पुस्तके…

मनिष's picture
मनिष in जे न देखे रवी...
2 Jan 2016 - 2:38 pm

Pustake

पुस्तके झिरपत राहतात कुठेतरी जाणिवेत, नेणीवेत
आणि मग त्यांना अवचितच मनात धुमारे फुटतात

न बघितलेला पण परीचित परीसर, वाचलेली पात्रे
नकळत, वेळी-अवेळी डोळ्यांसमोर पिंगा घालतात

अनोळखी या वाटांवरून चाललोय आपण आधीही कधीतरी
एखादा बालमित्र मॅडसारखा इथेच गळ्यात पडेल असे वाटते

आपण त्यांना विसरलो, मुळात हेही विसरलेल्या कविता
अचानकच नेमक्या वेळी, नेमक्या ओळींसकट भेटतात

आणि काय पाझरत होते नेणीवेत हे तेंव्हा उलगडते
आतल्या आतच फुलणारे ते झाड आनंदाने मोहरते

ज्यांच्या मातीत आपण रुजलो, ज्यांच्या पानांवर आपण पोसलो
ती पुस्तकांची पाळेमुळे किती खोलवर रुजलीत हे उमगते

पुस्तकांशी जुळलेली नाळ, अशी सहजासहजी तुटत नसते
हे देणे अव्यक्त अज्ञाताचे, असे सहजा-सहजी फिटत नसते!

~ मनिष (१/१/२०१६)

कविता

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

2 Jan 2016 - 2:43 pm | यशोधरा

सुर्रेख! पोचली अगदी!

पद्मावति's picture

2 Jan 2016 - 3:01 pm | पद्मावति

सुंदर लिहिलेय.

चुकून दोनदा प्रकाशित झाली आहे, कोणी संपादक कृपया दुसरी कविता काढून टाकेल का?

प्रचेतस's picture

2 Jan 2016 - 5:17 pm | प्रचेतस

अप्रतिम.
तुझ्या पुस्तकांच्या नादाविषयी माहिती आहेच.

शार्दुल_हातोळकर's picture

2 Jan 2016 - 7:22 pm | शार्दुल_हातोळकर

पुस्तक.... जीव की प्राण.....

सर्वच प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद! :-)

विशाल कुलकर्णी's picture

4 Jan 2016 - 12:39 pm | विशाल कुलकर्णी

ज्जे ब्बात ! मस्तच. आवडली

सुंदर कविता.. चित्रही झक्कास आहे..!!!

राघव's picture

26 Jan 2016 - 6:20 pm | राघव

भा.पो. :)
आवडेश!!

राघव

प्राची अश्विनी's picture

27 Jan 2016 - 8:03 am | प्राची अश्विनी

अतिशय आवडली.

अप्रतिम. अगदी मनातलं बोलणारी कविता.अतिशय आवडली.

सतिश गावडे's picture

27 Jan 2016 - 8:32 am | सतिश गावडे

सुंदर कविता. आवडली.

नाखु's picture

27 Jan 2016 - 11:57 am | नाखु

आवाली . वाखु साठवली आहे

मी पण! पिंचिच्या सासंमध्ये पुप्रसाठी लावायला हवी होती ही मोठ्ठं होर्डिंग करुन!

नाखु's picture

30 Jan 2016 - 12:30 pm | नाखु

फक्त उडणार्या पत्र्यांपासून जरा लांब.

यशोधरा's picture

30 Jan 2016 - 12:33 pm | यशोधरा

हो!!!

एक एकटा एकटाच's picture

27 Jan 2016 - 9:37 pm | एक एकटा एकटाच

मस्तय

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jan 2016 - 8:24 am | अत्रुप्त आत्मा

@पुस्तकांशी जुळलेली नाळ, अशी सहजासहजी तुटत नसते
हे देणे अव्यक्त अज्ञाताचे, असे सहजा-सहजी फिटत नसते!
>> लाजव्वाब!

संदीप डांगे's picture

28 Jan 2016 - 11:38 am | संदीप डांगे

+१

चाणक्य's picture

28 Jan 2016 - 10:42 am | चाणक्य

आवडली. छान आहे.

श्रीरंग_जोशी's picture

28 Jan 2016 - 10:05 pm | श्रीरंग_जोशी

ही कविता खूप भावली.
कवितेबरोबर टाकलेले चित्रही खासंच आहे.

पैसा's picture

28 Jan 2016 - 10:59 pm | पैसा

खूप छान!

मनिष's picture

30 Jan 2016 - 11:55 am | मनिष

सर्वच प्रतिसादकर्त्यांचे आभार! खूप दिवसांनी ही वर काढल्याबद्द्ल राघवला धन्यवाद!:-)
चित्र नेटवर मिळाले (Book iPad wallpaper) आणि समर्पक वाटले म्हणून वापरले, त्याचा उल्लेख राहून गेला.

एका मैत्रिणीच्या फेसबुक स्टेटसवरून ही कविता सुचली. कधीतरी खूप आधी वाचलेली गुलजा़र ह्यांची ही कविताही डोक्यात होती - http://www.kavitakosh.org/kk/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%...

सस्नेह's picture

30 Jan 2016 - 12:49 pm | सस्नेह

फारच सुरेख कविता.
...पुस्तकप्रेमी

अशीच वर काढतोय - जागतिक पुस्तक दिनानिमित्त!