नाडीग्रंथ ताडपट्टीच्या त्या फोटोचे इतके महत्व ते काय ?

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
27 Oct 2008 - 11:22 am
गाभा: 

नाडीग्रंथ ताडपट्टीच्या त्या फोटोचे इतके महत्व ते काय ?

नाडी ग्रंथांच्या ताडपत्रावरील मजकुराबाबत चर्चेचा विषय लाऊन धरलेला काही वाचकांचा अपवाद सोडता फारसा विचारात घेण्यासारखा किंवा वैचारिकतेने आनंददायी वाटत नाही.
याचे कारण म्हणजे त्यांची ज्योतिषशास्त्राबाबत नकारात्मक मते आहेत. त्यांच्या वैचारिक बैठकीमुळे फलज्योतिषाला वा अन्य भविष्यकथनाच्या विधांना विरोध करणे स्वाभाविकपणे घडते. अशा मनोधारणेतून त्या लोकांना नाडी ग्रंथ हे भविष्यकथनाचा प्रकार असल्याने ते थोतांड असणार असे खात्रीपुर्वक वाटते वा मानावेसे वाटते. त्यामुळे या विषयावर अनेकांच्या अपेक्षित प्रतिक्रिया आल्या.
नाडी ग्रंथांवरील लेखनातून त्यातील ताडपट्टीतील मजकुरातून जे काही लेखनकार्य भविष्यकथन म्हणून केले गेलेले आहे. त्याला सध्या गौण महत्व देऊन नाडीग्रंथांतील ताडपट्ट्यांचा अभ्यास करण्यासाठी खरेतर नकारात्मक विचारांची बैठक असलेला गटच अभ्यासपूर्ण कार्य करू शकतो. आणि त्यासाठीच जर कोणी भारतात किंवा परदेशातील तज्ञ मदतीचा हात पुढे करत असेल तर त्यांची मदत होऊ शकेल.
तसे पाहिले तर 'या फोटोत काय दडलय?' विचारणेत तो फोटो व त्यासबतचे स्पष्टीकरण वाचून-पाहून हा फोटो फार महत्वाचा पुराचा आहे किंवा असेल असे सामान्यतः वाटत नाही हे खरे.
ते बरोबरही आहे. काय लावलय हे ओकंनी नाडीपुराण असा सामान्य वाचकांचा ग्रह होणे स्वाभाविक आहे. तथापि जी शंका उपस्थित केली गेली त्याचे निराकरण करणे आगत्याचे ठरते.मात्र खोलवर विचार केल्यावर ही बाब वाटते तितकी हलकी फुलकी किंवा टाळून विचारावेगळी करायला येत नाही असे लक्षात येते. ते कसे तर ऐका तर -
पण आता खालील विचार नीट वाचल्यावर त्यातून विविध आक्षेपांच्या संदर्भात काय काय उपस्थित होते याची झलक मिळेल.
1. पहिला आक्षेप असा असतो की या ताडपट्ट्यात काहीही लिखाण कुठल्याही भाषेत केलेले नसते. त्या कोऱ्याच असतात. भासवले असे जाते की नाडीवाचक त्यात पाहून त्यातील मजकूर वाचतो आहे.
उत्तर - आता त्या ताडपट्टया कोऱ्या असतात की कि काहीतरी का होईना लिहिलेल्या असतात हे शोधणे हे काम केले पाहिजे. ते काम नाडी भविष्य केंद्रातजाऊन प्रत्यक्ष शोधकरून त्यांच्याकडील उपलब्ध ताडपट्टया पडताळाव्या लागतील. प्रस्तूत लेखकाने असे अभ्यासकार्य केले आहे. तसे केले असता त्या संपूर्णतः कोऱ्या नसतात. त्यावर मजकूर लिहिलेला असतो. हे लक्षात येते. त्यामुळे या आक्षेपातील खोटेपणा सिद्ध होतो.
2. दुसरा आक्षेप असा असतो की चर्चेसाठी जरी त्या ताडपट्ट्यात मजकूर असतो असे मानले तरी त्यातून नेमकी कुठली भाषा असते याचा अर्थबोध होत नाही.
उत्तर - यावर सोपे उत्तर असे की सध्या जे नाडी ग्रंथ पट्टीवाचनाचे काम करतात ते सर्व तमिळभाषी आहेत. ते यातील मजकूर वाचून दाखवतात अणि तो मजकूर परत एका ४० पानी वहीत सध्याच्या प्रचलित तमिळ लिपित पुन्हा लिहून काढतात. यावरून त्या मजकुराची भाषा तमिळ का अन्य कोणती असावी याची खात्री करता येते. या उलट ताडपट्ट्यांचे वाचन करणारे तमिळभाषिक सोडून अन्य भाषिकांतर्फे होते वा केले जाते असा पुरावा उपलब्ध करावा लागेल. तो होत नाही. आक्षेप असा खोडून निघतो.
3. तिसरा आक्षेप असा की जरी मानले की ताडपट्टी मजकूर लिहिलेला असतो. त्याची भाषा तमिळ असते तर ती सामान्य तमिळ भाषिकाला का वाचायला येत नाही? त्या अर्थी नाडीपट्टी वाचन हा एक तमिळ नाडीवाचकांचा देखावा असतो.
उत्तर – असे लक्षात येते की सामान् तमिळभाषिकांना या ताडपट्ट्यांवरील मजकूर वाचायला येत नाही किंवा आला तरी अर्थबोध होत नाही. याचे मराठी भाषिकांना पटेल असे स्पष्टीकरण असे की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेत लिहिला गेला आहे. तरीही त्यातील छापील मराठीतील ओव्यांचा अर्थ सर्वसामान्य मराठी समजणाऱ्याला समजायला कठीण जाते. आता तीच ज्ञानेश्वरी जर मोडी भाषेत लिहून सध्याच्या मराठी वाचकाला दिली तर त्याची काय अवस्था होईल? त्याला नेमके काय लिहिलेले आहे याचा अर्थ बोध होणार नाही पण कोणी ती मोडी लिपि-भाषातज्ञ वाचायला लागले तर थोडा थोडा अर्थ कळेल. तोच अर्थ ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलेल्या जाणकार मंडळींनी फोडकरून सांगितला की 'ओहो, असा अर्थ आहे!' असे उद्गार ओठी येतील. नेमके तेच सामान्य तमिळ भाषिकांचे होते असे अभ्यास करता जाणवते. त्यामुळे या आक्षेपात काही तथ्य नाही. हे लक्षात येते.
4. आक्षेप चौथा असा की सामान्य तमिळांना जरी ती वाचता आली नाही तरी ती तमिळ भाषातज्ञांनी तरी वाचून कुठे मान्य केली आहे?
उत्तर – या तऱ्हेचे अभ्यासकार्य अनेक वेगवेगळ्या तमिळ भाषा तज्ञांकडून विविध ठिकाणी झाले आहे. तथापि अजूनही त्यांच्याकडून ते आणखी पद्धतशीरपणे व्हावे यासाठी प्रयत्न करणे जरूरी आहे. श्री लंकेतील डॉ. अरसे कुलरत्ने अणि लंडनस्थित डॉ. एस. संबंधम या दोघांनी अत्यंत परिश्रमपुर्वक एक अभ्यास निबंध सन २००२ मधे लिहून प्रकाशित केला. त्यात त्यांच्या शोधाचा महत्वाचा भाग होता की खरोखरच नाडीच्या ताडपट्ट्यात त्यांच्या संबंधातील नावे कोरलेली होती.त्यांनी तो शोध निबंध आभिप्रायार्थ पुनर्जन्मावर आयुष्यभर काम केलेल्या डॉ. आयन स्टीव्हन्सन यांना अमेरिकेत पाठवला होता. त्यात त्यांनी असे म्हटले होते की मी यावर तत्वतः विश्वास ठेऊ शकत नाही. तरीही असा नाडी ग्रंथांचा पुरावा खरोखर असल्यास तो अविश्वसनीयच नव्हे तर सध्याचे प्रस्थापित शास्त्राचे नियम उलथुन टाकणारा आहे असे सिद्ध होईल. तथापि यावर आणखी अभ्यास कार्य करावे लागेल.
या पुराव्यांच्या संदर्भात विशेष उल्लेख करावा लागेल की नाडी ग्रंथ भविष्याच्या दि १४ ऑक्टोबर २००७ साली पुण्यात झालेल्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद चेन्नईच्या इन्स्टिट्युट ऑफ एशियन स्टडीज या तमिळ भाषेतील इंडॉलॉजीवर काम करणाऱ्या व विशेषतः ताडपत्रांच्या ग्रंथांवर शोधकाम व त्यांचे संरक्षण करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक, चालक डॉ. जी जॉन सॅम्युएल यांनी स्वीकारले होते. त्यांच्या सोबत त्याच संस्थेच्या ताडपत्रशोध विभागाच्या प्रमुख तमिळतज्ञ श्रीमती लक्ष्मी यांनाही बोलावले गेले होते. त्यांनी उपस्थितांसमोर त्या पट्टीतील अणि अन्य एका नाडीपट्टीतील मजकूर व विशेषतः नावे वाचून ती खरोखरीच ताडपट्टीत कूट तमिळ भाषेत कोरून लिहिलेली आहेत असा असल्याचा निर्वाळा दिला.
जर्मनीत थॉमस रिटर नावाच्या एका नाडी भविष्यावर जर्मन भाषेत पुस्तके लिहिलेल्या व्यक्तीने तेथील तमिळ भाषेतील तज्ञाकडून नाडी ग्रंथ भविष्य ताडपट्टीतील मजकूर वाचून तो भविष्य कथन सोडून अन्य धार्मिक लेखन नसल्याचा निर्वाळा दिला असा उल्लेख त्यांच्या ''द सीक्रेट ऑफ इंडियन पामलीफ लायब्ररीज्" पुस्तकात केलेला आहे.
यापुढे जाऊन त्या ताडपट्ट्यात व्यक्तीच्या अन्य तपशीलाचे उल्लेख, कसे असतात याचा अभ्यास करून या ताडपट्यांचे फोटो मिळवून यावर आणखी कार्य होणे अपेक्षित आहे.
5. आक्षेप पाचवा असा की नाडी ग्रंथ भविष्य सध्याच्या प्रचलित विज्ञानाच्या विरोधात जात असल्याने त्याला कितीही पुराव्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न निष्फळ आहे.
उत्तर - मान्यता आहे की सामान्यपणे व्यक्तीचे नाव त्याचे आईवडील किंवा वरिष्ठ नातलग ठरवतात व विधिपुर्वक ठेवतात. पण जर या ताडपट्याच्या मजकुरात व्यक्तीचे नाव व अन्य माहिती त्याने ती न पुरवलेली असता, त्याच्या जन्माच्या आधीपासून केंव्हातरी लिहून तयार असेल तर त्याला काय म्हणायचे? त्याची संगती कशी लावायची? ती संगती मानवी बुद्धीच्या स्तरावर लावता येत नसेल तर त्याला मानवी विज्ञानाच्या कक्षेबाहेरील म्हणजेच इंद्रीयगम्य ज्ञानाने ज्ञात न होणाऱ्या अदभूत शक्तीचा विलास किंवा लीला मानावे लागेल. कदाचित त्रिमितीच्या पलिकडे सध्या अज्ञात अन्य मितींच्या ज्ञानात त्या गूढाचे उत्तर सामावलेले असेल. भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ असा आपण करतो तसा भेद न करता काही गोष्टी घटना ज्ञात करता येऊ शकतात याचा शोध घ्यावा लागेल. मात्र नाडी भविष्य थोतांड मानून त्याच्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून असे म्हणत बसायचे की जर आम्हा विज्ञानवाद्यांनी नाडी ग्रंथांच्या या सत्यतेला तत्वतः मान्यता दिली तर आमच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचा पायाच निखळून पडतो म्हणून आम्हाला नाडी ग्रंथांच्या अस्तित्वाची दखल घेणे मान्य नाही. ही तर वैज्ञानिक विचारांशी प्रतारणा नव्हे काय?

