ऑफिस मधे काहीच काम नसल्यावर तुम्ही काय करता?

वरदा's picture
वरदा in काथ्याकूट
18 Jan 2008 - 10:22 pm
गाभा: 

ऑफिस मधे काहीच काम नसल्यावर तुम्ही काय करता? आज शुक्रवार आहे म्हणून काम नाही आणि त्यात हा नवा जॉब्...खूप बोर होतय म्हणून मी मिपा वर लोकांना सल्ले देत बसलेय. सगळे लेख आणि कविता वाचुन झाल्यात्..तुम्ही अशा मोकळ्या वेळात काय करता? मला काहीतरी आयडीया द्या ना.

प्रतिक्रिया

ऑफिसच्या कामाचं बघतो, त्यामुळे मला हा प्रश्न कधीच पडत नाही!! :)))
ह.घ्या.

चतुरंग

केशवसुमार's picture

18 Jan 2008 - 10:27 pm | केशवसुमार

वरदाताई
खर तर मिपा आणि नमोगतावर काम नसेल तेव्हा मी हपिसातली कामे करतो..;)
त्यामुळे मी काही आयडिया देऊ शकत नाही बा..
केशवसुमार

वरदा's picture

18 Jan 2008 - 10:32 pm | वरदा

सहिचे के.सु. तुमची आयडिया. ऑफिसने काम दिलं तर मीही कामचंच बघते हो...पण कामंच नाहीये....

राजे's picture

18 Jan 2008 - 10:36 pm | राजे (not verified)

माझे शब्द.... पाहतो, काही बदल करता येतील का ह्याचा शोध घेतो.
गुगलबाबाला त्रास देत बसतो, व खुपच वेळ असेल तर जुन्या मित्रांना ईमेल अथावा खरोखरंच एकादे पत्र लिहीत बसतो, ह्या पेक्षा जास्त वेळ असेल तर नवीन काय काम चालू करा येऊ शकते ह्याचा शोध घेतो व त्या कामाची माहीती शोधतो, सोर्स पाहतो, किती फायदा होऊ शकतो ह्याचे आराखडे बांधतो.
व संपुर्ण दिवसच मोकळा असेल तर मित्रांना बोलावतो व गाडी घेऊन जवळपास कोठे ही भटकंती करतो.

व ह्या पेक्षा जास्त वेळ माझ्या कडे असेल तर मनोगत वरील काही रेसेपी वाचत वाचत झोपी जातो......... झोप आपल्याला जाम आवडते.... व खास करुन मनोगत वरील निसर लेखन वाचल्यावर तर जरा अंमंळ जास्तच झोप येते मला.... ;)

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

आमोद शिंदे's picture

21 Jul 2010 - 9:03 pm | आमोद शिंदे

काय आहे हे माझे शब्द? एका युवतिचा फोटो आणि ढीगभर जाहिरातीच्या लिंक्स सोडून काहीच दिसले नाही.

सूर्यपुत्र's picture

21 Jul 2010 - 9:45 pm | सूर्यपुत्र

एका युवतिचा फोटो ????
मला तर तोही दिसला नाही.... :? :? :( :( ;)

-ध्येयहीन

वरदा's picture

18 Jan 2008 - 10:45 pm | वरदा

मला छान आयडिया दिल्यात Thank You...
नवीन कामाची माहीती कालच जमवून झालेय आणि आधी हेच काम करत असल्याने बरचसं माहीतेय. पण माझे शब्द मस्त आहे..
भरपूर वाचायला मिळालं....खरच Thank You. आता मिपा वरच्या लोकाना त्रास देत नाही बसणार चाल्ले वाचायला...

सुनील's picture

18 Jan 2008 - 11:37 pm | सुनील

चतुरंग / केशवसुमार,

तुमची हपिसं कोणती हो? मी ही resume टाकून बघीन म्हणतो!!

