महिलांना शनी शिंगणापुर चौथर्यावर प्रवेश द्यावा का नाही हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. मिपावर या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची बाब आहे. ( पुर्वीचं मिपा राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट !
यासंदर्भात "भुमाता ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी नेटवर जास्त माहिती मिळाली नाही. कुणाला माहीत असेल तर क्रुपया टंकण्याचे कष्ट घ्यावे.
शनीच्या चौथर्यावर जाण्याची गरज आत्ताच का भासली ?
राज्य सरकारने यावर काय भुमीका घ्यावी ?
आपल्याला याबद्दल काय वाटते ?
मला असे वाटते की - मी जर आस्तीक असलो तर साहजीकच शेकडो वर्षांपासुन चालत असलेली परंपरा जी पाळण्याने कुणाचेही नुकसान नाही ती मोडन्याचे काही कारण नाही. मी जर नास्तीक असलो तर शनीच्याच काय तर कुठल्याच मंदिरात जाण्याचे कारणंच काय ?
सुज्ञ मिपाकरांच्या प्रतिक्षेत....
प्रतिक्रिया
30 Jan 2016 - 5:44 pm | संदीप डांगे
सप्रेसाहेब,
परत मुद्दा असाच आहे की ही बंदी आहे की रुढी? फरक आहे ना? म्हणून म्हणतो त्या रुढीच्या मुळाशी जावे लागेल. सवयीने काही मान्यता निर्माण होतात. कर्मधर्मसंयोगाने काही घटना घडून मान्यता निर्माण होतात, कुठेतरी एक पॅटर्न बघून मान्यता तयार होतात. मान्यतांच्या परंपरा होतात, परंपरांचे नियम होतात, नियम देवाचे म्हणून घट्ट पाळल्या जातात. आस्तिक विचारांमधे हे सर्व स्वाभाविक आहे. "स्त्रियांनी येऊ नये" हे तीन शब्द कोण कसे घेतं त्यावर इंटरप्रिटेशन अवलंबुन आहे. नास्तिक-स्त्रीवादी ह्याकडे 'बंदी' म्हणून बघतील, आस्तिक 'देवाशी संबंधित नियम' (ज्याविरूद्ध सामान्य आस्तिक प्रश्न करत नसतात) म्हणून बघतील.
ज्या लोकांना ही बंदी/भेदभाव वाटते ते त्यांच मत आहे, त्यावर स्पष्टीकरण मागितले जाणे निरर्थक असेल तर स्त्रियांनी तिथे का जाऊ नये याची पटतील्/बुद्धीस मान्य होतील अशी कारणे मागणे हे ही निरर्थक आहे.
माझा एकूण मुद्दाच हा आहे की ही बंदी/भेदभाव नसून रुढी-परंपरा आहे. ह्या परंपरेने कुणाचेच काही नुकसान होत नाहीये. ह्या रुढीमुळे स्त्रियांचा अपमान, पुरुषांचा सन्मान असे काही होत नाही. स्त्रीला अलाऊड नाही म्हणून स्त्रीत काही कमतरता आहे असे आस्तिक पुरुषही मानत नाहीत. ही एक न्युट्रल रुढी आहे. ह्या मध्ये स्त्री-पुरुष भेदभाव शोधून काढणे हा फारच ताणलेला तर्क आहे.
वैयक्तिक एक प्रश्न विचारतो, तुम्ही तुमच्या आईवडीलांच्या पाया पडत असाल, तेव्हा 'भेदभाव, उच-नीच' चा प्रश्न कधी उद्भवला काय? नसाल पडत तर प्रश्नच नाही. पण पडत असाल तर ह्यामागे काय शास्त्रीय व पटण्यासारखे बुद्धीवादी कारण आपणांस सापडले?
30 Jan 2016 - 8:01 pm | बाळ सप्रे
ज्यांना जाउ नये हे पटतं व जात नाहीत त्याविषयी काहीच म्हणणं नाही. खुशाल रूढी म्हणून पाळा..
पण ज्यांना पटत नाही म्हणून जातात त्यांना सुरक्षारक्षक ठेवून येण्यास मनाइ केली जाते ती बंदीच.. आणि जे अडवतात त्यांना कारण माहीत असणे आवश्यकच आहे. ते निरर्थक म्हणून पळ काढू शकत नाही. अशा रूढी ज्यांना पटत नाहीत त्यांच्यावर लादणे हे गैरच !!
आइवडीलांच्या पाय वगैरे प्रश्न पूर्ण्पणे गैरलागू आहे.
30 Jan 2016 - 8:32 pm | संदीप डांगे
पण ज्यांना पटत नाही म्हणून जातात!
हे सेल्फ कॉन्ट्रॅडिक्टरी आहे. पटत नाही तर जाताच कशाला हा प्रश्न येतो. त्या देवाचे काही नियम आहेत जे परंपरेने तयार झालेत, तुम्ही देवाला मानता पण त्याच्या नियमांना नाही हे सेल्फ कॉन्ट्रॅडिक्टरी आहे.
त्यांना सुरक्षारक्षक ठेवून येण्यास मनाइ केली जाते ती बंदीच/अशा रूढी ज्यांना पटत नाहीत त्यांच्यावर लादणे हे गैरच !
परंपरा पाळण्यास जे विरोध करतात, थोडक्यात ज्यांना ही व्यवस्था मान्य नाही त्यांना अडवण्यात काहीच चूक नाही.
