वाढलेल्या दाढीचे खुंट घेऊन तो बराच वेळ बसला
भादरायला कोणीच नसल्याने जरा उदासच वाटला
उठून मग त्याने हातात वाटी वस्तरा घेतला
ब्रश नसल्याने हातानेच तोंडाला साबण फासला
आरशात बघून जेव्हा त्याने वस्तरा फिरवला
कवीमहाशयांच्या मनात काव्यबीज संचारला
उत्तररात्रीच्या उन्मत्त धुक्यात मग तो लिहीतच राहिला
रात्रभर जागून लेखणीला जीवाच्या आकांताने छळतच राहिला
सकाळी घोटभर दूध पिऊन पुन्हा पाने फाडतच राहिला
संध्याकाळी पेन बदलून नव्या वह्या काढतच राहिला.
दिवसांमागून दिवस गेले, पुनव जाऊन आवस आली
कविमहाशयांची म्हैस, एकदा नव्हे दोनदा व्याली
एकदा ऑफिसला बसलो असता सहाय्यक मला म्हणाला
साहेब तो कवी आलाय या कविता छापायला
उद्वेगानंच मी त्याला म्हटलं
असल्या भिकारड्या कविता मला पुन्हा नको देऊ वाचायला
ऑफिसमधून घरी जाताना कवीमहाशय मला बसस्टँडवर दिसले
कवितांच गाठोडं उरावर घेऊन प्रयोग करत होते कसले?
वाढलेल्या दाढीचे खुंट घेऊन मग ते कविताच पाडत सुटले
पण भादरायला कोणीच नसल्याने जरा उदासच वाटले
-जव्हेरगंज
[कळंबा जेलमधून थेट ....]
प्रतिक्रिया
20 Mar 2016 - 9:18 pm | जेपी
आता फंटी वरच्या कविता येऊ द्या..;)
20 Mar 2016 - 9:25 pm | उगा काहितरीच
काय ? कविता सप्ताह चालू आहे का ? बाकी तो जेलचा काय लोचा आहे ?
20 Mar 2016 - 10:16 pm | चांदणे संदीप
आणि तो 'लोचा' जेलात गेल्यावरच कळेल बर्का! ;) (ह. घ्या)
बाकी, जव्हेरभौ, कविता एकदम अण्टच है, लै आवडली!
Sandy
20 Mar 2016 - 11:28 pm | एस
ही जरा बरी पाडलीयं.
20 Mar 2016 - 11:56 pm | रातराणी
अरे रे! :)
21 Mar 2016 - 10:03 am | नाखु
कवीता...