'रोमा', अगदी जुने परदेशस्थ भारतवंशीय

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
15 Feb 2016 - 5:12 pm

पहीले परदेशस्थ भारतवंशी कोण ? हा तसा अद्यापही संशोधनाचा विषय असावा. जमिनीवरून आणि सागरी आशिया ते युरोप दोन-चार हजार वर्षापासून असावा -नेमका काळ हा आर्किऑलॉजी आणि इतिहास संशोधकांचा विषय आहे- ज्याला प्रेमळ चिनी लोक कदाचित सिल्करूट म्हणतात. हा व्यापार करणार्‍या समुदायात चिनी, अरब, उत्तर आफ्रीकन, मध्य आशियातील आणि युरोपिय सुद्धा अनेक व्यापार्‍यांचा या व्यापारात सहभाग राहीला असेल तर नवल नाही. पण हजार वर्षापुर्वीच्या काळात नेमके कोणते भारतीय बाहेर गेले असतील त्यांचे वंशज कुठे असतील हा इतिहास आजतरी माहित नाही. त्यानंतर-गेल्या हजार -दिड हजार वर्षात- पुर्व आशियाच्या वार्‍या बौद्ध धर्मीय तसेच दक्षिणेतील काही राजांनी केला. पण बौद्ध भिख्खुंनी सोबत पुरेसा भारतीय समुदाय नेला असेल का या बाबत साशंकता वाटते, त्या काळातील समुद्र किनारी व्यापार करत व्हिएतनामात जाऊन स्थायिक झालेले शैव-हिंदू परदेशस्थ भारतीय वंशिय असल्याचा पहिला मान घेणारे असतील का? त्या पाठोपाठ नंबर लागावा म्हणजे मधपुर्व आणि युरोपात गेलेल्या डोम आणि रोमा लोकांचा. डोम आणि रोमा लोकांच्या स्थलांतराचा कोणताही लिखीत इतिहास उपलब्ध नाही.

roma
roma
roma1
By Emil Volkers (1831–1905) (Kunsthaus Lempertz) [Public domain], via Wikimedia Commons

या लोकांच्या धर्म आणि संस्कृतीचे काळाच्या ओघात स्वाभाविक पणे बरेच स्थानिकीकरण झालेले असेल तर नवल नाही, स्थानिक स्थळांच्या धर्म संस्कृती सोबतच स्थानिकांसोबत मिश्र विवाह कुटूंबे वगैरे सर्व काही झालेले असेल तरीही युरोपिय रोमांची गुणसुत्रे भारतीय लोकांशी मिळतात. डोमांच्या भाषिक स्वरुपावरून ते पाचव्या शतकापासून केव्हातरी स्थलांतरीत होऊन मध्यपुर्व आणि उत्तर आफ्रिकेकडे गेले असावेत, तर युरोपात रोमांचे पोहोचणे थोडेसे अलिकडले म्हणजे बाराव्या शतकाच्या आसपास असावे असे त्यांच्या भाषेच्या स्वरुपावरून अंदाज लावले जातात. यांच्या बोली भाषा राजस्थानी आणि पंजाबीच्या जवळच्या समजल्या जातात. डोम आणि रोमा लोकांची नेमकी जागतिक जनगणना माहित नाही परंतु पन्न्नास लाख ते दिड एक कोटीच्या अधे-मधे असू शकेल.