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

27 Oct 2008 - 11:51 am | सखाराम_गटणे™

http://www.misalpav.com/node/4247

http://www.misalpav.com/node/3968

तुम्ही तुमच्या नाडीचा काही व्यवहारातही वापर करणार आहात की नाही. आम्ही खास धागे काढले नाडीचा वापर व्यवहारात व्हावा म्हणुन.
मला असे आढळुन आले आहे, जेव्हा जेव्हा आम्ही (मिपाकर) ह्या विषयावर विधायक चर्चा घडवुन आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आम्हाला जोतीष मधील लोकांकडुन पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.

---
तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.

विसोबा खेचर's picture

27 Oct 2008 - 11:59 am | विसोबा खेचर

ओकसाहेब, आपल्याला दिपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...

बाकी चालू द्या, :)

आपला,
(चट्टेरीपट्टेरी चड्डीची नाडी चांगली घट्ट आवळून बांधणारा) तात्या.

(हो, नायतर तिच्यायला सुटायची आणि पब्लिकला 'विश्वरूप दर्शन' व्हायचं! :)

फटू's picture

27 Oct 2008 - 12:03 pm | फटू

आपला,
(चट्टेरीपट्टेरी चड्डीची नाडी चांगली घट्ट आवळून बांधणारा) तात्या.

(हो, नायतर तिच्यायला सुटायची आणि पब्लिकला 'विश्वरूप दर्शन' व्हायचं! )

=)) =)) =))

सतीश गावडे
मी शोधतो किनारा...

फटू's picture

27 Oct 2008 - 12:07 pm | फटू

नाडी तपासून घ्यावी लागणार...

आम्ही एकदाच "प्रतिक्रिया प्रकाशित करा" दाबलं... तरीही आमचा प्रतिसाद दोनदा कसा प्रकाशित झाला :S

सतीश गावडे
मी शोधतो किनारा...

राघव's picture

27 Oct 2008 - 12:13 pm | राघव

तुमचे सगळे लेख वाचलेत. मागे एकावर प्रतिसादही टाकला होता. अगदी राहावत नाही म्हणून परत लिहितोय.

जरावेळ आपण असे धरून चालू कि ज्योतिष एक शास्त्र आहे, खरे आहे. ज्योतिष कथनाचे अनेक प्रकार आहेत हे ही मान्य करू.
अगदी असेही धरून चालू कि प्रत्येक प्रकार अगदी शास्त्रोक्त रित्या सिद्ध झालेला आहे.
पण पुढे काय? या ज्योतिष/भविष्याच्या भानगडीतून आपण काय मिळवणार? कशासाठी आपण हे सर्व करायचे? जास्तीत जास्त तुम्ही स्वतःचे/दुसर्‍यांचे भविष्य अगदी छातीठोकपणे सत्य म्हणुन सांगाल. होणार्‍या घटनांसाठी मानसिकरित्या तयारी कराल. यापेक्षा जास्त काय होणार? मानवाच्या/समाजाच्या उन्नतीची कोणती गरज या "शास्त्रातून" भागणार?

न पेक्षा, भविष्य जाणून घेण्याच्या उत्सुक मानसिकतेचा लाभ घेऊ पाहणार्‍या, लोकांना धंदा चालू करण्याचा एक चांगला मार्ग उपलब्ध होईल अन् चांगल्यापैकी पैसा गाठीला बांधता येईल हा एक व्यवहारीक फायदा मात्र नक्की होईल. सध्या सर्वत्र या गोष्टींचा सुकाळ झालेला आहेच.

माझ्या मते तर हे भविष्य वगैरे खरे-खोटे करण्यात वेळ वाया न घालवता त्याची गरज कशी नाही हेच पटवून दिल्यासच समाजाचा पुष्कळ फायदा होईल.

असो. ही माझी वैयक्तीक मते आहेत. पण कुणावर व्यक्तिगत रोख नक्कीच नाही. तरीही कुणास वाईट वाटल्यास आधीच क्षमस्व म्हणतो.

जे झालंय, जे होतंय अन् जे होणारंय ते सर्व चांगल्यासाठीच यावर पूर्ण विश्वास असलेला
अन् भविष्य बघण्याची यत्किंचितही गरज न वाटणारा
मुमुक्षु

वेताळ's picture

27 Oct 2008 - 12:33 pm | वेताळ

नाडी व नाडा ह्यात फरक काय?
चड्डीला नाडी असते का नाडा?
वेताळ

धोंडोपंत's picture

27 Oct 2008 - 3:48 pm | धोंडोपंत

नाडीज्योतिषाचे पोवाडे हल्ली बरेच गायले जाताना ऐकू येतात.

आमचे वैयक्तिक मत म्हणजे नाडीज्योतिष हे केवळ अनाकलनीय आहे. जगात पुढे हजारो वर्षे जन्मणार्‍या सर्वांची भविष्ये ऋषीमुनींनी लिहून ठेवली आहेत, असा अपसमज समाजात पसरवणे हेच चुकीचे आहे.

बहुतेक नाडीग्रंथ तामिळ भाषेत असल्यामुळे सर्व ऋषीमुनींना तामिळ येत होते काय? हा प्रश्न पडतो. तसे जर असते तर त्याकाळच्या सर्व ग्रंथरचना संस्कृत ऐवजी तामिळ भाषेत झाल्या असत्या.

दुसरी गोष्ट म्हणजे त्या पद्धतीला कोणताही शास्त्र नाही. अनुमान कशाच्या आधारावर? तर ऋषीमुनींनी लिहून ठेवले आहे म्हणून. त्यांनी तसे लिहिले आहे याला पुरावा काय? त्या पट्ट्या तुम्हाला बघायला मिळतात का? तामिळ ज्याला येते त्या माणसाकडून त्यावर नक्की काय लिहिले आहे याची खात्री करता येते काय?