जे अडवतात त्यांना कारण माहीत असणे आवश्यकच आहे
जे अडवतात त्यांना नेहमीच कारण माहित असते असे नव्हे. बरेचदा "वरून आदेश आहे" असे कुठल्या सुरक्षारक्षकाकडून, पोलिसांकडून, आर्मीच्या जवानांकडून सांगून अडवले जाते. जे अडवतात त्यांना खरंच कारण माहित असतं असं नाही. मंदिर विश्वस्त हे त्याच परंपरेचे निष्ठावान सुरक्षारक्षक आहेत असे मानले तर त्यांनाही परंपरागत पद्धतीने आलेले कारण माहित असेलच असे नाही. अनेकदा कारण माहित असणारा हाताखालच्यांना फक्त नियम पाळायला लावतो. निष्ठावान काहीही न विचारता नियम पाळतात. नियम पाळणारांना विलन ठरवणे योग्य नाही. विशेषतः जेव्हा त्यात त्यांचा फायदा-नुकसान काहीच नसतं. समजा स्त्रियांना प्रवेश असता तर विश्वस्तांपैकी, व्यवस्थापकांपैकी कुणाचे नुकसान होतंय काय, त्यांच्या हेतुंना बाधा येते आहे काय हे बघणे आवश्यक आहे. तसे होत असेल तर ही बंदी बंदीच असून भेदभाव आहे असे म्हणू शकतो.
आईवडिलांना नमस्कार हे उदाहरण गैरलागू अजिबात नाही. 'रूढी-परंपरेतून येणारी शिकवण कशी पाळली जाते व त्याविरूद्ध कोणी कसा प्रश्न विचारत नाही' या मुद्द्याचे स्पष्टीकरणासाठी तो प्रश्न आवश्यक होता.
(वैयक्तिकरित्या माझी शनी-शिंगणापुरवर काहीही श्रद्धा नाही. तो निव्वळ भंकसपणा आहे असे वैयक्तिक मत आहे. तिथे एकदा जाऊन आलो आहे, परत कधीच -अगदी मला विश्वस्त नेमले तरी- जाणार नाही.)
1 Feb 2016 - 10:49 am | बाळ सप्रे
काँट्रॅडिक्शन अजिबात नाही..
पटत नाही म्हणजे.. एखाद्याला विनाकारण अडवणे पटत नाही ते..
वरून आदेश देणार्यांना माहीत असणे आवश्यक आहे ..
आईवडीलांना नमस्कार रुढीने चालत आलाय म्हणून नसून त्यांच्या विषयी आदरातून असावा.. त्यामुळे येथे तो प्रश्न गैरलागूच..
1 Feb 2016 - 11:11 am | संदीप डांगे
आईवडीलांना नमस्कार रुढीने चालत आलाय म्हणून नसून त्यांच्या विषयी आदरातून असावा
आईवडीलांचा आदर करावा ह्यामागे काही वैज्ञानिक वा शास्त्रिय कारण नाही. ती समाजमान्यता आहे. हे एवढंच सांगायचं होतं, आता परंपरा अशाच तयार होतात हे लक्षात आलं असेल. पुर्वी पतीला परमेश्वर मानायची प्रथा घट्ट होती, आजकाल विरळ झाली. आईवडीलांचा आदर करण्याचीही भावना कदाचित विरळ होईल भविष्यात. वैज्ञानिक कारणे व रुढी परंपरा ह्यात मूलभूत फरक आहे. वैज्ञानिक कारणे स्थल-काल-परिस्थितीनुसार बदलत नाहीत. समाजमान्यता-परंपरांना कारण असतंच असं नाही व त्या सतत बदलत असतात.
1 Feb 2016 - 11:17 am | बाळ सप्रे
एखादी परंपरा का तयार झाली हे कोणालाच जेव्हा माहीत नसतं तेव्हा तरी ती सोडावी.. at least दुसर्यावर लादू नये
1 Feb 2016 - 11:53 am | संदीप डांगे
ते तर होइलच. पण तुम्ही त्याचा मूळ प्रश्न सोडून इतर बिनमहत्त्वाच्या व गैरलागू मुद्द्यांवर भर देताय. तसंच ही परंपरा चालू ठेवून कोणाचा फायदा, नुकसान होत असेल तर तेही पुढे यावे पण ते आलेले दिसत नाही. फक्त एकविसाव्या शतकात समानता, सन्मान, समन्याय ही तत्वे पाळण्याची 'शनीचा चौथराच' जणू एकमेव दुर्लक्षित वस्तु राहिली असा आविर्भाव नसावा.
भूमाता ब्रिगेड वा तत्सम स्त्री-सन्मान-आंदोलन वाल्यांना स्त्रीयांसाठी खरंच जास्त सकारात्मक व खर्या उपयोगाची कामे करायची असलीत तर हजारो पडलेली आहेत. सार्वजनिक ठिकाणी प्रसाधनगृहांपासून ते सत्तेतल्या खर्या सहभागापर्यंत अनेक आहेत. अनेक स्त्रिया सरपंच म्हणून राखीव जागांतून निवडून येतात पण त्यांचे पतीच त्यांच्या खुर्चीवर बसून कारभार करतात. हा उद्वेगजनक प्रकार अनेक वर्षे होतोय. त्याकडे लक्ष देणे स्त्रीयांच्या समान-हक्कांच्या जागृतीविषयी परमआवश्यक आहे. देवाधर्माच्या गुलामीच्या जोखडातून स्त्रीयांना सोडवणे ह्याला प्राधान्य हवे.
