गजाननाचे वंदन गाऊ

सुमेध रानडे's picture
सुमेध रानडे in जे न देखे रवी...
9 Jan 2016 - 9:20 pm

****************************
मिसळपाव वर माझी ही पहिली कविता.
म्हणूनंच, सुरुवात गणरायाच्या स्तवनाने.
गजाननाचे वंदन, गजाननाला अर्पण!
****************************

गजाननाचे वंदन गाऊ|
रोज आधी हो त्यालाच पाहू||

हाच देवसे कला-बुद्धीचा,
हाच कांत प्रिय रिध्दी-सिद्धीचा,
आशीष हा साफल्य, वृद्धीचा,
कृपा निरंतर मागत राहू|
गजाननाचे वंदन गाऊ||१||

दुर्वांकुर नीरज जासवंद,
केवड्याचा ये मंद सुगंध,
मोदकाचा ही पुरवू छंद,
शुभ्र कपाळी चंदन लाऊ|
गजाननाचे वंदन गाऊ||२||

कार्याच्या शुभ आरंभाला,
मिळून आळवू गणरायाला,
विसरु नित संकट विघ्नाला,
फूल भक्तीचे चरणी वाहू|
गजाननाचे वंदन गाऊ||३||

श्रीगणेशकविता

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jan 2016 - 9:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान. गणेश पुजन झालं. आता चांगलं लिहा ब्वा काही तरी.
तेच तेच मिपाकरांचे लेखन वाचुन कंटाळा आला.
आता तुम्हीच काही तरी भारी लिहा. शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

पद्मावति's picture

9 Jan 2016 - 10:22 pm | पद्मावति

छान आहे कविता. आवडली.