roma 3

roma2

बंजारा हि भटकी जमात मुलतः व्यापारी जमात म्हणून परिचीत होती,- रोमालोकांच्या कार्ट्स युरोपियनांच्या परसिक्युशनन्समध्ये काढून घेतल्या गेल्या- भारतातून लोखंड आणि तांबे या धातूंची निर्यातही होत असे तेव्हा या डोम आणि रोमा लोकांकडे लोहार कामाचे कौश्यल्य राहीले असल्यास नवल नाही, पण डोमांचा सरळ संबंध आपल्या कडच्या भटक्या कलाकार डोंबारी जमातीपर्यंत पोहोचत असण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणजे व्यापार्‍यांसोबत त्यांच्या मनोरंजनाचे लोकही त्यांच्या सोबत जात असल्यास नवल नाही - हे रोमा लोक चार्ली चॅप्लिन, पिकासो, प्रेसली अशा कलाकारांवर रोमा असल्याचा दावा सांगतात, खखोदेजा- पण मुख्य म्हणजे अजूनही अंशतः कुठे कुठे कला जगवत असावेत; पण काळ आणि वेळ या बदलत्या गोष्टी असतात, जगाच्या प्रगतीच्या ओघात यांच्या व्यापार आणि कौशल्यांचे मुल्य संपले असेल तर नवल नाही. गेल्या काही शतकात भारतातल्याही काही भटक्या जमातींना त्यांची उदर निर्वाहाची साधने गेल्या नंतर चोर्‍यांसारख्या असामाजिक उत्पन्न स्रोतांचा आधार घ्यावा लागला तसेच काहीसे या रोमा लोकांचे झाले असावे - तसे भुरट्या चोर्‍या आणि भिक मागणे या पलिकडेही त्यांची गुन्हेगारीत मजल जात नसावी, पण तरीही हे भटके लोक, स्थानिकांसारखे दिसत नाहीत- युरोपातला गोरा वंशवाद, गावांच्या परिघावर राहणे, भाषेतला फरक आणि स्थानिक धर्म स्विकारले तरी तिथल्या तिथल्या कट्टर पंथियांना ते आपलेसे वाटत नाहीतच ज्यू लोक युरोप सोडून गेले किंवा जे उरले त्यांची आर्थिक सुबत्ता आणि प्रसार माध्यमातील आवाज करण्याची क्षमता अधिक पण रोमांचे नशिब याच्या पूर्ण विरुद्ध, तिथल्या स्थानिक उजव्यांमध्ये रोमांची प्रतिमा निगेटीव्ह असेल किंवा ज्यूनंतर सहज द्वेषकरण्यासारखा रोमा हाच समुह उरला असेल, पण आधुनिक काळात गेलेला परदेशस्थ भारतीय सुद्धा त्यांच्या बद्दल कधी कुठे चकार शब्द काढताना दिसत नाही.
roma6
roma4
roma5

नेमेची येतो पावसाळा तशी या रोमा लोकांचा भारत सरकारकडून १९७६पासून भारतात वार्षिक मेळावा घेतला जातो नाही असे नाही, तसा १२ ते १४ फेब्रुवारी हा सोपस्कार भारतात पार पडला, सुषमांजींच्या निमीत्ताने एखादी बातमी एखादा क्वचित लेख या पलिकडे माध्यमांचे आणि लोकही जवाहरलाल नेहरु विद्यापिठातील राजकारणात होती त्यात हि बातमी कुठल्याशा कोपर्‍यात बसली. बाकी हे डोम आणि रोमा भारतीयांच्या खिसगणतीतही नसतात आणि ते ज्या ज्या देशात गेले तेथले धर्म आणि देश स्विकारले पण तरीही तिथल्या स्थानिक जनतेनेही त्यांना निटसे स्विकारले असे म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. तिथे त्यांना गरिबी, वंशवाद आणि वांशिक अस्पृश्यतेचाच सामना करावा लागतो. गेल्या २६ जानेवारीला फ्रान्सचे अध्यक्ष दिल्लीच्या राजपथावर सलामी घेऊन जाण्यास -किती दिवस झाले ४+१५ फारतर १९ - भारतीय माध्यमे भारतातील आंतरराष्ट्रीय रोमा कॉन्फरन्सची किमाच चार ओळीची बातमी देत आहेत, पाश्चात्य माध्यमांमध्ये हि बातमी नाहीच, पण फ्रान्स मधील झोपडपट्ट्यातून त्याचवेळी रोमा लोकांवर विस्थापनाचीही कारवाई चालू आहे. या रोमा लोकांनी युरोपात कोणत्या प्रकारचे परसिक्यूशन सहन केले नाही असे नाही, इन्क्विझीशन झाले त्यात रोमा लोकांचा नंबर पहिला, गुलाम म्हणून गुलामगिरी करून घेणे यांचा नंबर आहेच, नाझींनी ज्यूंसाठी कॉन्संट्रेशन कॅम्प उघडले ज्यु लोकांसाबोत यांचीही वरात आहेच, -अगदी महायुद्धोत्तर काळात- चेकोस्लवाकिया, जर्मनी या देशांनी रोमा स्त्रीयांचे सक्तीचे स्टरीलायझेशनचे कार्यक्रमही राबवले. इअन्क्विझीशन नंतरच्या स्पेन मध्ये त्यातल्या त्यात बरी वागणूक मिळाली असेल तिही त्यांनी त्यांची भाषा आणि संस्कृती सोडण्याच्या किमती वर कम्युनिस्ट राजवटी काम देत म्हणून तिथला तो काळ बरा असेल पण कम्युनिस्ट राजवटी पडल्या नंतर तेथले बहुस्संख्यच खाण्यास मौताज झाल्यावर तेथिल उजव्या कट्टर पंथियांनी त्यांचा मोर्चा रोमा लोक ज्यांच्या हातात काहीच नाही त्यांच्या कडे वळवल्याचे दिसते, तुम्ही रोमा असाल आणि तुम्ही युरोपातील माध्यमातील त्यांच्या विषयीच्या बातम्यांचा आढावा घेतला तर चित्र आशादायी नाही आणि त्यांच्या एकुण स्थितीत भारत आणि भारतीयांचे पाठबळ तुटपुंजे म्हणावे एवढेही नसावे.