हा 'शनि चौथरा आंदोलन प्रकार' मुळातूनच तकलादू आणि अतिशय दुर्लक्ष करण्याचा प्रकार आहे, इथे स्त्रीयांच्या सन्मानासाठी लढा दिला जात नसून हिंदू धर्मात कसे भेदभाव आहेत, स्त्रियांना आजही कसे अपमानित केले जाते वैगरे विषय तापवण्याचा प्रकार आहे. हे शुद्ध राजकारण आहे, ह्यात स्त्रीयांचे कोणतेही भले होणार नाही. भले ह्या आंदोलनात पुढे असणार्या नेत्यांचेच होईल.
ह्या आधीच्या धाग्यावरही मी ते मत मांडलेलेच की एखाद्या ठिकाणची व्यवस्था तुम्हाला तुमच्या मर्जीविरुद्ध वागण्यास भाग पाडत असेल तर तो भेदभाव वा बळजबरी असेलच असे नसते. तुम्हाला ती मान्य नसेल तर तिथे न जाण्याचा पर्याय खुला आहे. शनी चौथरा जीवनावश्यक वस्तु वा मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीचे स्थळ नाही जिथे घटनेने दिलेल्या नागरी अधिकारांचा संकोच होतोय. त्या देवस्थानाचा तो नियम आहे. तो तुम्हाला मान्य नसेल तर शनीची दुसरी देवस्थाने आहेत. मुळात हा सर्व प्रकारच सभ्य भाषेत 'बुलशिट' असल्याने ह्यावर काथ्याकूट करून अजून जास्त शक्ती वाया घालवणे मला योग्य वाटत नाही. ह्या धाग्यावर तुम्ही भेदभावाचा उल्लेख केला म्हणून प्रतिवाद करावासा वाटला.
चर्चा करून छान वाटले, धन्यवाद!
1 Feb 2016 - 12:17 pm | बाळ सप्रे
तुमच्या दृष्टीने हा मुद्दा बिनमहत्वाचा असेल.. मला परंपरांच्या नावाने एखाद्यावर बंदी हा बिनमहत्वाचा नक्कीच वाटत नाही. अशाने काळ सोकावतो.. आंदोलनाला तर पाठींबा नक्कीच आहे..
खाजगी असलं तरी ट्र्स्ट आहे.. अशा ठीकाणी असे पायंडे समाजाच्या दृष्टीने अयोग्यच..
1 Feb 2016 - 1:26 pm | उगा काहितरीच
अजून एक ढकलपत्र...
(वरील टीप लागू)
मी काल पुन्हा एकदा शनीमहात्म्य वाचल,त्यात तो सगळ्या पुरुषांना पिडतो.तो कधीही स्त्रीच्या वाटेला गेलेला मला आढळला नाही.स्त्रीला देवाने एवढी विविध शक्ती मुबलक दिली आहे कि त्या मुळे शनीमहाराज देखील स्त्रियांच्या बाबतीत बोटचेपे धोरण स्वीकारताना दिसतात.स्त्रीयानो कशी कुठली गोष्ट आहे कि जी पुरुष करू शकतात पण स्त्री करू शकत नाही.शक्ती साथीला नसेल तर शिव प्रभावहीन आहे.स्त्रीयानो एक मान्य कि तुमच्यावर शतकानुशतके अन्याय झाला आहे पण पुरुष वर्गाशी समान वागणुकीची मागणी करताना तुमच्या शक्तीच तुम्हाला विस्मरण झाले आहे का ?शनीचा चौथरा वगैरे दुय्यम गोष्टी आहेत.अरे ताकद वापरायची ती संसदेत ५० % आरक्षणासाठी वापरा.प्रत्येकीने स्वरक्षणासाठी ज्युडो कराटे शिका आणि हे शिक्षण स्त्रियांना फुकट मिळायला हव या साठी विधानभवन ,लोकसभा यांना घेराव घाला.स्वरक्षणा साठी शस्त्र वापरायची परवानगी मागा,त्या साठी योग्य प्रशिक्षण घ्या पण हे करताना तुमच स्त्रीत्व घालवून बसू नका.काही गोष्टी पुरुष करीत आहेत त्या आळशी मंडळीना तेवढ तरी करायला लावा.
स्त्री हि विधात्याची सर्वात सुंदर निर्मिती आहे.सगळे नवरस तिच्या जवळ ठासून भरलेले आहेत.पराक्रमात पुरुषांची बरोबरी नक्की करा पण मला विचारलं तर स्त्री हि जास्त पराक्रमी आहे.दुखाःच्या भावनेचा एकदा रडून निचरा झाला कि पदर खोवून तीच खंबीर उभी रहाते.
तेवढ स्त्री असणे हि भावना मात्र नक्की जपा.मोहकता,विभ्रम,लाज या देणग्या आहेत त्या पुरुषी बनून घालवू नका.सर्वच स्त्रिया पुरुषी झाल्या तर जगण निरस होईल.
स्त्री हि धारेसारखी हवी.कधी शस्त्राची धार तर कधी शीतल जलधार.
.
.
रच्याकने या सर्व चर्चेत त्या भूमाता ब्रिगेड विषयी माहिती मिळालीच नाही.
1 Feb 2016 - 2:10 pm | बाळ सप्रे
हे पत्र या प्रतिसादाला उत्तर म्हणून का चिकटवलय इथ??
