एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग २

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in भटकंती
6 Jan 2016 - 4:27 pm

भाग पहिला भाग

"साहेब, कुठे पोचले...?" रेडकरांचा फोन.
"अहो अजून घरातच आहे.."
"का बरं...?"
"आल्यावर सांगतो"
"लवकर या. त्या लोखंडेला एक काम सांगीतलंय येता येता करायला. त्यालाही वेळ लागेल, तुम्ही लवकर निघा म्हणजे वेळ वाचेल सगळ्यांचा..."
"ओके."

लोखंडेचा फोन लगेच,
"का हो निघाले का...?"
"बस कपडेच घालत आहे"
"म्हंजे अजून घरातच काय... काय बावा, थे रेडकरने पेट्या घ्याले सांगीत्ल्या हायेत, आता अथून च्यामारी थ्या गोडाऊनले जा, तथून पेट्या घ्या, थ्या तिकडे लोहनेरेले द्या. अकाद हाय मायबहिन... किती वाजन आपल्याले निंघ्यालेच..."
"तुम्ही फोन ठेवाल तर मला जरा लवकर निघता येईल.. नै का?"
"......."

---------------------------------------------

मी आज दिवसभर जेवलोच नाही हे कळताच बायकोने बळजबरी ताटावर बसवले होते. आधीच वेळ झालेला त्यात गरमागरम जेवण समोर. द्विधा मनस्थिती ओळखून बायकोने दटावलेच. "आधी जेवण करा मग पुढे कुठे जायचे ते जा... उपाशीपोटी घराबाहेर पडायचे नाही"

मनसोक्त जेवलो. पटापट आवरले. जुने कपडे घातले, सोडून देण्यासारख्या दोन चप्पल होत्या. नेमकं ठरत नव्हतं कोणती सोडायची ते. एक घातली, एक परतीसाठी सोबत पॅक करून घेतली. सगळ्यांच्या पाया पडलो, सूचना दिल्या आणि बाहेर पडतांना लोखंडेचा परत फोन...
"अरे देवा... निघालो ना बाप्पा."
"ठिक आहे, मले जत्रा हटेलजोळ भेटजा. तथी आले की कॉल करा. मी येतोच."

-------

घड्याळात ७ वाजून ४८ मिनिटे झाली होती जेव्हा मी कार सुरु केली. ७ वाजून ५३ मिनिटाला रेडकराचा फोन.

"कुठे पोचले..."
"द्वारका होटेल.."
"लवकर जरा... तो लोखंडे वाट पाहतोय."
"अहो पाच मिनिटात तिथे पोचतो..."
"बरं.... या लवकर."

---------

दहा किलोमीटरचे अंतर भर आठ वाजताच्या रहदारीतून शहराच्या मध्यभागातून पार करायला किती वेळ लागावा...?

फक्त दहा मिनिट. हे नाशिक आहे भाऊ... इथे तुम्ही कोणालाही 'ट्रॅफिकमधे फसलोय' हे कारण देऊ शकत नाही. तर मी जत्राला दहाव्या मिनिटाला हजर होतो. लोखंडेला कॉल लावला. साहेब म्हणाले बस दोन मिनिटात आलोच. दोन मिनिटाचे पंधरा मिनिट करून साहेब उगवले. मग त्यांच्या मागे मागे त्यांच्या घरी गेलो. कार पार्क केली. घरच्यांशी ओळखपाळख वैगेरे सोपस्कार आटोपून आम्ही लोखंडेच्या वॅगनार मध्ये घुसलो. आणि अचानक मला कुठल्यातरी भंगार थेटरमधे आल्यासारखे वाटले. तंबाखू, दारू आणि इतर अनेक वैशिष्ट्यपूर्ण सुवास हे शिनुमा थेटरचेच म्हणून ओळखले जातात ते मी त्या नव्या कोर्‍या वॅगनार मध्ये भोगत होतो... अजून ह्या वासात किती काळ घालावायाचा कुणास ठावूक.