roma7
roma8
roma9
शासकीय स्तराचे काम लाल रिब्बीन पद्धतीने आणि कल्पना दारीद्र्याचे वाटावे. ज्या लोकांना शाळा, शिक्षक प्रशिक्षण, उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशीप, मायक्रोक्रेडीट, सह्कारी बँकींग अशा सहज पुरवण्या जोग्या गोष्टीत भारत सरकारचा सहभाग कुठेच दिसत नाही. हे युरोपातील लोकांचे झाले. सिरीयातील डोम-जिप्सी तिथल्या चालू युद्धाच्या कोणत्याच गटात नाही आणि हकनाक भरडला जातो आहे. तसे परदेशस्थ भारतीय वंशीयांबद्दल सुषमा स्वराजांचे रेकॉर्ड बरे आहे. ब्रह्मदेश, आफ्रीकेच्या काही देशात भारतीय व्यापार्‍यांच्या खासकरून व्याज व्यवहार तसेच स्थानिक प्रशासनासोबत भ्र्ष्टाचार आणि वंशवादाबाबत नाराजी असते त्याची भारतीयांनीही दखल घ्यावयास हवी, दुसरी कडे व्हेएतनाम सारख्या मित्र देशातही भारतीय वंशियांचे परसिक्यूशन होते किंवा फिजी सारख्या परिस्थिती स्थानिकांसोबत भारतवंशियांबद्दल विश्वास निर्माणकरण्याचा मोठा टप्पा भारतीयांना अद्यापि पारकरणे बाकी असावा. आपल्यापर्यंत यासर्व बातम्याही पोचत नाहीत आणि पोचल्यातरी करण्यासारखे हातात फारसे काही नसते हेही तेवढेच खरे.

संदर्भ

*http://www.newsgram.com/we-romas-would-like-to-be-treated-as-indian-dias...
*http://www.dailypioneer.com/columnists/oped/the-roma-people-indias-pride...
*http://iccr.gov.in/content/international-roma-conference-and-cultural-fe...
*http://www.worldromaorganization.org/index.php/en/contact
*https://en.wikipedia.org/wiki/Romani_people#Romani_subgroups
*https://en.wikipedia.org/wiki/File:Emil_Volkers_Zigeunerlager_vor_D%C3%B...
*https://en.wikipedia.org/wiki/Caló language_language
*https://commons.wikimedia.org/wiki/Category:Roma_people
*https://commons.wikimedia.org/wiki/File:Do_you_speak_english%3F_%2833835...
*https://commons.wikimedia.org/wiki/File:Peaceful_personalities_and_warri...
*https://en.wikipedia.org/wiki/Dom_people
*https://en.wikipedia.org/wiki/Domba
* http://www.punemirror.in/pune/others/Decoding-language/articleshow/50827...
*http://www.middleeastgypsies.com/
*http://www.middleeastgypsies.com/gypsy-history.html
* http://economictimes.indiatimes.com/magazines/panache/should-india-recog...
*http://www.ibtimes.co.uk/paris-roma-people-evicted-petite-ceinture-camp-...
*http://www.ibtimes.co.uk/roma-only-bus-route-montepellier-5-countries-wh...
*http://www.dailysabah.com/minorities/2016/02/15/turkeys-roma-community-b...
*http://www.radio.cz/en/section/one-on-one/far-right-focus-on-migrants-ta...
* http://www.newhamrecorder.co.uk/news/newham_s_roma_orchestra_helps_fight...

