रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा

अभ्या..'s picture
अभ्या.. in मिपा कलादालन
27 Mar 2016 - 11:40 pm

rp

सर्व मिपाकरांना, वाचकांना आणि हितचिंतकांना रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा!

प्रतिक्रिया

वैभव जाधव's picture

27 Mar 2016 - 11:56 pm | वैभव जाधव

अय्यो!
मस्त काम केलायस अभ्या..
'होली' ला रंग खेळणाऱ्या मराठी माणसांना रंगपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Mar 2016 - 10:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्यासेठ, ब्यानर नंबर एक बनवलं आहे. आवडलं अभिनंदन. :)
फक्त असं ब्यानर ऐन सनासुदीलाच आलं पाहिजे.

शिमग्याच्या बोंबा मारायला तव्हा लै मजा आली असती.

-दिलीप बिरुटे

प्रफुल्ल पा's picture

27 Mar 2016 - 11:56 pm | प्रफुल्ल पा

सुन्दर

प्रफुल्ल पा's picture

27 Mar 2016 - 11:56 pm | प्रफुल्ल पा

सुन्दर

प्रफुल्ल पा's picture

27 Mar 2016 - 11:56 pm | प्रफुल्ल पा

सुन्दर

मितभाषी's picture

28 Mar 2016 - 12:11 am | मितभाषी

झक्कास.

तर्राट जोकर's picture

28 Mar 2016 - 12:19 am | तर्राट जोकर

साष्टांग दंडवत. जबरा. फारच मार्मिक आणि बारिक. आमच्यासारख्या कलेच्या आडाण्यांना काही रुपक वापरले असतील तर तेही सांगा. हेलिकॉप्टर्ने येणारे कोण माननीय विआयपी आहेत?

अभ्या..'s picture

28 Mar 2016 - 12:23 am | अभ्या..

ते अंतर्गत हवाई पाहणी करण्यासाठी वापरले जाणारे होलिकॉप्टर आहे ;)
दंगा करणार्‍या आयडी वरच्या वर उचलल्या जातात.

तर्राट जोकर's picture

28 Mar 2016 - 12:31 am | तर्राट जोकर

धन्यवाद. दणदणीत रेफरंस वापरले आहेत असं दिसतंय. __/\__

ते बुलडोजर वापरुन भगव्या गृपमधला एक जण पाडला का काय कोणी? आता ह्या तुमच्या चित्राचे सही सही रसग्र्हण करणारा जान्खोर (भाउंचेभाउ यांचेकडून शब्द उधार) लागेल. ;-)

यशोधरा's picture

28 Mar 2016 - 6:12 am | यशोधरा

मस्त!!

कंजूस's picture

28 Mar 2016 - 6:30 am | कंजूस

मस्त!!

जुइ's picture

28 Mar 2016 - 7:45 am | जुइ

छान!!

नाखु's picture

28 Mar 2016 - 8:31 am | नाखु

आयडीयाची कल्पना बेष्ट म्हणजे खतरा !!!

प्रचेतस's picture

28 Mar 2016 - 8:51 am | प्रचेतस

काय रुपकार्थाने कलाकाराने मिपा साम्राज्य चितारलंय पहा ना.

राजवाड्याच्या सर्वात वरच्या मजल्यावरच्या सज्जात उभे आहेत ते मिपा मालकद्वय अर्थात नीलकांत आणि प्रशांत. शांतपणे ते मिपाकरांना निरखत आहेत. त्यांच्याच खालच्या सज्जात उभे राहून कडवी नजर ठेवणारे तीन संपादक दिसताहेत. एकेकाची उभी राहण्याची स्टाईलच त्यांची नजर अधोरेखीत करतेय. तो दोरावरुन रंग फासणारा कलाकार म्हणजे स्वतः अभ्याच असावा जो ह्या महालाची रंगभूषा करत आहे. येथे चित्रकाराने हाती ब्रश दाखवण्याऐवजी नुसतेच दोरावरुन जाणारा एखादा सदस्य दाखवला असता तरी चालून गेले असते असे वाटून गेले. कदाचित संपादकपद मिळवण्यासाठी धडपड करणारा व पुन्हा पुन्हा घरंगळून खाली येणारा जेपी त्या रुपात दिसला असता.