दोन वळणे घेऊन आम्ही आता हायवेला लागणार तोच लोखंडे बोलला, "साहेब, बीअर घेणार काय?"
"नको हो, आता अजून आपण निघालोही नाही व्यवस्थित. मुक्कामास पोचून करण्याच्या गोष्टी सुरुवातीसच....?"
"काही होत नाही. आपण रात्री बाराशिवाय काही गुजरातच्या रस्त्याला लागणार नाही, लिहून घ्या. दोन बीअर मारल्याशिवाय मला जमायचे नाही."
"तुम्ही घ्या, मला नको."

त्याने कडेलाच थांबवून दोन बीअर घेतल्या. गाडी चालवता चालवता रिचवायला सुरुवात केली.

(वाचकांना नम्र सूचना: येथून पुढे नियमबाह्य, कायदाबाह्य, घटनाबाह्य, नैतिकताबाह्य बरंच वाचायला लागणार असल्याने थोडावेळ आदर्शवाद बाजूला ठेवणे ;-) )

"पण मला एक प्रश्न पडलाय, साहेब, कि हा तुम्हाला का सोबत घेऊन चालला आहे. असा तसा तर काय कोणालाही सोबत घेत नाही. तुम्ही जरा विचार करा. पण धंद्याचं गणित रेडकरले जेवळं माहित हाय तेवळं कोनालेच मालूम नायी. त्याच्या बरोबर काम कराची एक अल्लगच मजा आहे. रेडकरसोबत आपली नाळ जुळेल आहे, बाकी कोणासोबत जमतंच नै. माणसाने हुशाराचा गुलाम व्हाव पण बेकूफाचा मालक हो नौय.

पण सालं तुमाले काऊन संग घेतलं हे काय माल्या डॉक्यात नाय येऊन रायलं बॉ."

"अहो, तुम्ही इतके वर्ष त्यांच्या सोबत आहात, तुम्हालाच जास्त कळत असेल, नाही का...? तुम्हीच सांगा काय झोल आहे ते" इति मी.

"आपलं तर काय दिमाग काम करून नै रायला बावा."

आम्ही गोडाऊनसाठीच्या रस्त्याकडे वळलो. आता हायवे सुटला. निर्जन, शांत रस्ता. अमावस्या होती. गाडी गोडाऊनच्या दिशेने घातली. तिकडे कुणीही काळं कुत्रं नव्हतं. असतं तरी दिसलं नसतं म्हणा कारण अंधारच इतका होता तिथे. गोडाऊनवरून माल घ्यायचा, पण इथे कोणीच नाही. कुणीतरी फिरकी घेतल्यासारखे वाटले.

ह्याने दोन-तीन फोन लावले. तसे एका स्टोअरचे शटर उचलले गेले. लाईट लागला.. दोन-तीन टपोरी-छाप दिसणारी पोरं बाहेर आली. त्यांना सूचना दिल्या गेल्या. पटापट बॉक्सेस वॅगनारच्या मागच्या सीट्सवर ठेवल्या जाऊ लागले.

मी खाली उतरलो. वर आकाश निरभ्र. चांदण्या तर इतक्या खाली आल्या होत्या जणू हाताने खुडून घ्याव्या... पण हात भाजेल म्हणून तो विचार सोडून दिला. कोण म्हणतं अमावस्येला चंद्र नसतो, हे काळभोर अवाढव्य आभाळच तर अमावस्येचा चंद्र आहे, इतकं भव्य, आणि सुंदर. त्या काळ्यातही किती लाख छटा. नुसता त्या काळाभोर आभाळाकडे पाहत राहिलो. आपलं क्षुद्रपण जाणवायला लागतं मग. त्या चांदण्याही छोट्या वाटत नाहीत मग. ते तारे भले इवलेशे, पिटूकले दिसू देत, पण तेवढ्याशा प्रकाशाच्या किरणांतूनही आपली लाखो किलोमीटरचा परिघ असलेली भव्यता ते आपल्यापर्यंत पोचवत असतात.

वॅगनारमधे बसलो, बारावा बॉक्स बसत नव्हता. माझी सीट पुढे करायला लागली, सर्व पंधरा बॉक्सेस नीट बसले आणि मी मात्र सोळावा बॉक्स असल्यासारखा त्या उपलब्ध जागेत अॅडजस्ट झालो. फार दूर नव्हते जायचे, फक्त अजून दहा मिनिटे बस...

