ही कोंबड्याची'चव'हा,वेड लावी जिह्वा(जिभ)
(टीप : सदर गाणे "ही गुलाबी हवा"च्या चालीत म्हणावे.
आरवा=कोंबड्याचे आरवणे या अर्थाने घ्यावे)
ही कोंबड्याची 'चव'हा, वेड लावी जिह्वा(जिभ)
हाय रश्श्यातही,ऐकू ये आरवा......
तंगडी फोडी कुणी,कड्डकडाडूनी
सुख प्रकटले,आज माझ्या मनी
पांढर्या रश्श्यातही,गंध दाटे नवा
ऐकू ये आरवा.......
का किती पेग हे,रिचवले(पचवले) उदरा
भान हरपून मी,हावराबावरा
का कळेना तरी,जाणवतो गारवा
ऐकू ये आरवा.......
-
-
- खाली मुंडी कोंबडी धुंडी
प्रतिक्रिया
10 Mar 2016 - 6:29 pm | प्रदीप साळुंखे
अगागा
;-)
10 Mar 2016 - 6:37 pm | चांदणे संदीप
हुर्रेरेर्रेर्रेर्रे!!! धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड!!!
;)
स्वारी!
(माझ्या आयडीनावात बदल झालाय त्याच्या आनंदात कुठे जाऊ तेच कळेना! ;) )
बाकी, लिहिलेय चान!
Sandy
10 Mar 2016 - 9:52 pm | बोका-ए-आझम
नागपूर खाणावळ, रस्सा रोडीज. म्हणाल तिथे जाऊ.
10 Mar 2016 - 6:45 pm | श्री गावसेना प्रमुख
कोंबडा गावरान आहे कि बॉयलर
11 Mar 2016 - 12:28 pm | सतीश कुडतरकर
आव येक नवीच आलीय. 'इंग्लीश गावठी' म्हणून इकत्यात. दिसाया एकदम गावठी सारखीच. आमी फसलो येकदा! :-(
11 Mar 2016 - 4:21 pm | बोका-ए-आझम
फसलो असं म्हणताय म्हणून विचारतोय.
12 Mar 2016 - 10:58 am | श्री गावसेना प्रमुख
कॉकरेल खाल्ली कि काय
10 Mar 2016 - 6:59 pm | सूड
वशाडी येवो..
10 Mar 2016 - 7:55 pm | चेक आणि मेट
फोड्ड तू भावा!
10 Mar 2016 - 9:49 pm | बोका-ए-आझम
चाल: दिवस तुझे हे फुलायचे
दिवस तुझे हे हादडायचे
रोजच चिकन ओरपायचे!
रश्शास शोधत जाणे
वाटेत सुकेही खाणे
पीसेसनी ताट भरायचे
रोजच चिकन ओरपायचे!
माझ्या या किचनपाशी
खाच तू कलेजी जराशी
तांबडे पांढरे रेमटायचे
रोजच चिकन ओरपायचे!
12 Mar 2016 - 11:08 am | चौकटराजा
मोजावी तर्रीची खोली
मगच आर्डर द्यावी
पदार्थ पुरते भुर्कायचे
कांदा लिम्बू लोणचे हाणायचे
10 Mar 2016 - 10:05 pm | एस
नॉनव्हेज कविता.
10 Mar 2016 - 11:29 pm | kunal lade
आयडी नावात बदल कसा करायचा सांगा न sandy राव.....
10 Mar 2016 - 11:59 pm | चांदणे संदीप
काय विशेष नाय हो!
तुमचे एकूण ५०० प्रतिसाद झाले की नाव बदलायची सुविधा मिळते!
कितके झालेत तुमचे?? मोजलेत का??
11 Mar 2016 - 12:21 pm | पक्षी
डु आय डी बनवायचा (गुपचूप).
11 Mar 2016 - 9:56 am | अत्रुप्त आत्मा
हहिहहिहहि!