पूर्वी

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in जे न देखे रवी...
23 Mar 2016 - 11:17 am

पूर्वी म्हणे जग फार फार छान होत
पिंपळाला सोन्याचं खर खर पान होत

पूर्वी म्हणे विमान आमचे आकाशात उडायचे
धनुष्याच्या लढाईनंतर तिथून फुलं पडायचे
बाण घेवून आमचे ऋषी समुद्राला नडायचे
साध्याश्या गाईसाठी पण राजाशी लढायचे

पूर्वी म्हणे शेतात सकस अन्न पिकायचे
बालपणी बचावलेले शंभर वर्ष टिकायचे
एका एका गर्भाचे शंभर क्लोन करायचे
मोठे मोठे राजे साध्या क्षयाने मरायचे

आत्ता आत्ता चाळीत माणुसकी नांदत होती
रोज सकाळी नळावर पाण्यासाठी भांडत होती
आपल्या वाट्याची मिलो प्रेमाने कांडत होती
भरलेल्या एसटीमधून गावो गाव सांडत होती

जे होते जसे होते त्याला आपला नमस्कार
जिथे आहोत बरे आहोत नको आता माघार
आमचं जगही बर आहे जरी तुमचं महान होत
पूर्वी म्हणे जग फार फार छान होत

- शैलेंद्र

संस्कृती

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

23 Mar 2016 - 1:57 pm | चौकटराजा

कविता मस्त आहे मित्रा. पण आपट्याला सोन्याचं खरं पान होतं असं तुला म्हणायच हाय काय ?

शैलेन्द्र's picture

23 Mar 2016 - 8:16 pm | शैलेन्द्र

नाही हो, पिंपळाचंच

काय मस्त कविता आहे! नजरेतून सुटली होती.

एक एकटा एकटाच's picture

23 Mar 2016 - 8:21 pm | एक एकटा एकटाच

आवडली