हेलीकॉप्टरमधून फिरणारे बहुधा आपले सल्लागार असावेत.
राज्याच्या आवारात घोळके करुन राहणारी बरेच मिपाकर आहेत. घोळका हे कंपूचे प्रतिक. दूर उजव्या कोपर्‍यात पण राज्यातच दोघांची लठ्ठालठ्ठी चाललेली दिसत आहे ह्याचा संदर्भ कदाचित मिपावरील डाव्या उजव्यांशी असावा. एका बाजुला बुलडोझरही फिरताना दिसतोय. त्यासमोर एक मिपाकर धारातीर्थी पडलेला दिसतोय. हा बहुधा आयडी ब्यान झालेला असावा. बुलडोझरसमोर जे इतर रहिवाशी दिसत आहेत ते संपादकांच्या रडारवर असलेले काही आयडी असावेत.

प्रवेशद्वारावर मिपा साम्राज्यात नव्याने सामिल होऊ राहणार्‍यांची रांगच लागलेली दिसते आहे. अर्थात नव्याने आत आल्यावर ह्यांच्यातील काहींचे सुरुवातीचे दिवस मोठे कठीण राहणार हे निश्चित.
उजव्या कोपर्‍यात जो गुलाबी रंगाचा निळा ध्वज असणारा नवा प्रासाद दिसतोय तो हल्लीच ह्या स्वतंत्र संस्थानात आलेल्या अनाहितांचा दिसतोय हे अगदी निश्चितच. संस्थान स्वतंत्र हवे, पुरुषांना त्यात प्रवेश नको मात्र आतमध्ये चालणार्‍या चालणार्‍या उपक्रमांना बाहेर आणून पुरुषांनी त्याचे कौतुक करावे ही स्त्रीसुलभ इच्छा मात्र त्या संस्थानाच्या सदस्यांच्या मनी आहे. चित्रकाराने ह्या प्रासादाच्या वर असणार्‍या भोंग्यातून हे मोठ्या खुबीने प्रतित केलेले दिसते.
डावीकडे जो लहानसा हिरवा प्रासाद दिसतोय तो ऐसीवाल्यांचा आहे. मध्ये जलायशय व त्यात बोटीने जा ये करणारे सदस्य दाखवून चित्रकाराने दोन्ही ठिकाणी आवकजावक करणारे सदस्य येथे चितारले आहेत.

सूदूर जो निळ्या रंगाचा प्रासाद दाखवलाय तो मायबोलीचा दिसतोय. मूळचा तो प्रासाद जरी अवाढव्य असला तरी त्याला आता ओहोटी लागल्याचे येथे आपल्या कलाकाराने दाखवून दिलेय. तिथल्याही काही सदस्यांनी मिपा राज्याच्या प्रवेशद्वारानजीक आपल्या बोटी नांगरल्या आहेत.

मिपाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच इच्छा व इतके म्हणून मी माझे सुमार रसग्रहण संपवतो.

जय मिपा
जय मराठी.

उगा काहितरीच's picture

28 Mar 2016 - 9:48 am | उगा काहितरीच

अभ्याचे चित्र आणी आपले रसग्रहण दोन्हीही प्रचंड आवडले. रंगपंचमीच्या शुभेच्छा सर्वांना .

पैसा's picture

28 Mar 2016 - 10:02 am | पैसा

आतमध्ये चालणार्‍या चालणार्‍या उपक्रमांना बाहेर आणून पुरुषांनी त्याचे कौतुक करावे

मिपा हे पुरुषांसाठी राखीव आहे का? मला वाटले अनाहितामधे नसणार्‍या अनेक महिला सदस्या आहेत इथे. आणि अनाहिताच काय कोणी एखाद्या एकट्या सदस्याने काही उपक्रम सुरू केला तरी त्याला भरभरून कौतुक मिळतंच. चष्मे काढा.

पुरुषांनी ऐवजी गावकऱ्यांनी किंवा समस्त प्रजेने असा बदल करा. हाकानाका.:)

बाकी वर सुमार रसग्रहण असं लिहिलंच आहे ओ.

