***
घाटामध्ये रुळालागी
नागमोडी पायवाट
चालतसे खेडवळ
बाई एक झटाझट
-
ताई एक कळवळे
खिडकीशी बसलेली
"आम्हांसंगे ये गे, उगी
दमछाक चाललेली"
-
बाई म्हणे, "ताये, तुझी
संग मला थोडी असे.
दरीमध्ये शेत माझे
घाटमाथ्या घर असे"
-
"तिथे कोणी वाट पाहे
ऊर येई भरुनिया -
मुंबईला तुझ्या घरी
तू जा बाई बसुनिया"
***
प्रतिक्रिया
15 Sep 2007 - 2:10 am | गुंडोपंत
"बाई म्हणे, "ताये, तुझी
संग मला थोडी असे."
हे आवडले.
बरेचदा हे कळतच नाही की खरंच बरोबर कोण आहे नि असणार आहे.
आपला
गुंडोपंत
15 Sep 2007 - 5:37 pm | संपादक मंडळ
....
20 Sep 2007 - 10:54 am | टीकाकार-१
:)
15 Sep 2007 - 7:14 am | विसोबा खेचर
>>दरीमध्ये शेत माझे
>>घाटमाथ्या घर असे"
>>"तिथे कोणी वाट पाहे
>>ऊर येई भरुनिया -
क्या बात है, सुंदर चित्रदर्शी कविता!
आयला धन्या, तू कविताही इतक्या छान करतोस हे माहीत नव्हतं!
जियो..
तात्या.
15 Sep 2007 - 7:30 am | सहज
काव्याचा वेगळेपणा भावला.
15 Sep 2007 - 7:40 am | उग्रसेन
कविता आवल्डी लय दिसापासून ताजी कविता वाचाला नै भेटाची.
आता लै मस्त वाटून राह्यले. :)
15 Sep 2007 - 9:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धनंजय,
कविता आवडली.शब्दांची रचना बंधनात असली तरी ती तशी वाटत नाही अर्थात तेच तर कवीचे मोठे वैशीष्टे असते.
"बाई म्हणे, "ताये, तुझी
संग मला थोडी असे.
दरीमध्ये शेत माझे
घाटमाथ्या घर असे"
मला वरील चार ओळी अधिक आवडल्या.येऊ दे अशाच कविता !
15 Sep 2007 - 9:34 am | चित्रा
तुम्ही कविताही करता वाटतं? आवडली.
चित्रा
15 Sep 2007 - 10:57 am | कोलबेर
खरं सांगायच तर पहिल्यांदा गडबडीत वाचताना काही कळली नाही.. आता जरा निवांतपणे वाचल्यावर समजली! छान कविता.
16 Sep 2007 - 2:21 pm | वाचक्नवी
तुमच्या या छोटेखानी सुरेख कवितेला काय म्हणावे? अष्टाक्षरी ओवी की नुसतीच अष्टाक्षरी? काहीही चालेल. आफ्टरऑल अ रोझ इस अ रोझ बाय एनी नेम !--वाचक्नवी
16 Sep 2007 - 4:07 pm | सहज
केशवसुमार स्टाइल मधे हा. म्हणजे तुमचेच काव्य जरा फेरफार करुन.
काय म्हणावे तरी
या छोटेखानी सुरेख कवितेला
अष्टाक्षरी ओवी की नुसतीच अष्टाक्षरी
काहीही चालेल तू जा बाई लिहूनिया
प्रमादाबद्दल माफी असावी. दोघांचीही मागतो, वाचक्नवी व केशवसुमार
प्रेरणा - खालील घाटपांडेसाहेबांचा प्रतीसाद!
16 Sep 2007 - 3:12 pm | प्रकाश घाटपांडे
<<<तिथे कोणी वाट पाहे
ऊर येई भरुनिया -
मुंबईला तुझ्या घरी
तू जा बाई बसुनिया">>
शेवट भावस्पर्शी.
प्रकाश घाटपांडे
16 Sep 2007 - 4:13 pm | आजानुकर्ण
सुंदर प्रकटन आहे. :)
19 Sep 2007 - 7:23 pm | रंजन
कविता आवडलि.
19 Sep 2007 - 8:00 pm | चित्तरंजन भट
बाई म्हणे, "ताये, तुझी
संग मला थोडी असे.
दरीमध्ये शेत माझे
घाटमाथ्या घर असे"
अष्टपैलू धनंजय, तुमची ही अष्टाक्षरी फार आवडली. अष्टाक्षरी हा बायकी प्रकार आहे असे माझे एकंदर मत असले तरी. [कारण ९० टक्के अष्टाक्षऱ्या ह्या कवयत्र्या (कवयित्रीमध्ये मजा नाही) लिहितात, असा माझा समज. दुसरे कुठलेही कारण नाही. त्यामुळे कुणी उगाच चवताळण्याचे काही कारण नाही.]
20 Sep 2007 - 1:32 pm | अप्पासाहेब
हल्लीच्या त्या 'पाडीव' गजलांच्या बुजबुजाटात असे सकस काव्य जरा दुर्मिळच झाले आहे. अजुन लिहा राव असेच.
17 Nov 2007 - 11:14 pm | धनंजय
The path by the railtrack ही माझीच मूळ कविता. हिचे मी केलेले रूपांतर ("घाटातली पायवाट") वरती दिलेले आहे. मूळ इंग्रजीतल्या सॉनेटवर रॉबर्ट फ्रॉस्टच्या शैलीचा प्रभाव दिसला तर निरीक्षण वावगे नाही.
---
The path by the railtrack
For a while, my weary path hugs tight the track
That takes the train to town. Through head high corn
Both blindly snake. The quiet is pierced by a horn
That shrieks so man and beast be warned, "Stand back!"
To wait its pass I stop, put down my pack -
It chugs and seems to say, "Poor man, so worn,
"You choose to plod the stones. O why you scorn,
"My ride that hundreds take? More fool, alack!"
I stand to catch my breath and mull, as still
I brace the hedge of thorns, the riders' ease
And fellowship, compared to how I will
Trudge on alone. Because my whence nor where
Lies by this track, the pack to back I seize
Resolved, and to set trajectory repair.
---
19 Nov 2007 - 9:42 am | नंदन
कविता आवडल्या. इंग्रजी अधिक. त्यातला विल आणि व्हेन्सचा प्रयोग आवडला.
[इंग्रजी कवितेला 'द ट्रेन नॉट टेकन' हे शीर्षक चालू शकेल :).]
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
19 Nov 2007 - 11:38 am | शब्दवेडा
कविता आवडल्या...इन्ग्लिश जास्त आवडली..