नवोदित कवी

हरिदास's picture
हरिदास in जे न देखे रवी...
4 Mar 2016 - 12:07 pm

नकोत मजला टाळ्या चुटक्या
वाहवाही अन मान बढाई
कोऱ्या पाट्या तुमच्या आमच्या
रसिक आपुली बाप नि आई

कुणी कल्पतो आकाशगंगा
कुणी वर्णीतो प्रीत पतंगा
नाद कुणासी विठू रायाचा
रंगून जातो भलत्या रंगा

अलंकारे सजवी कुणी कविता
कुणाची वाहे दुःख सरिता
भलत्या भलत्या कल्पना स्फुर्ती
शब्द निराळे भाव पेरिता

नवकवी मीही धडपड करतो
फाटके तुटके शेले विणतो
तुमच्या दारी हात जोडुनी
कृपाप्रसादा निशिदिनी झुरतो

रांगत्या मुलासी उचलुनी घ्यावे
अनुभव अंजन नयनी दयावे
तुम्हीच दावा चूक आमुची
दिशा दावूनी मार्गस्थ करावे

शब्दास शब्दांनी न्याय मिळावा
नवजात प्रवाहे सहज रुळावा
कल्पवृक्ष हा बहरत राहो
नव्या कळ्यांनी सदा फ़ुलावा

:हरिदास पाटील

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

4 Mar 2016 - 12:12 pm | अभ्या..

वाहवा वाहवा, सुरेख
स्वागत पाटीलबाबा.

कविता जितकी मनस्वी, तितकी ती उत्स्फूर्त असते. मग अशा कवितेला टाळ्याचुटक्यांची वाहवा मिळाली नाही तरी ती आपल्या वाटेने बहरत राहते. तुम्हांला तुमची कविता लवकरच सापडो ही सदिच्छा.

लीलाधर's picture

4 Mar 2016 - 12:13 pm | लीलाधर

क्या बात है मस्तच

हरिदास's picture

4 Mar 2016 - 12:52 pm | हरिदास

धन्यवाद

एक एकटा एकटाच's picture

4 Mar 2016 - 12:46 pm | एक एकटा एकटाच

वाह वाह

खरच मस्त आणि मनस्वी लिहिलय

हरिदास's picture

4 Mar 2016 - 12:53 pm | हरिदास

धन्यवाद

चांदणे संदीप's picture

4 Mar 2016 - 1:07 pm | चांदणे संदीप

शब्दास शब्दांनी न्याय मिळावा

हे आवडले!

Sandy

नीलमोहर's picture

4 Mar 2016 - 1:12 pm | नीलमोहर

छानच आहे की नवकविता :)

अत्रुप्त आत्मा's picture

4 Mar 2016 - 1:40 pm | अत्रुप्त आत्मा

झ्याक भट्टी जमलिया!

रातराणी's picture

4 Mar 2016 - 9:29 pm | रातराणी

मस्त! कविता आवडली!

चाणक्य's picture

4 Mar 2016 - 9:58 pm | चाणक्य

छान कविता.

पद्मावति's picture

4 Mar 2016 - 10:01 pm | पद्मावति

सहजसुंदर कविता.

हरिदास's picture

5 Mar 2016 - 10:38 am | हरिदास

धन्यवाद

स्वामी संकेतानंद's picture

5 Mar 2016 - 10:45 am | स्वामी संकेतानंद

झकास सुरुवात! कविता आवडली.

क्लास कविता ! वाचनखुण साठवली आहे.

कुणी कल्पतो आकाशगंगा
कुणी वर्णीतो प्रीत पतंगा
नाद कुणासी विठू रायाचा
रंगून जातो भलत्या रंगा

क्या बात ..
पुन्हा पुन्हा वाचावी अशी कविता

यशोधरा's picture

5 Mar 2016 - 7:05 pm | यशोधरा

सुरेख!

सतिश गावडे's picture

5 Mar 2016 - 7:54 pm | सतिश गावडे

सुंदर कविता. आवडली.

मिसळपाव's picture

5 Mar 2016 - 11:16 pm | मिसळपाव

हरिदास,
काय सुरेख काव्य आहे हे. काव्य या सदराच्या नावाला अगदी शोभणारं! फार पूर्वी, फार वर्षांपूर्वी (म्हणजे "म्हाराजांच्या टायमाला.." पुलनी लिहिलंय ना त्या प्रमाणे!!) ईथे पुष्कराज अशा सुंदर कविता लिहायचा त्याची आठवण करून दिलिस. "गणपत वाणी बिडी पिताना.."च्या नादात (बरचसं) बसतंय. थोडेफार शब्द खटकताहेत म्हणून जरा पुढे-मागे करून/कींचित बद्लून घेतलेत - मुळातली तुझी अशी छान रचना, अर्थाला धक्का न लावता, म्हणायला जराशी सफाईदार करायचा प्रयत्न ईतकंच. आता नादात म्हणताना मधे मधे गचके बसत नाहीत. ;-)
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

नकोत मजला टाळ्या चुटक्या
वाहवाही अन मान बढाई
कोऱ्या पाट्या तुमच्या आमच्या
रसिक आपुली बाप नि आई

कुणी कल्पितो नभात गंगा
कुणी वर्णीतो प्रीत पतंगा
नाद कुणासी विठू रायाचा
रंगून जातो भलत्या रंगा

अलंकारे कुणी सजवी कविता
कुणाची वाहे दुःख सरिता
भलभलत्या कल्पना स्फुर्ती त्या
शब्द निराळे भाव पेरिता

नवकवी मीही धडपड करतो
विटके तुटके शेले विणतो
तुमच्या दारी हात जोडुनी
कृपाप्रसादा निशिदिनी झुरतो

मुला रांगत्या उचलुनी घ्यावे
अनुभव अंजन नयनी भरावे
तुम्हीच दावा चूक आमुची
दिशा दावूनी मार्गी करावे

शब्दानीच मज न्याय मिळावा
प्रवाही नवथर सहज रुळावा
कल्पवृक्ष हा बहरत राहो
नव्या कळ्यांनी सदा फ़ुलावा
- हरिदास

टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

चांदणे संदीप's picture

7 Mar 2016 - 10:52 am | चांदणे संदीप

क्या बात है!

चपखल शब्दप्रयोगांनी चार चांद लावलेत तुम्ही कवितेला!
नभात गंगा
भलभलत्या
विटके
मुला रांगत्या
मार्गी
शब्दानीच मज
प्रवाही नवथर

अर्थात मूळ कविताही चार चांद लावण्याजोगीच आहे!

Sandy

हरिदास's picture

7 Mar 2016 - 12:49 pm | हरिदास

वाह वाह सर....अगदीच सुरेख....धन्यवाद
असेच सर्वांच मार्गदर्शन लाभुदे...आपल्या मराठी भाषेचा गौरव करावा तितका थोडा आहे......