अचानक तीने घेतला माझ्या हाताचा किस,
त्यानंतर येणार्या प्रत्येक दिवशी आणि रात्री आम्ही खाऊ लागलो प्रेमाचे किसमिस,
दीवस गेले भूरभूर लागली लग्नाची हूरहूर,
खरं म्हणजे माझ्या लग्नाची बाबाच काढणार होते छानशी वरात,
पण मीच आणली हट्ट करून हीला घरात,
आता मात्र खरंच दिवस गेले आणि आमच्या सौंच्या बुद्धीमत्तेचे दीवे घरभर पेटू लागले,
एक दीवस तीने मागितली आमच्या ईस्टेटीची परात,
मी मात्र बुडून गेलो दारू सोबत अंधारात,
मरून गेलेल्या बाबांचा मागून यायचा आवाज,
बाळा यालाच म्हणतात-
बीन बुडाची आणि बीन घोडयाची वरात,
म्हणूनच आपण रहावे आपल्या रीतीभातींच्या घरात
आपल्या रीतीभातींच्या घरात.
प्रतिक्रिया
14 Nov 2011 - 12:30 am | पाषाणभेद
<राजकुमार>आपने जरूर उसको अपनी सुई चुभाइ होगी वर्ना हमारी प्यारी भाभीजान ऐसी हरकत कभी नही करती!
अंगूर का दाना हूँ सुई ना चुभो देना सुई जो चुभोई तो रस टपकेगा जो रस टपकेगा तो किसमिस किसमिस किसमिस बन जाऊंगी
14 Nov 2011 - 1:14 pm | मदनबाण
:(
28 Aug 2013 - 9:09 am | अभ्या..
लील्या काय कहर कविता लिहायाचास बे :-D:-D
आधी दिवस काय जायचे मग लग्नाची हुरहुर काय लागायची :-D:-D
भारीच ब्वा ....
मिस ची होणार का आता मिसेस
किसेस एवजी धुवा आता डिशेस :-D
28 Aug 2013 - 2:35 pm | चौकटराजा
नव्याने फोटोशॉप शिकणार्या सारखे कवीराज लीलाधर यांचे झालेय ! दिवसजायचा लेअर व लग्नाचा लेअर यांची काहीतरी
गडबड झाली.
28 Aug 2013 - 9:23 am | प्रचेतस
माताय.
ही कविता नजरेतून कशी काय निसटली होती ब्वा.
28 Aug 2013 - 9:51 am | संजय क्षीरसागर
दिवस कधी खोटे गेलेत का बोला,
गेलेत ना आता? कामवाली ठेवा.
घोड्यावर वरात जाऊं दे जोरात,
हौसेनं तिला घेतलीये ना घरात ?
तुम्ही खा किसमिस, दादा खातो साय
आता हाय काय आणि नाय काय!
28 Aug 2013 - 10:05 am | कोमल
लील्याच्या कवितांना डॉल्फिन चावलाय की काय...
सगळ्या टुणटुण करत वर येत आहेत..
28 Aug 2013 - 10:07 am | स्पा
भयाण =)) =))
28 Aug 2013 - 10:54 am | प्रसाद गोडबोले
दीवस गेले भूरभूर लागली लग्नाची हूरहूर,
>>> बरोबर आहे . आधी दिवस गेले की हूरहूर लागणारच लग्नाची
4 Sep 2013 - 5:04 pm | बॅटमॅन
नॉट नेसेसरिली ;)
28 Aug 2013 - 11:05 am | अद्द्या
काय काय लिहायचा हा प्राणी :D
28 Aug 2013 - 12:09 pm | बॅटमॅन
सौ ने इष्टेटीची परात मागितली तर दारूसोबत का बुडावे अंधारात? कैच्याकै लिहितंय झालं लील्या...
28 Aug 2013 - 12:53 pm | धन्या
अफाट काव्यप्रतिभा असलेल्या कवीची ही कविता कशी बरे ईतके दिवस अंधारात राहीली?
