गाभा:
दहशतवादाच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतीही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल.
यापूर्वी त्याचा आजतक वर डिसेंबर २००१ मध्ये घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस न्यायालयात सिद्ध झाले असल्याने असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही, पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.
प्रतिक्रिया
10 Mar 2016 - 9:44 pm | ट्रेड मार्क
मी आपला साधासुधा सामान्य हिंदू आहे हो. कोंबडी आणि मासे फक्त खातो आणि माझ्या ओळखीत भारतात राहणारे कोणी वराह खाणारे पण नाहीत, त्यामुळे मला फारशी कल्पना नाही. डुक्कर म्हणलं की उकीरड्यावर फिरणारी आठवतात त्यामुळे कधीच खावंसं नाही वाटलं. बाकी लोक्स बेकन आवडीने खातात आणि वर सांगतात पण भारी चव असते म्हणून.
मी वराह पूज्य आहे असं म्हणलं नव्हतं फक्त तो विष्णूचा एक अवतार आहे असं म्हणतात.
11 Mar 2016 - 8:48 am | भंकस बाबा
वराह विष्णूचा अवतार आहे, बर्र, मत्स्यअवतार कोणाचा होता बुवा?
9 Mar 2016 - 8:22 pm | सुबोध खरे
वराह्पालन करायचे म्हणतोय, सुरुवातीला आपली 'मदत' लागेल, याल ना?
हा प्रतिसाद अप्रस्तुत आणि पातळी सोडून होता असे मला वाटते.
असे होऊ नये.
9 Mar 2016 - 9:18 pm | प्रदीप साळुंखे
गोडसे कृपया मर्यादा सांभाळा ही विनंती,
9 Mar 2016 - 9:36 pm | बोका-ए-आझम
त्यावर बंदी आणणारा कायदा काँग्रेस किंवा पुलोद यांच्यापैकी कुणीतरी एका सरकारने पास केला. तेव्हापासून आपल्याकडे (पक्षी: महाराष्ट्रात) म्हैस आणि रेडा यांचं मांस बीफ या नावाने विकलं जातं. भाजप सरकारने गोवंशबंदी कायदा आणून तेही बंद केलं. तुम्हाला काय म्हणायचंय? बीफ म्हणजे अजून काहीतरी वेगळंच आहे?
9 Mar 2016 - 10:49 pm | मार्मिक गोडसे
@ बोका ए आझम
जे मांस खाण्यास कायद्याने बंदी आहे त्याबद्दलच मि प्रश्न विचारला होता.
@डॉ.सुबोध खरे
मान्य आहे. परंतू मी विचारलेल्या प्रश्नाला प्रतिसाद देताना ट्रेड मार्क ह्यांनी कोणती पातळी राखली होती? वैयक्तिक पातळीवर येऊन उगाचच धार्मिक तेढ निर्माण होईल असा सल्ला मला देण्याची काय गरज होती? त्यामुळे मी सं.मं ला विनंती करतो माझा प्रतिसाद काढून टाकावा व ज्यावर मी उपप्रतिसाद दिला तो ट्रेड मार्क ह्यांचा प्रतिसाद संपादीत करावा.
9 Mar 2016 - 11:57 pm | ट्रेड मार्क
तुमचा गजनी (महम्मद नव्हे, आमिरखानच्या चित्रपटातील) झालाय का? तुम्हीच आधी काय म्हणला आहात ते विसरताय. मी हिंदू परंपरा व रूढी विषयी विचारलं होतं त्यात बीफ खायला मिळेल का? असं तुम्हीच विचारलं होतं. तेव्हा धार्मिक तेढ नव्हती वाढत? ते तर फक्त हिंदू धार्मियांविरोधी नसून कायद्याच्या विरोधी सुद्धा आहे. त्यात भंकस बाबांनी तुम्हाला सांगितलं की भेंडीबाजारात या तिथे खायला घालतो. त्यावर फक्त मी म्हणलं की फक्त बीफच कशाला पोर्क (याला मराठीत डुक्कर म्हणतात) पण खाउन बघा. हिंदू धर्मियांना पोर्क खायला बंदी नाहीये. तुम्हाला का एवढा राग आला काय माहित.
