खिशात किती नोटा आहेत जमा ?

मयुरMK's picture
मयुरMK in जे न देखे रवी...
17 Jan 2016 - 10:27 am

प्रिया, मी तर तुझी प्रियतमा !
( खिशात किती नोटा आहेत जमा? )

प्राणेश्वरा,जीवलगा! सख्या सजना !
तुझिया संगती रे आज मज ना
पाहावयाचा आहे ( फुकटात ) सिनेमा
प्रिया मी तुझीच प्रियतमा !
( खिशात किती नोटा आहेत जमा? )

( भुलते हे जन पैसा पाहुनी
असेल 'मनी' तरच मिळेल 'हनी'
पैशाविना मोल ना तव प्रेमा )
प्रिया मीच तुझी प्रियतमा !
( खिशात किती नोटा आहेत जमा? )

पाहू दे रे मनाची दिलदारी
नसेल 'बैलेंस' कर उसनवारी
तुझिया प्रेमाची होईल खातरजमा
प्रिया मीच ना तुझी प्रियतमा ?
( खिशात किती नोटा आहेत जमा? )

( फुकटात लाभे ऐसी 'प्रीती' ना स्वस्त
एक विचारता मला मिळतील मस्त
करता एक इशारा कैक होतील जमा )
असेन आणिक तुझी प्रियतमा
खिशात जेव्हा असेल पैसा पुन्हा-

( सर्वच प्रेमिका अशा असतीलच असे नाही )

फ्री स्टाइलकविता

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

17 Jan 2016 - 11:52 am | जव्हेरगंज

बरं,
आजपासून खिशात नोटा ठेवत जाईन!!

क्रेडीट कार्ड ठेवले तर उत्तम :)

सस्नेह's picture

17 Jan 2016 - 4:17 pm | सस्नेह

मजेशीर !

उद्य's picture

17 Jan 2016 - 5:01 pm | उद्य

kavita mast aahe

मयुरMK's picture

18 Jan 2016 - 10:12 am | मयुरMK
नाखु's picture

18 Jan 2016 - 10:26 am | नाखु

प्रीतीक्रिया :

अश्या सवंग आणि छचोर काव्याने आपल्या उच्च संस्क्रुतीचा र्‍हास होत आहे आणि मिपाकर त्याला दाद देत आहेत हे आगामी धाग्याचा विषय आहे.

===हे मन (तू) साफकर

अखिल मिपा संस्क्रुती हितरक्षण समीती आणि समाज प्रोबधन समीती (तहहयात अध्य्क्ष/चिटणीस्/कार्यवाह्/एक्मेव आजीवन सभासद)

"मयुरा " मस्त लिहिलेस हो अगदी आम्च्या काळातही असे होते असे आम्चे हे गुरुजी भावजींशी बोलताना कालच म्हणाले..

==== सार्वकालीन मिपा जगनमान्य माई

यावर मी लवकरच एक भय कथा लिहिणार आहे . खिशात नोटा नसताना भूत दिसले म्हणून . विषय पुरवल्याबद्दल मयु तैंचे (झाडावरून्च )आभार.

== दिनू गवळी (छोट्या धाग्यांचे रतीब घालून मिळतील)

संकलक नाखु

तुमच्या भयकथेच्या प्रतीक्षेत असलेला अ-भय :)

सूड's picture

19 Jan 2016 - 3:04 pm | सूड

ओह के

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jan 2016 - 6:39 am | अत्रुप्त आत्मा

भुलते हे जन पैसा पाहुनी
असेल 'मनी' तरच मिळेल 'हनी' >>> लिल्याSssssss http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-040.gif

मयुरMK's picture

20 Jan 2016 - 9:51 am | मयुरMK

;0