1 Feb 2016 - 2:21 pm | उगा काहितरीच
होय ! बरचसं पटन्याजोगच आहे. शनी चौथर्यावर जाण्यापेक्षा आंदोलन करण्याजोग्या बऱ्याच गोष्टी आहेत. बरं अजून एक - बऱ्याच महिलांनी प्रतिसाद दिलाय इथे. पण त्यांना काही विशेष discrimination वाटत नाहीये तिथे जाऊ न देण्यात !
1 Feb 2016 - 2:12 pm | अजया
तुमचे प्रतिसाद वाचून ती केव्हाच भूमीगत झाली.
30 Jan 2016 - 12:59 pm | विजय पुरोहित
कुठलाही प्रकारे जर एखादी रुढी प्रचलित होत असेल तर त्यामागे कुणाचा तरी अवमान करणे, किंवा गैरफायदा घेणे हीच कारणे असतात असे नसते. तुमचे प्रतिसाद ह्या परंपरेत "स्त्रियांचा अपमान करणे, त्यांना कमी लेखणे, त्यांचे खच्चीकरण करणे ह्या हेतुने प्रवेशास बंदी लादणे" हे उद्देश आहेत, ह्या अर्थाचे वाटतात. प्रथमतः जर आपण हे उद्देश सिद्ध करू शकलात तर पुढे चर्चा करु शकतो. कारण ह्या परंपरेवर आपण भेदभावाचा आरोप केला आहे जो सिद्ध करणे आधी आवश्यक आहे. +१११११ डांगेअण्णा...
सप्रेसाहेंबांचा सगळा रोख स्त्रियांवरील अन्याय, दुजाभाव वगैरे वगैरे झाल्याने मग मीही प्रतिसाद देणं बंद केलं.
30 Jan 2016 - 1:06 pm | बाळ सप्रे
माझ्यामते धाग्याचा तोच मूळ विषय आहे.
30 Jan 2016 - 8:04 pm | गामा पैलवान
बाळ सप्रे,
माझ्या मते धाग्यातील मजकुरातून स्त्रियांवर अन्याय झाल्याचं कुठेही सूचित होत नाहीये. आणि जरी तसं सूचित होत असलं तरी, शनीच्या चौथऱ्यावर काही नास्तिक बायका गेल्याने हा अन्याय दूर होणं संभव नाही.
आ.न.,
-गा.पै.
1 Feb 2016 - 10:51 am | बाळ सप्रे
एखाद्याला एका ठीकाणी जाण्यापासून बलपूर्वक रोखणे तेदेखिल सुयोग्य कारणाविना हे तुम्हाला अन्याय्य वाटत नसले तरी ज्याला अडवले त्याच्या दृष्टीने अन्यायकारकच आहे.
31 Jan 2016 - 6:33 pm | प्रदीप साळुंखे
रूढी,परंपरांमागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे हे पटवून सांगण्याचं फॅडच आलय जणू आता!!!
29 Jan 2016 - 4:25 pm | नीलमोहर
नुकतंच हे वाचण्यात आलं, स्त्रियांनी शनि शिंगणापूर चौथर्यावर का जाऊ नये यासाठी इथे जरा पटण्यासारखी कारणे दिलेली आहेत. बाकी आम्ही अज्ञानी आहोत, सूज्ञ जनांनी अजून माहिती द्यावी.
"The Shani idols are swayambhu idols, meaning that they regenerate on their own from the Earth. There is no particular origin site for the idols of Shani deva. Shani Deva keeps the evil away from a person’s life as long as he continues to keep Shani Dev happy with offerings. Mustard oil is the most loved offering that Shani Dev accepts. The oil can be put only by men as the effect of Shani Dev’s wrath is considered to be less on women. The wrath of Shani Devta destroys the life, health, wealth and reputation of a man. Women are largely unaffected from the effects of Shani Dev.
There is no particular biasing against women that prevents them from offering oil to Shani Deva. As per legends, Shani Dev’s horizon is wide and can inflict severe damage to the person’s life in numerous ways. When a person enters the zone of Shani Deva to pour oil, he is likely to get inflicted with good as well as bad effects. It is like a neutralizing effect. Shani Deva is the God of ‘imbalance’. His work is to keep the person’s life in a constant dynamic mode. In a bid to relate to women, it is believed that since women are not affected by Shani Dev’s effect, they need not get close to the Shani idols to pour oil. It may expose them to the bad effects of Shani Devtas. Mere vision of Shani devtas is enough to turn the course of life.
Shani Dev is the son of Lord Surya, the eternal source of Energy. Shani Dev is born from Chaya, the Shadow. He has extreme features, almost opposite to that of the Sun God. Women worship Sun God for potency, fertility and longevity of life for the husband. Shani Dev neutralizes the blessing from the Sun God. By going close to Shani Dev’s idols, women may inflect themselves with irreversible effects.
As per scriptures, the chastity of women is very delicate. It can be maligned even by the moonlight. Women prefer to stay away from Shani Dev’s idol as a mark of respect, just like the Indian women have for their elders. It is said that touching Shani Dev’s idol during pregnancy is bad for the foetus. Nobody visits the Shani temple during the prosperous times. He is appeased only when the Navgraha moves treacherously into the horoscope and transforms prosperity into destruction of wealth and health leading to poverty and loss of reputation. If women are not affected, their husbands and sons are likely to be affected. Shani Dev is seen as one of the most chivalrous Gods who worships every woman as his Mother. Hence, it is preached that only males should pour oil in Shani temples."
29 Jan 2016 - 4:33 pm | माहितगार
=)) नीलमोहर कॉपीपेस्टवण्यासाठी या पेक्षा चांगला विनोद मिळाला नाही का ? असो. बाकी चालू द्यात.