(कामचुकार) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चतुरंग's picture

19 Jan 2008 - 12:08 am | चतुरंग

पण सुनील, कामचुकार पणाचा काही अनुभव नसेल तर तुला नोकरी मिळणे अवघड आहे, आणि तुला सध्याच्या हपिसात बरेच काम असावे असे दिसते!! ;))

चतुरंग

सुनील's picture

19 Jan 2008 - 12:30 am | सुनील

कामचुकार पणाचा काही अनुभव नसेल तर तुला नोकरी मिळणे अवघड आहे

अरेरे !!

तुला सध्याच्या हपिसात बरेच काम असावे असे दिसते!! ;))

आता काय सांगू? वझ्यानं वाकलेल्या गाढवागत गत झालीयं :((

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

19 Jan 2008 - 12:47 am | विसोबा खेचर

कुणाची चाकरी करणं स्वभावात नसल्यामुळे फार काळ दुसर्‍याच्या हापिसात काम केलं नाही. सध्या स्वत:चंच ऑफीस आहे त्यामुळे मालकही आम्ही, आणि नौकरही आम्हीच!

जेव्हा नोकराच्या भूमिकेत असतो तेव्हा 'मिसळपावचं पुढे काय होणार?' अशी घटका दोन घटका चिंता करून तो नाद सोडून देतो आणि कोकणी हलकटपणा करत मराठी आंतरजालावर चकाट्या पिटत फिरत असतो. आणि जेव्हा मालकाच्या भूमिकेत असतो तेव्हा मात्र इमानदारीत कामच करतो. नायतर, दोन वेळच्या आमटीभाताचेच वांधे व्हायचे तिच्यायला! मग बाईबाटलीचा शौक तर दूरच राहिला!! :)

अवांतर - अगो वरदा, तुझा पत्ता काय? बरी आहेस ना? :) मायबोलीनंतर बर्‍याच दिवसांनी भेटते आहेस. असो, मिपावर तुझी हजेरी आणि लेखन पाहून संतोष जाहला!

तुझा,
(मायबोलीकर मित्र) तात्या.

वरदा's picture

19 Jan 2008 - 1:21 am | वरदा

तात्या, कंटाळा आला ग म्हणेपर्यंत येईन मी आणि सगळिकडे नाक खुपसत बसेन अजुन १-२ आठवडे..मग होईल नेहेंमीसारखं काम सुरु...मग आधीसारखं अधुन मधुन.....आता मलाच कसंतरी वाट्टंय काय फालतु प्रश्ण टाकलाय मी...पण पुरती कंटाळले होते...सगळ्यांना पकवल्यावर बरं वाटंलं...:)

ब्रिटिश टिंग्या's picture

19 Jan 2008 - 1:58 am | ब्रिटिश टिंग्या

हापिसात काम नाही?
च्यामारी जेव्हापासून आम्ही किडे शोधण्याची हमाली सुरू केलीये तेव्हापासून एकही दिवस काम नाही असं झाल नाही......
सालं आमचं नशीबच XX.

-छोटी टिंगी

वरदा's picture

19 Jan 2008 - 7:24 am | वरदा

तुझ्या नशिबाला नको ग बोलूस...मी सोमवारी सुरूवात केली आणि माझी बॉस इथे नाहीये म्हणून मला काम नाहीये....मग येईल गं काम १-२ आठवड्यात....

इनोबा म्हणे's picture

19 Jan 2008 - 1:02 pm | इनोबा म्हणे

तुझ्या नशिबाला नको ग बोलूस...मी सोमवारी सुरूवात केली आणि माझी बॉस इथे नाहीये म्हणून मला काम नाहीये....मग येईल गं काम १-२ आठवड्यात....
हा हा हा.....टिंग्या ह्या वरदाबाई काय बोलल्या बघ....
वरदाबाई टिंगी 'अरे' आहे 'अगं' नव्हे :)

आमचाही आधी असाच गोंधळ झाला होता हो!