नाडीज्योतिषाबद्दल एकाच गृहस्थांचे दोन किस्से सांगतो.

आमच्या परिचयातील एक गृहस्थ तीन चार महिन्यापूर्वी पुण्याच्या कुठल्यातरी नाडी/परकर वाल्यांकडे जाऊन आले आणि त्यांचे खूप कौतुक करत होते.

त्यांच्या गर्भवती मुलीला मुलगा होईल आणि मुलगाच होईल असे खात्रीलायकपणे , कोणतीही प्रश्नकुंडली न मांडता आणि शनीचे स्थान न पाहता, त्या नाडी़वाल्यांनी केवळ त्या नाडीपत्रावरून सांगितले. त्या गृहस्थांची मुलगी प्रसूत होऊन तिला मुलगी झाली. नाव 'अवनी' ठेवले. सुंदर नाव आहे.

तसेच त्यांच्या मुलाचे ऍरेन्ज्ड मॅरेज होणार असेही भाकित नाडीवाल्यांतर्फे करण्यात आले होते.

मुलाची कुंडली आम्ही पाहिली होती, तेव्हा त्याचा प्रेमविवाह होईल असे आम्ही त्यांना सांगितले होते. कारण आमच्या कृष्णमूर्ती पद्धतीप्रमाणे, त्याच्या सप्तमस्थानाचा सबलॉर्ड हा पंचमाचा बलवान कार्येश आहे. इतकेच नव्हे तर त्याला सुरू असलेल्या सध्याच्या दशेच्या सुरूवातीपासूनच हा एका मुलीच्या प्रेमात आहे असेही आम्ही त्यांना सांगितले होते.

त्यामुळे नाडीवाल्यांनी ऍरेन्ड मॅरेजच होईल हे केलेले भाकित त्यांनी आम्हाला घोळवून घोळवून ऐकवले. आम्ही म्हटले , " ठीक आहे. घोडामैदान जवळ आहे."

दाखवलेली प्रत्येक मुलगी तो मुलगा नाकारू लागल्यावर या गृहस्थांनी आणि त्यांच्या सौभाग्यवतींनी त्याला एक दिवस आडवा घेतला. तेव्हा त्याने कबूल केले की , " धोंडोपंतांनी सांगितल्याप्रमाणे माझे एका मुलीशी गेले दोन वर्षे प्रेमसंबंध आहेत पण तिच्या वडिलांचा प्रचंड विरोध आहे. त्यामुळे यातून पुढील मार्ग निघेपर्यंत, सांगून आलेल्या मुली नाकारणे हाच पर्याय मला योग्य वाटला. पण काहीही झालं तरी आम्ही दोघे लग्न करणार आहोत." असो.

आपला,
(शब्दवेल्हाळ) धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

नाडी ग्रंथावरील प्रस्तुत भाषेच्या पुराव्यांना ज्योतिषकथनांच्या उपयोगितेशी जोडून पाहू नका.
नाडी ग्रंथ भविष्याच्या दि १४ ऑक्टोबर २००७ साली पुण्यात झालेल्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद चेन्नईच्या इन्स्टिट्युट ऑफ एशियन स्टडीज या तमिळ भाषेतील इंडॉलॉजीवर काम करणाऱ्या व विशेषतः ताडपत्रांच्या ग्रंथांवर शोधकाम व त्यांचे संरक्षण करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक, चालक डॉ. जी जॉन सॅम्युएल यांनी स्वीकारले होते. त्यांच्या सोबत त्याच संस्थेच्या ताडपत्रशोध विभागाच्या प्रमुख तमिळतज्ञ डॉ. श्रीमती लक्ष्मी यांनाही बोलावले गेले होते. त्यांनी उपस्थितांसमोर त्या पट्टीतील अणि अन्य एका नाडीपट्टीतील मजकूर व विशेषतः नावे वाचून ती खरोखरीच ताडपट्टीत कूट तमिळ भाषेत कोरून लिहिलेली आहेत असा असल्याचा निर्वाळा दिला.
जर्मनीत थॉमस रिटर नावाच्या एका नाडी भविष्यावर जर्मन भाषेत पुस्तके लिहिलेल्या व्यक्तीने जर्मनीमधील तमिळ भाषेतील तज्ञाकडून नाडी ग्रंथ भविष्य ताडपट्टीतील मजकूर वाचून तो भविष्य कथन सोडून अन्य धार्मिक लेखन नसल्याचा निर्वाळा दिला असा उल्लेख त्यांच्या ''द सीक्रेट ऑफ इंडियन पामलीफ लायब्ररीज्" पुस्तकात केलेला आहे.
यापुढे जाऊन त्या ताडपट्ट्यात व्यक्तीच्या अन्य तपशीलाचे उल्लेख, कसे असतात याचा अभ्यास करून या ताडपट्यांचे फोटो मिळवून यावर आणखी कार्य होणे अपेक्षित आहे.
नाडी ग्रंथ थोतांड मानून त्याच्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून असे म्हणत बसायचे की जर आम्हा विज्ञानवाद्यांनी नाडी ग्रंथांच्या पुराव्यांच्या सत्यतेला तत्वतः मान्यता दिली तर आमच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचा पायाच निखळून पडतो म्हणून आम्हाला नाडी ग्रंथांच्या पुराव्यांच्या अस्तित्वाची दखल घेणे मान्य नाही. ही तर वैज्ञानिक विचारांशी प्रतारणा नव्हे काय? यावर विचार व्हावा. असो.
नाडीग्रंथांवरील या धाग्याचे वाचन २८३ सदस्यांनी केले आणि त्यातील सात जणांना यावर आपली प्रतिक्रिया देण्याइतकी उत्सुकता वाटली.
आता १५ दिवसांच्यावर वेळ गेल्यावर आणखी प्रतिक्रिया येण्याची वाट न पाहता माझ्याकडून उत्तराची अपेक्षा असणाऱ्यांसाठी त्यांच्यापैकी काही प्रतिक्रियांवर माझे विचार मांडत आहे.
१) सखाराम गटणे – आपण पाठवलेले धागे वाचलेले आहेत.
एक ज्योतिषी म्हणून मी नाडी ग्रंथांकडे पहात नसून ताडपत्रावर कोरलेल्या तमिळ भाषेतील लेख असा विषय धरून हा धागा मांडला गेला होता. ज्योतिषशास्त्राची उपयोगिता काय, ती कितपत तर्कशुद्ध आहे याबाबत मला या धाग्यातून काहीही विषद करायचे नव्हते व नाही. ते काम ज्योतिषशास्त्र वा कला मानणाऱ्यांनी वाटल्यास अवश्य हाती द्यावे. मी ज्योतिषशास्त्री नाही किंवा नाडी ग्रंथवाचक, भविष्यकथक नाही. मी एका अभ्यासकाच्या भूमिकेतून या विषयाकडे पहात आहे.
२) चट्टेरी पट्टेरी चड्डीची नाडी घट्ट बांधलेल्या तात्यांच्या प्रोत्साहनाबाबत धन्यवाद.
3) मुमुक्षु –"भविष्य जाणल्याने काही लोकांची तुंबडी भरण्याखेरीज समाजाचा काय फायदा?" असा विचार आपण मांडला आहेत. आपल्या विचारसरणीच्या लोकांचे मत अगदी बरोबर आहे. ज्योतिष्यांकडे जावे कि न जावे हा सर्वस्वी वैयक्तिक विषय आहे. तथापि काही लोकांना भविष्यकथन ऐकायला आवडते. कांहींना त्याचा मानसिक आधार वाटतो तर काहींना त्या मार्गदर्शनातून अत्यांतिक व आकस्मिक उपयोग होतो असा अनुभव येतो. त्या लोकांसाठी या कथनांचा उपयोग होतो. असे वारंवार त्यावरील माहिती जमवल्यावर लक्षात येते. त्या विचाराच्या लोकांना आपणासारख्यांनी नाडी भविष्य पाहून काहीही लाभ होणार नाही असे सांगण्याने प्रभाव पडत नाही असे दिसते. मी या धाग्यातून आपणासारख्या व अन्य नाडी ग्रंथांच्या पुराव्यांकडे दुर्लक्ष करणाऱया विचारवंतांना यातील पुराव्यांवरून नाडी ग्रंथ ताडपट्यात तथ्य काय आहे याचा भाषाशास्त्राचा पुरावा म्हणून शोध घ्यायला हवा असे पुन्हा पुन्हा सूचित करत आहे.
वरील दिलेले पुराव्यांत काय त्रुटी आहेत व त्या शिवाय आणखी काय पुरावे मिळवावे लागतील याचा विचार व्हावा. मिपा चे अनेक सदस्य परदेशात विविधपदांवर आहेत त्यापैकी अनेकांचे संबंध भाषातज्ज्ञांशी येत असतील त्यांच्याकडून यावर मार्गदर्शन मिळवता येईल का यासाठी हा धागा प्रस्तुत केला होता. भारतातील वा परदेशातील तज्ज्ञांशी यावर विचार व्हावा.
४) धोंडोपंत – ज्योतिषशास्त्राचे आपण अभ्यासक आहात. आपण दिलेल्या उदाहरणांवरून नाडी कथन चुकले वा चुकते असे आपण विषद करता. शिवाय कृष्णमुर्तींचे वैयक्तिक काय मत होते ते मांडता. आपण नाडी ग्रंथ भविष्य अनुभवून नाडी ग्रंथ पट्ट्यात व्यक्तींची नावे खरोखरच कोरून येतात तर ती कशी येत असावीत यावर आपले मत मांडावे अशी प्रामाणिक विनंती.