29 Jan 2016 - 4:45 pm | नीलमोहर
- हे त्यासाठीच लिहीलं होतं.
मला जी महिती मिळाली ती इथे ट्रांन्सफर केली इतकंच. त्या पूर्ण लेखनाशी मी सहमत नाहीच आहे, त्यातल्या
काही गोष्टी पटण्यासारख्या आहेत, बर्याच नाहीत.
प्रत्येकाची विचारसरणी, श्रध्दा, beliefs वेगळे असतात शेवटी.
29 Jan 2016 - 5:03 pm | अजया
मुनलाइटने चॅस्टिटी कशी काय जाते ब्वा ?
हे ज्यात लिहिले आहे त्याचा कुठलाही भाग विश्वास ठेवण्यालायक का समजावा ? कोणाचे कोणतेही belief असले तरी ?
29 Jan 2016 - 5:16 pm | पिलीयन रायडर
मला शनी काय कोण कशाला.. ह्यातच रस नाही..
पण तरीही एक मुद्दा मांदायची खाज म्हणुन...
एखाद्याने एखाद्या ठिकाणी जायचं का नाही हे दुसर्याने काय वाट्टेल ते तर्कट लावुन का ठरवावे? कुणाला खरंच माहितीये की शनी जवळ गेल्याने नक्की काय होतं? कोण ठामपणे सांगु शकतं?
हे उद्या वरती दिलय तर मुनलाईट टाईप काय वाट्टेल ते बरळलं तर तो प्रवेश नाकारायला पुरेसा पुरावा कसा होतो?
मंदिर किंवा देव ही कुणाची खाजगी मालमत्ता नाही. तर जसा धर्मावर / जातीवर आधारित प्रवेश नाकारणे चुक.. तसेच लिंगावर आधारित प्रवेश नाकारणे सुद्धा चुकच नाही का?
29 Jan 2016 - 5:28 pm | नीलमोहर
याविषयी मलाही शंका आहेत, पण निश्चित माहिती नाही.
1. Several exogenous influences on the human female's menstrual cycle length have recently been demonstrated. Previously, sexual behavior and pheromonal influences have been described. This report evaluates lunar cyclicity patterns.
A relationship is demonstrated between the onset of menstruation, among women who have 29.5 + 1 day menstrual cycles, and the onset of full moon. Four separate prospectively gathered sets of data are presented from different years and seasons. It is demonstrated that these women tend to menstruate in the full of the moon with a diminishing likelihood of menses onset as distance from full moon increases..
there appear to be several exogenous influences which promote lunar type cycle lengths in women.
"http://www.athenainstitute.com/lunarmpl.html"
2. strange-ways-the-moon-might-affect-our-bodies
It may regulate your menstrual cycle:
The menstrual cycle in reproductive-age women lasts about 28 days, which is similar to the length of a lunar phase (29 days and change). But they may be more closely tied: A 2011 study in the journal Acta Obstetricia et Gynecologica Scandinavica tracked the menstrual cycles of 826 women aged 16 to 25 years. Nearly 30% of the women had their period around the full moon. The next biggest grouping of women menstruating during a certain phase of the moon was just 12.5% of the participants.,
3. All objects including stars, planets and satellite bodies along with their gross (tangible) attributes emanate subtle (intangible) frequencies. These physical attributes and subtle-frequencies affect us in varying degrees at a physical and subtle-level.
" http://www.spiritualresearchfoundation.org/spiritual-problems/effects-of..."
29 Jan 2016 - 4:12 pm | माहितगार
उगाजी आत्ता बित्ताची मूळीच घाई नसावी, :) जेवढा अधिक वेळ घेतला जाईल समतेचा लढा तेवढा अधिक काळ चालून अधिक चांगला रुजेल.
29 Jan 2016 - 3:53 pm | माहितगार
आस्तीकांचा विश्वास ईश्वरावर असतो. आस्तीकाने कुणास मानणे अभिप्रेत असते ? ईश्वरावर मालकी कुणा विशीष्ट गट/वंश/लिंग/व्यक्ती यांची असणे अभिप्रेत आहे का? आस्तीकासाठी ईश्वर मोठा की शब्द-पुस्तक-व्यक्ती-परंपरा यांचा दंभ मोठा ? कोणत्याही शब्द-पुस्तक-व्यक्ती-परंपरा म्हणाले म्हणून ईश्वराच्या समोर विषमतेचे समर्थन होते का?
Appeal to tradition हि तार्कीक उणीवेतून आलेली असू शकते.
An appeal to tradition essentially makes two assumptions that are not necessarily true:
* The old way of thinking was proven correct when introduced, i.e. since the old way of thinking was prevalent, it was necessarily correct.
** In reality, this may be false—the tradition might be entirely based on incorrect grounds.
* The past justifications for the tradition are still valid at present.
** In reality, the circumstances may have changed; this assumption may also therefore be untrue.
शंकराचार्यांचे नाव वापरून आपण नेम ड्रॉपींग केले आहे. शंकराचार्यांबद्दल आदर व्यक्त करून भारतीय धर्म आणि संस्कृती शंकराचार्यांपासून चालू झालेल्या नाहीत; शेवटचा शब्द म्हणून स्विकारावा असे त्यांच्या म्हणण्यावर भारतीय धर्म आणि संस्कृतीचे अवलंबीत्व आहे का ? हा वेगळ्या धागाचर्चेचा विषय असावा म्हत्वाचे म्हणजे Argument from authority हि एक तार्कीक उणीव असू शकते ज्यात जी व्यक्ती ऑथॉरिटीच नाही त्या व्यक्तींना ऑथॉरिटी म्हणून समोर उभे केले जाते अथवा अप्रस्तूत विषयात त्यांचा संदर्भ देऊन तर्क बरोबर असल्याचे भासवले जाते. एखादी (तथाकथीत) व्यक्ती म्हणते म्हणून एखादा तर्क सुसंगत असल्याची गॅरंटी उपलब्ध होते का ?