(टिंग्याचा इनायकभौ) -इनोबा

विकि's picture

19 Jan 2008 - 12:50 pm | विकि

कोणत्याही विषयावर चर्चा होतात आश्चर्य आहे. ऑफीसात काम नसेल तर वृत्तपत्रे वाचा.
आपला
कॉ.विकि

लबाड मुलगा's picture

19 Jan 2008 - 1:49 pm | लबाड मुलगा

कोणत्याही विषयावर चर्चा होतात आश्चर्य आहे. ऑफीसात काम नसेल तर वृत्तपत्रे वाचा.

मग तुम्ही कशाला घेतलात भाग?

जा तिकडे मास्कोत पाउस पडत आहे तुम्ही भारतात छत्री उघडुन बसाः)
साम्यवादी पण नाव मात्र अमेरीकी विकी

पक्या

विसोबा खेचर's picture

19 Jan 2008 - 2:10 pm | विसोबा खेचर

मग तुम्ही कशाला घेतलात भाग?

मीही पक्याप्रमाणेच विचारतो. विकि, एवढंच जर असेल तर तू बस ना वृत्तपत्र वाचत. या चर्चेत भाग कशाला घेतलास?

हे मिसळपाव आहे हे असं आहे! परवडलं तर इथे या नायतर बसा वृत्तपत्र वाचत!

तात्या.

विकि's picture

19 Jan 2008 - 2:30 pm | विकि

रागावलास की काय? डायरेक्ट हाकलायला निघालास की मला .
आपला
कॉ.विकि

विकि's picture

19 Jan 2008 - 2:38 pm | विकि

पक्या डेंजर हे कोणते नाव छपरी माणसाचच ना .
आपला
कॉ.विकि

लबाड मुलगा's picture

19 Jan 2008 - 7:06 pm | लबाड मुलगा

पक्या डेंजर हे कोणते नाव छपरी माणसाचच ना .

नाव छपरी असले तरी मी भारतीय आहे बरका साम्यवादी माणसा (?)

विकि's picture

19 Jan 2008 - 9:11 pm | विकि

क्या बोलरे है भिडू. अभी तेरे को क्या बताऊ भाय .देख अभ तेरे वास्ते मेरेको छपरी भाषा बात कारेनेकू पडा. समझा क्या
आपला(समानतेवर विश्वास ठेवणारा)
कॉ.विकि

लबाड मुलगा's picture

19 Jan 2008 - 12:58 pm | लबाड मुलगा

एक चांगली काड्यापेटीतील काडी घ्या....
.
डोळे मिटा...............
..
.कान कोरा............
..
.आधी उजवा ... मग डावा....परत उजवा मग डावा

दहा पाच वेळा झाले की मग
हातात हात गुंफुन सरळ वर न्या
.... अग आइ ग म्हणुन जोरदार आरोळी द्या
ऽऽ
हाताचा तळवा नाका वर घासा जोरदार नाक दुखेपर्यत
ऽऽ
खुर्चीवर उभे राहा तोल संभाळुन
ऽऽ
परत बसा
माण मोडा
बोटे मोडा
ऽऽ
छ्या असे जोरात म्हणुन कागद उडवा
परत गोळा करा
ऽऽ
शांत बसा
एक चांगली काड्यापेटीतील काडी घ्या....
.
डोळे मिटा...............
..

नीलकांत's picture

19 Jan 2008 - 1:15 pm | नीलकांत

;) !

नीलकांत

अवलिया's picture

19 Jan 2008 - 1:23 pm | अवलिया

हेच म्हणतो मी
नाना

लबाड मुलगा's picture

21 Jan 2008 - 6:58 pm | लबाड मुलगा

नाना निलकांत

धन्य वाद

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Jan 2008 - 2:41 pm | बिपिन कार्यकर्ते

पक्या डेंजर, खरंच डेंजर !!!! मस्तच आहे. हा एक गहन प्रश्न आहे आणि जर कोणी म्हणत असेल की त्यांना हा प्रश्न भेडसावत नसेल तर ते खोटं बोलत आहेत.