मला वाटत नाही मी कुठे पातळी सोडली आहे. जर का सोडली असती तर नक्कीच मला कोणी तरी दाखवून दिलं असतं, जसं तुम्हाला दाखवून दिलंय.
10 Mar 2016 - 8:05 pm | मार्मिक गोडसे
एखाद्याला बीफ खावेसे वाटले तर त्याची ईच्छा पुर्ण केली जाईल का?
बीफ खाणे कायदेशीर गुन्हा ठरू शकतो हे बरोबर आहे, परंतू हे कृत्य हिंदू धर्माविरुद्ध कसे काय होते? म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे का हिंदू परंपरेत गोमांस खाल्ले जात नसल्यामुळे ईतर धर्मियांनीही ते खाऊ नये म्हणून असा कायदा केला गेला आहे?
मुळात तुम्हाला व भं.बा. ना माझा प्रश्न समजलाच नाही. 'एखाद्याला' व 'त्याची' असे मी म्हणले आहे, मला खायचे असे मी म्हणालो नसताना तुम्ही दोघांनी व्यक्तीगत होउन मला बळजबरीने गोमांस व डुक्कर खायचा सल्ला दिला. वर कुठे जाऊन खावे हेही सुचवले ज्याचा मी विचारलेल्या प्रश्नाशी सबंध येत नव्हता. डुक्कर मधे आणायचे कारण मला कळाले नाही. हे मला योग्य वाटले नाही.
तरीही तुम्ही
अशी शेरेबाजी करत आहात.
अहो गजनी, तुम्हीच म्हणाला ना हिंदू पोर्क खात नाही.
हिंदू वराहपालन करत नाही? किती हे अज्ञान ?
मलाही वाटत नाही माझा पहीला प्रश्न 'धार्मिक तेढ' निर्माण करणारा आहे. ज्याअर्थी मला कोणी तसं दाखवून दिले नाही.
11 Mar 2016 - 9:18 am | भंकस बाबा
@ट्रेडमार्क , जेव्हा मला कळले की तुम्ही विश्वाची चिंता करत आहात. तुम्ही बीफ खात नाही, चांगली गोष्ट आहे. ते प्रकृतिला चांगले नसते.
जेव्हा तुम्ही विचारले की एखाद्याला बीफ खायचे असेल तर? माझे उत्तर होते मी सांगितलेल्या ठिकाणी या भरपूर बीफ मिळेल, जर तुम्ही खातच नसाल तर विचारायचे कशाला?
रच्याकने तुम्ही घरोघर फिरण्यार्या खारीवाल्याकडून मस्का खारी घेऊन कधी खाल्ली आहे का? खा कधीतरी ,शुद्ध शाकाहारी असते ती!
11 Mar 2016 - 8:17 pm | मार्मिक गोडसे
हे बघा भं.बा. मी ट्रे.मा. ह्यांच्या प्रतिसादातील विचारलेला प्रश्न क्वोट करून त्यावर प्रतिप्रश्न केला होता. तुम्हा दोघांना माझा प्रश्न समजला नाही. म्हणून वरील प्रतिसादात ट्रे.मां.ना
हा प्रश्न विचारला. तुम्ही तो वाचला नसावा किंवा मागच्या प्रमाणे प्रश्न कळला नसावा म्हणून मला खारी खाण्याचा सल्ला दिला असावा असे मी समजतो.
12 Mar 2016 - 7:16 pm | भंकस बाबा
याबद्दल माफ़ी,
खारी खाण्याचा सल्ला दिला कारण जेव्हा मोठी गुरे मारली जातात तेव्हा त्यांची चरबी प्रोसेस करून तेल बनवले जाते,जे सामान्य खाद्यतेलापेक्षा पुष्कळ स्वस्त पड़ते. हयांचे कारखाने भिवंडी भागात बहूत करून आहेत. बेकरिवाल्याकडून या तेलाला फार मागणी असते. खारी याच तेलात बनवली जाते. हे तुम्हा दोघांना सांगायचे उद्दिष्ट की तुम्ही गोमांस खात नाही पण अजाणता आपल्या पोटात ते जाते.