निघालो, कुठल्यातरी बॉक्समधून लिकेज होत असल्याची शंका लोखंडेने बोलून दाखवली. एवढ्या भयंकर वासात त्याला क्षुद्र केमिकलचा वास आला ह्याबद्दल मला आश्चर्य वाटत होते.

परत हायवेला टच झाल्या झाल्या रेडकरचा लोखंडे ला फोन..
"हेल्लो, हां, बोला साहेब.."
"----------"
"ठिक आहे, बरं बरं, बघतो."

त्यांच्या संभाषणात कुठल्यातरी बेकरीचा पत्ता, ब्राऊन ब्रेड, हिरवी चटणी असे काय काय उल्लेख होत होते. संभाषण संपले.

"सांगा आता काय करू. आता ते ओझरले जायचे, ते कोणती बेकरी होय ते शोधाची, तिथून ते ब्रेड पायजेत कोनते तर ते घ्याचे, थे कोणती हिरवी चटनी भेटते दुसर्‍या दुकानात ते पाह्याची. हे एवळं वजं घेऊन आता ओझरच्या बजारायनी हिंडायचं, आता टाईम काय झाला."

"मग सांगा ना, 'जमणार नाही' म्हणून.... सरळ तोंडावर"

"नाही हो, तो माणुस चांगला आहे हो, चला पाहू आता ओझरले कोणतं दुकान उगळं हाये तर"

"--------"

दोनचार लॉग-कॉल नंतर आम्हाला ते विशिष्ट दुकान सापडले. एकातून ब्रेड, दुसर्‍यातून चटणी, तिसर्‍यातून अजुन काही. असा जामानिमा लोखंडे गोळा करत होता तोवर मी मिपा-मिपा खेळून घेतलं. तो परत आला, आम्ही परत निघालो. आता बस अजून पंधरा मिनिटे, बॉक्सपॅकींगमधे. त्यात रीलीफ मिपाचाच.

यथावकाश पिंपळगावमधे पोचलो, साहेबांच्या बिल्डींगसमोर गाडी लावली. एन्डेवर आत पार्कींगमधे लागली होती. म्हणजे आम्ही आज एन्डेवरने जाणार नाही हे निश्चित झाले. तसा लोखंडेचा चेहरा खुलला.

"म्हणजे आपल्याले सदाशेठच्या स्कॉर्पीओतून जा लागीन वाट्टे, बरं आहे तिच्यामायले. ह्या एन्डेवरचे लाईट बरबर नाहीत, दूरचं दिसत नाही. घाटात चालवायले लय प्रॉब्लेम. आपण तर मस्त बॅकसीटले ताणून देणार बॉ, ते तुम्ही अन् बाकीचे पाहून घ्या कोण कधी चालवीन ते."

स्कॉर्पीओ तिथे नव्हती. अजुन एक वॅगनार होती रमेशभाऊंची. दोन्ही वॅगनार एका महिन्याच्या अंतराने घेतलेल्या त्यामुळे नंबर सोडला तर दोहोंत काही फरक नाही. मी, लोखंडे पहिल्यासारखेच. बाकी रमेशभाऊ, पंढरीनाथ आणी रेडकर दुसर्‍या वॅगनार मधे बसले. आम्हाला पुढे जायला सांगीतले कारण लोडेड वेहिकल होती.

आम्ही निघालो. दहा-बारा किमी पुढे आल्यावर एका ठिकाणी एक वॅगनार पुढे जाऊन हायवेवरून खाली उतरली, ती रमेशभाऊंची वाटल्याने आम्ही तिला फॉलो केले. पण ती भलतीकडेच वळल्याने आमचा वेळ गेला. थोड्यावेळाने आम्ही सदाशेठची स्कॉर्पीओ जिथे होती तिथे पोचलो. लोखंडेचे परत बीअर घेण्याचे चालले होते, मी त्याला नको म्हणत होतो कारण वेळ नव्हता आता. तो म्हणत होता, दहा मिनिटात होऊन जाईल. तेवढ्यात मागून स्कॉर्पीओ आली, रेडकर लोखंडेला झापत होता, “अरे तुम्हाला पुढे जा म्हटलं तरी का थांबून राह्यलाय... तुमच्याकडे लोड आहे, तुमच्यापेक्षा आम्ही फास्ट जाऊ शकतो. तुम्हाला वेळ लागेल."

