( काही वर्षांपूर्वी लिहिलेली आहे ... आत्ता आठवली )
पत्रं लिहिण्यास कारण कि ...
आजची सकाळ खूप छान होती
कसलीच मला घाई नव्हती
घड्याळाचा बंद करून गजर
ठरवले लवकर उठायचेच नाही |
रोजची धावपळ , गोंधळ गडबड
ऑफिसची वेळ गाठायची धडपड
त्यातच सतत वाजणारा फोन
माझ्यासाठी अजिबात नसते सवड |
संध्याकाळची ही न्यारी तऱ्हा
सगळेच प्लान्स - तीन - तेरा
अर्जंट मिटींग , कॉन्फरन्स, कॉल्स
संपता संपता रात्रीचे बारा |
आज मात्रं तसे काहीच नाही
कारण तुझी ती अमेरिकावारी ..
स्वैपाकाला सुट्टी, शाळेला बुट्टी
आनंदी आनंद - घरी अन दारी |
पण माहीत नाही असं का ?
वाटतय काही चुकतंय का ?
मोकळी सकाळ नकोशी भासते
तुझं नसणं असं खुपतंय का ?
मग म्हणलं ,
करूया थोडी कामं - वेळ तरी जाईल
पॉटलक - भिशी ?
आज तरी नकोच बाई
मुलाचा आभ्यास राहील मग
शॉपिंग ची नको इतक्यात घाई |
असं का होतय समजत नाही
वाटलं तुलाच विचारावं काही
संसारी होऊन मी विसरले का ?
काय आवडतं मला अन काय नाही ?
तर पत्रं लिहिण्यास कारण की ...
विचारायचे आहे तुला काही
कळते आहे का तुला कारण
सारं का आणि कशासाठी ?
हसून म्हणशील - हे सारं
घरासाठीच मी करतोय ना ?
सुखासाठी तुमच्याच तर
घड्या ळा मागे मी धावतोय ना ?
पटतंय मला सारं सारं
तरीही काही चुकतंय का ?
सारं काही मिळतंय पण ..
तू तर कधीच नसतोयस ना ?
समजले आहे बहुदा काही
नसण्याची तुझ्या मला सवय नाही
असतील काही फायदे आणि तोटे
तुझ्याशिवाय जगणे , मला जमत नाही |
प्रतिक्रिया
12 Jan 2016 - 1:12 pm | सस्नेह
बैलाच डोळा !!
12 Jan 2016 - 2:57 pm | कविता१९७८
मस्त कविता
12 Jan 2016 - 3:13 pm | पद्मावति
सुरेख!
12 Jan 2016 - 3:19 pm | मित्रहो
मस्त कविता
12 Jan 2016 - 3:24 pm | एस
आवडेश!
12 Jan 2016 - 4:15 pm | वेल्लाभट
सुरेख
12 Jan 2016 - 11:45 pm | एक एकटा एकटाच
छान आहे
12 Jan 2016 - 11:56 pm | श्रीरंग_जोशी
साधे सरळ शब्द असलेली पण खोलवर भाव असणारी कविता भावली.
13 Jan 2016 - 7:35 am | मनीषा
मनःपूर्वक आभार !
13 Jan 2016 - 8:08 am | अत्रुप्त आत्मा
छान
13 Jan 2016 - 8:37 am | अजया
हम्म ...काहीसं असंच वाटतं खरं.
13 Jan 2016 - 9:18 am | पैसा
छान पत्र
13 Jan 2016 - 11:16 am | नूतन सावंत
पत्र पोचलं मनापर्यंत.
13 Jan 2016 - 4:03 pm | शैलेन्द्र
मस्त पत्र,
अशी पत्र एकमेकांना देत राहिलं की संसार सुखाचा होतो.
14 Jan 2016 - 11:37 am | मनीषा
सर्वांचे परत एकदा आभार !
14 Jan 2016 - 2:12 pm | नीलमोहर
छान लिहिलंय पत्र..
14 Jan 2016 - 2:38 pm | राघव
कविता आवडली गो माय!! :-)
राघव
16 Jan 2016 - 12:19 pm | मनीषा
धन्यवाद , नीलमोहर आणि राघवजी .
17 Jan 2016 - 6:26 pm | लीलाधर
@ तà¥à¤à¥à¤¯à¤¾à¤¶à¤¿à¤µà¤¾à¤¯ à¤à¤à¤£à¥ , मला à¤à¤®à¤¤ नाहà¥,
à¤à¤¥à¥à¤ सारठसार à¤¦à¤¡à¤²à¤¯í ½í±
17 Jan 2016 - 6:34 pm | सस्नेह
बाळराजांनी एवढ्यात आपली भाषा शिकवली ?
17 Jan 2016 - 6:28 pm | लीलाधर
सुंदर
6 Feb 2016 - 10:09 am | शिव कन्या
सत्य आवडले.