तो........

एक एकटा एकटाच's picture
एक एकटा एकटाच in जे न देखे रवी...
22 Jan 2016 - 10:06 pm

उदासल्या अंबरी तो
कधीचा दाटलेला
आसवांत होई रिता
परी उरी साचलेला........

लाख अडवू पाही तो
या आठवांच्या लाटां
ज्या डिवचूनी जाती
त्या उध्वस्त तटाला........

उन्हे पेटवूनी गेली
त्याची गाफिल स्वप्ने
आता उरले ना काही
ह्या रात्रीस जाळण्याला.....

उतरती सांज बोले
सावर रे वेडया
ना तिचा दोष काही
होता तुच फसलेला.........

ती येईल माघारी
तुझ्यासाठी एकदातरी
का आस ही वैरी
झुलवी त्या जिवाला.....

बहरला गुलमोहर
जेव्हा तिच्या अंगणात
निरोपाच्या फुलांनी होता
मग तोही सजलेला.........

कविता

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

22 Jan 2016 - 10:44 pm | कविता१९७८

मस्त

सूड's picture

22 Jan 2016 - 10:51 pm | सूड

.

पैसा's picture

22 Jan 2016 - 10:52 pm | पैसा

कविता आवडली.

मित्रहो's picture

22 Jan 2016 - 11:09 pm | मित्रहो

कविता छान

चांदणे संदीप's picture

23 Jan 2016 - 3:34 am | चांदणे संदीप

आवडली कविता!

Sandy

पद्मावति's picture

23 Jan 2016 - 3:53 am | पद्मावति

बहरला गुलमोहर
जेव्हा तिच्या अंगणात
निरोपाच्या फुलांनी होता
मग तोही सजलेला.........

:(

रसिकामहाबळ's picture

23 Jan 2016 - 4:00 am | रसिकामहाबळ

मस्त रे अमोल

पालीचा खंडोबा १'s picture

23 Jan 2016 - 11:45 am | पालीचा खंडोबा १

प्रचंड उंची गाठणारी कविता शेवटचे कडवे खास समारोपाचे . अश्या कविता वाचून काही तरी सकस वाचल्याचे खासमखास वाचल्याचे समाधान मिळते. ते समाधान प्राप्त करून दिल्याबद्दल आभार.
असेच लिहित रहा आम्ही वाचत राहू

बहरला गुलमोहर
जेव्हा तिच्या अंगणात
निरोपाच्या फुलांनी होता
मग तोही सजलेला.........

एक एकटा एकटाच's picture

23 Jan 2016 - 9:47 pm | एक एकटा एकटाच

आपल्या प्रतिसादाने उत्साह वाढला.

नक्कीच प्रयत्न करीन...

यशोधरा's picture

23 Jan 2016 - 12:21 pm | यशोधरा

सुरेख.

एक एकटा एकटाच's picture

23 Jan 2016 - 9:43 pm | एक एकटा एकटाच

हुश्श.....

मला वाटलं की ही कविता देखिल "फ़ेंटसी" सारखी वांझोटी बोर्डावरुन खाली उतरते की काय...

पण वाचलो.......

:-)

किसन शिंदे's picture

23 Jan 2016 - 10:01 pm | किसन शिंदे

अतिशय सुरेख भो कविता.

शब्दबम्बाळ's picture

4 Feb 2016 - 1:53 am | शब्दबम्बाळ

अत्यंत प्रभावी!
कशी काय राहून गेली होती वाचायची काय माहित...
खूपच परिणामकारक शेवट केलाय!

लिहित राहा!!

विजय पुरोहित's picture

4 Feb 2016 - 11:08 am | विजय पुरोहित

मस्तच अमोल...

स्पा's picture

4 Feb 2016 - 11:13 am | स्पा

एक नंबर साहेब

एकप्रवासी's picture

9 Feb 2016 - 4:05 pm | एकप्रवासी

खरच फारच छान आहे.

एक एकटा एकटाच's picture

22 Mar 2016 - 9:42 pm | एक एकटा एकटाच

धन्यवाद

सगळ्यांचे आभार