काही लोकांना चर्चा आवडली नाही पण मला आवडली बाबा... ते 'जीवनस्पर्शी' का काय म्हणतात ना तसा विषय आहे हा... लगे रहो पक्याभाय...

बिपिन.

लबाड मुलगा's picture

21 Jan 2008 - 6:59 pm | लबाड मुलगा

पक्या डेंजर, खरंच डेंजर !!!! मस्तच आहे

धन्य वाद

विकि's picture

19 Jan 2008 - 2:45 pm | विकि

नाव घेऊन बोला .काही लोक काही लोक करत बसू नका. कार्यकर्ता असा नसतो.\
आपला
कॉ.विकि

किशोरी's picture

19 Jan 2008 - 5:29 pm | किशोरी

ऑफीसात काम नसेल तर सरळ कल्टी मारा ऑफीस मधुन मग काय पाहीजे ते करायला मोकळे,
कल्टी मारायचा चान्स नसेल तर लावा लावी करा,म्हणजे त्यांची भांडण-मारामारी बघण्यात वेळ छान जाईल
(हे जरा अतीच आहे),बर मग बॉसला दुसरा किती कामचुकार आहे हे दाखवुन द्या(नको नाहीतर आपल्या
कामचुकारपणाबद्द्लचे सत्य बाहेर येण्याचा धोका)
सोपा मार्ग आपल्या आवडत्या व्यक्तीला फोन करा म्हणजे दोघांचाही वेळ सत्कारणी लागेल!!
मजा करा!!

विकि's picture

19 Jan 2008 - 5:37 pm | विकि

कल्टी मारायचा चान्स नसेल तर लावा लावी करा,म्हणजे त्यांची भांडण-मारामारी बघण्यात वेळ छान जाईल
प्रतिसाद आपल्याला आवडला बुवा. आम्हीही या चर्चेवर तेच केले .
आपला(फुकटात मनोरजंन करणारा)
कॉ.विकि

लबाड मुलगा's picture

19 Jan 2008 - 7:07 pm | लबाड मुलगा

मजा आली
एक काडी वाचली:)

सुनील's picture

22 Jan 2008 - 1:41 am | सुनील

आज शुक्रवार आहे म्हणून काम नाही आणि त्यात हा नवा जॉब्...खूप बोर होतय म्हणून मी मिपा वर लोकांना सल्ले देत बसलेय. सगळे लेख आणि कविता वाचुन झाल्यात्..

वरदा, आज फिरकली नाहीस? काम आलेलं दिसतयं?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

वरदा's picture

22 Jan 2008 - 7:09 am | वरदा

आले होते मी पण खूप वाचायला होतं, पहिले रोशनी मग इथले जोक आणि मग थोडी शेजारच्या बाईला फाईलींगला मदत करत बसले....पण इथले जोक्स खतरनाक आहेत एकदम...आणि खरच टिंगी नाव मुलीचंच वाट्लं सॉरी मिस्टर टिंगी......

झकासराव's picture

22 Jan 2008 - 10:58 am | झकासराव

तुझी खरडवही वाच बघु :)

ब्रिटिश टिंग्या's picture

22 Jan 2008 - 3:53 pm | ब्रिटिश टिंग्या

इट्स ओके ;)
बाकी या आठवड्यात आमच्या हपिसात प्रचंड लेऑफ झाल्याने काम नसतानाही खुप काम करत असल्याची ऍक्टिंग करावी लागत आहे....नाहीतर साला आमचा पण पत्या कट व्हायाचा. असो.
कलोअ,

