(कधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारी, अदभूत, अविश्वसनीय, रोमांचकारी.)
रम्य अश्या ह्या सुवर्णमय सायंकाळी
नभामध्ये ह्या ढगांची मांदियाळी
दाटते चैतन्य मनामध्ये कातरवेळी
पाहून हि निसर्गाची होळी
रंगपेक्षाही किती सुंदर भरले जातात निसर्गाचे रंग
पाहून हा रंगांचा सोहळा भरून येते हे अंतरंग
प्रतिक्रिया
15 Feb 2016 - 7:06 pm | एक एकटा एकटाच
कातरवेळ असतेच अशी मनाला वेड लावणारी.
माझी ही एक अशीच कातरवेळ
http://www.misalpav.com/node/30633
15 Feb 2016 - 7:08 pm | प्रचेतस
माथेरानमधली कातरवेळ फार भयानक असते असा अनुभव आहे.
15 Feb 2016 - 7:29 pm | एक एकटा एकटाच
म्हणजे काही विशेष असत का?
जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर अनुभव शेअर कराल का?
15 Feb 2016 - 7:43 pm | प्रचेतस
विशेष असं कै नै हो.
पण ती कातरवेळ फार जीवघेणी असते इतकंच.
15 Feb 2016 - 7:43 pm | प्रचेतस
विशेष असं कै नै हो.
पण ती कातरवेळ फार जीवघेणी असते इतकंच.
15 Feb 2016 - 7:57 pm | एक एकटा एकटाच
मला वाटलं की माझ्या नवीन कथेसाठी काही प्लॉट सुचवताय की काय?
:-)
15 Feb 2016 - 8:44 pm | प्रचेतस
नै हो.
पण एकंदरीतच तिथे असलेली शांतता, रातकिड्यांचा किर्र आवाज, धड उजेडही नाही आणि अंधारही नाही अशी अवस्था.
15 Feb 2016 - 8:52 pm | एक एकटा एकटाच
सहसा
म्हणुनच कातरवेळ
एक एकटी असते....
ना ती कुणाची
ना कुणी तिचा.....
अशीच काहीशी.....
17 Feb 2016 - 5:20 pm | नाखु
आहे वल्ली मागे एकदा म्हणाले होते अश्यावेळी
सोबत खात्रीशीर कातरी असावी बरोबर म्हणजे अंतर्+वेळ कापली जाते !!!!!
का तर वे(ग)ळा नाखु
17 Feb 2016 - 5:22 pm | प्रचेतस
नाही हो.
भेटीत बोलू.
17 Feb 2016 - 5:47 pm | एक एकटा एकटाच
तुमची ही आगळी वेगळी
कातर वेळ
आवडली
16 Feb 2016 - 8:19 pm | राघव
कातरवेळेचं फक्त वर्णन करायचं की त्यावेळी दाटून येणार्या भावनांचंही चित्र चितारायचं? की दोन्हीही? चॅलेंजींग आहे, नाही??
17 Feb 2016 - 12:04 am | एकप्रवासी
कातरवेळच वर्णन तर अवश्य असावं पण त्याला भावनेची जोड असेल तर ती अधिक रसपूर्ण होईल.