गुजरान
माझी होईल कशी गुजरान,कंठाशी आला प्राण
कोण देईल आम्हाला दान,वणव्यात अडकल रान
डोक्यावर कसले भार,कोणी देईना जीवा आधार
फक्त उरल्या घटका चार,लांबला प्रवास फार
चार घासांचे हे दुखणे,पोटात तिडिक उठणे
काट्यावर सदैव निजणे,अश्रुंनी रातभर भिजणे
धीर करुनी पसरीला हात,केविलवाणे बोल तोंडात
लाज सुटली होती आघात,भीक मागतो माणसात
कटोऱ्यात पडती नाणे,मुखात देवाजीचे गाणे
असे जीवन लाजिरवाणे,श्वानापरी काय राहाणे
पोटाला मिळे भाकर,साऱ्या जगाचा मी चाकर
झोप नसते रात्रभर,श्वास माझे तुमचे आभार
कुठल्या कर्माची ही शिक्षा,दारोदारी मागतो भिक्षा
शरीराची होते रक्षा,मनास देई काही दीक्षा
कपड्यांनी फरक हा केला,भिकारी जन्मताच मेला
श्रीमंतीचा भरला पेला,माणासातून माणूस गेला
देवा तुझी ही लेकरेबाळे,कुणा पायी सोन्याचे वाळे
कुणी काट्यातून चाले,हे कसले माकडचाळे
देवा एक तुझा दरबार,इथे कसा आला अंधार
मी भिकारी नाही चोर,नको मांडू असा संसार
शाहीराची होईल गुजरान,शब्दांचे राहु दे भान
समभावे देई आम्हा दान,लेकरु आहे अजुन अजाण
प्रतिक्रिया
9 Feb 2016 - 1:58 pm | इरसाल
लिहीलेय छान.
पण जरा हेडिंग मधली स्पेलिंगमधे न च्या ऐवजी त असता ना तर प्रतिसादाचा धबधबा कोसळला असता.
9 Feb 2016 - 2:12 pm | हरिदास
:) वाह वाह..............
9 Feb 2016 - 11:29 pm | अभ्या..
'त' किंवा 'न' च्या ऐवजी 'ल' असता तर तुमचा एकुलता एक प्रतिसाद पण आला नसता.
10 Feb 2016 - 8:26 am | संदीप डांगे
हेंगाशी.... =)))