The argument from authority can take several forms. A legitimate argument from authority can take the general form:
X holds that A is true.
X is an authority on the subject.
The consensus of authorities agrees with X.
There is a presumption that A is true.[12]
The argument is fallacious if one or more of the premises are false, or if it is claimed that the conclusion must be true on the basis of authority, rather than only probably true.[12]
Other logicians have claimed that the argument from authority is a statistical syllogism:
Most of what authority a has to say on subject matter S is correct.
a says p about S.
p is correct
संदर्भ
29 Jan 2016 - 4:22 pm | उगा काहितरीच
शंकराचार्य हा एक मुद्दा झाला. मला फक्त येवढंच म्हणायचं होतं की आस्तीक म्हणजे सहसा परंपरा पाळणारे वगैरे. आत्तापर्यंत नाही गेलोना मग काही झालं का ? नाहीना मग ठीक आहे असं माननारी जमात . त्यात वर शंकराचार्यही म्हणतात म्हटल्यावर जाऊच नये. असं माननारी पापभिरू माणसे. असा अर्थ अभिप्रेत होता मला. (रच्याकने हिंदू धर्मात शंकराचार्चांचा शब्द शेवटचा का नाही ? यावर इथे चर्चा करण्यास उत्सुक नाही. तुमची इच्छा असेल तर काढा दुसरा धागा. )
29 Jan 2016 - 1:36 pm | माहितगार
'मंदिर प्रवेश नाकारणारी अस्पृश्यतेची परंपरा' हे अद्याहृत शब्द वरील वाक्यात मी जोडले आहेत. ईश्वरी नावाच्या साक्षीने पाळली जाणारी विषमता या पलिकडे याचे काही वर्णन केले जाऊ शकेल का माहित नाही. सतिश गावडे यांनी प्र.के. अत्रेंची आठवण दिली, साने गुरुजींनी केलेल्या मंदिर प्रवेश आंदोलनाच्या वेळी प्र.के. अत्र्यांनी पंढरपूरच्या प्रत्येक कोपर्या कोपर्यात सभा घेऊन मंदिर प्रवेश खुले करण्यासाठी भाषणे दिली होती. या बातमीत महिला आंदोलकांनी काही पर्टीनंट प्रश्न उपस्थीत केलेले दिसतात त्यांचाही विचार होणे जरूरी असावे असे वाटते असो.
28 Jan 2016 - 11:13 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
परवाचं व्हॉट्सअॅपवर कोणीतरी मिपाकरानेचं मांडलेला हा विचार.
शनि चौथर्यावर महिलांना प्रवेश देउन शनि कोपला नाही तरं देवस्थानाचा महिमा कमी होणार. आणि कोपला तर अजुन दुसरं नुकसान एवढं साधं गणित आहे ते.
28 Jan 2016 - 11:16 pm | काकासाहेब केंजळे
चायला ,त्या रशियन लोकांनी चाळीस वर्षापुर्वी झोंड १ व २ ही यानं शनिभवती सोडली होती, आणि भारतात २०१६ साली शनी चौथर्यावर बायांनी जावे का नाही याचा खल चालू आहे.........आणि हे २०२० साली जागतीक महासत्ता होणार आहेत
28 Jan 2016 - 11:18 pm | विजय पुरोहित
झोंड????
Are you sure about the name? Nanasaheb Nefale?
28 Jan 2016 - 11:19 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
कधी नाही ते नानासाहेबांशी सहमत. _/\_
28 Jan 2016 - 11:31 pm | तर्राट जोकर
मंगळाभोवती यानं आपण पण सोडली की, तरी पत्रिकेतला मंगळ बघणं सोडलं नाही.
रशियातपण अंधश्रद्धा असतीलकी, तिथल्याही कोण्या चौथर्यासाठी आंदोलनं चालू असतील. इथं बसून तुम्हाला काय दिसतंय? उगा शहाजोगपणा दाखवायचा आणि भारतीयांची खिल्ली उडवायची. बास झालं आता.
28 Jan 2016 - 11:32 pm | विजय पुरोहित
दणकून अनुमोदन टीजे...
28 Jan 2016 - 11:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
१००
उगाचं काहितरी ह्यांना सेंच्युरीबद्दल शनिदेवाच्या २१ आरत्या असणारं पॉकेट बुक देउन सत्कार करणेत येत आहे.
(अखिल मिपा उपेक्षितधागाशतकसुपारीसंघ फरारजेपी संचालित सत्कारसमिती)
28 Jan 2016 - 11:48 pm | टवाळ कार्टा
आणि तेलाची बाटली =))
तेलाचा उपयोग कधी/कसा/कुठे करावा हे त्यांचे त्यांनी ठरवावे =))
29 Jan 2016 - 1:41 am | कपिलमुनी
लौकरच आयडी ला पंख लागायची चिन्हे
29 Jan 2016 - 6:46 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
आपल्या हाताने अंगावर तेल ओतुन काडी टाकणे अशी नवी म्हण कशी वाटते.