आपला,
(मिश्टर) छोटी टिंगी

छोटा डॉन's picture

22 Jan 2008 - 3:36 pm | छोटा डॉन

मिपावरच्या रथी-महारथी कामसू लोकांनी सांगितल्याप्रमाणे आम्हीपण लोकांना मेल पाठवणे, ओर्कुट नावाच्या महाटाईमपास माहितीजालावर व्यस्त राहणे [ यात मित्रांच्या / मैत्रिणींच्या मैत्रिणींच्या मैत्रिणींच्या मैत्रिणींच्या मैत्रीणेंचे व्यक्तीचित्र पहात बसणे, ऊगाच आपल्यासारख्या समव्यसनी लोकांना भंगार पाठवणे हे सगळे आले.....] , गूगलबाबाला त्रास देणे या गोष्टी करतो .....
पण याशिवाय अवांतर काही ..........
१. आमची कंपनी "आय टी पि एल " या बैगलोरच्या अतिप्रसिध्द ठिकाणी असल्यामुळे ईथे मॉल, कॉफी डे, गेम, भरपूर हॉटेल्स, बोंबलत हिंडायला भरपूर मोकळी जागा या गोष्टींची वानवा नाही. त्यात काही "अतिप्रसिध्द कंपनीच्या" पण सध्या "ऑन बेंच" म्हणवल्या जाणार्‍या काही सुस्वरूप कन्यांचा वावर या ठिकाणी असल्याने काळ-अपव्याय अगदी सूखद होतो......

२. आमच्या "क्युबिकलच्या" पलीकडेच आमच्या बॉसची अतिआगाऊ "पी ए " बसते. दिसायला "काटा " आहे पण एकंदरित वागणे, बोलणे, चालण्याच्या नावाने चक्क माठ आहे. तर सांगायचा मुद्दा असा की, दर ५-५ मिनिटाला ऊठून तिच्यावर टप्पे टाकणे हा सुध्धा आमचा अति आवडता छंद आहे. या प्रकारामुळे आमचा व तिझा [ हो सांगणे गरजेचे आहे, नाहीतर लगेच आमच्या नावाने खडे फोडायला रिकामे..... ] सुध्धा ऊत्तम काळ्-अपव्याय होतो....

३. काही ईतर कंपन्यातिल आमच्या समव्यसनी दोस्तांनी विपत्रातून पुढे ढकललेल्या "कॅरम, चेस, कार पार्कींग, पूल ...." सारख्या खेळात सुध्धा वेळ कसा कटतो याची जाणीव होत नाही......

चतुरंग's picture

22 Jan 2008 - 6:48 pm | चतुरंग

तुझा बॉस मराठी नाही ना?
नाही म्हटलं, मि.पा.चा सदस्य निघायचा!! :))((
चतुरंग

"तुझा बॉस मराठी नाही ना?
नाही म्हटलं, मि.पा.चा सदस्य निघायचा!! :))(""

च्यायला हा लोचा माझ्या लक्क्षातच आला नाही. खरच माझा बॉस "मराठी"च आहे....
झाले ते झाले, जो होगा देखा जायेगा .........

"शूर आम्ही सरदार आम्हाला काय कूणाची भिती ?"

वरदा's picture

22 Jan 2008 - 9:17 pm | वरदा

मला आधी वाट्लं काय मुर्खासारखा प्रश्न टाकला मी पण आता सॉलीड मजा आली.....माझ्यासारखे खूप आहेत म्हणायचे...ह्सून हसून पोट दुखलं....छोटा डॉन नी तर कहरच केला...मुलगी "काटा" असणे हा नवीन वाक्प्रचार कळला मला.....माझ्या कंपनी ची बैगलोरला ब्रांच आहे....तिथे यायचं असेल तेव्हा बैगलोरलाच ट्रांसफर घ्यावी म्हणते...म्हणजे हा प्रश्न विचारायची वेळच येणार नाही....:)

पिवळा डांबिस's picture

24 Jan 2008 - 1:49 am | पिवळा डांबिस

ऑफिसात काम नसतांना कोणीही चकाट्या पिटेल, वरदाताई!

आम्ही ऑफिसात कामं असतांना ती हाताखालच्या वा टीममधील इतर माणसांवर सोपवून "मिसळपावाचा" आस्वाद घेतो.
आणि आमचे नांव सार्थ करतो!