समाज

प्रतिक्रिया

जयंत कुलकर्णी's picture

15 Feb 2016 - 6:48 pm | जयंत कुलकर्णी

मला आठवते आहे काही वर्षापूर्वी म्हणजे बर्‍याच वर्षापूर्वी त्यांचा एक नेता भारतात आला होता व त्याने दिल्लेमधे त्यांचे सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी जागा मागितली होती पण आपल्या सरकारने दिली नाही. रोमा भाषेत मूळ शब्द हिंदी, हरियानवी व मराठीतूनही आलेले आहेत. म्हणजे जगभर हे शब्द तसेच पसरले आहेत. यावर मी फार पूर्वी अभ्यास केला होता....उदा. खालील शब्द पहा. मला त्यावेळी याचे भयंकर कौतूक वाटले होते...

पहा उदा :
मानुष: माणुस, दाद:दादा, मामी:मॉं, सर/शेईरो:सर, बाल/वाल:बाल, आकी/आंकी:आंख, नाक/नाख:नाक ,
कान:कान, दात:दांत/दंत, त्शिब:जिभ, मुई:मुह, दस्त:हस्त, अंगुस्टे:अंगुष्ट, तलपा:तळवा,
चोन:चांद, अस्तारा:तारा, पानी/पानेन:पाणी, याग:आग, अलौ:लौ, अंगार:अंगार, लोण:लोण,
पोर:पर, सिंगी:सिंग, मछो:मच्छी, पत्रीन:पत्रि, कर:घर, कुथ्था:कुत्ता, गौविन्:गौ, बक्रो:बकरा,
मेंडेस:मेंढी, टुध:दुध, पशुन:पश्मिन, छुरी:छुरी, गोनो:गोणी, कुडो:कोलू, ताल्लो:तलाव,
अंगुस्त्रो:अंगुस्त्राण, अकोर:आक्रोड, सुना:सोने, रुप:रुपे, चोर:चोर, परदस:परदेशी, बोख:भूक
डुख:दुख, कनरिआ:करुणा, गंडी:गंधी, देव्ला:देव/देऊळ, त्रिजुल:त्रिशूल, नाव:नाव, पुरो:पूर्वी,
तर्नो:तरुण, मुल्लो:मेलो/मेलेला, नंगो:नंगा, कालो:काळा, लोलो:लाल, कौइन:कौन, तू:तू, तिरो:तेरा,
सात:साथ, आन्द्रै:अंदर, सोना:सोना, डाईखव:दाखव, मुत्र:मुतणे, मट्टो: मत्त/मस्त/पिऊन मस्त असे असंख्य हिंदी स्बद जगभर प्सरले आहेत याचे मला खरोखरच अप्रूप वाट्ते :-)

काका, यानिमित्त तुमची कालच आठवण काढली होती.

http://www.loksatta.com/ls-diwali2015-news/panipat-war-prisoners-1197000/

जयंत कुलकर्णी's picture

15 Feb 2016 - 7:38 pm | जयंत कुलकर्णी

धन्यवाद !
आपण माझी आठवण काढल्याबद्दल ! :-)

अस्वस्थामा's picture

15 Feb 2016 - 10:48 pm | अस्वस्थामा

आदूबाळ +१,
काकांची कथा आठवली लगेच. :)

माहितगार's picture

15 Feb 2016 - 8:35 pm | माहितगार

@ जयंत आणि आदुबाळ रोचक माहितीसाठी आभार

गरिब चिमणा's picture

15 Feb 2016 - 7:15 pm | गरिब चिमणा

रोमा म्हणजे डोम या पंजाबी/राजस्थानी दलित जातीचे लोक, दुसर्या शतकात ईराणच्या शाह ने राजस्थानवर आक्रमण केल्यानंतर रजपुतांना फौज कमी पडू लागली तेव्हा या डोम लोकांना सामाजिक स्थानी प्रमोशन देण्याचे वचन देऊन राजपुतांनी त्यांना भरती करुन घेतले व शाहशी लढायला पाठवले,शाहच्या फौजेने यांना धोबीप्छाड देऊन पश्चिमेकडे पिटाळले ,हे लोक मग उत्तर मध्यपुर्वेत स्थिरावले व तिथुन युरोपात गेले.