29 Jan 2016 - 11:49 am | माहितगार
..??
29 Jan 2016 - 5:33 pm | माहितगार
आदर्श नसलेली !
28 Jan 2016 - 11:31 pm | राँर्बट
साक्षात शनिदेवाच्या मागे साडेसाती लावणार्या भरतखंडातील आधुनिक आणि संस्कृती जपणार्या बायकांना लै लै परनाम!
28 Jan 2016 - 11:37 pm | उगा काहितरीच
मागच्या धाग्यावर धड दहा प्रतिसाद ही येत नव्हते अन् यावर काही तासातच सेंचुरी ! शनीदेवाची कृपा ती हीच काय ? ;-)
28 Jan 2016 - 11:49 pm | यशोधरा
बघा!! नास्तिक बिस्तिक होऊ नका!
28 Jan 2016 - 11:57 pm | अन्नू
गणा धाव रे मना पाव रे...
29 Jan 2016 - 12:35 pm | श्रीगुरुजी
अनाहितात प्रवेश द्यावा यासाठी मिपावरील पुरूष सदस्यांनी आंदोलन केल्यास आश्चर्य वाटणार नाही.
29 Jan 2016 - 12:49 pm | अजया
=))समानतेचं युग आहे.अंधश्रध्देतली असमानता दूर करायची तर मिपावरली का नको ;)
29 Jan 2016 - 2:12 pm | अनिरुद्ध.वैद्य
सध्या सर्व धर्मांच्या राशीस शनी महाराज येउन बसले असल्याने सगळ्या धर्मांना शहाणे करून सोडतील ;)
- चेपूहून साभार!
29 Jan 2016 - 2:13 pm | माहितगार
:) असेच घडो
29 Jan 2016 - 3:14 pm | यशोधरा
आँ? आँ? आँ? :)
29 Jan 2016 - 5:34 pm | माहितगार
एवढा सोपा मार्ग निघाल्यावर तथास्तू म्हणणे आलेच, कसें ;)
29 Jan 2016 - 9:56 pm | यशोधरा
असें नसें! एकपे रहना, या आ या ना!
29 Jan 2016 - 3:17 pm | नीलमोहर
त्या चौथर्यावर स्त्रिया तर दूर, पुरूषांनाही काही रक्कम दिल्याशिवाय प्रवेश नाही असं ऐकलं आहे, त्यामुळे या प्रकरणाविषयी बर्याच शंका, संभ्रम आहेत.
बाकी जिथे आपल्या येण्याचे स्वागत नाही तिथे जाण्याचा अट्टाहास कशासाठी..
आमचे शनिपाराचे शनिमहाराज आम्हाला हवे तेव्हा दर्शन घेऊ देतात, पुष्कळ आहे :)
29 Jan 2016 - 3:20 pm | विजय पुरोहित
जिओ नीमोतै जिओ... अगदी सत्य
या धाग्यावरचा कोटीकोटी मोलाचा प्रतिसाद...
सगळा वादच फुस्स्स्स....
29 Jan 2016 - 4:09 pm | माहितगार
हाच प्रश्न इतरांना नाकारुन ईश्वरावर केवळ आपलाच मालकी हक्क आहे हे सांगू पाहणार्या लिंग/गट/वंश/... इत्यादींबाबतही लागू होणार नाही का ?
कदाचित १) ईश्वराच्या नशिबी आलेली अमंगळ भेदाभेदाची संस्कृती दूर करून, ईश्वराचे दायित्व सर्वाप्रती समान असते हे सिद्ध करण्यासाठी २) अधिकारपूर्ण समतेच्या सन्मानासाठी' ३) भारतीय संस्कृतीतील कुपमंडूकते चे दोष दूरकरून सर्वसमावेशकतेचे आदर्श जोपासण्यासाठी
29 Jan 2016 - 8:24 pm | होबासराव
अरे बापरे :)
आता संस्कृती चे काका, मामा, सगळे येतिल बघा. बात निकली है तो बहोत दुर तक जायेगि.
29 Jan 2016 - 3:53 pm | पिलीयन रायडर
कोण शनिमहाराज?
धन्यवाद!
29 Jan 2016 - 7:20 pm | हेमंत लाटकर
अरे कोणीतरी शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवा. शनिदेवाच्या चौथर्यावर बायका गेल्या, न गेल्या काय फरक पडणारयै.
29 Jan 2016 - 8:06 pm | माहितगार
यांवें !
30 Jan 2016 - 2:35 pm | भंकस बाबा
आपण आता शनि देवालाच साकडे घालू की बाबा थांबव या आत्महत्या!
आणि हो ते देशाचे संरक्षण वेग्गेरे कशाला पाहिजे , तिथेपन शनिदेवाला सांगू आपल्या दुष्मनाच्या मागे साडेसाती लावायला.
काका तुम्ही फ़क्त हो म्हणा
29 Jan 2016 - 8:34 pm | नितीनचंद्र
मला आठवतय मागे एकदा डॉ नरेंद्र दाभोळकर साहेबांनी हाच संकल्प एकदा घेतला होता. त्यांनी मग तो मागे घेतला असे आठवते आहे.
कोणाला माहित आहे का की त्यांनी हा निर्णय का बदलला ? त्यांना पटलेली बाजु लोकांच्या समोर आणता येईल का ?
अर्थातच त्या मुलींनी स्त्रीयांनी जावे शनिशिंगणापुरला. आक्षेप असायचे कारण नाही.