अभ्या..'s picture

28 Mar 2016 - 2:19 pm | अभ्या..

वल्लोबा,
अतिसुमार चित्राच्या सुमार परिक्षणासाठी आमच्या सुकुमार भाषेत अनेकानेक धन्यवाद. ;)

पियुशा's picture

28 Mar 2016 - 10:21 am | पियुशा

लै भारी अभ्या १ च नम्ब॑र !
वल्लिला लैच टाइम दिसतोय हल्ली ;)
पळा........

चांदणे संदीप's picture

28 Mar 2016 - 10:49 am | चांदणे संदीप

अतिशय उच्च दर्जाचे रसग्रहण! :)

तो दोरावरुन रंग फासणारा कलाकार

लोल! मला काल मोबल्यावर जीव दिलेला मिपा आयडी वाटलेला! ;)

संस्थान स्वतंत्र हवे, पुरुषांना त्यात प्रवेश नको मात्र आतमध्ये चालणार्‍या चालणार्‍या उपक्रमांना बाहेर आणून पुरुषांनी त्याचे कौतुक करावे ही स्त्रीसुलभ इच्छा मात्र त्या संस्थानाच्या सदस्यांच्या मनी आहे.

लोलच लोल! =))
तिथेच प्रवेशद्वाराजवळ पाण्यातली मगर नव्या प्रवेशकर्तीला घाबरवतेय का?? ;) तसेच, ते पाण्यातले शार्क मासे काही लोकांना अडवून आहेत! लोल!!

ते बालेकिल्ल्याच्या दरवाजाजवळ उजव्या बाजूला असणारी तक्रार पेटी तिथे नेमकी काय करतेय हा एक प्रश्न आला डोस्क्यात. तसेच तो प्रवेशद्वारावरचा मोठ्ठा माणुसही गूढ आहे! ;)

काही अक्षरे ठळक दिसत नाहीत तरी अलिकडे, उजव्या बाजूचा, "पाक कृती" चा विभाग असावा! प्रवेशद्वारावरच शिल्प आणि अक्षर मला दिसत नाहीये! :(

क्याण्टिलिव्हर हेलिप्याड तर बुर्ज खलिफाच्या तोंडात मारील असाच आहे, वा! भटकंती, ट्रेकिंगवाल्या मिपाकरांची जागाही पलिकडे, डाव्या बाजूस मस्त दाखविली आहे! बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ बहुतेक साहित्य संपादक किंवा भावी संपादक उभे आहेत.

अभ्यादादा मान गये, आपकी चित्रकला और कल्पकता दोनोको! :)
___/\___

जय मिपा
जय मराठी.

Sandy

प्रचेतस's picture

28 Mar 2016 - 11:12 am | प्रचेतस

क्या बात है.
बरेच निसटलेले मुद्दे क्लियर केलेस. :)

मोबल्यावर जीव दिलेला मिपा आयडी वाटलेला

काय सांगू सॅन्डीबाबा, असेच वाटते रे कित्येकदा. ;)
एनीवे थ्यांक्स अ लॉट भावा.

सस्नेह's picture

28 Mar 2016 - 10:52 am | सस्नेह

रसग्रहण वाचल्यावर चित्र काये ते कळ्ळे !
धन्यवाद, प्रचेतस.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Mar 2016 - 1:17 pm | अत्रुप्त आत्मा

@मिपाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच इच्छा व इतके म्हणून मी माझे सुमार रसग्रहण >> =))
अभ्या तो अभ्या, और आगोबा सू भान'हल्ला! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing007.gif

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Mar 2016 - 10:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वल्लीसेठ, दुपारीच आपलं रसग्रहण वाचलं. सुमार वाटलं नाही.
आपल्या रसग्रहणाने चित्र अजून व्यवस्थित समजून घेता आलं.
धन्स. आणि वाढदिवसाच्या अभ्याला शुभेच्छा.

>>> संस्थान स्वतंत्र हवे, पुरुषांना प्रवेश नको, आत चालणारे उपक्रम, पुरुषांनी फक्त छान छान म्हणा.
हे कशाबद्दल आहे, ते नेमकं कळलं नाही. जरा व्य.नि. करता का ?