28 Aug 2013 - 1:31 pm | सुयशतात्या
मस्त...क्या बात है!!!
28 Aug 2013 - 2:01 pm | सूड
ही कशी वाचली नाही कविता मी?? वाह वाह !! मिपावरही कलोनियल कझिन्स का काय म्हणतात ते आहेत याचा अभिमान वाटला. ;)
28 Aug 2013 - 5:42 pm | सस्नेह
साखरपुड्याच्या सुपाचा बाऊल संपायच्या आतच रीतिभातींचे डेझर्ट पिऊन टाकलेस वाटतं !
28 Aug 2013 - 10:00 pm | मोदक
किसमिस
प्रेषक, लीलाधर, Sun, 13/11/2011 - 18:07
1 Sep 2013 - 3:15 pm | अन्या दातार
"बरेच दिवस गेल्यावर" ही कविता बोर्डावर आलीये. जरा मिपाकर्स, स्वागत नही करोगे?? ;)
4 Sep 2013 - 4:57 pm | पैसा
रम्य आठवणी!
4 Sep 2013 - 10:29 pm | अत्रुप्त आत्मा
लिली हूं.... पुढे सरक!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कागद बदलायचाय! =))
4 Sep 2013 - 11:37 pm | प्यारे१
आणि हा पहा कोलोनियन कझिन्सपैकी दुसरा लॉर्ड कझिन ! ;)
5 Sep 2013 - 12:13 am | अत्रुप्त आत्मा
प्या...रे भा ***** =)) :p
5 Sep 2013 - 12:02 am | मोदक
:-))
27 Jun 2014 - 3:27 pm | बॅटमॅन
चचाचे अजूनेक अजरामर काव्य =))
27 Jun 2014 - 5:06 pm | सौंदाळा
उत्खननाबद्दल धन्यवाद.
साय, किसमिस फोडु कविता आहेत एकसे एक.
27 Jun 2014 - 3:34 pm | सूड
>>मरून गेलेल्या बाबांचा मागून यायचा आवाज
इंटरेस्टिंग !! बाकी दिवस जाणं, मग लग्न होणं आणि परत रीतीभातींच्या घरात राहणं; चुकल्यासारखं वाटत नाहीये का काही?
27 Jun 2014 - 5:55 pm | स्पा
अहाहा ,आजचा दिवस साजरा झाला... कोणीतरी या सुंदर कवितेच रसग्रहण करा प्लीज ,
27 Jun 2014 - 6:00 pm | धन्या
लिल्या पुन्हा एकदा मिपाच्या प्राईम टाईम स्लॉटमध्ये :D
27 Jun 2014 - 8:23 pm | अत्रुप्त आत्मा
=)) ... =)) ... =))
27 Jun 2014 - 8:32 pm | प्रचेतस
खूप छान कविता.
आणि मनापासून लिहिलेली असल्याने काळजाला भिडणारी.
27 Jun 2014 - 8:49 pm | धन्या
कविता काळजाला भिडली हे ठीक आहे. मात्र तुम्हाला कसे कळले की त्यांनी ही कविता मनापासून लिहिली आहे? कशावरुन त्यांच्या कलोनियल कझिनप्रमाणे र ला र आणि ट ला ट जुळवत नाहीत.
27 Jun 2014 - 9:13 pm | प्रचेतस
कवी जे काही लिहितात ते मनापासूनच लिहितात. नाहीतर असले भावविभोर काव्य उमटणे कठीण.
आणि त्यांचे कलोनियल कझिन तर अत्यंत प्रत्ययकारी काव्य लिहितात. त्याचा प्रत्यय तुम्हास अजिंठ्याला आणि किसनदेवांना देवगिरीवर आलाच आहे.
28 Jun 2014 - 9:01 am | किसन शिंदे
=))
27 Jun 2014 - 8:55 pm | यशोधरा
*biggrin*
28 Jun 2014 - 12:46 pm | भिकापाटील
तोडलस मित्रा !!
अशीच काव्यप्रतिभा दिवसेंदिवस बहरत जौ दे.......