शशिकांत

खादाड_बोका's picture

13 Nov 2008 - 11:46 pm | खादाड_बोका

प्रकाटाआ.

जैनाचं कार्ट's picture

14 Nov 2008 - 10:38 am | जैनाचं कार्ट (not verified)

वरील कार्याला जबाबदार सर्व नाडी वाले ;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

limbutimbu's picture

14 Nov 2008 - 12:37 pm | limbutimbu

तुमचे नाडी वरील पुस्तक ४/५ वर्षान्पुर्वी विकत घेतलेले, माझ्या सन्ग्रही पेटीत आहे! :)
हिन्दुस्थानी गुढशास्त्रान्बद्दलच्या "विज्ञानवादी" लोकान्च्या प्रतिक्रियान्च्या माझ्या अनुभवानुसार, ते लोक स्वतः काही एक करणार नाहीत, व दुसरा करत असेल तर मधे मधे "टान्ग" घालतील.
एक उदाहरण देतो, ज्योतिषात पत्रिकेवरून व्यसनाधीनता बघता येते, तसेच व्यसनमुक्ती होण्याचि शक्यता देखिल आजमावता येते, पण त्याचा आकडेवारीनिशी अभ्यास करायचा झाल्यास, व्यसनमुक्ती केन्द्रात दर महिना शेकड्याने ट्रिटमेण्ट घेणार्‍या व्यक्तिन्च्या कुन्डल्यान्चा अभ्यास करावा लागेल! जमल्यास व्यसनातून बाहेर न पडलेल्या व्यक्तिन्च्या कुन्डल्या तपासाव्या लागतील.

व्यक्तीला वेड लागेल (वेडाचे झटके अथवा पूर्ण वेड) किन्वा कसे हे देखिल पत्रिका तसेच हातावरील रेषान्वरुन सान्गता येते, पण त्यात अधिक अचूकता येण्यास, आधीपासूनच वेडे झालेल्या असन्ख्य लोकान्च्या पत्रिकान्चा तौलनिक अभ्यास करावा लागेल! त्यासाठी वेड्यान्च्या इस्पितळान्चे, मनोवैज्ञानिक/मानसिक उपचार देणार्‍या डॉक्टरान्चे सहाय्य लागेल

साधे, जगात वा भारतात दर मिनिटाला किती मानव जन्माला येतात याचे प्रमाण मिळू शकते, पण याचा अर्थ असा नाही की खरोखरच प्रत्येक मिनिटाला तेवढ्या सन्ख्येने जीव जन्माला येतात, जर दवाखान्यात्/अन्य ठिकाणी, जन्मदिनान्काबद्दलची माहिती सक्तिची करतानाच जन्मवेळही नोन्दवणे सक्तिचे केल्यास कोणत्या योगात किती, कुठे, कसे जीव जन्माला येतात याची आकडेवारी तयार मिळू शकेल, पण मूळात हे सर्व "धादान्त खोटे" असा पूर्वग्रह असलेल्यान्कडून वेगळी कशाची अपेक्षा करणार?
इथेच घोडे पेण्ड खाते!
तथाकथित विज्ञानवादी, या गूढ विद्या ही "शास्त्रे" नाहीतच या पूर्वगृहितकाने भारावून, आणि असे हे अभ्यासाचे कष्ट करण्याऐवजी, "आम्ही अमुक तमुक तेवढ्या पत्रिका देतो, सान्गा तुम्ही", अशा तर्‍हेची आव्हाने देत रहातात!

गूढशास्त्रान्ची निखळ परिपूर्ण आकडेवारीनिशी सिद्ध होणारी वाढ होणे दूरच राहिले, उलट आहे ते ज्ञान टिकवणे, पुर्वीच्या परकीय आक्रमणान्मुळे व सध्याच्या "अतिविज्ञानवादी अन्धश्रद्धेमुळे" धोक्यात आहे.

हे असेच चालणार! (उगिच नाही "कलियुग" असे म्हणले आहे)

नाडी बद्दल मला उत्सुकता हे, पण अजुन अनुभव घेतलेला नाही! (अनुभवावीण्/अनुभुतीशिवाय त्यावर काहीएक बोलणे व्यर्थ हे, तेव्हा परत कधीतरी, तुमचे चालूद्यात!)

आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

महेश हतोळकर's picture

14 Nov 2008 - 1:11 pm | महेश हतोळकर

ज्योतिषात पत्रिकेवरून व्यसनाधीनता बघता येते, तसेच व्यसनमुक्ती होण्याचि शक्यता देखिल आजमावता येते, पण त्याचा आकडेवारीनिशी अभ्यास करायचा झाल्यास, व्यसनमुक्ती केन्द्रात दर महिना शेकड्याने ट्रिटमेण्ट घेणार्‍या व्यक्तिन्च्या कुन्डल्यान्चा अभ्यास करावा लागेल! जमल्यास व्यसनातून बाहेर न पडलेल्या व्यक्तिन्च्या कुन्डल्या तपासाव्या लागतील.

व्यक्तीला वेड लागेल (वेडाचे झटके अथवा पूर्ण वेड) किन्वा कसे हे देखिल पत्रिका तसेच हातावरील रेषान्वरुन सान्गता येते, पण त्यात अधिक अचूकता येण्यास, आधीपासूनच वेडे झालेल्या असन्ख्य लोकान्च्या पत्रिकान्चा तौलनिक अभ्यास करावा लागेल! त्यासाठी वेड्यान्च्या इस्पितळान्चे, मनोवैज्ञानिक/मानसिक उपचार देणार्‍या डॉक्टरान्चे सहाय्य लागेल

तथाकथित विज्ञानवादी, या गूढ विद्या ही "शास्त्रे" नाहीतच या पूर्वगृहितकाने भारावून, आणि असे हे अभ्यासाचे कष्ट करण्याऐवजी, "आम्ही अमुक तमुक तेवढ्या पत्रिका देतो, सान्गा तुम्ही", अशा तर्‍हेची आव्हाने देत रहातात!

या दोन्ही विधानांमधला विरोधाभास तुला जाणवला नाही का? जर तथाकथीत विज्ञानवाद्यांना पत्रीका/कुंडल्या बघता आल्या असत्यातर नक्कीच ही वेळ आली नसती. सोपं उदाहरण सांगतो. एखाद्या नवीन उपकरणात (डिजीटल कॅमेरा) एक नवीन सोय आहे . ही सोय आधीच्या उपकरणात नव्हती. विक्रेता किंवा तंत्रज्ञ मला ती सोय समजाऊन सांगतो आहे. माझ्यात आणि त्याच्यात पुढील संभाषण होतं. (अविश्वास का कुतुहल - थोड्यावेळ बाजूला ठेऊ).

तो: आता बघा साहेब. या तुम्ही ही गोष्ट करू शकता....
मी: खरं सांगताय (? !)
तो: आहो खरंच!
मी: दाखवा बघु करून....

कदाचीत विक्रेता करून दाखवेल किंवा मला मॅन्युअल मध्ये (माहिती पुस्तीकेत) वाचून स्वतःच करायला सांगेल. हे झालं छोट्या पातळीवर. हेच जरा मोठ्या पातळी वर पाहिल्यास... उपकरण कदाचीत खूपच मोठं आणि किचकट असेल तर मला शिकायलाच खूप वेळ लागेल. मग मी दुसर्‍यालाच (विक्रेता, तंत्रज्ञ किंवा इतर कोणी ज्या ते येते) ती गोष्ट करून दाखवायला सांगणार ना.
तेच ज्योतीषांच्या बाबतीतही होतं आहे. शिवाय दुसरा सुप्त हेतू असा आहे की तथाकथीत विज्ञानवाद्यांनी निकालाच्या बाबतीत फेरफार केली हा आरोप होऊ नये.

आता काही लोकांनी ज्योतीष शास्त्राचा अभ्यास करून आपले निष्कर्श मांडले ही आहेत. (आपले घाटपांडे काका).

