कधीतरी.........

एक एकटा एकटाच's picture
एक एकटा एकटाच in जे न देखे रवी...
25 Feb 2016 - 11:06 am

कधीतरी पुन्हा भेटशील
त्या रिमझिमणार्या पावसात
असावीस फ़क्त तू आणि मी
सोबत एक चिंब शहारणारी बरसात

कधीतरी पुन्हा भेटशील
त्या पहाटेच्या धुक्यात
असावीस फ़क्त तू आणि मी
सोबत एक गुलाबी मिठी गारठ्यात

कधीतरी पुन्हा भेटशील
त्या एकांती शिवारात
असावीस फ़क्त तू आणि मी
सोबत एक उत्कट आसुसलेली सांजरात

कधीतरी पुन्हा भेटशील
त्या लुकलुकणार्या चांदण्यात
असावीस फ़क्त तू आणि मी
सोबत एक मदहोश निशिगंध अंगणात

कधीतरी खरीखुरी भेटशील
माझ्या एकएकट्या प्रवासात
सोबत असावीस फ़क्त तू
तेव्हाच अर्थ येईल ह्या जगण्यात

सांग ना......
एकदातरी भेटशील.........

कविता

प्रतिक्रिया

विजय पुरोहित's picture

25 Feb 2016 - 11:40 am | विजय पुरोहित

वा! मस्तच....
अप्रतिम....

रातराणी's picture

25 Feb 2016 - 11:50 am | रातराणी

छान!

सरदार's picture

25 Feb 2016 - 12:03 pm | सरदार

मस्तच........

एक एकटा एकटाच's picture

26 Feb 2016 - 11:16 am | एक एकटा एकटाच

सगळ्यांचे आभार

मित्रहो's picture

26 Feb 2016 - 4:42 pm | मित्रहो

मस्त

एकप्रवासी's picture

28 Feb 2016 - 9:27 pm | एकप्रवासी

आवडली

सस्नेह's picture

28 Feb 2016 - 11:03 pm | सस्नेह

आशावादी कविता !

भरत्_पलुसकर's picture

1 Mar 2016 - 1:50 pm | भरत्_पलुसकर

आपल्याला त लयच निराशावादी वाटली. तुमचं नाव बी लय डिप्रेशिंग हाय. आपुन त बाबा मुन्नाभाईवानी म्हणतो अपुन के मोहल्लेमें आयी हेमा मग रेखा मग जया मग आणि कुणी आणि कुणी.

एक एकटा एकटाच's picture

1 Mar 2016 - 2:05 pm | एक एकटा एकटाच

धन्यवाद

मित्रा