डुक्कराविषयी थोडेसे, डुक्कराचे मांस जगात सर्वाधिक खाले जाते. याची कारणे ही आहे की डुक्कर कदान्न खाऊन जगते, त्याची वीण अफाट असते( एका वेळेला सरासरी 8/9 पिल्लै) . आता ते मुस्लिमाना निषिद्ध आहे त्यामुळे तुम्ही दिलेला भेंडीबाजारात पोर्क खाण्याचा सल्ला धार्मिक तेढ़ वाढवणारा ठरतो. तुम्ही भेंडीबाजार एरिया बघितला आहे काय? तिथल्या एखाद्या उपहारगृहात असे गमतिने बोलून पहा , प्रसाद मिळून तुम्ही प्रतिसाद द्यायच्या अवस्थेत राहणार नाही.
माझ्यापुरते, मी गोमांस खातो, गोहत्याप्रतिबंध कायद्याला माझा विरोध आहे. याचे कारण मी शेती जाणतो. मी शेती केलि आहे. हाडाचा शेतकरी या कायद्याला कधीच सम्मति देणार नाही. याची कारणे बरीच आहेत. त्यासाठी वेगळा धागा काढावा लागेल.
11 Mar 2016 - 8:19 pm | ट्रेड मार्क
तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी विश्वाची चिंता करतोय असं कुठे म्हणलंय? मला बीफ खायचं असं पण मी म्हणलो नव्हतो. तो मार्मिक गोडसे या आयडीने विचारलेला प्रश्न आहे. त्याला तुम्ही भेंडीबाजारात या भरपूर खायला घालतो असे उत्तर दिलेत.
मला बीफ खायचे असेल तर मी राहतो तिथे भरपूर मिळते आणि बिनदिक्कत खाऊ शकतो. पण मला खायचे का नाही हे मी या प्रतिसादात सांगितले आहे.
बाकी तुम्ही म्हणताय ती खारी कधी खाण्याचा योग आला नाही.
11 Mar 2016 - 8:37 pm | मार्मिक गोडसे
अरे व्वा!
मला पोर्क खायचं असं मी पण म्हणलो नव्हतो, गजनीसाहेब. मूळ प्रश्न विसरला असालच.
9 Mar 2016 - 11:33 pm | भंकस बाबा
गुरांच मांस, ज्यात बैल ,गाय, म्हैस, रेडा हे सर्व आले. आपल्या महाराष्ट्रात गोमांस बंदी आहे ,बीफबंदी नाही, त्यामुळे बीफ मिळते. आणि हास्यास्पद गोष्ट अशी की बंदी घातली म्हणजे ती वस्तु मिळत नाही असे कोणी सांगितले ? मुस्लिम वस्तीत खुल्ले आम हुकाला टांगुंन बीफ विकल जाते. आता तो रेडा आहे का बैल आहे का गाय आहे हे त्या खाटकाला माहीत! गोवंशहत्याबन्दी म्हणजे गाय व् बैल महाराजा, म्हेस वा रेडा नव्हे,
9 Mar 2016 - 9:16 pm | प्रदीप साळुंखे
हाच आशय मला उमगला होता,पण नानांनी थोडी घाई केली,
असो
8 Mar 2016 - 12:53 pm | चेक आणि मेट
सरकारच्या धोरणांचा विरोध करण्याच्या नादात काँग्रेस अन् सेक्युलर,तथाकथित डावे देशविरोध्यांची पाठराखण तर करत नाहीत ना याची खात्री करुन घ्यावी लागेल.
:
:
"अफजलबाबत घाईने निर्णय झाला असे वाटते"
-------- श्री पी पादंबरम्
8 Mar 2016 - 1:14 pm | तर्राट जोकर
त्याबद्दल आम्ही आधीच निषेध नोंदवला आहे. तुम्ही वाचले नसेल.