सुनील's picture

15 Feb 2016 - 7:51 pm | सुनील

दुसर्या शतकात ईराणच्या शाह ने राजस्थानवर आक्रमण केल्यानंतर ...

दुसर्‍या शतकात हे शक्य वाटत नाही. कारण तसे असते तर, वर जयंतरावांनी दिलेल्या शब्दावलीतील अनेक शब्द त्यांच्या आजच्या बोलीत असणे शक्य नसते.

त्यांचे स्थलांतर बहुधा बाराव्या शतकात झाले असावे.

प्रचेतस's picture

15 Feb 2016 - 8:35 pm | प्रचेतस

त्यांना बहुधा पर्शियन साम्राज्याच्या आखमेनिद राजवटीच्या सिंधू खोऱ्यातील आक्रमणाविषयी म्हणावयाचे असावे.

पैसा's picture

15 Feb 2016 - 7:49 pm | पैसा

या लोकांबद्दल कधीच काही वाचले नव्हते. भाषा राजस्थानी पंजाबीला जवळची असेल तर ते उत्तर भारतीय मुळातले असू शकतात. डोंब जमात असेल का?

कपडे बंजारा लोकांसारखे दिसत आहेत.

माहितगार's picture

16 Feb 2016 - 12:17 am | माहितगार

डोंब जमात असेल का?

बहुत्तेक

कपडे बंजारा लोकांसारखे दिसत आहेत.

कदाचित अधिक अभ्यासाचा विषय असावा, मीही मला तसे वाटणारी चित्रे निवडली, पण या मंडळींनी खरेतर जिथे गेले तिथली संस्कृती बर्‍यापैकी स्विकारली असावी.

स्वाती दिनेश's picture

15 Feb 2016 - 8:03 pm | स्वाती दिनेश

नवीन माहिती समजली. धन्यवाद.
स्वाती

अस्वस्थामा's picture

15 Feb 2016 - 10:56 pm | अस्वस्थामा

चार- पाच वर्षांपूर्वी एक मस्त ट्रॅक (झेब तरिफा) समोर आला. खूप भावला. त्याबद्दल वाचताना डोंब, डोम, रोम, बंजारा आणि यांचे हे स्थलांतर याबद्दल बरचसं कळालं.
आणि यावर एक मस्त चित्रपट पण सापडला "लाचो ड्रोम"

अस्वस्थामा's picture

15 Feb 2016 - 11:00 pm | अस्वस्थामा

"लाचो ड्रोम" (Latcho Drom). तसा तर डॉक्युमेंट्रीच्या वळणाचा आहे पण संगीत आणि आपलं भारताचं नातं चित्रपट बघायला इंटरेस्टींग करतं.

( कधी काळी यावर लिहावं असा विचार करणारा आणि लिहिल्याबद्दल माहितगार यांचे आभार मानणारा )

माहितगार's picture

16 Feb 2016 - 12:12 am | माहितगार

आपण दिलेल्या दुव्यांची नोंद घेतली, सावकाश बघेन. माहितीपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद.

जयंत कुलकर्णी's picture

16 Feb 2016 - 9:31 am | जयंत कुलकर्णी

काय चित्रपट आहे.....ग्रेट, फॅन्टॅस्टिक...आणि काय लिहावे ते समजत नाही. एक अनुभव....

अस्वस्थामा's picture

16 Feb 2016 - 7:04 pm | अस्वस्थामा

अर्रे वा.. लगेच पाहिलात पण काका.? मस्तच !! :)

जयंत कुलकर्णी's picture

16 Feb 2016 - 7:56 pm | जयंत कुलकर्णी

तुमच्या प्रतिसादातील लिंकवर क्लिक केले आणि नंतर तसाच बघत बसलो......

