६४ कलेत पारंगत
हिंदु संस्कृतित काम शास्त्रा ला अन्यनसाधारण मह्त्व होते, आहे.
काम शास्त्रा च्या नियमाप्रमाणे,कुमारीकेस,खालील
६४ कलेत पारंगत असण्याची आवश्यकता सांगीतली आहे,
ह्या कला तिने स्वतः गुप्त पणें अभ्यास करुन शीकायच्या व आत्मसात करावयच्या शिकवण्यासाठी खालिल पैकि शिक्षिकेचि नियुक्ती केली जायची. तिच्या बरोबर वयात आलेली, दाइची विवाहीत मुलगी, विवाहीत, विश्वासु मैत्रीण, आईची बहिण[मावशी],जुनि विश्वासु नोकराणी, मोठी बहिण, वरील पैकी कुणास तरी नियुक्त करुन तिला खालिल ६४ कला शिकवल्या जायच्या.
१ गायन कला
२ वाद्य वाजवण्याची कला,
३ नृत्यकला
४ गात, वाद्य वाजवत नृत्य करण्याची कला
५ लेखन व चित्रकला
६ गोंदण कला [ टॅटु काढण्याची कला ]
७ बिछाने,घालणे, फुलानि सजवणे, व फुलांच्या रांगोळ्या चि कला
८ दांत, कपडे,शरीर, नखें रंगवण्याची कला
९ भिंतित, व घरातल्या जमीनी वर रंगीत आरसे, काचा फिक्स करण्याची कला
१० पुष्प रचना करण्याची कला
११ गालिचे दिवाणखान्यात पसरणे, साफ करणे, इ कला
१२ जलतरंग वाजवण्याची कला
१३ पाणी भरुन, त्याचे साठवण , व वापर करण्याची कला
१४ चित्रे काढुन, गृह सजावट करणे.
१५ दो~यात फुले ओवुन, पुष्प माला, गजरे, माळा तयार करण्याची कला
१६ पुरुषांच्या फेट्यावर, फुलांची सजावट, व तुरे करण्याची कला
१७ कर्ण दागीनें [फुले] करण्याची कला
१८ नाटकात, एखादे पात्र सादर करण्याची कला
१९ अत्तरे, सु गंध तयार करण्याची कला
२० वस्त्र प्रावरणे, घातल्यावर, त्यावर योग्य दागिने, घालुन नटवण्याची कला.
२१ जादु करण्याची कला
२२ हस्त लाघव
२३ सॅलद,कोशिंबिरी,चपात्या, अन्न बनवण्याची कला
२४ ----
२५ पेय, सरबत ई..बनवण्याची कला
२६ विणकाम, भरत काम...
२७ सुत्र क्रिडा
२८ विणा डमरु वाजवण्याची कला२९ कोडे,[पहेली] घालुन सोडवण्याची कला
३० पाठांतर कला
३१ पुस्तक वाचण्याची कला
३२ लहान नाटुकल्यात काम करण्याची कला
३३ काव्य समास, आणि विग्रह कला
३४ वेत/बाम्बु पासुन बाण, ढाल ईत्यादि करण्याची कला
३५ पिंजण कला
३६ सुतार कला
३७ वास्तु विद्या
३८ रुप/रत्न परीक्षा..ची कला
३९ धातु विद्या
४० दागिने रंगवण्याची कला
४१ आकार ज्ञान
४२ जडि बुटी औषध विज्ञान
४३ कोंबड्या,बकरी,पक्षी यांच्या शी फाईट करण्याची कला
४४ पोपट व मैनेचे संभाषण जाणुन घेण्याची कला
४५ पुष्पौषधी नी हिलिंग करण्याची कला
४६ केश रचना कला
४७ अक्षर आणि मुद्रानि संभाषण करण्याची कला
४८ --------
४९ देश भाषा ज्ञान
५० फुलां पासुन खेळणी बनवण्याच ज्ञान
५१ यंत्र ज्ञान
५२ शुभेछ्या देण्याचे ज्ञान
५३ संभाषण कला
५४ मनातल्या मनांत काव्य करण्याची कला
५५ क्रिया विकल्प ज्ञान
५६ चलितका योग
५७ अभिदन कोश विद्या
५८ वस्त्राने झाकुन [कव्हर] ठेवण्याची कला
५९ द्युत क्रिडा ज्ञान
६० फसे टाकुन सोंगट्या खेळावयाचे ज्ञान
६१ लहान मुलांच्या खेळण्या विषयीचे ज्ञान
६२ विनायकि विद्या..शिस्त लावण्याची कला
६३ जिंकण्याची कला
६४ मधुर संगीताने आपल्या मालकाला जागे करण्याची कला
आवि..अप्पा
प्रतिक्रिया
8 Jan 2009 - 10:22 am | बिपिन कार्यकर्ते
... मग पुढे काय?
अवांतरः मिपावर 'बोळा अडकणे' सारखाच 'रेकॉर्डची पीन अडकणे' असा नविन वाक्प्रचार चालू करावा काय? ह्या साहेबांचे लेखन साधारणपणे एकाच दिशेने होते आहे का?
बिपिन कार्यकर्ते
8 Jan 2009 - 10:22 am | मृगनयनी
:)
धन्यवाद अविनाश जी,
मी बर्याच दिवसांपासुन या ६४ कलांच्या शोधात होते. श्रीकृष्णाने गुरु-सांदिपनी ऋषींकडे या सर्व कला आत्मसात केलेल्या होत्या.