29 Jan 2016 - 9:03 pm | श्रीगुरुजी
शनीच्या चौथर्यावर महिलांना प्रवेश न देणे हे चुकीचे आहे. जिथे पुरूषांना मुक्त प्रवेश आहे तिथे महिलांना का प्रवेश नसावा?
परंतु याबाबतीत महिलांचे आंदोलन सिलेक्टिव्ह वाटते. अनेक ठिकाणी महिलांना पुरूषांपेक्षा जास्त झुकते माप दिलेले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयात मुलींना ३०% प्रवेश राखीव (उर्वरीत ७०% प्रवेश घेण्यात महिलांना प्रतिबंध नाही), स्थानिक स्वराज्य संस्थात महिलांना ५०% जागा राखीव (तिथे पुरूषांना प्रवेश नाही, परंतु महिला उर्वरीत ५०% जागातून सुद्धा येऊ शकतात), बसमध्ये महिलांसाठी राखीव बाक, रेल्वेत महिलांसाठी राखीव डबा अशा अनेक ठिकाणी महिलांना केवळ महिला आहेत म्हणून फायदा दिलेला आहे. स्त्री-पुरूष समानतेचा विचार करताना या विशेष हक्काचाही विचार व्हायला हवा.
29 Jan 2016 - 9:34 pm | उगा काहितरीच
क्या बात है ! और ये लगा सिक्सर सिधा स्टेडीयमके बाहर.
29 Jan 2016 - 10:11 pm | मारवा
जे शैक्षणिक व राजकीय राखीव जागांच उदाहरण दिलेल आहे. त्यात आज पर्यंतच्या स्त्रीयांना शिक्षण आणि राजकारण (सत्ता) पद्धतशीरपणे कुटीलतेने जाणीवपुर्वक डावलल्याची अत्यावश्यक भरपाई या हेतुने आहे. हे मागचा सर्व इतिहास पुसुन नविन पाटीवर जणु काल अस्तित्वातच नव्हता आजपासुन सुरुवात झालेली आहे. आणि आजपर्यंत दोन्ही बाजुला उत्तम अधिकार मिळत होते. अशा अ-सामान्य गृहीतकातुन घेतलेले आहेत.
बस रेल्वे ठीक आहे पण किरकोळ स्वरुप असला तरी मुद्दा मात्र बरोबर आहे.
29 Jan 2016 - 10:31 pm | लालगरूड
देव नसतात.
30 Jan 2016 - 12:22 am | काळा पहाड
लालगरूड पिवळे असतात.
30 Jan 2016 - 9:00 am | अनुप ढेरे
30 Jan 2016 - 2:13 pm | इरसाल
असे काही आले नां की मला हटकुन " एक रुका हुआ फैसला" ची आठवण येते मग इथल्या वेगवेगळ्या प्रतिसादकर्त्यांच्या प्रतिसादाने मी गडबडुन जातो.
भेंडी काय चाल्लय काय ?
असे धागे नेहमी उडदाचे पापड करत असताना वाचा-लिहायला घ्यावेत. उडदाच्या चिवट पीठाच्या उंड्या मस्त्पैकी ठेचल्या जातील आणी पापड मस्त मऊ मुलायम.
30 Jan 2016 - 2:18 pm | विजय पुरोहित
मस्त खुसखुशीत प्रतिसाद....
30 Jan 2016 - 3:21 pm | यशोधरा
कित्ती दिवस झाले पापडाच्या लात्या खाऊन!
30 Jan 2016 - 7:31 pm | सुबोध खरे
एक माझेही मत(त्याला कुत्रं पण विचारात नाही हे सोडा)
तेथे एक पाटी लावून ठेवा. "चौथर्यावर स्त्रियांनी पाऊल ठेवल्यास शनीमहाराजांचा कोप होऊन त्यांच्यावर संकट कोसळू शकते असा विश्वास आहे. तेंव्हा चौथर्यावर पूल ठेवण्याच्या अगोदर विचार करा. "
ज्यांची श्रद्धा आहे त्या स्त्रिया पाउल ठेवणार नाहीत. आणि ज्यांची श्रद्धा नाही त्या मुळातच येणार नाहीत.
बस काय चार "स्त्रीमुक्ती" वाल्या स्त्रिया त्यावर पाऊल ठेवतील बाकी कोणी ठेवणार नाही. एवढा काथ्याकुट आणि ठणाणा आपण होऊन बंद होईल.
30 Jan 2016 - 7:45 pm | तर्राट जोकर
आताही पाटी न लावता तोच अर्थ प्रचलित आहे. जे होत आलंय तेही त्याच भावनेतून आजवर होत आलंय. काथ्याकूट आणि ठाणाणा वेगळ्याच कारणासाठी आहे (इथला नाही-भुमाता रणरागिणी ब्रिगेड चा). मलातरी कुणाच्याच मुद्द्यात काहीच दम दिसत नाही. काहीतरी अंतर्गत राजकारण धुमसतंय.
ती भूमाता ररा ब्रि वाचलं की भुछत्र आठवतं. दोन्ही ची उत्पत्ती साधारण एकसारखीच वाटते.
31 Jan 2016 - 7:35 am | हेमंत लाटकर
त्यापेक्षा शनि चौथर्यावर जाण्यास सर्वांनाच (स्त्री पुरूष) बंदी करावी.
31 Jan 2016 - 9:23 am | माहितगार
स्त्रीयांनी करू नये म्हणून पुरूषांवरसुद्धा बंदी मननीय आहे ! हे आणखी कोण-कोणत्या क्षेत्रात करता येईल ?