तथाकथीत विज्ञानवादी
महेश हतोळकर

limbutimbu's picture

14 Nov 2008 - 2:55 pm | limbutimbu

महेशराव, आपण दिलेल उदाहरण तर अगदी "चपखल" दिल्यासारख वाटतय!
पण तसे ते नाहीये!
डिजीटल कॅमेरा वा अन्य कोणत्याही आधुनिक वस्तुबाबत तुमचा पूर्वग्रह नाहीये, असलाच तर तो तुम्ही लिहिल्याप्रमाणे, तुमच्या स्वतःच्या "वापर करता येण्याच्या क्षमते" बद्द्दल हे
अन समजा वस्तुबद्दलही पूर्वग्रह असलाच, तरी ती घेण्याचे तुमच्यावर बन्धन नाहीये, उदाहरणात, तुम्ही ग्राहक"राजे" आहात, अन विक्रेता एक क्षूद्र जीव जो त्याची वस्तू "फायद्याकरता" विकायचा प्रयत्न करतो हे! तुम्ही तो घेण्याचे नाकारु शकता, नाकारताना, त्या वस्तुस तसेच वेळेस विक्रेत्यास देखिल दोनचार शिव्याशाप (शिव्या ठीकेत हो, शाप कशाला आणखी? आमचा नाही विश्वास! :D ) घालू शकता! त्याने नाही त्या विक्रेत्याचे/वस्तुचे वा तुमचे काही बिघडणारे!

गूढशास्त्रे (एकटे ज्योतिष नाही) व विज्ञानवादीअन्धश्रद्ध यात असे ग्राहक्-विक्रेत्याचे नाते नाहीये, व जे नाते विज्ञानवादीअन्धश्रद्धान्नी गेल्या काहीवर्षातल्या आन्दोलन्/कायदे इत्यादीद्वारे निर्माण केले आहे ते "विळा/भोपळ्याचे" आहे! विज्ञानवादीअन्धश्रद्ध ग्राहक नाहीत आणि, "त्यान्ना" गुढशास्त्रवादी काही विकायला जात नाहीयेत. इथे विज्ञानवादीअन्धश्रद्ध हे स्वयम्घोषीत "पोलिस" बनलेले आहेत. या नात्यात तुमचे उदाहरण कसे काय बरे बसू शकते?
अन अजुन एक आक्षेप नॉर्मली अस्तो, तो म्हणजे हे सगळे गुढशास्त्रवादी थोतान्ड पसरवून जनतेला नादी लावून फसवतात, तर या नजरेने बघितल्यास देखिल, गुढशास्त्रवाद्यान्चे खरेखुरे ग्राहक जी सामान्य जनता, तिचे समाधान कोणीच विज्ञानवादीअन्धश्रद्ध का बरे विचारात घेत नाही???? साधे डॉक्टरकडील उपायान्बाबत देखिल "सेकण्ड ओपिनिअन" घेणारी सुशिक्षीत माणसे "गुण" आल्याशिवायच का गुढशास्त्यान्कडे जातात? की असे जाणारी तमाम जनता मूर्ख-फसलीजाणारी अडाणी, अन विज्ञानवादीअन्धश्रद्ध लोक तेवढेच शहाणे?

तुम्ही म्हणता तेवढ्या सहजपणे जर या विज्ञानवादीअन्धश्रद्धान्ना ज्योतिष जाणून घ्यायचे असेल तर "नस्ती आव्हाने" देत न बसता पुण्यातल्या अगदी "कुडमुड्या" समजल्या जाणार्‍या ज्योतिषाकडे जरी ते जावुन बसले तरी त्यान्ना बरेच काही उमगू शकेल!
पुण्यात ज्योतिष शिकवणार्‍या अनेक सन्स्था आहेत, काही खूप जुन्या आहेत, जर अगदी खरखोट जरी करायच असल तरी या विज्ञानवादीअन्धश्रद्धान्ना तिथे स्वतः जाऊन अभ्यास करावा लागेल जे त्यान्च्या पचनी पडत नाही कारण "पूर्वग्रह".
असो, मूळ विषय ओकान्च्या "नाडीपट्टी" सम्बन्धी हे, त्यात अजुन हे "ज्योतिषाचे" "खूळ" कशासाठी???? नाही का???? :D

आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Nov 2008 - 3:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अन विक्रेता एक क्षूद्र जीव जो त्याची वस्तू "फायद्याकरता" विकायचा प्रयत्न करतो हे! तुम्ही तो घेण्याचे नाकारु शकता, नाकारताना, त्या वस्तुस तसेच वेळेस विक्रेत्यास देखिल दोनचार शिव्याशाप (शिव्या ठीकेत हो, शाप कशाला आणखी? आमचा नाही विश्वास! Big Grin ) घालू शकता! त्याने नाही त्या विक्रेत्याचे/वस्तुचे वा तुमचे काही बिघडणारे! ....
तर या नजरेने बघितल्यास देखिल, गुढशास्त्रवाद्यान्चे खरेखुरे ग्राहक जी सामान्य जनता, तिचे समाधान कोणीच विज्ञानवादीअन्धश्रद्ध का बरे विचारात घेत नाही?

तुमचीच दोन उदाहरणं घ्या? कॅमेरा विकणार्‍याला लोकांना जर ग्राहकानी घातले शिव्याशाप तर ठीक आणि समाधान (पद्धत चूक का बरोबर हा प्रश्न जरा बाजूलाच ठेवू या) विकणार्‍या लोकांना घातले चूक असं का बरं?
कॅमेरा विकत घेताना दुसर्‍याची फसवणूक होते असं मला वाटलं आणि मी ग्राहकाला हरतर्‍हेने समजावलं तर ठीक पण समाधान विकत घेणार्‍याला समजावलं तर मग मी विज्ञानवादीअंधश्रद्ध, असं का?
अहो, साधी गोष्ट आहे, चोरी करणं चूक आहे हे पटतं म्हणून चोरीच्या विरुद्ध लोकं बोलतात. आता काही लोकांना नाडी, ज्योतिष चूक वाटतं ते त्यांचं म्हणणं मांडतात. चोरी कायद्याने गुन्हा आहे (पकडलं गेलं तर) शिक्षा होते, ज्योतिष सांगणं कायद्यानी गुन्हा नाही त्यामुळे पकडण्याचा प्रश्न येत नाही. आणि ज्यांना ते योग्य वाटतं ते लोकं ज्योतिष, नाडी वगैरे गोष्टी बघतात, विचारतात; ज्यांना पटत नाही ते त्याला विरोध दाखवतात, ज्यांना मत नाही ते शांत बसतात. पण या तथाकथित विज्ञानवादी-अंधश्रद्ध लोकांना ज्योतिष, नाडी वगैरेंवर विश्वास ठेवणारे लोक एवढं का महत्त्व देतात? दुसर्‍या प्रकारचे लोकच पहिल्या प्रकारच्या लोकांना महत्त्व देत आहेत असं एकूण रागरंग बघून दिसतंय.
विज्ञानात कोणीही प्रश्न विचारले, तुम्ही बरोबर आहात हे सिद्ध करा सांगितलं की लगेच तसं होतं; ज्योतिष, नाडी वगैरेंमधे होत नाही, पहिल्या प्रकारच्या लोकांना ते खोटं वाटलं तर मला त्यात आश्चर्य वाटत नाही.

आणि हो, ज्योतिष, नाडी, चमत्कार, गूढविद्या यांच्यावर अविश्वास दाखवणारे सगळे "अंनिस"वाले असतात अशी एक नवीनच अंधश्रद्धा मला दिसत आहे.

असो, मूळ विषय ओकान्च्या "नाडीपट्टी" सम्बन्धी हे, त्यात अजुन हे "ज्योतिषाचे" "खूळ" कशासाठी???? नाही का????
बाकी हा ज्योतिषाचा विषय आपणच काढलात, महेशरावांनी त्याला उत्तर दिलं; इथली पोस्ट्स पहाता माझं असं मत झालंय.

मराठी_माणूस's picture

14 Nov 2008 - 3:55 pm | मराठी_माणूस

ज्योतिष सांगणं कायद्यानी गुन्हा नाही

चुकीच असेल आणि सामान्य माणसाचे फसवणूक आणि नुकसान होत असेल तर कायदा का होत नाही ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Nov 2008 - 4:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चुकीच असेल आणि सामान्य माणसाचे फसवणूक आणि नुकसान होत असेल तर कायदा का होत नाही ?
आता यात मी काय बोलणार हो? सरकारी नोकर या गोष्टीवर प्रतिक्रिया व्यक्त करु शकतो का नाही तेही मला माहित नाही. त्यामुळे अळीमिळी गुपचिळी!

शिवाय नोकरीच्या स्वरुपामुळे मी "बायस्ड" असण्याची "भीती" दुसरी बाजू व्यक्त करु शकते.

