बायको म्हणजे बायको म्हणजे बायकोचं असतें

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जे न देखे रवी...
7 Jan 2016 - 12:12 pm

माननिय गुर्जी यास,
प्रेर्ना

बायको म्हणजे बायको म्हणजे बायकोचं असतें,
तुमचं किंवा आमची अगदी 'सेमचं' असतें !

काय म्हणता ?
'बायको' हे प्रकरण नक्की कांय असतें ?
अहो दशरथ असो वा राघोबा, असो परवाचा आमिर,
युगानुयुगे हे कोणालाही न कळले दिसतें,
पन तरिही तुमचं वा त्यांचे अगदी 'सेमचं' असतें !

रुसली तर रुसू दे, भडकली तर भडकू दे !
तरीसुद्धा तरीसुद्धा, तुम्हाला म्हणुन सान्गतो

बायको म्हणजे बायको म्हणजे बायकोचं असतें,
तुमचं किंवा आमची अगदी 'सेमचं' असतें !

एखाद्याची वेळ भरता, मनी लग्नाचे धुमारे उमलू लगतात
संसाराच्या हळदीची पुटं त्याच्या मेंदूवर साचू लागतात ।

आठवतं ना ?
तुमची लग्न घटिका जेव्हा, भरली होती,
"सावधान" म्हणून भटाने
खरंच लाश्ट वॉर्निंग दिली होती !

पण तरीही आंतरपाटामधून बेभान होऊन
तुम्ही काहीतरी शोधत होता,
चौड्यावर उभे राहील्याने
पडता पडता वाचला होता !

कोणालाच तेव्हा कळत नसतं,
आम्हालासुद्धा कळलं नव्हतं !

बेसावध क्षणी हळुवारपणे 'ती' आयुष्यात उतरू लागते,
'व्यापारी म्हणून आले अन राज्यकर्ते झाले'
पुस्तकाबाहेरचा धडा लाइफ शिकवू लागते,
पण, 'तोफ बरसली कि खंदकात लपून वाचण्याची' प्राक्टीस आपण करायची असते,
आणी ती करता करता कधीही तोंड उघडायचे नसते,
त्यावेळी तसंही आपल्या हाती आणखी काय उरलेलं असते ?
कारण
बायको म्हणजे बायको म्हणजे बायकोचं असतें,
तुमचं किंवा आमची अगदी 'सेमचं' असतें !

करुणधोरण

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

7 Jan 2016 - 12:22 pm | पद्मावति

:)

कंजूस's picture

7 Jan 2016 - 12:49 pm | कंजूस

भारी जमलंय.
तरुणपणी ( म्हणजे किती वर्ष नका विचारू ) बायकोचं ऐकाल तर म्हातारपणी ती तुमचं ऐकेल.

अबोली२१५'s picture

7 Jan 2016 - 1:14 pm | अबोली२१५

मिपा वर आजचा दिवस " बायको डे " म्हणून साजरा करू या….

वेल्लाभट's picture

7 Jan 2016 - 4:05 pm | वेल्लाभट

हहहहाहहा

अरे देवा, बायको पुराण!!

नवरारडे आपलं नवरा डे कधी?

पगला गजोधर's picture

7 Jan 2016 - 6:19 pm | पगला गजोधर

काही ठिकाणी नवरा डे ला,
'बैलपोळा' असेही म्हणतात.

पैसा's picture

7 Jan 2016 - 7:59 pm | पैसा

:)

स्रुजा's picture

7 Jan 2016 - 8:17 pm | स्रुजा

:)

अजया's picture

8 Jan 2016 - 8:05 am | अजया

खिक्क!

म्हणूनच सांगतो, लग्न करू नका. उगीच कटकट हो! ;-)

प्रसाद को's picture

2 Feb 2016 - 2:39 pm | प्रसाद को

कविता खुप आवडली.
प्र को.

मारवा's picture

2 Feb 2016 - 6:28 pm | मारवा

अगदी तुमच्या नावासारखी
मस्तय

अत्रुप्त आत्मा's picture

2 Feb 2016 - 7:42 pm | अत्रुप्त आत्मा

@

आठवतं ना ?
तुमची लग्न घटिका जेव्हा, भरली होती,
"सावधान" म्हणून भटाने
खरंच लाश्ट वॉर्निंग दिली होती !

>>> छान ! फाडा आता आमच्या नावावर तिकिट! :-/ दुत्त दुत्त! :-/

तुमच्या घटी़का भरल्यावर तुम्हाला नाही मिळाली लाश्ट वॉर्निंग गुरुजी?
कुनी दिली?