काम दाखव फेकू...

तर्राट जोकर's picture
तर्राट जोकर in जे न देखे रवी...
3 Feb 2016 - 3:58 pm

काम दाखव फेकू तुला देशी (गाय) ची शपथ हाय! ।।धृ।।

राखी सावंतचा भाऊ अशी ओळख लोकांत
टेलीप्रिंटरवरचे भाषण हा चुकवतो जोशात
हात वर करुनी उभा हा जोरात
आता कीती बोलतो हीच भीती सारे घोरात ।।१।।

विदेश फिरुनी डोक्यात वारं ह्याच्या भरलं
चार दिवस परतुनी पुन्हा गडप्प झालं
कुठे होई फजीती ह्याची
पण कॅमेरामनचाच लळा ।।२।।

सेल्फी घेई कॅमेर्‍यातुन हा
होई स्वतःच हीरो
मनाच्याच करे बाता
कामं सगळे झीरो
पक्ष नाही दिसत कुठे
यालाच फुटला गळा ।।३।।

घोषणांच्या नोटा उधळी जणू नवरदेव
भक्तांना येतो माजून भलताच चेव
सरत-सरत येई पुण्याई लाटेची
भरत-भरत आली घटका ही परतीची
कसली ही वेळ देशावरती आणील
अच्छे दिनचे प्रॉमिस कधीच होणे नाही ।।४।।

प्रेरणास्रोतः

अनर्थशास्त्रकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीभूछत्रीविडंबन

प्रतिक्रिया

विवेक ठाकूर's picture

3 Feb 2016 - 4:57 pm | विवेक ठाकूर

सध्या रजेवर आहेत का?

डॉ. एस. पी. दोरुगडे's picture

3 Feb 2016 - 5:03 pm | डॉ. एस. पी. दोरुगडे
डॉ. एस. पी. दोरुगडे's picture

3 Feb 2016 - 5:04 pm | डॉ. एस. पी. दोरुगडे
आदिजोशी's picture

3 Feb 2016 - 5:07 pm | आदिजोशी

दुपारीच का आज?

नाखु's picture

3 Feb 2016 - 5:12 pm | नाखु

कालचा मापपरीणाम !

परिमाण चुकल्याने झालेला

प्रचेतस's picture

3 Feb 2016 - 5:16 pm | प्रचेतस

विडंबन आहे हो.

नाखु's picture

4 Feb 2016 - 9:09 am | नाखु

हे त्ता नव्याने कळले. आणि खालच्या प्रतिसादानुसार जर "कच्चा माल " वाल्यांनी पातळीसोड अभिप्राय दिले असतील तर मी तीव्र निशेध व्य्कत करतो. म्हणजे तजोंनी जे केले ते योग्यच केले.

हरकत नसेल तर तो व्यनी इथे चिटकवा म्हणजे उच्च(भ्रू) शिक्षीतांचे अंतरंग दिसतील जरा !!!!

(इतरांचेही) वाचाल तर वाचाल वाला मिपाकर नाखु

डॉ. एस. पी. दोरुगडे's picture

4 Feb 2016 - 1:06 pm | डॉ. एस. पी. दोरुगडे

पातळीसोड अभिप्राय (शिव्या वगैरे) दिलेला नाही! मात्र एकेरी उल्लेख केला हे मात्र मान्य करतो. रागाच्या भरात लिहिले. त्याबद्दल दिलगीर आहे.
आमच्या आडनावाचे अनेक अपभ्रंश बोलताना लिहिताना होताना पाहतो. समोरच्यास लगेच दुरुस्त करतो. मात्र तर्राट जोकर व होबासराव यांनी जी काही आमच्या आडनावाची धिंड काढली ती मला फार लागली.शिवाय ज्या गोष्टीशी आमचा दुरान्वयेही सम्बन्ध नाही अशा (अतिशय घानेरड्या) गोष्टीशी आमच्या आडनावाची लिंक लावली गेली. त्याचा फार राग आला. मात्र तो ओसरल्यावर मी लगेच दिलगीरी व्यक्त केली.
व्य. नी. केले कारण सर्वासमोर त्याना समज देण्यापेक्षा आधी खाजगीत सांगणे बरे असा विचार केला.
मी अजुन उच्चभ्रू झालेलो नाही आहे. अजूनही ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थीच आहे.
साहित्यिक नसलेने नियमित लेखन होत नाही. इथे नियमित (आणि परवडेबल) इंटरनेट नाही. मोबाइल वर कधीकधी नेटपैक मारून मिपा, तत्सम संस्थळे, ब्लॉग्स इ. चे वाचन करावे लागते.
(बऱ्यापैकी) नियमीत वाचक आहे. साहित्यचर्चा वगैरेची सवय नाही. तसे इथे आमच्या भागात वातावरण ही नाही. शिवाय इंट्रोवर्ट आहे. काही आवडले तर त्याचा स्वतःशीच आस्वाद घेणे ही प्रवृत्ती. प्रतिसाद द्यावा हे सुचत नाही.
इथून पुढे प्रयत्न करेन.