ऋषिकेश's picture

15 Nov 2008 - 10:24 pm | ऋषिकेश

ज्यांना मत नाही ते शांत बसतात

अर्धसत्य.. आमच्यासारखे काहि तेचतेच सांगून वैतागल्याने गप्प बसतात.. ओकसाहेबांनी गेल्यावेळीच सांगून टाकले आहे.. वैज्ञानिक दृष्टीने बघणार्‍यांसाठी नाडीशास्त्र सिद्ध करता येणार नाहि.. फक्त ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्यापुढेच हे सिद्ध करू शकतात. :) तरीही मंडळी बोलतात हे बघुन करमणूक झाली

नाडीज्योतिष हे थोतांड आहे असे माझे मत आहे. आणि ज्यांना असे नाहि वाटत त्यांनी खुशाल पसे वाया घालवावेत..

ओकसाहेबांसारख्यांनी जर कळीचे मुद्दे सोडून गोल गोल फिरायचं आणि फिरवायचं ठरवत असेल तर मी गप्प बसेन.. मात्र जर मला कोणी पटवून द्यायला लागला.. तु नाडीला खरं मानलं पाहिजेस असं सांगायला लागला... तर माझं मत मी ठणकावून सांगेन

-(योग्य नाड्या आवळणारा) ऋषिकेश

महेश हतोळकर's picture

14 Nov 2008 - 4:10 pm | महेश हतोळकर

लिम्बुटिम्बु,
प्रथमतः चपखल उदाहरण न देऊ शकल्याबद्दल sorry. मला वाटतं तुम्हाला माझा मुद्दा निटसा समजलेला नाही. तथाकथीत विज्ञानवादी "तुम्ही तपासुन पहा" म्हणून आपली जबाबदारी नाकारत नाहीत. ज्याना कुंडली, हस्तरेखा किंवा इतर कोणत्याही स्वरुपातले ज्योतीष समजते त्या सर्वांना जाहीर आवाहन (आव्हान नव्हे) केलं जातं की पुढं या आणि मदत करा. स्वतःच अभ्यास करून चाचण्या करणे हा काही योग्य मार्ग नाही. कोणत्याच क्षेत्रात असं होत नाही. (कल्पना करा, न्यायाधीश महाराज स्वतःच बोटांच्या ठशांचा अभ्यास करून गुन्हेतपास करताहेत!).

महेश
एक विनंती - महेश ठीक आहे महेशराव नको.

विनायक प्रभू's picture

14 Nov 2008 - 12:54 pm | विनायक प्रभू

शेणिमात पण एक वेगळ नाडीशास्त्र असते. डॉ. येतो. हिरॉइनची सगळ्यादेखत नाडी तपासतो. ३२ दात दाखवत उदगारतो, "मुबारक हो, आप मा बननेवाली है". आजपर्यंत ही जादू तो कशी काय करतो ते मला अजिबात कळले नाही.
लेखातले हे नाडिशास्त्र असेच मला न कळणारे काही तरी असावे.
शशिकांत साहेब सर्व काही आपल्या आडनावात आहे.
अवांतरः माझे नशीब थोर हो. माझ्या लग्नापर्यंत नाडीची फॅशन जाउन इलॅस्टिक आले होते.

बकासुर's picture

14 Nov 2008 - 3:36 pm | बकासुर

श्री. सुभाषचन्द्र बसु.

म्हणजे एकदाचा निकाल लागेल की ते
कोणत्या सालापर्यन्त जिवन्त होते.

हे नाडी भविष्य जर फक्त जिवन्त लोकान्साठी असेल
तर मग

श्री.अफझल गुरु
म्हणजे राष्ट्रपती त्यानुसार निर्णय देतील फाशी बद्दल.

अनंत छंदी's picture

14 Nov 2008 - 7:21 pm | अनंत छंदी

ओकसाहेब नमस्कार
सर्वप्रथम मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की, माझा ज्योतिषावर विश्वास आहे. गेली अनेक वर्षे प्रतिकूल परिस्थितीमुळे कंटाळून गेलो असतानाच २००२साली एकदा पुण्यात स्टेशनवरील बुकस्टॉलवर आपले पुस्तक पाहिले आणि त्यात दिलेल्या कल्याणीनगरमधील पत्त्यावर असलेल्या नाडीकेंद्रात जाऊन भविष्य पाहिले. प्रथम जनरल कांडम आणि नंतर सप्तम कांडम यांचे वाचन केले.
त्यावेळी कथन करण्यात आलेल्या भविष्यानुसार सप्टेंबर २००३ व्यवसायात बदल होईल व विवाह होईल असे म्हटले होते. त्यावेळी माझे वय ३९ होते. ४०व्या वर्षी व्यवसाय व जागा बदल होईल त्यासाठी मित्रांची मदत होईल असेही म्हटले होते. वयाच्या ४२ नंतर पतीचे पहिले अबॉर्शन होईल व त्यानंतर एक मुलगा व एक मुलगी अशी अपत्ये असतील असे भविष्य वर्तविण्यात आले होते. आज हे सर्व टप्पे ओलांडून मी त्या पुढील वयाचा आहे. परिस्थितीत जराही सुधारणा नाही त्या उलट अधिकच प्रतिकूल बनलेली आहे.आणि आजही त्यात्यासारखा अविवाहीतच आहे. म्हणजेच माझे वर्तविण्यात आलेले भविष्य शंभर टक्के चुकलेले आहे. अर्थात त्याबद्दल मी नाडी ज्योतिषाला दोष देत नाही, पण असे का घडले असावे? आपण यावर काही प्रकाश टाकू शकता का? या निमित्ताने नेमके काय चुकते आहे ते तरी कळेल. कळावे, प्रतिसाद यावा. हवेतर आपण गुगल टॉकवर बोलू.

शशिकांत ओक's picture

15 Nov 2008 - 9:58 pm | शशिकांत ओक

बोला अनंत छंदी गूगलवरून. माझे नवे पुस्तक नाडी ग्रंथ भविष्य - चला नवग्रह यात्रेला वाचलेत का त्यात यावर विषयावर काही लेखन केले गेले आहे. नंतर फोनवरूनही रात्री ९ नंतर संपर्क होऊ शकतो. मो ९८८१९०१०४९. शशिकांत

माझे तर आधीचे उत्तरच उडविले प.पु. तात्यांनी... नो प्रोब्लेम

ओक...भारत आज चंन्द्रावर पोहोचला आहे आणी तुम्ही अजुनसुद्धा हे दकियानुस नाडीपुराण घेवुन बसला आहात. तुम्ही जर हे नाडी लफडे बंद नही केले तर, तुमच्या वर गरीब जनतेला मानसिक त्रास देण्याची कलम लावुन बंद केले पाहीजे...... ~X( ~X(

शशिकांत ओक's picture

15 Nov 2008 - 9:50 pm | शशिकांत ओक

तथाकथित विज्ञानवादी-अंधश्रद्ध लोकांना ज्योतिष, नाडी वगैरेंवर विश्वास ठेवणारे लोक एवढं का महत्त्व देतात? दुसर्‍या प्रकारचे लोकच पहिल्या प्रकारच्या लोकांना महत्त्व देत आहेत असं एकूण रागरंग बघून दिसतंय.

विज्ञानवाद्यांनी ज्योतिषा सारख्या बाबींमधे नको इतके लक्ष घालून त्यांना अवास्तव महत्व देऊन त्यांचे स्तोम माजवले आहे असे म्हटले जाते. पण नाडीग्रंथांच्या संदर्भात याच्या नेमके उलटे आहे. मी व माझ्या सारखे अनेक नाडी ग्रंथ प्रेमी - त्यात डॉ. विजय भटकांरांसारखे विज्ञानवादीही येतात - नाडी ग्रंथांच्या ताडपट्ट्यांचे शोध कार्य करायला पुढे या. परदेशातील तज्ञलोक शोधाभ्यास करतायत तर मग आपण भारतीय भाषातज्ञ, हस्तलेखनतज्ञ, प्राच्यविद्या अभ्यासी, ज्योतिषाचे जाणकार यांसह विज्ञानवादी म्हणवून घेणाऱ्या तज्ञांनी ही ते करावे असे आवाहन मी करतोय. त्याला नाके मुरडून कोणीही पुढे येत नाही. - नाडी ग्रंथभविष्य थोतांड आहेत- असे सारखे म्हणण्याने काही साध्य होणार नाही. नाडी ग्रंथपट्ट्यांचे भाषेच्या अंगाने तरी शोधकार्य करू या ना. त्यात भविष्य असते का नसते. ते खरे येते का नाही, ते येत नसेल तर का येत नाही याचा शोध करण्यासाठी ही विचार करता येईल.
ज्यांना मनोविकाराच्या बालकांच्या संदर्भात ज्योतिषशास्त्र -शास्त्र- नाही. आहे असा निष्कर्ष काढायला भरपूर सवड मिळते असे काही प्रतिष्ठित विज्ञानवादी, ५-५ पत्रे पाठवूनही नाडी ग्रंथांचे साधे अवलोकन करायला ही तयार नाहीत. मग या ठिकाणी कानात बोटे घालून बसणाऱ्यांची, पुराणवादी, दकियानूसी असे म्हणून हात झाडून ज्यांनी आपली मळमळ माझ्या आडनावाने सार्थ केली आहे. अशांची काय कथा. पण असे नुसते म्हणून काय उपयोग. काही हरकत नाही. पोट मोकळे झाले की त्यांना बरे वाटेल असो.
नाडी भविष्यावर आत्तापर्यंत जे काही आरोप वा कुत्सित उदगार काढले गेले त्या प्रत्येकाला समर्पक उत्तरे दिली गेली आहेत शिवाय नाडी भविष्य कधी कधी का चुकते यावर माझे व प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांचे विचार आधीच आमच्या पुस्तकातून व्यक्त झालेले आहेत. ते आपण कृपया वाचावेत ही विनंती. पुण्यात ही पुस्तके उपलब्ध आहेत. अन्यथा माझ्याशी संपर्क करावा.

