आमच्या सरांनी FB टाकलेलं हेे पत्र....
एका विधवेचे नवऱ्याला पत्र.
प्रिय -----
काल तुझा अकाली मृत्यू झाला. वय 41 फक्त. म्हणजे आयुष्यात स्थिरस्थावर होऊन आनंद उपभोगण्याचे , मुलांबरोबर फिरण्याचे, खेळण्याचे ,बायकोबरोबर गप्पगोष्टी, थट्टामस्करी करण्याचे वय. परंतु त्या सुखाला तू मुकालासच पण या आनंदाला तुझी बायको मुलंही पारखी झाली.
काय कारण होतं या सगळ्याचं? तू खोट्या आनंदात रममाण झाला होतास. त्यामुळे खऱ्या आनंदाला तू मुकतो आहेस याचे तुला भानच राहिले नाही.
लग्न झाल्यापासून पाहतेय, तू कायम मित्रांच्याच गराड्यात cheers करत असायचास. मित्र असावेतच, पण आपलं कुटुंब सुद्धा आहे, त्याबद्दल आपली जबाबदारी सुद्धा आहे याचा तुला विसर पडला होता.
शिवाय रोज रात्री बाटली घेऊन घरी बसणे होतेच. त्यामुळे आपल्या मुलांवर काय परिणाम होतो याची तू चिंताच करत नव्हतास. रोज रात्री 9 नंतर बाबा आपले नाहीत याची त्यांना जणू सवय लागली होतीच, पण तुझी भीतीही वाटत होती. बायकोवर हात उगारणे , भांडणे हे त्यांच्यासाठी नित्याचेच झाले होते. आपली मुलं कितवीत आहेत, त्यांना काय हवे-नको, याची तुला परवाच नव्हती. तू आणि तुझे मित्र.
दारू हि औषधी आहे, हृदयविकार दूर ठेवते वगैरे पेपर मधली माहिती तू दाखावायाचास, परंतु त्याच दारूमुळे आपल्यातलाच दुरावा वाढलेला तुला समाजालाच नाही किंवा समजून घ्यायची तुझी इच्छाच नव्हती. जर हि बाटली एवढा आनंद देणारी, औषधी असेल तर ती मी आणि मुलांनी घेतली तर तुला चालेल का?
अधेमध्ये तुला प्रेमाचे भरते यायचे व तू दारू सोडायचे ठरवायाचास, परंतु परत मित्रच आडवे यायचे. कुठच्या तरी आनंदात किंवा कोणाच्या तरी दु:खात तू परत त्यांच्या बरोबर बसायचास, कि मग पुन्हा सर्व सुरु. मित्राला परत परत दु:खात लोटणारे असले कसले रे हे मित्र? जीवनात आनंद मिळवण्याचे अनेक चांगले मार्ग आहेत. परंतु तुम्ही सर्वांनी मात्र वाईट मार्गच निवडला. दारू पिणं सोडून बघितल्यास यातले अर्ध्याहून अधिक मित्र गायब झाले असते.
तुझी आजारपणे चालू झाली आणि घराची आर्थिक विवंचना अजूनच वाढली.तुझ्या पोटात झालेले पाणी काढणे, लिवर ची सूज उतरवायला औषधे घेणे, हे सोपस्कार चालू झाले. माझ्या सुद्धा ओफिचे ला दांड्या चालू झाल्या. हौसमौज करणे दूरच, मुलांची फी सुद्धा वेळेवर भरली जात नव्हती.
तुझ्या शेवटच्या आजाराने तर डोक्यावर कर्ज करून ठेवले. तू बरा होणार नाहीस माहित असून सुद्धा तुझ्या औषधोपचाराचा खर्च थांबवला नाही आम्ही.
सरकार ला सुद्धा दारूबंदी नको आहे कारण त्यांचे फक्त मिळणाऱ्या महासुलाकडेच लक्ष आहे. पण माणसाची काम करण्याची ताकद कमी होणे, आजारपण वाढणे यामुळे होणारे नुकसान सरकारला दिसत नाही का? शिवाय नवरा/मुलगा/वडील गमावणे याची किंमत पैश्यात कशी मोजणार आहे हे सरकार?