बोका-ए-आझम's picture

15 Feb 2016 - 11:19 pm | बोका-ए-आझम

हिटलरने ज्यूंच्या बरोबरीने ज्या रोमानी लोकांचा आपल्या मृत्यूछावण्यांमध्ये वंशसंहार घडवून आणला ते आणि हे रोमा एकच आहेत का? ज्यूंच्या Holocaust ला जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढी या वंशसंहाराला मिळाली नाही.

माहितगार's picture

16 Feb 2016 - 12:10 am | माहितगार

होय डोम आणि रोमानाच जिप्सी म्हणत, पण जिप्सी हा शब्द हिणवण्यासाठी वापरल्या गेल्यामुळे तो वापरणे अयोग्य मानले जाते.

हिटलरने ज्यूंच्या बरोबरीने ज्या रोमानी लोकांचा आपल्या मृत्यूछावण्यांमध्ये वंशसंहार घडवून आणला ते आणि हे रोमा एकच आहेत का?

होय

ज्यूंच्या Holocaust ला जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढी या वंशसंहाराला मिळाली नाही.

हम्म अम्शतः खरे असावे, मुख्य म्हणजे इतिहासाच्या भारतीय अभ्यासक्रमांनी पुरेशी दखल न घेण्यामुळे भारतीयांना माहित नसणे हे अधिक खटकणारे असावे; कदाचित ज्युंची आर्थिक,पॉलीटीकल आणि माध्यमातील प्रभाव रोमांच्या वाटेस कधी आला नसावा.

मी काही भटकणारे तांडे पाहिलेत. मराठवाड्यात त्यांना रोमानी किंवा इराणी म्हणतात. टिपिकल युरोपिअन रापलेला वर्ण, बारीक असे दात, लांब आणि धारदार नाक ही वैशिट्ये लगेच जाणवतात. बायका चुण्यांचे स्कर्टस आणि वर शर्ट सारखे पोलके घालतात. बारीक आणि लांब वेण्या असतात. पुरुष साधा शर्ट आणि ढगळ पॅन्ट वापरतात. त्यांच्याकडे ट्रॅव्हलर बस असतात. काय धंदा करतात ते कळत नाही पण रस्त्याच्या कडेला ४-४ दिवस मुक्काम करुन राहतात. ते पैशात फसवतात, त्यांच्या मुली नादी लावून पैसे काढतात अश्या गोष्टी ऐकायला मिळतात.

मी काही भटकणारे तांडे पाहिलेत. मराठवाड्यात त्यांना रोमानी किंवा इराणी म्हणतात.

भटकणार्‍या तांड्यांसाठी रोमानी हा शब्द मराठवाड्यात कॉमन आहे का ? कि युरोपीय रोमानी लोकांची माहिती झाल्यामुळे कुनी वापरण्यास चालू केला आहे ?

ते पैशात फसवतात, त्यांच्या मुली नादी लावून पैसे काढतात अश्या गोष्टी ऐकायला मिळतात.

वस्तुतः उडदामाजी काळेगोरे सगळीकडेच असतात, काही गोष्टींचे चलन काही समुदायात अधिक असू शकते खासकरुन इंडस्ट्रीअलयाझेशन, प्रॉडक्ट सायकल मध्ये नवे प्रॉडक्ट रुजू होण्यामुळे जुने प्रॉडक्ट व सर्वीसेस बाद होणे, भांडवलशाहीच्या परिपाकामुळे येणारे व्यावसायिक तोटे अथवा हातचा रोजगार जाणे, दुष्काळ साथीचे रोग अशा बर्‍याच कारणांनी हाती रोजगार नसलेले समुह भटके होतात आणि चुकीच्या मार्गाला लागण्याचे प्रमाण अधिक असू शकते नाही असे नाही.

पण तरीही स्टिरीओ टायपिंगचा मोह टाळला पाहीजे असे वाटते.