शशिकांत

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Nov 2008 - 12:35 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी व माझ्या सारखे अनेक नाडी ग्रंथ प्रेमी - त्यात डॉ. विजय भटकांरांसारखे विज्ञानवादीही येतात - नाडी ग्रंथांच्या ताडपट्ट्यांचे शोध कार्य करायला पुढे या. परदेशातील तज्ञलोक शोधाभ्यास करतायत तर मग आपण भारतीय भाषातज्ञ, हस्तलेखनतज्ञ, प्राच्यविद्या अभ्यासी, ज्योतिषाचे जाणकार यांसह विज्ञानवादी म्हणवून घेणाऱ्या तज्ञांनी ही ते करावे असे आवाहन मी करतोय. त्याला नाके मुरडून कोणीही पुढे येत नाही. - नाडी ग्रंथभविष्य थोतांड आहेत- असे सारखे म्हणण्याने काही साध्य होणार नाही.

१. माझ्यामते या विचारांना आधीही इतर धाग्यांवर उत्तर दिलेलं आहे, इथेही दिलेले आहे तरीही पुन्हा आणखी सुस्पष्ट उत्तर देण्याचा प्रयत्न करते, थोडंसं स्वत:चं उदाहरण वापरुन! आठवड्याचे कमीतकमी पंचेचाळीस तास मी स्वतःच्या नोकरीत प्रत्यक्ष काम करते. घरी असताना अर्धा वेळ माझं डोकं त्याच, कामाच्या विचारात, असतं तेव्हा उरलेल्या वेळात थोडी मौजमजा करावी असा स्वाभाविक विचार डोक्यात येतो आणि त्यावर अंमलबजावणीही होते. इथल्या बर्‍याचश्या लोकांना विचारलंत तर तेही तेच सांगतील, आकडे थोडेफार बदलतील एवढंच. कोणत्याही विषयावर संशोधन करायचं तर, 'चला आता चार दिवस सुट्टी आहे आता काय ते बघूया; आणि नाही झालं तर पुढच्या वर्षी नाताळात सुट्टी मिळेल तेव्हा बघू', असं म्हणून संशोधन होत नाही (स्वानुभव). तेव्हा जो कोणी काम करत आहे त्याला, तिला, त्यांना प्रश्न विचारुन उत्तरं मिळवणं एवढंच हातात रहातं. शिवाय व्यक्तिगत आवड हाही एक भाग असतो. म्हणजे मला संगणक आणि आंतरजाल या गोष्टी अन्न-पाण्याएवढ्या महत्त्वाच्या वाटतात. पण म्हणून संगणकाचा डब्बा उघडून आत काय आहे हे मी शोधलं पाहिजे असा हट्ट का? संगणक कसा वापरायचा एवढं माहित असणं माझ्या दृष्टीने पुरेसं आहे. ओकसाहेब, आपल्याला आवड आहे या विषयाची आपण काम करा, पण बाकीच्यांनीही ते काम कराच असा हट्ट का? आणि आपणच विषय समोर मांडलात म्हणून प्रश्न आले, शंका आल्या आणि कुशंकाही आल्या. बरं कोणी आपण संशोधन बंद करावंत असाही जाहीर आग्रह दिसला नाही. तेव्हा नाकं मुरडत आहेत त्यांना मुरडू देत! भारतानी चांद्रयान का पाठवलं म्हणून नाकं मुरडणारेही आहेत, म्हणून काय 'इस्रो' ते काम बंद करते का? पण एखादा विषय मांडला आणि तो जर तार्किक वाटला नाही तर लोकं प्रश्न विचारणारच नाही का? (आणि आम्ही मिपाकर अंंमळ टवाळ आहोत, तेव्हा टवाळी फार गंभीरपणे घेऊ नका.) आता प्रश्नांना उत्तर येत असतील तर उत्तरं देता येतात, नसतील उत्तरं तर नाही मला माहीत नाही, किंवा यावर अजून काम झालेलं नाही यापैकी जे योग्य उत्तर आहे तेही देता येतं ना? (आजपर्यंत मला आपल्या लेखांमधे आणि प्रतिसादांमधे लोकांनी विचारलेल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरं दिसली नाही आहेत.)

२. समजा उद्या मी असं म्हटलं की मी ज्या क्षेत्रात काम करते त्या क्षेत्रातलं (आजतरी) दुसरं कोणी मिपावर नाही, तेव्हा मी जे काय म्हणते तेच प्रमाण आणि काहीतरी तार्किक कसोटीवर न पटणारं विधान केलं तर तुम्ही तरी ते मान्य कराल का? आणि डॉ. विजय भटकर यांच्याबद्दल मला आदर आहे, पण त्यांचा या विषयावरचा अभ्यास किती? त्यांचा संदर्भ देऊन कोणी संगणकाच्या संरचनेचा दाखला दिला मी त्यावर संशय घेणं कठीण आहे, पण हा विषय आणि डॉ. भटकर ही भेळ पचत नाही हो! आणि शिवाय कोणी दुसरा म्हणतो म्हणून विश्वास ठेवा असं कसं चालेल? तर्कशुद्ध आणि पटेलसं कारण दिलं तर कोणीही विचारी माणूस सहज मान्य करतोच ना! जसं त्या पट्ट्यांवर कूट लिपी आहे आणि तिचा अभ्यास झाला पाहिजे, १००% मान्य. जे माहित नाही त्यावर काम करुन ती गोष्ट माहित करुन घेतली पाहिजे हा विचार तार्किक आहे, त्यामुळेच लगेच मान्य करण्यासारखा आहे.

३. मागच्या धाग्यात आपण म्हटलेलं होतं आणि धनंजयनी सहमतीही दाखवली होती त्याप्रमाणे, जुने दस्तऐवज आहेत त्यांच्यावर संशोधन केलं पाहिजे, त्यातलं जे काही अद्भुतरम्य गूढ असं आत्ता दिसतंय त्याचा उलगडाही झाला पाहिजे. पण आपणच म्हणतात की यात संशोधनाची गरज आहे तर नाडीभविष्य या गोष्टीत खरोखर काही तथ्य आहे हे कसं मानायचं? हे म्हणजे एकीकडे रस्त्यावर डांबराचा वास येतोय, रोलर फिरत आहेत आणि दुसरीकडे "बघा आमचा स्वच्छ, सुंदर, गुळगुळीत रस्ता" असं म्हणायचं हे कसं हो मान्य होणार? आमच्या डोक्यात 'सेगमेंटेशन फॉल्ट' येतो ना!

४. भविष्य खरं न ठरल्याचं उदाहरण वरती अनंत फंदींनी दिलं आहे. त्याला आपण काही जाहीर उत्तर दिलेलं नाही. तर मग नाडी ज्योतिषावर विश्वास ठेवणं कठीणच होणार ना?
मी मान्य करते की मला यातलं काही माहीत नाही; म्हणूनच मी कोर्‍या पाटीने, उघड्या डोळ्यांनी आणि डोकं सुरू ठेवून हे सगळं वाचलं तर मला काहीही विश्वासार्ह सापडत नाही, कूट तमिळचा अभ्यास झाला पाहिजे एवढं एक 'अनुमान' वगळता!

आता माझ्या या विधानांना, प्रश्नांना तुम्ही उत्तर द्याल (नेहेमीप्रमाणे बगल न देता) अशी अपेक्षा!