8 Mar 2016 - 2:27 pm | याॅर्कर
धाग्याचे शीर्षक वाचून बुचकळ्यातच पडलो,नंतर धागाकर्ता कोण आहे आणि प्रतिसाद वाचल्यावर कळले विडंबन आहे ते.
हुश्शश्
म्हटलं देशविरोधी वायरस मिपापर्यंत पोहचला कि काय??
8 Mar 2016 - 3:17 pm | viraj thale
दुर्गा मातेबद्दल जे विधान तिकडे केले गेले आहे ते आपल्याला माहीत आहे का ?
8 Mar 2016 - 3:33 pm | नाना स्कॉच
मी मुळ पत्रक वाचलेले नाही, आपण वाचले असल्यास त्याची लिंक (नको लिंक नको) छायाप्रत ज़ेरॉक्स स्कैन कॉपी वगैरे काही असल्यास इकडे पेस्ट करा, विधान केले एकाने ते वाचले दुसऱ्याने विवेचन केले तिसऱ्याने अन चवथा म्हणतो भावना दुखावल्या आहेत, ये कुच हजम नै हुआ, कमअस्सल कागड़पत्र असल्यास द्या मग वाचुन ठरवतो,
शिवाय, माझा मुद्दा अतिशय सिंपल आहे ज्याला तुम्ही "टेंजेंट" जाताय भाऊ साहेब, पत्रक किंवा त्यातली भाषा ख़राब असणे हे नक्कीच शक्य आहे , मी ते मुळ पत्रक वाचले अन त्यातली भाषा मला आवडली नाही किंवा आक्षेपार्ह वाटली तरी मी
1. माझ्या वैयक्तिक भावना दुखावल्या गेल्यात असे म्हणेल (अर्थात भावना दुखावल्यामुळे कोण अन्नपाणी त्याग करूण प्रयोपवेशन करायला बसेल असे वाटत नाही)
2. भावना माझ्या वैयक्तिक दुखावल्या तर मी तसे बोलेण , मी फ़क्त माझी माझ्या विधानांची जबाबदारी घेईन, उगाच अमुक इतके टक्के लोकांच्या भावना दुखावल्या म्हणून उमेदवारी करत लोकांची जबाबदारी घेणार नाही, त्यामुळे अश्या केस मधे वैयक्तिक भावना दुखावल्या आहेत म्हणल्यास मला काही हरकत नाही पण जेव्हा कोणी 1.2 अब्ज पैकी 70% लोकांच्या भावना दुखावल्या म्हणतो तेव्हा ती निश्चित मोठी गोष्ट असते अन ती सिद्ध करायचे शिवधनुष्य त्यालाच पेलावे लागते
असा माझा मुद्दा आहे.
8 Mar 2016 - 3:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
अरे लेखाचा मूळ मुद्दा काय होता ते कोणाच्या लक्षात आहे का अजून ?... निदान लेखकाच्या तरी ??? ;) =))
8 Mar 2016 - 3:56 pm | viraj thale
https://www.change.org/p/mr-ban-ki-moon-ban-inhumane-and-cruel-festivals...
8 Mar 2016 - 4:03 pm | नाना स्कॉच
अत्यंत एकांगी अन चुकीची भाषा माझ्या वैयक्तिक भावना खरेच दुखावल्या आहेत! पण म्हणजे नेमके काय अपेक्षित आहे?? ब्रिगेड़ी भाषा अन ह्या भाषेत समानता जाणवली हे ही नोंदवतो ह्या निमित्ताने,
see ? मी माझ्यापुरता बोलतोय
8 Mar 2016 - 4:09 pm | viraj thale
माफ करा पण असल्या लोकांची हीच लायकी आहे .