अभ्या..'s picture

16 Feb 2016 - 11:55 pm | अभ्या..

कॉमन नसावा. इराणी जास्ततर ऐकले आहे. रोमानी नाव एकायला एक मजेशीर प्रसंग घडला. एका शिक्षकाचे आडनाव रोमन (मराठा) होते. त्याच्या मित्राने च्ष्टेचेष्टेत सांगितले हा तर रोमानी हाय. रोमानी म्हणजे कोण विचारताना त्याने ते चाकुसुरेवाले इराणी नसतेत का? फिरता झगा घालणार्‍या बाया असे सांगितले इतकेच. निजामी अंमलाखाली हा शब्द प्रचलित असावा.
बाकी स्टीरीओटायपिंग नाहीच. मी एकले ते लिहिले. वैयक्तिक मी एकाही रोमानी अथवा इराण्याशी बोललेलो नाही. फक्त पाहिलेत.
अशाच कथा बंजारा वगैरे लोकंसदर्भात एकायाल मिळतात. जातीवाचक उल्लेख होईल, मला टायपिंगचा कंटाळा आणि स्टीरिओटाइअपचा शिक्का यामुळे पास.
धन्यवाद.

माहितगार's picture

16 Feb 2016 - 12:09 pm | माहितगार

टिपिकल युरोपिअन रापलेला वर्ण, बारीक असे दात, लांब आणि धारदार नाक ही वैशिट्ये लगेच जाणवतात.

एवढ्या शतकांमध्ये युरोपात गेल्यापासुन युरोपिअयनांशी संबंध होणे आनि तो प्रभाव जाणवणे शक्य असले तरीही युरोपात त्यांना गोरे म्हणून स्विकारले जात नाही वंशभेदास सामोरे जावे लागते, बहुतांश युरोपातील रोमांची ठेवण भारतीयच असावी असे छायाचित्रांवरून वाटते, मी धागा लेखात लावण्यासाठी छायाचित्रे कॉपीराईट मुक्त स्रोतातील हवी होती म्हणून भारतिय गोर्‍या रंगाचा प्रभाव धागालेखातील उपलब्ध छायाचित्रातून अधिक दिसतो आहे, पण प्रत्यक्षात कदाचित तसे नसावे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Feb 2016 - 8:06 pm | राजेंद्र मेहेंदळे

हे लोक(बायका जास्त करुन) गॉगल विकणे वगैरे व्यवसाय करताना दिसतात शहरात. भाषा हिंदी बोलतात पण जरा वेगळीच. शहराबाहेर बघितले तर ट्रॅव्हलर बस वगैरे लावुन मुक्काम टाकलेला असतो.

अद्भूत आणि रोचक माहीती. अजुन येउद्या...

मानव वंशाबद्द्ल प्रचंड कुतुहल असलेला खटपट्या...

अनुप ढेरे's picture

16 Feb 2016 - 10:06 am | अनुप ढेरे

रोचक! आवडला लेख!

मी-सौरभ's picture

16 Feb 2016 - 5:43 pm | मी-सौरभ

अजुन माहिती असल्यास वाचायला आवडेल

-आळशी नं. ६४४०

अजया's picture

16 Feb 2016 - 6:48 pm | अजया

नवीच माहिती मिळाली.
चित्रपटाच्या लिंकबद्दल धन्यवाद.

जुइ's picture

17 Feb 2016 - 5:09 am | जुइ

अक्षर दिवाळी अंक २०१५ मध्ये मेधा कुळकर्णी लिखित स्लोव्हाकिया देशातील त्यांच्या भेटीत या रोमा वस्तीचा उल्लेख नुकताच वाचण्यात आला.

स्मिता.'s picture

17 Feb 2016 - 1:29 pm | स्मिता.

पूर्व युरोपातील रोमनिया देश आणि हे रोमा लोक यांचा काही संबंध आहे का?
पश्चिम युरोपियन देशात लेखात वर्णन केल्याप्रमाणे मजुरी करणारे तसेच भुरटे चोर, खिसेकापू, वगैरे करणारे हे 'ऱोमानीयन' म्हणवणारेच असतात. त्याव्यतिरिक्त रस्त्यावर कला सादर करणारे (डोंबारी सदृश्य) रोमानियन असतात. हे रोमानियन म्हणजेच रोमा किंवा त्यांचा संलग्न वंश असावा का?

पूर्व युरोपातील रोमनिया देश आणि हे रोमा लोक यांचा काही संबंध आहे का?...हे 'ऱोमानीयन' म्हणवणारेच असतात.....हे रोमानियन म्हणजेच रोमा....

