संक्रांती

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
14 Jan 2009 - 1:11 am

पुरे जाहले "केश्या" मेल्या सोड अता ही निवृत्ती
तुला न जमणे गप्प बैसणे ही न तुझी रे प्रवृत्ती

तू गेल्यावर 'ब्याद टळाली' कुजबुजले हे जालकवी
तू गेल्यावर आणि निघाल्या तुझ्या किती या आवृत्ती

'कट्टे' झाले, 'हल्ले' झाले, नि झाले 'नेहरू' 'गांधी'
'शिल्पे' झाली, 'चर्चा' झाल्या आणिक जळजळ 'भटकंती'

कौल लावले कुणी फुकाचे, चित्रे संगणकी कोणी
बक्कळ झाली भाषांतरे , अन प्राण्यांच्या पाककृती

परीक्षणे आली शिणमांची, अन पडली व्यक्तिचित्रे
दिसू लागल्या 'अर्ध्या चड्ड्या' अन 'स्वेटर' अवतीभवती

जुनी स्थळे नि नवीन खोड्या, अजीर्ण झाले 'विषया'चे
लैंगिकता अन समोपदेशन, वाचून झाली गुंगमती

येतो आम्ही घडीभर येथे विसरण्या दुःखे अमुची
परंतु येथे सुरू भांडणे, नि गंभीर कविता वरती

किती वाचावे दुःख वेदना ओढून तरी चेहरा
पुरे जाहल्या कविता गंभीर लाव त्यांना तू बत्ती

'सात्त्विक थाळ्या' पुरे आता लावा 'भेळेची गाडी'
बाप बाटली लाथा बुक्क्या अन "केश्या"ची कंबख्ती

घाल पुन्हा धुडगूस जाली लोकांना हसू दे थोडे
आम्हा सांगती 'अतींद्रिये', सोडशील तू निवृत्ती

लाग "केशवा" कामाला तू पुरे जाहली विश्रांती
नमन करुनी सर्व कवींना करू साजरी संक्रांती

केशवसुमार

कविता

प्रतिक्रिया

सर्किट's picture

14 Jan 2009 - 2:50 am | सर्किट (not verified)

केसु !!

लाग "केशवा" कामाला तू पुरे जाहली विश्रांती
नमन करुनी सर्व कवींना करू साजरी संक्रांती

वेलकम ब्याक !!!

तिळगूळाची गोडी वाढली !

-- सर्किट

कोलबेर's picture

14 Jan 2009 - 2:52 am | कोलबेर

केसूशेठ पुनरागमन धडाक्यात!

घाटावरचे भट's picture

14 Jan 2009 - 4:54 am | घाटावरचे भट

असेच म्हणतो.

सहज's picture

14 Jan 2009 - 7:17 am | सहज

जबरी !

भगवान के घर देर है अंधेर नही है!

अवलिया's picture

14 Jan 2009 - 10:04 am | अवलिया

असेच म्हणतो...
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jan 2009 - 2:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ज ह ब ह रा पुनरागमन!

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

मैत्र's picture

14 Jan 2009 - 3:32 pm | मैत्र

शॉल्लीड...
एका दगडात दोन पक्षी ऐकले होते. रजनीकांत काही जास्त मारू शकतो.
एका कवितेत इतके एका दमात हाणायचे म्हणजे कमाल आहे :D

चतुरंग's picture

14 Jan 2009 - 3:01 am | चतुरंग

अहो किती वाट पहायची आम्ही? :W
जर्मनीतल्या खनिजांच्या बर्फाळ गुंफेत आपण निद्रिस्त आहात असे कळल्याने आमची झोप उडाली होती!! :O
आज संक्रांतीच्या मुहूर्तावर आपले आगमन झाले आम्ही धन्य झालो! =D>

'सात्त्विक थाळ्या' पुरे आता लावा 'भेळेची गाडी'
बाप बाटली लाथा बुक्क्या अन "केश्या"ची कंबख्ती

घाल पुन्हा धुडगूस जाली लोकांना हसू दे थोडे
आम्हा सांगती 'अतींद्रिये', सोडशील तू निवृत्ती

लाग "केशवा" कामाला तू पुरे जाहली विश्रांती
नमन करुनी सर्व कवींना करू साजरी संक्रांती

हे तर होणारच! कोई शक?

(खुद के साथ बातां : रंग्या, आली आली कविजनांवर संक्रांत आली! ;) )

चतुरंग

लिखाळ's picture

14 Jan 2009 - 3:27 am | लिखाळ

अरे वा ! काकांचे आगमन दणक्यात !
छान छान. आता मजा येईल :)
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

विसोबा खेचर's picture

14 Jan 2009 - 4:10 am | विसोबा खेचर

केशवा,

प्रत्येक ओळन् ओळ दाद देण्याजोगी! क्या केहेने भैय्या! जियो..! :)

पुनरागमनाबद्दल हर्दिक अभिनंदन..

तात्या.

मदनबाण's picture

14 Jan 2009 - 4:32 am | मदनबाण

स़क्रांतीची ही भेट आवडली.... :)

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

सुनील's picture

14 Jan 2009 - 7:59 am | सुनील

लाग "केशवा" कामाला तू पुरे जाहली विश्रांती
नमन करुनी सर्व कवींना करू साजरी संक्रांती

हेच म्हणतो!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

भास्कर केन्डे's picture

14 Jan 2009 - 8:16 am | भास्कर केन्डे

वाह केशवराव!