28 Jun 2014 - 1:00 pm | पैसा
हौशी कवी बिचारे कविता जुळवतात आणि शिनेर मिपाकर त्यांचा बाजार उठवतात याबद्दल एक मिपाकर म्हणून शरम वगैरे वाटली. लिल्या, हौर आन्दो! डरनेका नै!
30 Jun 2014 - 5:03 pm | निखळानंद
कवितेचे रसग्रहण मिपाकरांकडून शिकावे..
करूण रसाला छातीशी धरून भडभडून हसावे !
30 Jun 2014 - 5:09 pm | सूड
तुमचे प्रतिसाद वाचून पूर्वी 'रातकिडा चंद्रसेन' आयडीने एक गृहस्थ काव्यात्मक प्रतिसाद टंकत असत, त्यांची आठवण झाली. ;)
30 Jun 2014 - 5:11 pm | प्रचेतस
आयडीने नाही, तशी स्वाक्षरी घेऊन.
30 Jun 2014 - 5:13 pm | सूड
तांच तां !!
30 Jun 2014 - 7:13 pm | निखळानंद
मी काहीही लिहिले तरी कोणाला तरी पूर्वीचे आठवतंय काहीतरी..
चालायचंच्..मिसळपाव म्हणजे आठवणींचे गाठोडेच आहे नाहीतरी..
30 Jun 2014 - 7:18 pm | सूड
वा वा !! चारोळ्या लिहीण्यात वेळ नका घालवू, आता एक खंडकाव्यच येऊद्यात. ;)
30 Jun 2014 - 7:34 pm | अत्रुप्त आत्मा
@खंडकाव्यच येऊद्यात. >>>. खंडच का? अखंडकाव्यही चालेल! ;)
26 Feb 2016 - 4:01 pm | किसन शिंदे
आत्ताच पारलेचे किसमी टाॅफी चाॅकलेट खाल्ले आणि चचाची ही कविता आठवली.
हँट्स आॅफ लिलेश.
26 Feb 2016 - 4:07 pm | प्रचेतस
अरे काय हे!!!!
मरतोय मी हसून हसून.
26 Feb 2016 - 4:15 pm | किसन शिंदे
बरं झालं आठवलं, बायकोने परात आणायला सांगितली होती. बघायला हवी आता मार्केटला.
26 Feb 2016 - 4:31 pm | सस्नेह
मिपा (किस)मिसिंग लीलाधर !
26 Feb 2016 - 4:35 pm | नाखु
परात पुन्हा घरात (पक्षी वर) आली.
अता तरी बुवा लिहिते होतील का? (प्रतीसाद सोडून अश्या प्रत्यय दर्शी कवीता)
28 Feb 2016 - 10:18 pm | पैसा
कझिन्सपैकी बुवा की लिल्याचे लेखण पायजे?
29 Feb 2016 - 9:54 am | नाखु
मुख्यालय इथे असताना शाखेची चौकशी करण्याचे पाप आम्हाला का करायला लावताय?
26 Feb 2016 - 6:24 pm | अजया
लिल्या मेल्या किती दिवस अशा जुन्या कविता वाचायच्या चाहत्यांणी
पाच वर्षं झाली कवितेला.परत दिवस घालवलेले चालावे ;)
28 Feb 2016 - 8:38 pm | माहितगार
या कवितेतील दोन ओळींची मनावरील ते शूर्प ओरखडे १ : (ईस्टेटीची परात) या मिपा लेखात दखल घेतली आहे.
29 Feb 2016 - 12:26 pm | बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =))
1 Mar 2016 - 10:56 am | सविता००१
आज वाचली ही एवढी भावविभोर कविता. :) किसनदेवा, परत वर आणल्याबद्दल धन्सः))
1 Mar 2016 - 7:17 pm | सुमीत भातखंडे
.
1 Mar 2016 - 7:24 pm | सूड
बाबांचा मागून आवाज यायचा म्हंजे नक्की काय व्हायचं?