रोमानी म्हणजे रोमानीयन नव्हे या दोघांमध्ये मुळीच गल्लत करू नका. योगा योगाने रोमनिया देशात सुद्धा रोमा बर्‍यापैकी प्रमाणात आहेत पण रोमा आणि रोमानिया यांच्या व्युतत्ती संपूर्णपणे वेगळ्या असाव्यात. रोमानियाची व्युत्पत्ती इटली मधील रोम > रोमन >> रोमानीया अशी असावी तर रोमा शब्दाची व्युत्पत्तीचा त्यांच्या भारतीय वंशाचे असण्याशीही संबंध असू शकतो पण रोमन लोकांशी नक्कीच नव्हे.

माहितगार's picture

17 Feb 2016 - 5:28 pm | माहितगार

रोमा लोकांना रोमानी म्हणतात रोमानी आणि रोमानीयन वेगवेगळे

जीएस's picture

17 Feb 2016 - 3:14 pm | जीएस

उत्तम लेख व माहिती.

सरकार फारसे काही करत नसले तरी संघ गेली अनेक वर्षे रोमा, डोमा व अशा जगभर पसरलेल्या जमातींमध्ये काम करत आहे. त्यातील सर्व भारतातून उगम पावलेले असतीलच वा थेट हिंदू वारसा असलेले असतीलच असे नाही पण युरोपच्या सार्वत्रिक ख्रिश्चनीकरणापूर्वीचे हे धर्म/जमाती आहेत.

माहितगार's picture

17 Feb 2016 - 5:34 pm | माहितगार

पण युरोपच्या सार्वत्रिक ख्रिश्चनीकरणापूर्वीचे हे धर्म/जमाती आहेत.

युरोपातल्या बाकी भटक्यांचे माहित नाही, भारतीय वंशाचे जे रोमा आहेत त्यांच्या बाबत भाषातज्ञांचे मत ५ वे ते १२ शतक असा आहे म्हणजे नक्कीच युरोपच्या बर्‍यापैकी ख्रिश्चनीकरणा नंतर

...
तरी संघ गेली अनेक वर्षे रोमा, डोमा व अशा जगभर पसरलेल्या जमातींमध्ये काम करत आहे.

नेमके काय काय करत आहे,

पिशी अबोली's picture

17 Feb 2016 - 9:02 pm | पिशी अबोली

वाह.छान ओळख करून दिलीत.
अलीकडेच यांच्या भाषेवर काम केलेले यारोन मात्रास यांचा एक वर्कशॉप आणि त्यानंतर त्यांच्यासोबत लंचमधे गप्पा मारायचा योग आला. त्यांना सापत्न आणि संशयाची वागणूक मिळते हे खरेच. त्यांची भाषा टिकवण्यात त्यांना कितपत रस आहे, या प्रश्नाला त्यांनी 'They have no motivation in actively preserving it' म्हटलं, तेव्हा वाईट वाटलं.

पिशी अबोली's picture

17 Feb 2016 - 9:02 pm | पिशी अबोली

वाह.छान ओळख करून दिलीत.
अलीकडेच यांच्या भाषेवर काम केलेले यारोन मात्रास यांचा एक वर्कशॉप आणि त्यानंतर त्यांच्यासोबत लंचमधे गप्पा मारायचा योग आला. त्यांना सापत्न आणि संशयाची वागणूक मिळते हे खरेच. त्यांची भाषा टिकवण्यात त्यांना कितपत रस आहे, या प्रश्नाला त्यांनी 'They have no motivation in actively preserving it' म्हटलं, तेव्हा वाईट वाटलं.

अमरेंद्र बाहुबली's picture

7 Nov 2024 - 2:23 am | अमरेंद्र बाहुबली

छान लेख. काल शिंडलर्स लिस्ट हा सिनेमा पाहिला. त्यानंतर हिटलरवरील मीपावरचे लेख वाचत सुटलो. एका लेखाखालच्या प्रतिक्रियेत हिटलरने ज्यूंबरोबर रोमन जिप्सी लोकांचीहीकत्तल/होलोकॉस्ट केल्याचं वाचलं, आता हे कोण हा प्रश्न आल्यावर मीपावरच शोधाशोध केली नी हा लेख सापडला. भारत ते युरोप असा प्रवास तेही संस्कृती जपून, वाखान्याजोगा आहे. उद्या latcho drom यूट्यूब ला पाहणार.