ना शाळेत शिकवली, ना कोलेजात शिकवली,
ही तर दुनियादारी आहे, आम्हाला या दुनियेनी शिकवली....
वाटेत होता वाटसरू , म्हणालो मदत तुम्हा काय करू,
ऐकवले प्रवचन म्हणे इथे तिथे तोंड नको मारू,
दोस्त होता पुढे , आनंद होता मला,
दुनियादारी म्हणते तू मागे तर तो पुढे कसा काय गेला,
ती पण गेली सोडून वाटेत मला अर्ध्यावरती,
म्हणे दुनियादारी शिक, तू तर आहे फारच सरळ सोबती,
मग काय किताब होती मोठी , दुनियादारी शिकत गेलो,
कधी याचे तर कधी त्याचे पाय ओढत गेलो,
वाईट नव्हतो कधीच, खूप पहिली होती आम्ही दुनियादारी
बस कळली आम्हास जेव्हा संपली होती आमच्यासाठी दुनिया सारी..........
प्रतिक्रिया
12 Feb 2016 - 5:07 pm | तुषार काळभोर
"दोस्त होता पुढे , आनंद होता मला,
दुनियादारी म्हणते तू मागे तर तो पुढे कसा काय गेला,"
>> हे एकदम भिडलं ब्वॉ आपल्याला!!
(तेव्हढं शुद्धलेखन बघा.. मदत इथे आहे.)
12 Feb 2016 - 5:10 pm | जव्हेरगंज
मस्त!
12 Feb 2016 - 5:14 pm | बोका-ए-आझम
आयडी रोचक आहे. अर्थ कळेल काय?
13 Feb 2016 - 2:55 pm | पिके से पिके तक..
निरर्थक आहे हो आयडी चा अर्थ....तुम्हीच सुचवा काही तरी लॉजिक..
12 Feb 2016 - 6:04 pm | चांदणे संदीप
सदस्यत्व घेतल्यापासून ३ तासाच्या आत कविता टाकल्याबद्दल तुमचे सर्वात आधी अभिनंदन! कारण, इथे बर्याच नवीन सदस्यांना आठवडा किंवा महिनाही लागतो! मला स्वत:ला जवळपास एक वर्ष लागले! ;)
आता पुढचा रेकॉर्ड पाहूया काय असेल!
बादवे, कविता चांगली आहे! :)
Sandy
12 Feb 2016 - 7:08 pm | जव्हेरगंज
:)
मला तर ३-४ वर्षे लागली !
12 Feb 2016 - 7:04 pm | एक एकटा एकटाच
दुनियादारी
आवडली.
13 Feb 2016 - 10:39 pm | एस
कविता छान आहे.
14 Feb 2016 - 12:07 pm | एकप्रवासी
तुमच्याच कवितेवरून काही ओळी आठवल्या ….
"सगळ्यांनाच शिकावी लागते दुनियादारी
एकाच चष्म्यातून पाहावी लागते दुनिया सारी"
खूप छान आणि वस्तुस्थितीशी निगडीत आहे कविता………… आवडली.
7 Mar 2016 - 9:38 am | kunal lade
खुपच छान ....