8 Mar 2016 - 4:19 pm | नाना स्कॉच
अहो मी पत्रकातल्या भाषेबद्दल बोललोय हो, तुमचा भाव मी समजू शकतो! :)
8 Mar 2016 - 4:25 pm | viraj thale
ok .मला वाटल मलाच ब्रिगेडि सारखे ठरवल त की काय ;
8 Mar 2016 - 6:18 pm | श्री गावसेना प्रमुख
Sitaram Yechuri is the current head of CPI(M). He is married to Seema Chishti. Seema Chishti is the resident editor of Indian Express , Delhi.
Pronoy Roy (head of NDTV) is married to Radhika Roy. Radhika Roy is the sister of Brinda Karat of CPI(M). Brinda Karat is the wife of Prakash Karat , ex-head of CPI(M).
The Communist-Media nexus will surely harm our nation.
We would like to know your views.हा वरचा भाग जुना नाही तर आजचा सुब्रमण्यम स्वामी ह्यांच्या fb पेज वर आलेला आहे,सीताराम येचुरी ह्यांच्या (there is nothing wrong in saying pakistan jindabad) एका स्टेटमेंट नंतर ,आता त्यांनी ते कधी म्हटलं ते मला माहित नाही त्याबद्दल लिंक ची मागणी करू नये
8 Mar 2016 - 6:54 pm | सुबोध खरे
https://www.youtube.com/watch?v=zFKVBY9rkVc
सुब्रमण्यम स्वामीनची हि विधाने सत्य आहेत
8 Mar 2016 - 6:34 pm | नाना स्कॉच
फेसबुक!! विषय संपला!!
___/\__
धन्यवाद
8 Mar 2016 - 6:56 pm | सुबोध खरे
नाना साहेब
फेस बुक सोडा
विकी वर ताडून पहा.
सुब्रमण्याम स्वामी सहसा पुराव्याशिवाय काही बोलत नाहीत.
8 Mar 2016 - 7:01 pm | नाना स्कॉच
हो हे मात्र आहे! उगाच काय बाई ला अन खुळ्याला नॅशनल हेराल्ड मधे नाकी दम आणला आहे खरे! :D
8 Mar 2016 - 9:00 pm | श्री गावसेना प्रमुख
कन्हैया राष्ट्रवाद के मुद्दे को यकायक ज़ोर से उछालने के पीछे भाजपा की राजनीति को कारण बताते हैं.
वे कहते हैं, “य़ूपी का चुनाव आने वाला है. बीजेपी के ख़िलाफ़ दलितों के बीच माहौल पैदा हो गया है. ध्यान भटकाने के लिए इन लोगों ने ये राष्ट्रवाद और देशद्रोह का नाटक शुरू कर दिया.
हा वरचा परिच्छेद bbc च्या वाचकांच्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरात आलेला आहे।jnu च्या रजिस्टर नुसार जर कन्हैय्या ने त्या दिवसाचा प्रोग्रॅम ठरवून केलेला असेल तर,त्याचे आजचे हे उत्तर गैर लागू ठरत नाही काय।jnu मध्ये तिथले प्राध्यापक श्री परांजपे ह्यांच्या व्याख्यानात कन्हैय्या ने अडथळा का आणला ,त्यांनी तर एव्हढंच विचारलं कि स्वतंत्र काश्मीर झालेलं कोणाला आवडेल,दोन चारच टाळक्यांनी हात वर केले म्हणून।सगळ्यांनी हात वर केले असते तर त्याला हर्षवायू झाला असता।
8 Mar 2016 - 9:02 pm | श्रीगुरुजी
देशद्रोहाच्या आरोपावरून गेले साडेचार महिने तुरूंगात असलेल्या हार्दिक पटेलचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. कन्हैय्या आणि त्याच्या साथीदारांनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की देशद्रोहाचा आरोप हा फार गंभीर स्वरूपाचा आरोप आहे.
https://us-mg6.mail.yahoo.com/neo/launch?.rand=6kc1mttb1jtb8#6452458445
8 Mar 2016 - 9:03 pm | श्रीगुरुजी
हीच मंडळी सहिष्णुता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल टाहो फोडत असतात. आता त्यांनी गेस्टबुकातील एक कॉमेंटही सहन होत नाही.
http://www.thehindu.com/news/national/other-states/congress-upset-over-r...