:)
माहिती बद्दल धन्यवाद!
अवान्तर : क्र. २४ व ४८ व्या कला अनुक्रमे, वक्तृत्व कला, आणि युद्धकला असू शकतात (का) ?
:)
8 Jan 2009 - 12:10 pm | सहज
..
8 Jan 2009 - 2:14 pm | राघव
कुणी म्हणतंय कुमारिकेने आत्मसात करायच्या या कला आहेत.. त्याही गुप्तपणे(!!)..
तुम्ही म्हणताय श्रीकृष्णाने गुरु-सांदिपनी ऋषींकडे या सर्व कला आत्मसात केलेल्या होत्या..
काय बी संबंध लागं ना..
8 Jan 2009 - 10:25 am | सहज
२४ ----
४८ --------
छोटी व मोठी डॉटेड लाईन काढायची कला? वाह भाई वाह!!
8 Jan 2009 - 10:51 am | जृंभणश्वान
६३ जिंकण्याची कला
कुमारीकेला ही कला आली म्हणजे झाले, बाकी सगळ्या कला येणाऱ्यांना जिंकुन घ्यायचे :)
8 Jan 2009 - 11:21 am | नेटकिडा
१ गायन कला
२ वाद्य वाजवण्याची कला,
३ नृत्यकला
४ गात, वाद्य वाजवत नृत्य करण्याची कला
१,२,३ व ४ मिळून एकच कला ४ होते.
असेच
७ बिछाने,घालणे, फुलानि सजवणे, व फुलांच्या रांगोळ्या चि कला
१० पुष्प रचना करण्याची कला
११ गालिचे दिवाणखान्यात पसरणे, साफ करणे, इ कला
व
१८ नाटकात, एखादे पात्र सादर करण्याची कला
३२ लहान नाटुकल्यात काम करण्याची कला
म्हणता येईल.
४३ कोंबड्या,बकरी,पक्षी यांच्या शी फाईट करण्याची कला
इतर का नाहीत? कोंबड्या,बकरी,पक्षी च का?
8 Jan 2009 - 11:26 am | जृंभणश्वान
४३ कोंबड्या,बकरी,पक्षी यांच्या शी फाईट करण्याची कला
इतर का नाहीत? कोंबड्या,बकरी,पक्षी च का?
फाईट जिंकल्यावर लगेच फस्त करायला बरी वाटतात ही मंडळी , म्हणून असावे :)
8 Jan 2009 - 4:44 pm | श्रावण मोडक
बकरी, पती असे वाचले... :) :) :)
8 Jan 2009 - 11:33 am | वेताळ
४३ कोंबड्या,बकरी,पक्षी यांच्या शी फाईट करण्याची कला
हे असे नसुन कोंबड्याकोंबड्यात,दोन बकर्यात किंवा दोन पक्ष्यात झुंज लावणे ही एक कला पुर्वीचे काळी समजत असत.
वेताळ
8 Jan 2009 - 11:36 am | सहज
४३ कोंबड्या,बकरी,पक्षी यांच्या शी फाईट करण्याची कला
बहुतेक कों, ब, प. यांच्या शी [विष्ठा] फाईट ऑफ/ डाग पुर्णता साफ करण्याची कला असावी.
8 Jan 2009 - 11:44 am | विनायक प्रभू
विनायकि कला मंजे काय.
यंत्रकला मंजे काय. कोण्कोण्ती यंत्रे?
8 Jan 2009 - 11:52 am | वेताळ
वरील कला मुलींना शिकण्यासाठी होत्या मग मुलाना कोणत्या ६४कला शिकवत?त्याबद्दल सविस्तर लिहा.
वेताळ
8 Jan 2009 - 1:57 pm | बिपिन कार्यकर्ते
अहो मुलांचा इंटरेस्ट तेव्हा पण तोच हो.... पुरुष बदलतात का? ते ६४ कला वगैरेच्या नादी न लागता ८४ वगैरेचा अभ्यास करत. ;)
बिपिन कार्यकर्ते
8 Jan 2009 - 12:07 pm | अमोल केळकर
अविनाश साहेब,
चांगली माहिती मिळाली.
धन्यवाद
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
8 Jan 2009 - 2:40 pm | धम्मकलाडू
२४, ४८ 'अ'कला का? आम्रपाली या सगळ्या कलांत पारंगत होती म्हणे! पण फुलायचे की एवढ्या कला शिकायच्या ? असो. ही माहिती दिल्याबद्दल आभारी आहे.
(गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
8 Jan 2009 - 3:24 pm | योगी९००
काम शास्त्रा च्या नियमाप्रमाणे,कुमारीकेस,खालील ६४ कलेत पारंगत असण्याची आवश्यकता सांगीतली आहे,
इतक्या कला शिकेपर्यंत ती कुमारीका राहील का?
२२ हस्त लाघव
म्हणजे काय..?
४५ नंबर ची कला चुकून वेगळीच वाचली. लोक लज्जेस्तव इथे नमूद नाही करत काय वाचले ते. पुर्ण मराठीत लिहिले तर अर्थाचा अनर्थ होणार नाही.
४२ जडि बुटी औषध विज्ञान आणि ५१ यंत्र ज्ञान >
म्हणजे एकाच वेळी डॉक्टर आणि इंजीनियर सुद्धा...? बापरे...
किती हो अशा कुमारीका (?) होत्या की त्यांनी ह्या सगळ्या कला शिकल्या..?
खादाडमाऊ