(डामरट) पिवळा डांबिस

सागर's picture

25 Jan 2008 - 2:50 pm | सागर

वरदा,

तुम्ही एवढ्या प्रतिभावान आहात. ऑफिसात वेळ मिळत असेल तर लेखन करा की...
तेवढेच आमच्यासारख्या वाचकांना चांगली मेजवानीही मिळेल आणि आमच्या ज्ञानात भरही पडेल कसे?....
एक पर्याय : तुम्ही कविता ट्राय करुन पहा... नक्की येतील...

(तुमच्या लेखनाचा चाहता) सागर

सुधीर कांदळकर's picture

27 Jan 2008 - 4:55 pm | सुधीर कांदळकर

पिकनिकला जाणे, फोटो पाहाणे, नवीन गाणी (सीडी/डिव्हीडी) वर लिहून मित्र मैत्रिणींना वाटणे, जालावर विहार करणे, राहिलेच तर नोकरी करणे यातून मला दिवसाला २४ तास पुरे पडत नाहीत.

अघळ पघळ's picture

28 Jan 2008 - 8:28 am | अघळ पघळ

एका दिवसात तुम्ही काय काय करता ते वाचून अवाक झालो. तुम्हाला २४च काय ४८ तास देखिल अपुरे आहेत.
(अचंबीत) अघळ पघळ

वरदा's picture

30 Jan 2008 - 10:35 pm | वरदा

सागर माझी शाळेत निबंध लिहिताना पण वाट लागायची हो..तुम्ही कुणी दुसर्‍या वरदाचं लेखंन वाचलं असेल....
वा सुधीर आयडीया छान आहेत्..पण इथे बाहेर १ डिग्री टेंपरेचर आहे हो बाहेर पडायलाही नको वाट्टं....
पिवळा डांबिस्.... बापरे हे नाव कसं सुचंलं तुम्हाला..तुमचाही बॉस मराठी नाही ना नक्की?
आता खूप काम आलंय्..एकदम ३ प्रोजेक्टस.... येता का कुणी मदतीला?

सागर's picture

1 Feb 2008 - 12:22 pm | सागर

वरदा....

माझा गैरसमज झाला असेल. कारण मागे मी एकदा दुसर्‍या एका संकेतस्थळावर वरदा या नावाने काही लेखन वाचले होते.
मला वाटले तुम्हीच त्या... असो ... हरकत नाही

तुमच्या मदतीला यायला आवडेल मला... पण माझा उपयोग होईन का ? हा पण मोठा प्रश्न आहे..... हा हा .....

मला फावला वेळ फार कमी मिळतो ऑफिसात नाहीतर लेखन करायला खरेच खूप आवडते
असो... चांगले वाटले....
धन्यवाद
सागर

पिवळा डांबिस's picture

30 Jan 2008 - 11:03 pm | पिवळा डांबिस

पिवळा डांबिस्......तुमचाही बॉस मराठी नाही ना नक्की?
..
आमच्या साह्यबाला मराठी तर सोडाच पण देवनागरी लिपीही वाचता येत नाही. आमच्या टेबलावर पु. लं. चे पुस्तक मिळाले तरी आम्ही "इंडियातले लेटेस्ट रिसर्च" वाचतोय असे सांगून वेळ मारुन नेऊ शकतो.:)

आपला,
(पार पोचलेला) पिवळा डांबिस

चतुरंग's picture

31 Jan 2008 - 12:02 am | चतुरंग

नाही तर उद्या आपला साहेब टेबलावर मस्त पाय वैगेरे टाकून "पुलं एक साठवण" वाचताना दिसायचा! :}}
ह्या जगात कोणाला काय येत असेल काही सांगता येत नाही.