8 Mar 2016 - 11:13 pm | श्रीगुरुजी
एकवेळ कन्हैय्या परवडला, तो अजून विद्यार्थी म्हणून एकाद्यावेळेस सोडून देता येईल. पण जेएनयू मधील या महिला प्राध्यापिकेची मुक्ताफळे वाचल्यावर तिथले विद्यार्थी अशा विचारांचे कसे हे लक्षात येते.
http://zeenews.india.com/news/india/jnu-professor-spits-venom-against-in...
त्यातील काही अंश -
JNU professor Nivedita Menon, who teaches at the Centre for Comparative Politics and Political Theory at the International Studies school, said, “We believe that democracy (Rashtraraj) is a very strong thing, but if it was so strong then why few students, who raised such (anti-India) slogans were arrested.” She went on to say that, “If such incidents happen then the democracy is not so strong as we claim because tanks and guns are used to keep the democracy intact and strong.”
“We all know that the world today believes that India is illegally occupying Kashmir,” she added.
Further spitting venom against the state, she said, “
'
“Atrocities are being committed from Kashmir to the northeast and in Chhattisgarh,” Menon noted, adding that “Manipur and Kashmir have been illegally occupied by the Indian state.''
The JNU professor was of the view that raising pro-azadi slogans in context of Kashmir is justified.
Further justifying her statement, Menon said, “When the international community is debating over legal occupation of Kashmir, then we should think that 'azadi' slogan is justified.''
She also said that Nagaland was annexed by India.
Menon was not the only one who shared such anti-national views. Retired Delhi University professor Achin Vinayak shared echoed similar views on Kashmir and the northeast.
9 Mar 2016 - 2:52 am | वैभव जाधव
काय प्रकार सुरु आहे नक्की?
भंजाळलंन डोकं. मी कोण आहे, कुठे आहे काही समजत नाहीये.
9 Mar 2016 - 2:55 am | निनाद मुक्काम प...
वायरल झालेल्या मेसेज ची शहानिशा
रोहित उमर आणि कनैह्या ह्यांच्या पलीकडे सुद्धा भारत, भारतीय लोक त्यांच्या सरकारकडून अपेक्षा त्यांची पूर्ती असे बरेच
विषय आहेत , विरोधक रोहित कनैह्या वर अडकून पडले आहेत ते मध्यमवर्गीय व उच्च वर्णीय तटस्थ हिंदूंचे ध्रुवीकरण
करत आहेत भाजपसाठी हे फायद्याचे आहे सावरकर संघ ह्यांच्यावर ओढून ताणून टीका करणाऱ्या लोकांच्यामुळे
संघाच्या लोकांना आगामी राज्यातील निवडणुकीसाठी आपसूक चार्ज केले जात आहे ,
मोदींनी आक्रमक हिंदुत्वाचा मार्ग न स्वीकारल्याने कट्टर हिंदू त्यांच्यावर काहीप्रमाणात नाराज होते , मोदी समर्थक परेश व अनुपम साध्वी योगी ह्यांच्यावर टीका करत आहेत तर गृहमंत्री नथुराम शी संबंध नाही असे सरळ सांगत आहेत तरीही
कनैह्या व रोहित त्यांच्यावर मेहेरबान वाममार्गी प्रसार माध्यमे ह्याच्या कृपेमुळे हा कट्टर वर्ग मोदींना पाठिंबा देत आहे
कारण थापरच्या कार्यक्रमाची लिंक मिळत नाही आहे पण हेगडे व जस्टीस गांगुलीने चरफडत काही तथ्य सांगितली आहेत
ती येथे देतो
कनैह्या वर जस्टीस राणी ह्यांनी जे कडक ताशेरे ओढले त्यामुळे सोशल मिडीयावर जे अनेक जण केवळ मोदी विरोध म्हणून कनैह्या उमर भाषण स्वातंत्र्य बडबड करत होते ते अंतर्धान पावले आता जस्टीस राणीच्या निर्णयावर प्रश्न उभे करणे म्हणजे प्रती उमर होणे त्यांना शक्य नव्हते.