एकदम खल्लास कविता... कवितेत सांगितल्याप्रमाणे तुम्ही हसवलेत हे मात्र खरं!

आपला,
(प्रभावित) भास्कर

प्राजु's picture

14 Jan 2009 - 9:07 am | प्राजु

=D> =D> =D> =D>

खूप खूप आनंद झाला........ एकदम भरपूर. केसु गुरूजी, खूप मिस केलं तुम्हाला.
एकदम धडाक्यात तुमचं आगमन झालं आहे.. संक्रांत मस्त साजरी झाली आमची.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

राघव's picture

14 Jan 2009 - 5:37 pm | राघव

खूप मिस केले तुम्हाला
अग्गदी अस्सेच म्हणतो!!
मुमुक्षु

अहो किती वाट बघायला लावायची?

लाग "केशवा" कामाला तू पुरे जाहली विश्रांती
नमन करुनी सर्व कवींना करू साजरी संक्रांती

बरे झाले तुम्हाल स्वतःलाच जाग आली ते...
नायतर आम्ही खुद्द जर्मनीत येऊन,
"चलो मछिंदर, गोरख आया" अशी आरोळीच द्यायचे ठरविले होते......

आता या मठाची सूत्रे तुम्ही लवकर तुमच्या ताब्यात घ्या बुवा!!!!
:)

मुक्तसुनीत's picture

14 Jan 2009 - 10:19 am | मुक्तसुनीत

बहोत अच्छे डांबिसखान! एक नंबर बात केली आहे ! :-)
केसुगुर्जी ! मजा आणली राव ! :-)

वेताळ's picture

14 Jan 2009 - 10:12 am | वेताळ

केशवसुमारांची खुपच दर्जेदार संक्रातभेट सर्व मिपाकरांना.
परीक्षणे आली शिणमांची, अन पडली व्यक्तिचित्रे
दिसू लागल्या 'अर्ध्या चड्ड्या' अन 'स्वेटर' अवतीभवती

अचुक निरिक्षण.... ह्यावरुन लक्षात येते तुम्ही जागेपणी झोपेचे सोंग घेतले होते.मिपावर काय चालले आहे ह्याची
खबरबात तुम्हां पर्यत होती तर..किती वेळ लावला तुम्ही
परत एकदा धन्यवाद

वेताळ

चेतन's picture

14 Jan 2009 - 12:12 pm | चेतन

गुरुजी एकदम धडाक्यात पुनरागमन केलतं

खरचं एक नं एक ओळ अव्वल दाद देण्याजोगी

येतो आम्ही घडीभर येथे विसरण्या दुःखे अमुची
परंतु येथे सुरू भांडणे, नि गंभीर कविता वरती

एक्दम चपखल शब्द बसलेत (मनातलं लिहलतं)

'सात्त्विक थाळ्या' पुरे आता लावा 'भेळेची गाडी'
बाप बाटली लाथा बुक्क्या अन "केश्या"ची कंबख्ती

संक्रांतिची गोडि वाढली आणि मिसळ पुन्हा चटकदार बनणार :D

(आनंदित) चेतन

चेतन's picture

14 Jan 2009 - 12:12 pm | चेतन

गुरुजी एकदम धडाक्यात पुनरागमन केलतं

खरचं एक नं एक ओळ अव्वल दाद देण्याजोगी

येतो आम्ही घडीभर येथे विसरण्या दुःखे अमुची
परंतु येथे सुरू भांडणे, नि गंभीर कविता वरती

एक्दम चपखल शब्द बसलेत (मनातलं लिहलतं)

'सात्त्विक थाळ्या' पुरे आता लावा 'भेळेची गाडी'
बाप बाटली लाथा बुक्क्या अन "केश्या"ची कंबख्ती

संक्रांतिची गोडि वाढली आणि मिसळ पुन्हा चटकदार बनणार :D

(आनंदित) चेतन

श्रावण मोडक's picture

14 Jan 2009 - 12:46 pm | श्रावण मोडक

'संक्रांत येणे' याचा अर्थ असा आहे तर...!!! :) :)

आनंदयात्री's picture

14 Jan 2009 - 1:25 pm | आनंदयात्री

गुरुदेव !!!
साधु संत येती घरा तोची दिवाळी दसरा !!

(स्वगतः चामारी बेणं बेंच वर आलं की काय ?? रेसेशन रेसेशन ;) )

जयवी's picture

14 Jan 2009 - 4:13 pm | जयवी

जबरी आगमन आहे गुरु..... अब हो जाओ शुरु :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jan 2009 - 5:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला लैच जोरदार आगमन झालं !
संस्थळावरील सार्‍या ष्टोर्‍या आल्या कवितेत :)

-दिलीप बिरुटे

विनायक प्रभू's picture

14 Jan 2009 - 6:46 pm | विनायक प्रभू

मी तर ऩक्कीच असेच म्हणतो.

केवळ_विशेष's picture

14 Jan 2009 - 6:43 pm | केवळ_विशेष

सर

सुवर्णमयी's picture

14 Jan 2009 - 9:07 pm | सुवर्णमयी

चला छान, आता विडंबने सुरु ठेवा.
सोनाली

स्वाती दिनेश's picture

15 Jan 2009 - 10:07 am | स्वाती दिनेश

संक्रांतीचा तिळगूळ काटेरी हलव्यासहित.. :)
स्वाती

केशवसुमार's picture

15 Jan 2009 - 3:12 pm | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासुन आभार!
(आभारी) केशवसुमार