळ कार्टा

टेंपररी निलंबीत :)

अभ्या..'s picture

28 Mar 2016 - 5:01 pm | अभ्या..

आण्भव कै? ;)
पण ते नाहीत बर्का तसले. ते बिचारे तटापल्याडचे वाचनमात्र. खरे आनंदी मिपाकर. वाचतात अन फुल्ल एंजॉय करतात.

अन्नू's picture

28 Mar 2016 - 5:12 pm | अन्नू

मस्त. अभ्याराव चित्रातले बारकावे एकदम जबरी

टवाळ कार्टा's picture

28 Mar 2016 - 5:44 pm | टवाळ कार्टा

निर्दोश अस्तानाची दडपशाही होती ती

त्या निळे झेंडेवाल्या प्रासादातले लोक काय ओरडून सांगत असावेत हा विचार करतोय..

चौथा कोनाडा's picture

28 Mar 2016 - 5:11 pm | चौथा कोनाडा

भन्नाट बॅनर, अफलातुन रसग्रहण अन एकापेक्षाएक इरसाल प्रतिसाद !

अभ्याभौ, मिपारंगपंचमी जोरदार झालीय !

किचेन's picture

28 Mar 2016 - 5:22 pm | किचेन

लय भारी!

विवेक ठाकूर's picture

28 Mar 2016 - 5:46 pm | विवेक ठाकूर

प्रवेशव्दारा लगतच्या समुहातील भगवा आणि हिरवा झेंडा दोन परस्परविरोधी वृत्ती दर्शवत असाव्यात. त्यात नेमक्या भगव्या झेंडेधारींकडे जेसीबीसमोर दुर्घटना घडलेली दिसते. अर्थात, जेसीबी तिकडे का गेला असावा असाही प्रश्न आहेच. पलिकडल्या संकेतस्थळाचा आणि इकडल्या हिरव्या झेंडेवाल्यांचा काही संबंध असावा काय असाही तर्क करता येतो. किंवा ते झेंडेधारी तिकडून इकडे केवळ मतचाचपणीसाठी आले असावेत. अर्थात तिथे एक-दोनच लोक दाखवले असते तर चित्र आणखी प्रभावी झाले असते. पण ते इकडच्या हिरव्या झेंडेवाल्यात मिसळल्यानं संख्या मोठी दिसत असावी.

अर्थात, मुख्य प्रासाद भगव्या रंगाचा असून त्यांच्याकडे चित्राच्या उजव्या बाजूस भक्कम वसाहत आणि कुमक दिसते. यावरुन हिरव्या झेंडेवाल्यांचे काही खरे नाही असे दर्शवायचे आहे की काय असे वाटून गेले.

तक्रार पेटी खालून मोकळी असावी असा संशय पहिल्यांदा आला पण चित्रकारानं त्याही पुढे जाऊन, ती उघडायाची व्यवस्थाच नाही असे दर्शवलेले दिसते.

गुलाबी प्रासादातील व्यक्ती भोपूतून काही सांगायचा प्रयत्न करते आहे पण इतक्या मोठ्या भोपूतून आवाजच येत नाही असे चित्रकाराने खुबीने दर्शवले आहे. तेच प्रवचनकारी बुवांबद्दलही म्हणता येईल.

सध्या इतपत चित्र कळले आहे.

टवाळ कार्टा's picture

28 Mar 2016 - 5:49 pm | टवाळ कार्टा

तक्रार पेटी खालून मोकळी असावी असा संशय पहिल्यांदा आला पण चित्रकारानं त्याही पुढे जाऊन, ती उघडायाची व्यवस्थाच नाही असे दर्शवलेले दिसते.

आग्गाग्गा....लैच