आता तुझ्या आई वडिलांची सेवा,मुलांचे शिक्षण व संस्कार हे सर्व माझी एकटीची जबाबदारी झाली आहे.ती मी पार पाडीनच पण महत्वाचे म्हणजे माझ्या मुलांना या ‘एकच प्याला’ पासून दूर ठेवणे माझ्या दृष्टीने फार महत्वाचे आहे.
पुढच्या जन्मात मला तूच नवरा म्हणून हवा आहेस, परंतु तुझ्या हातात ग्लास नसेल तरच.
तुझीच बायको
प्रतिक्रिया
9 Feb 2016 - 5:23 pm | टवाळ कार्टा
हातात ग्लास असणे वैट्ट नै ओ....कुठे थांबायचे ते माहित नसणॅ वैट्ट
9 Feb 2016 - 5:48 pm | भीमराव
बेवडे लोक स्वतःला बाकीच्यांपेक्षा शहाणे समजतात, तर बिगरबेवडे बेवड्यांना अगदीच अस्पृष्य/नकोसा ठरऊन मोकळे होतात, बेवड्यांचे कुटुंबिय अपवाद
9 Feb 2016 - 5:56 pm | _मनश्री_
आता इथे दारु पिण्याचं समर्थन करणाऱ्या भरपूर पोस्ट्स येतील , शतकी धागा होणार नक्की
9 Feb 2016 - 6:05 pm | उगा काहितरीच
:-( :-( :-(
9 Feb 2016 - 6:07 pm | _मनश्री_
पत्र चांगल आहे , पण प्रत्येक गोष्टीला सरकारला कशाला जबाबदार धरायचं ?
आपण कुणाचा तरी नवरा / मुलगा / बाप आहोत ह्याचा विचार दारू पिणाऱ्या माणसाने स्वतः केला पाहिजे , सरकार काही जबरदस्तीने कुणाच्या नरड्यात ओतत नाही .
9 Feb 2016 - 6:26 pm | भीमराव
कित्येकदा दारु पिणारे लोकांचे कुटुंबिय च त्यांचे पिणे झाकुन ठेवतात, शौकाची सवय, सवयीचे व्यसन, व्यसनाची अपरीहार्यता बनेपरियंत झाकपाक करु पाहतात व नंतर सरकारच्या नावाने गळे काढतात, सबब कायदे करुन समाज बदलनार नाही.
9 Feb 2016 - 6:28 pm | कपिलमुनी
होउ द्या धूर
9 Feb 2016 - 6:39 pm | जेपी
सध्या दारुच्या किमंती
बाकी ,
सरांना हे पत्र कसे सुचले?.
9 Feb 2016 - 6:41 pm | जेपी
*सध्या दारुच्या किमतीं कमी झाल्या आहेत.
असे वाचावे
9 Feb 2016 - 6:57 pm | विवेक ठाकूर
नवर्याला पत्र लिहीण्यात वेळ घालवण्यापेक्षा नवा नवरा शोधणं श्रेयस.
9 Feb 2016 - 7:00 pm | जेपी
ठाकुर सायबांशी सहमत.
9 Feb 2016 - 7:16 pm | विवेक ठाकूर
कमी `कपॅसिटीवाला' बघितला की झालं ! पुढच्या जन्मीचं कुणी पाह्यलंय?
9 Feb 2016 - 7:53 pm | टवाळ कार्टा
सहमत
9 Feb 2016 - 9:11 pm | विवेक ठाकूर
बेवडूच्या आई - वडीलांनी स्वतःचं स्वतः पाहावं !
9 Feb 2016 - 7:01 pm | धर्मराजमुटके
नाही पत्र चांगलं आहे ! पण ते FB वर येणार्या पब्लीकचे मानसिक वय बघून लिहिले असावे बहुतेक. येथील मंडळी ऑलरेडी मोठी झालेली आहेत. (काही अपवाद सोडता).
बाकी पत्रातील कळकळ व दु:खाशी सहमत ! पण सरकार के भरोसे मत बैठो ! का पता सरकार भी आपके भरोसे बैठी हो !
10 Feb 2016 - 2:44 pm | पैसा
पत्र चांगलं लिहिलंय. कळकळ पोचली. पण त्याचं मिपावर हे असंच होणार होतं.