(नाडी, इलास्टीक, पट्टा, वन-पीस, ग्रह, तारे, ताड, ताडी, ताडन काहीही वर्ज्य न मानणारी, तर्कट) अदिती

अवांतरः १. राहून राहून डोक्यातला नाडीची गाठ सुटत नाही! पट्टीला नाडी का म्हणतात आणि शोधून शोधून हाच शब्द का बरं निवडला असेल?? :?
२. तुमच्या पुस्तकांच्या नावांची यादीही मागे एकदा मी विचारली होती. इतर प्रतिसादात एक दिसलं आहे. तेव्हा कृपया पुस्तकांची नावं आणि पुण्यात किंवा ठाण्यात कुठे मिळतील हेही सांगितलंत तर बरं. इंटरनेटवर मागवून ऑफिसपोच मिळत असतील तर अतिउत्तम

(अवांतरप्रेमी, आळशी आणि इंटरनेट-शॉपिंगप्रेमी)अदिती

रामपुरी's picture

17 Nov 2008 - 7:50 pm | रामपुरी

या नाडीवाल्यांनी फक्त सहा सात अब्ज+ नाड्या ठेवलेलं गोदाम कुठे आहे हे दाखवावे.
की माणूस समोर आला की पट्टीवरचं भविष्य बदलतं? की एखादा अंधश्रद्धाळू माणूस आला की हे नवीन नाड्या तयार करतात? कि काहिही वाचून दाखवतात (नाहीतरी ते कूट तामिळ तामिळीला पण समजत नाही)

अनंत छंदी's picture

17 Nov 2008 - 6:05 pm | अनंत छंदी

ओक साहेब
नमस्कार
आपण पाठविलेले ई पत्र मिळाले मात्र गेले दोन तीन दिवस आमचेकडे मिसळपाव संकेतस्थळ उघडतच नव्हते त्यामुळे मला आज आत्ता आपण लिहिलेला मजकूर दिसला आहे आपण त्यात नमूद केलेले पुस्तक मी वाचलेले नाही हे प्रामाणिकपणे कबूल करतो. हे पुस्तक पुण्यात कोठे मिळेल? वादविवाद करत बसण्यापेक्षा भविष्य का चुकले या मुद्द्यावर चर्चा करण्यात मला रस आहे. त्यातून या शास्त्रावर काही अधिक प्रकाश पडून मला अधिक माहिती झाली तर ते बरे होईल. माझा या बाबतील दृष्टीकोन असा आहे, तेव्हा बोलूयात. आपण उत्तर देण्यात दाखविलेल्या तत्परतेबद्दल धन्यवाद!

धोंडोपंत's picture

17 Nov 2008 - 11:13 pm | धोंडोपंत

माननीय श्री. ओकसाहेब,

आम्ही उपस्थित केलेले मुद्दे अजूनही अनुत्तरीतच आहेत. कृपया सवड मिळेल तेव्हा त्यावर प्रकाश टाकावा ही विनंती.

मुख्य मुद्दा असा होता की या नाडीपट्टया तामिळ भाषेत असल्याचे सांगतात. तर त्या काळच्या सर्व ऋषीमुनींना तामिळ येत होते काय?

जर का येत होते तर आपले धर्मग्रंथ संस्कृतमध्ये निर्माण झाले नसते. ते तामिळ मध्येच लिहिले गेले असते.

या नाडीपट्टया नाडीवाले जातकाला वाचायला देतात काय? समजा आम्ही एखादा तामिळ भाषेचा जाणकार घेऊन गेलो तर त्यावर काय लिहिले आहे ते त्याला वाचायला मिळेल काय?

आम्ही जी दोन उदाहरणे दिली आहेत त्यांबद्दलही आपण काही भाष्य केलेत तर आमच्या ज्ञानात भर पडेल असे वाटते.

आपला,
(अडाणी) धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

प्रिय धोंडोपंत,
आपण केलेल्या मुद्यांवरील माझी प्रतिक्रिया -
अर्थात ती आपणांस मान्य होणार नाही व आपल्या केपींवरील श्रद्धेमुळे नाडीभविष्याचा अनुभवही घेणार नाही याची खात्री वाटल्याने मी आपणाला प्रतिसाद द्यायला उत्सुक नव्हतो. तरीही आज पुन्हा वाचनकरता आपल्या मुद्यांचे उत्तर दिले नाही असे लांछन लागू नये म्हणून आपणांस उत्तर देत आहे.

मुख्य मुद्दा असा होता की या नाडीपट्टया तामिळ भाषेत असल्याचे सांगतात. तर त्या काळच्या सर्व ऋषीमुनींना तामिळ येत होते काय?

उत्तर - खरे तर हा प्रश्न मजेशीर आहे. कारण जर नाडीग्रंथ पट्ट्या तमिळमधे आहेत हे आत्ता या घडीला प्रत्यक्ष अनुभवता येते तर त्याचे उत्तर हो असेच असणार. निदान ज्य़ांनी ते ग्रंथ लिहिले त्यांना तरी ती येत होती असेच अनुमान निघते.

जर का येत होते तर आपले धर्मग्रंथ संस्कृतमध्ये निर्माण झाले नसते. ते तामिळ मध्येच लिहिले गेले असते.

उत्तर - याचे उत्तरही असे की जसे तुम्हाला मराठीशिवाय अन्य भाषा येतात. काही लिखाण आपण मराठीतर भाषेतून करू शकता. ती स्वतंत्रता तुमची आहे. आता गरजेप्रमाणे आपण तो वापर करणार. काही वर्षांनी आपल्या ह्या विरोपांचे लेखन ही खरे तर धोंडोपंतानी इंग्रजीतून का केले नसावे यावर शोधकार्याची सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या नाडीपट्टया नाडीवाले जातकाला वाचायला देतात काय? समजा आम्ही एखादा तामिळ भाषेचा जाणकार घेऊन गेलो तर त्यावर काय लिहिले आहे ते त्याला वाचायला मिळेल काय?
उत्तर - खरेतर हाप्रश्न आपण मला न विचारता नाडी केंद्रात जाऊन त्यांना विचारण्याचा आहे. पण आपण तेथे न जाण्याचा जर निर्धार केलेला असेल तर मी काय करणार. याचे उत्तर हो असे आहे. मी हे काम विविध अंगांनी नाही नाही त्या शंका रचून स्वतः प्रत्यक्ष केलेले आहे. त्यात नाडी केंद्राशी संबंध नसलेल्या हवाईदलातील माझ्या तमिळमित्रांना घेऊन मी खात्री वरचेवर करून झाल्यावर मग लिहितोय.
नव्हे तमिळनाडूतील केंद्रात भेट देणाऱ्या कित्येक उत्साही व उत्सुक तमिळ भाषा जाणकार विचारकांना पट्टीतील अक्षरे, त्यांची नावे व अन्य मजकूर आवर्जून दाखवला जातो. माझ्यासारख्या अभ्यासकाला नाडीकेंद्राच्यावतीने स्वतःच्या खर्चाने प्रोफेशनल फोटोग्राफरला आवर्जून बोलाऊन, १८ ते २० इंच लांबलचक ताडपट्टीचा आधी तुकड्या तुकड्याने, नंतर एकत्र असे कष्टपूर्वक हवे तितके फोटो काढून देण्याचे व त्यातील मजकूर अनेक वेळा, वेगवेगळ्या नाडी वाचकांकडून वाचायला परवानगी देण्याचे श्रेय नाडी केंद्राच्या संचालकांना दिले गेले पाहिजे. हा माझा तांबरम-चैन्नई येथील तीन वर्षातील वास्तव्यातील अनेक नाडी केंद्रांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. तथापि तो एका नव्हे तशा अनेक पट्टांचा पुरावा आपल्या लेखी कितपत रुचतो. पटतो. कोणास ठाऊक. कारण आपण नाडी ग्रंथांना ज्योतिषकथन म्हणून मूलतः नाकारता आहात. बर नका मान्य करू. पण एक प्राचीन तमिळलेखन समुच्चय आहे. त्यातील लिखाण काय आहे ते खरेच असल्यास मी वर उपस्थित केलेले पुरावे मान्य केल्याशिवाय गत्यंतर नाही अशी परिस्थिती उत्पन्न होते. ती मानायची किंवा नाही तो प्रश्न अलाहिदा पण त्या सत्यतेला पाठ दाखवून आपण व आपल्यासारखे अनेक काय साधणार कारण ती सत्यता आहे हे मान्य करण्याची आपली मानसिकता नाही.त्याला मी काय किंवा महर्षी तरी काय करणार

आपल्या दोन अनुभवांबाबत मी लिहू इच्छित नाही कारण जर तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतलात तर तुम्हालाच त्या प्रश्नांची उत्तरे मिळतील व भविष्य कथनामागील हेतू व्यक्तीला जीवनमार्गदर्शक ठरावे त्यासाठी वेळ पडली तर चुकीचे सांगून कर्मविपाकाची सांगड जोडण्याचे कार्य महर्षींना करावे लागते असा निष्कर्ष निघतो.
असो. निदान या विरोपानंतर तरी आपणासारख्या ज्योतिषतज्ञाने तमिळ जाणकाराला सवे घेऊन नाडी ग्रंथांतील भाषेच्या अंगाने अनुभव घेतला नाडीपट्टयातील मजकूर तमिळ तज्ञाला दाखवला वगैरे ऐकायला -वाचायला - मिळाले तर आनंदच वाटेल. नाडी केंद्रवाले पहिल्या भेटीत एकदम पट्टीचा फोटो काढायला मान्यता देत नाहीत. थोड्या सबूरीने व धीराने मार्गक्रमण केले तर काम फत्ते होते. नेमक्या त्याच काळात आपले मत बदलण्यास सुरवात होते असा माझा अनुभव आहे.

शशिकांत