-दिलीप बिरुटे

तर्राट जोकर's picture

28 Mar 2016 - 11:56 pm | तर्राट जोकर

हे कशाबद्दल आहे, ते नेमकं कळलं नाही. जरा व्य.नि. करता का ?

का हो, गंमत करता का कोनाडासम्राट??? ;-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Mar 2016 - 12:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=)) कसंय. प्रतिसादकर्त्याला नेमकं काय म्हणायचं आहे त्यासाठी खुलासा विचारलेला बरा.
नसता आपले उगं गैरसमज होत राहतात. उगाच मनात अढी निर्माण होते.
पत्ता कोबीसारखं एक एक पान वेगळं करीत राहीलं पाहिजे.
आत काही नसतं हे आपल्याला माहित आहे, तरी आपला चावटपणा सोडायचा नाही. ;)

घोषणा : आधुनिक विचारांच्या स्त्री- पुरुषांसह मिपावर कोनाडा झालाच पाहिजे,
अरे होत कसा नै, झालाच पाहिजे.

-दिलीप बिरुटे
(कोनाडासम्राट) ;)

यशोधरा's picture

29 Mar 2016 - 8:06 am | यशोधरा

अजून एक कोनाडा? :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Mar 2016 - 9:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकच कोनाडा , फक्त स्त्री पुरुषांह संयुक्त असा. खरं तर मुख्य बोर्ड हाच आमचा कोनाडा. लिहिण्याची, बोलण्याची आणि विषयाची बंदी नसणे हा आमच्या 'कोनाडा' उद्देश. :)

-दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा's picture

29 Mar 2016 - 12:13 pm | टवाळ कार्टा

R.T.O. ऑफिसातली "येथे एजंटांमार्फत आलेले कोणतेही फॉर्म स्विकारले जाणार नाहीत" ही पाटी आठवली

प्रचेतस's picture

29 Mar 2016 - 8:18 am | प्रचेतस

व्यनि केला आहे. ;)

सस्नेह's picture

29 Mar 2016 - 4:33 pm | सस्नेह

हिकडेपन फॉरवर्ड करा :)

तुम्हाला कशास हवाय उगा अता. :)

नाखु's picture

29 Mar 2016 - 4:51 pm | नाखु

खाजगी आणि गुप्त ठेवणे कधी पासून सुरु झाले असावे शालिवाहन का गुप्त घराण्यापासून ते नक्की सांगणे... आणि जमल्यास मला व्यनी करणे.

प्रचेतस's picture

29 Mar 2016 - 4:57 pm | प्रचेतस

जमणार नै. :)

टवाळ कार्टा's picture

29 Mar 2016 - 5:01 pm | टवाळ कार्टा

तुम्ही कधीपसून कंपूबाजी करायला लाग्लात

प्रचेतस's picture

29 Mar 2016 - 5:02 pm | प्रचेतस

कंपूबाजी आणि मी? हंत हंत...
उलट मी कुणालाच तो व्यनि पाठवत नाहीये.

टवाळ कार्टा's picture

29 Mar 2016 - 5:03 pm | टवाळ कार्टा

असोच्च

अलीकडे म्हणे ल्ल्ल्ल्लूऊऊऊ ची जागा हुंब हुंबक हुंबन्म्म्म्म्म्न्न्न ने घेतलीये असे कळतेय.

अत्रुप्त आत्मा's picture

31 Mar 2016 - 9:14 am | अत्रुप्त आत्मा

http://freesmileyface.net/smiley/leisures-and-sports/leisures-and-sports-024.gif

नाखु's picture

31 Mar 2016 - 10:20 am | नाखु

जागाबदलाचा केंद्रउगम कुठल्या ऐतीहासीक घटनेनंतर आहे याचा जाणकारांनी खुलासा करावा.जो करणार नाही त्याला चिमण्या गणपतीची शप्पथ.