तर्राट जोकर's picture

3 Feb 2016 - 5:17 pm | तर्राट जोकर

औ ते सकाळी सकाळी डॉ. दारुगड्यांनी पाजली.. स्वारी... दोरुगडे हायेत बरंका डॉक्टरसाहेब. अशी पचपचित टाकली कोण उचलंना. म्हतलं याचं कॉकटेल केल्याशिवाय मजा नाही. फेकूचं नाव टाकताबरोबर अशी किक बसली की बघा तीन प्रतिसाद... जादू है फेकु मंजे. काय सांगू तुमको. अय म्म फाईन्स्स थ्यांक्यु...

बोका-ए-आझम's picture

3 Feb 2016 - 5:28 pm | बोका-ए-आझम

अायडी सार्थ आहे अगदी!

होबासराव's picture

3 Feb 2016 - 6:02 pm | होबासराव

अगदि अगदि
दारुगाळे आणि जोकर जो नेहेमिच तर्राट असतो. (ह्.घ्या.)

तर्राट जोकर's picture

3 Feb 2016 - 7:18 pm | तर्राट जोकर

माननीय राजमान्य राजश्री डॉ. एस. पी. दोरुगडे साहेब,

आपणांस विडंबन हा काव्यप्रकार व हलके-फुलके विनोद कळत नसतील तर माझा नाईलाज आहे. तुमचे व्यनि मिळाले. अति-सभ्य भाषेत आपण आपल्या आडनावाच्या विडंबनाबद्दल आनंद व्यक्त केला त्याबद्दल धन्यवाद!

मी कधीच असे करत नाही पण तुमच्या सहिष्णुतेच्या आविष्काराखातर नीट माहिती घेण्यासठी मी आपले सदस्यत्व काळ व काम बघितले. तीन महिन्यात स्वतःच्या सात कविता इथे टाकल्यात. इतर कुणाच्याही कुठल्याही लेखनावर आपल्या कोणत्याच प्रतिक्रिया नाहीत. ह्यावरुन आपणास मिसळपावचे वातावरण फारसे ठावूक नसावे व फक्त आपला साहित्यिक कंड शमवण्यासाठी इथे येता असे दिसते. आपण मिसळपावचा स्वतःच्या ब्लॉगप्रमाणे उपयोग करत आहात. मिसळपाववर कितीही मोठा आणि अतिव्यस्त साहित्यिक सदस्य असला तरी तो आपले साहित्य सोडुन दुसर्‍यांचेही वाचतो, प्रतिक्रिया देतो. आपण त्या सर्वांपेक्षा उच्चतम दर्जाचे असाल असे वाटते. आपणास माझे विडंबन न रुचण्याचे कारण आपला इथला दुष्काळी वावर असल्याचे समजते. अन्यथा आपण इतके आनंदित झाला नसतात.

इथे खरे नाव, खोटे नाव स्पष्ट नसते. त्यात तुमच्या खर्‍या नावाचा विपर्यास झाला असेल तर गैरसमज करुन घेऊ नये, तसा वैयक्तिक अपमानाचा हेतु नसतो. बाकी आपण सूज्ञ असाल अशी आशा आहे.

धन्यवाद!

होबासराव's picture

3 Feb 2016 - 7:30 pm | होबासराव

मला हि तसलेच व्यनि राजमान्य राजश्री डॉ. एस. पी. दोरुगडे साहेबांकडुन आलेत, ते हि एकेरि भाषेत.
माझ्या प्रतिसादात कोणाचि हि चेष्टा करायचा हेतु नव्हता, ना तुमचि ना दोरुगाडे ह्यांचि चेष्टा करत होतो.
that was spontaneous...तरिहि तुम्हि दोघ दुखावले गेले असल्यास. क्षमस्व.
@ संम माझा प्रतिसाद उडवावा हि विनंति.

http://www.misalpav.com/comment/799322#comment-799322

इरसाल's picture

3 Feb 2016 - 7:34 pm | इरसाल

उ का कहत है बाट्सअप मा जो टुकुर टुकुर देखेइ हसी जात बा उ इसमाइली मिसडपाब मा नाही है का ?

होबासराव's picture

3 Feb 2016 - 7:41 pm | होबासराव

अरि ससुरि इंहा इस्माइलि हि नहि बा :)