अवांतर - मी नववीत असतानाचा एक अनुभव. आम्ही ५-६ मित्र अहमदनगरच्या जवळच्या एका गावात, "अवतार मेहेरबाबा" नामक एका पारशी बाबाच्या समाधी स्थळी सहल म्हणून गेलो होतो. त्याकाळात त्यांचं बरच प्रस्थ असावं कारण परदेशातूनही बरेच भक्त वैगेरे येत. असाच एक गोरा माणूस बघून आमच्यातल्या एकाने त्याला टाटा करण्याचा आविर्भाव करुन दोन-चार इरसाल शिव्या घातल्या. आम्ही ही फिदिफिदि हसून घेतलं. झालं, तो शांतपणे चालत आमच्याजवळ आला. आमची चांगलीच तंतरली. त्या साडेसहा फूट उंच, तगड्या माणसाने आपल्या राक्षसी हातात, ज्याने शिव्या दिल्या त्याची मानगूट पकडली. आणि अस्खलित मराठीत म्हणाला, "मला मराठी चांगलं येतं. तुम्ही आत्ता वापरलेले शब्द वाईट आहेत. तुम्हाला पोलिसांकडे नेऊ का?" आम्ही गयावया करुन त्याची माफी मागितली आणि सुटका करुन घेतली आणि कसली सहल आणि कसलं काय सायकलींवर टांगा टाकून तराट घरी!!

चतुरंग

शानबा५१२'s picture

22 Jul 2010 - 9:44 am | शानबा५१२

बर झाल............... :D :D

काल एक्सप्रेस मधुन येताना एक वडापाव वाला आला त्याला 'श्युश्युक' करुन कोणीतरी बोलवयचा व नंतर त्याने बघुतल की गप्प बसायचा.
वडापाववाल्याला कोण बोलवतय ते समजत नव्हत व तो खुप चिडला होता.जाता जाता खुप घाण शिव्या देउन गेला.
अश्या चरब्या करायला ह्यांना काय मजा येते काय माहीत्,चांगल फोडल पाहीजे साल्यांना!!!

वरदा's picture

31 Jan 2008 - 10:31 pm | वरदा

सॉलीड हे अगदी खरं. गेल्या वर्षी एका आफ्रिकन बाईने मला हिंदीत रामायण महाभारत ऐकवलं..ती केनियाची आहे..तिथे दर शनिवार रविवार लोक रामायण महाभारत इथल्या फुट्बॉल मॅचइतक्या उत्साहाने पहातात म्हणे.....आता बोला...

यशोधरा's picture

21 Jul 2010 - 7:09 pm | यशोधरा

मलापण जाम कंटाळा आलेला आहे... मी काय करु? भ्यां... (|:

पुष्करिणी's picture

21 Jul 2010 - 7:32 pm | पुष्करिणी

मी सध्या बॉसशी यु.एफ्.ओ. आणि एलिअन्स या त्याच्या अतिशय आवडीच्या गहन विषयावर चर्चा करतेय :)
पुष्करिणी

शानबा५१२'s picture

22 Jul 2010 - 9:38 am | शानबा५१२

गप्पा मारतो,ग्लोव्ज फाडतो,टी ब्रेकला जातो,पायांना आराम देतो.

आजचा वेळकाढु उपाय
भारत - श्रीलन्का टेस्ट बघा - आपण दणक्यात हरतोय....

काहीच नाही!

आशिष सुर्वे's picture

22 Jul 2010 - 7:50 pm | आशिष सुर्वे

ऑफिस मधे काहीच काम नसल्यावर तुम्ही काय करता?..
>>

मन्जे रोज हापिसात काय करता अस्सं इचारा की!
काय न्हाय वं.. 'चा' च्या कंपनी काम करत असल्यानं, 'चा' पितू अन चकाट्या हाणतू!

======================
कोकणी फणस

आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/

आमच्या बोस ला पत्रे लिहने (म्हनजे आम्ही काम (च) करतो हे सिद्ध करण्यासाठीच हो दुसरे काय असनार?) आनि मैत्रिनीशी बोलत आन्तरजालावर बोंबलत फिरणे, हे आमचे आवडते उद्योग आहेत.शिवाय चॅट्(मराठीत यास प्रतिशब्द मिळेल काय?) करने हे तर जणू अम्रूताहुन मधुर भासते मज.....