तहान

Anonymous's picture
Anonymous in जे न देखे रवी...
5 Feb 2016 - 7:41 pm


तहा
तहान
तहान तहान
कधी आईच्या प्रेमाची
कधी बापाच्या शाब्बाशीची
कधी आजी-आजोबांच्या लाडाची
कधी मित्र-मौत्रिणींच्या भेटीची
कधी प्रेयसीच्या झलकेची
कधी बायकोच्या मिठीची
कधी मुलांच्या ओढीची
कधी मिटते कधी वाढते
कधी लहान कधी महान
तहान तहान तहान
तहान म्हणजे तडफड
तहान म्हणजे वणवण
तहान म्हणजे कोरड
तहान अगदी कहर
तहान नाही संपत
तहान ठेवते जिवंत
तहान मिळवे पाणी
तहान चाळवे भूक
तहान करवे तमाशा
तहान एक आशा
तहान हीच भक्ती
तहान हाच परमेश्वर
तहान कधी पुण्य
तहान कधी पाप
तहान शिकवी
तहान घडवी
तहान तहान
तहान
तहा

#सशुश्रीके

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

5 Feb 2016 - 8:26 pm | एक एकटा एकटाच

कवितेतला हां वेगळा प्रकार आवडला

खेडूत's picture

6 Feb 2016 - 6:53 am | खेडूत


आव
आवड
आवडली कविता.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Feb 2016 - 7:23 am | अत्रुप्त आत्मा

+
+१
+११
+१११

असे
असेच
असेच म्ह
असेच म्हण
असेच म्हणतो!

पां
पांडू
पां डुब्बा
पां डुब्बा प्रतिसादाच्या अपेक्षेत :- आत्मू टवाळ! ;)

प्रचेतस's picture

6 Feb 2016 - 8:33 am | प्रचेतस

कुणाला कशाचं तर तुम्हाला पांडुब्बाचं (अजूनही).

अन्नू's picture

6 Feb 2016 - 7:32 pm | अन्नू

:=)) :=))

शिव कन्या's picture

6 Feb 2016 - 9:56 am | शिव कन्या

Typography चे उत्तम उदाहरण.सुंदर मांडणी.
तृष्णा कवितेचे मूळ.

शिव कन्या's picture

6 Feb 2016 - 9:56 am | शिव कन्या

Typography चे उत्तम उदाहरण.सुंदर मांडणी.
तृष्णा कवितेचे मूळ.

अहो द्यायलाच पाहिजे क्रेडिट. तुम्हीच पाहा ना. अर्धे ऑस्कर ट्रॉफी तर टायपोग्राफीत केली तुम्ही. उरलेली मिरर इमेज बसवली की भागली तुमची तहान.

धिस इयर्स ऑस्कर इन पोयेटीक टायपोग्राफी गोज टू .....................