तेव्हा हे ताशेरे थापर च्या जिव्हारी लागले ते सुप्रीम कोर्टात जाऊन रद्द करता येतील ह्या त्याच्या प्रश्नावर गांगुली ह्यांनी नकारार्थी उत्तर दिले.
अंतरिम जमीन दिला आहे तेव्हा ताशेरे किंवा निरीक्षणे रद्द का करावी असा सर्वोच्च न्यायालय प्रश्न करू शकेन
खरे तर गांगुली ह्यांनी अनेक दाखले देऊन सिद्ध केले कि ह्या निरीक्षणाच्या मुळे कनैह्या हा तुरुंगात होता त्याहून जास्त बाहेरच्या जगात बंदिस्त झाला आहे त्यांचे मौकिक अधिकारावर राणी ह्यांनी बंधने आणली आहे वैगैरे
हेगडे म्हणाले कि जस्टीस राणी ह्याची निरीक्षणे खालच्या कोर्टाला आधारभूत किंवा संधर्भ म्हणून मानवी लागतात हा आपल्या न्यायलयीन प्रकियेचा ढाचा आहे म्हणूनच उमर व अनिर्बंध च्या केसवर त्यांचा अत्यंत प्रतिकूल परिणाम होणार आहे.
येत्या सहा महिन्यात कनैह्या बिग बॉस च्या घरात राहणार असून त्यांच्या प्रत्येक कृत्यांवर पाळत ठेवण्याचा मुक्त परवाना
पोलिसांना आहे व ह्या निरीक्षणाला आधार मानून देशात अनेक न्यायालय निकाल देतील
जस्टीस राणी ह्यांचे मनपूर्वक आभार
त्या वाईट प्रतीच्या न्यायाधीश आहेत का असे विचारण्या पर्यंत मजल थापर ची गेली ह्याला उत्तर गांगुलीने नाही जरी दिले तरी तिचा निर्णयावर ताशेरे ओढले
जस्टीस गांगुली आपल्याच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश सहकार्यांना अफजल प्रकरणी चुकले असे म्हणताच अनुपम ह्यांनी त्यांना सोलला गंमत म्हजे ह्या प्रकरणाला जबाबदार युपीए सरकार ज्यांनी न्यायालयीन प्रकियेत महत्वाची भूमिका घेतली त्यांचा प्रतिनिधी सुरजितवाला त्यांचा गटात होता , जस्टीस गांगुली ह्यांनी त्यांच्या सरकारच्या निर्णयावर न्यायालयावर ताशेरे ओढले तेव्हा आपल्या सरकारचा निर्णय योग्य होता हे सांगण्याची तसदी सुद्धा सुरजितवाला ह्यांनी घेतली नाही.
उलट भाजपवर डाफरले.
खुद्द कोन्ग्रेज मध्ये अफजल वरून दुफळी माजली आहे
४५ खासदार असणाऱ्या कोन्ग्रेज चे अरुणाचल प्रदेश सारखी पुनरावृत्ती झाली तर सगळी विधायाके धडाधड पार पडतील.
9 Mar 2016 - 11:34 pm | viraj thale
प्रत्येक प्रतिसादावर पुन्हा प्रतिसाद देण्याची जी पद्धत आहे ती मला थोड़ी अडचणीची वाटत आहे कारण नवीन आलेले प्रतिसाद शोधण्यासाठी "नवीन " प्रतिसाद असे लिहिलेले प्रतिसाद शोधण्यात वेळ जातो पान पालटायला लागतात .नवीन आलेले प्रतिसाद एका मागोमाग एक येण्यासाठी काय पर्याय आहे .
11 Mar 2016 - 9:17 am | बोका-ए-आझम
भारतीय सैनिकांविषयी काढलेल्या उद्गारांचा निषेध करणारी पोस्टर्स लावल्याची बातमी आहे. नशीब. नाहीतर हेही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर खपवलं असतं.