तळ(लेली) टीप

चिमण्या गणपती हे पुण्यातील प्रसिद्ध ठिकाण असून मिपावरील चिमण अथवा गरीब चिमणाचा त्याचेशी काहीही संबध नाही

बॅटमॅन's picture

31 Mar 2016 - 12:44 am | बॅटमॅन

रसग्रहण एकदम नेमके. "वेरूळच्या या लेण्यात शंकराचे राष्ट्रकूट शैलीत शिल्प कोरलेले असून जवळच दोनपाच वीरगळही आहेत" या नेहमीच्या शैलीत लिहिलेले. :)

उजव्या कोपर्‍यात जो गुलाबी रंगाचा निळा ध्वज असणारा नवा प्रासाद दिसतोय तो हल्लीच ह्या स्वतंत्र संस्थानात आलेल्या अनाहितांचा दिसतोय हे अगदी निश्चितच. संस्थान स्वतंत्र हवे, पुरुषांना त्यात प्रवेश नको मात्र आतमध्ये चालणार्‍या चालणार्‍या उपक्रमांना बाहेर आणून पुरुषांनी त्याचे कौतुक करावे ही स्त्रीसुलभ इच्छा मात्र त्या संस्थानाच्या सदस्यांच्या मनी आहे.

खवळून कोलबंध =)) =)) =)) ठ्ठो =)) =))

श्रीरंग_जोशी's picture

28 Mar 2016 - 9:09 am | श्रीरंग_जोशी

फारच मार्मिक चित्र!! __/\__.
प्रचेतस यांचे रसग्रहण एकदम रोचक वाटले.

एका ठिकाणी मंचावर एक बाबा बसले आहेत अन त्यांच्यासाठी दोन भोंगे लावले आहेत व समोर त्यांचे बरेच भक्तगण दिसत आहेत. माझ्या अंदाजानुसार राजकीय पक्षाची सतत (कसंही करून) री ओढणारे मिपाकर याद्वारे दाखवायचे असावेत.

यशोधरा's picture

28 Mar 2016 - 9:33 am | यशोधरा

भारी रसग्रहण!

भिंगरी's picture

28 Mar 2016 - 9:28 am | भिंगरी

वैभव जाधव

'होली' ला रंग खेळणाऱ्या मराठी माणसांना रंगपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा!

बाकी चित्र एकदम मर्मिक
प्रचेतस यांचे रसग्रहण +++१११

असंका's picture

28 Mar 2016 - 9:53 am | असंका

आमच्याकडे पोरं आजच रंग खेळतायत. पण नारा मात्र 'होली है' !!

पैसा's picture

28 Mar 2016 - 9:31 am | पैसा

कल्पक आणि सुबक चित्र

चित्र आणि चित्रग्रहण दोन्ही too good

नीलमोहर's picture

28 Mar 2016 - 10:46 am | नीलमोहर

रंगीबिरंगी रूपक चित्र खूपच आवडलं.

काय एकेक प्रति़कं दाखवलीत, किती ते बारीकसारीक तपशील, अगदी पाण्यातील मगरी आणि शार्कसकट :)
चित्रात अजूनही काही छुपे अर्थ सापडू शकतील. वरती डावी़कडे एक मंदिर, हत्ती आहे बहुतेक, ते काय आहे ?
राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर काहीतरी लिहीलं आहे आणि मूर्ती वगैरे आहे वाटतं ते समजत नाहीये.
जमत असेल तर एक हाय रेझ अपलोड करून इथे लिंक द्या ना.

प्रचेतस यांचे रसग्रहण परफेक्ट !! कितीतरी लक्षात न आलेल्या गोष्टी त्यामुळे कळण्यास मदत झाली.

अभ्या..'s picture

28 Mar 2016 - 2:26 pm | अभ्या..

प्रवेशद्वारावर ग्यानबा तुकारामाची शिमीटातली मूर्ती हाय. पुढच्या वर्षी ऑइलपेंट करु.
फुल्ल हाय रेझोल्युशन इमेज येणारे. कारण ह्या नुसत्या रंगपंचमीच्या शुभेच्छा नाहीत. हा ट्रेझर हंट आहे. यात नंबर्स वरुन बरेचसे शब्द फाइंडाउट करायचेत. ;)