मला अजूनही कळत नव्हते मी बॉक्सपॅकींगमधून कधी अनबॉक्स होणार आहे. ही रात्र संपायचे नाव घेत नव्हती. अकरा वाजले होते. आम्ही नाशिकपासून फक्त चाळीस किमी दूरपर्यंत पोचलो होतो. लोखंडेची भविष्यवाणी खरी होत होती.

सुरतची सूरत एवढ्यात दिसणार नाही एवढेच आतापावेतो कळले होते.

............................

क्रमशः

(वादग्रस्त भाग 'स्व'संपादित करून प्रकाशित केलेला)

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

6 Jan 2016 - 5:01 pm | वेल्लाभट

फारच रोचक

स्पा's picture

6 Jan 2016 - 5:07 pm | स्पा

वाचतोय

तुषार काळभोर's picture

6 Jan 2016 - 5:13 pm | तुषार काळभोर

तरी भारीये..

मस्त.. काय संपादित केल आहे याची उत्सुकता आहे.. व्यनी करा जमल तर

पगला गजोधर's picture

6 Jan 2016 - 5:28 pm | पगला गजोधर

a

पैसा's picture

6 Jan 2016 - 5:32 pm | पैसा

प्रवास आताच कुठे सुरू झालाय!

जिन्क्स's picture

6 Jan 2016 - 5:34 pm | जिन्क्स

अम्हाला पण व्यनी करा :) . लेख भारी!!!

होबासराव's picture

6 Jan 2016 - 5:40 pm | होबासराव

:)

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Jan 2016 - 10:30 pm | कैलासवासी सोन्याबापु

गाववाले, साधना कट असाच राह्यते न हो ?

प्राची अश्विनी's picture

6 Jan 2016 - 5:57 pm | प्राची अश्विनी

पुभाप्र

संदीप डांगे's picture

6 Jan 2016 - 9:39 pm | संदीप डांगे

सर्व सदस्यांचे मनःपूर्वक धन्यवाद!

काही गैरसमज होऊ नयेत म्हणून सांगावेसे वाटते की सर्व संपादन मी स्वतः केलंय. यात मिपा-संपादक वा इतर कुणाचाही काही सहभाग नाही. काही बाबी फारच स्फोटक असतात, उत्साहाच्या भरात कधीही दुरुस्त न करता येणार्‍या चुका घडू नये म्हणून जरा आवरलंय.

रषातु's picture

7 Jan 2016 - 1:24 pm | रषातु

अतिशय छान.ओझर लाच रहात असल्याने सगळ्या घटना पटकन रिलेट झाल्या .
संदिप सर एक कट्टॉ करू या मस्त ...

आता हळूहळू वेगवेगळ्या कुशंका येतायत. प्रकरण साधं नाही हे समजायला लागलय. लेखनशैली छानच आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Jan 2016 - 10:35 pm | कैलासवासी सोन्याबापु

मी खाली उतरलो. वर आकाश निरभ्र. चांदण्या तर इतक्या खाली आल्या होत्या जणू हाताने खुडून घ्याव्या... पण हात भाजेल म्हणून तो विचार सोडून दिला. कोण म्हणतं अमावस्येला चंद्र नसतो, हे काळभोर अवाढव्य आभाळच तर अमावस्येचा चंद्र आहे, इतकं भव्य, आणि सुंदर. त्या काळ्यातही किती लाख छटा. नुसता त्या काळाभोर आभाळाकडे पाहत राहिलो. आपलं क्षुद्रपण जाणवायला लागतं मग.

हा मधला सिक्सर आवडला गाववाले, खुप म्हणजे खुप आवडला, अंधाराचे असेच सौंदर्य अन थ्रिल अनुभवायचे म्हणून आम्ही एकेकाळी पीकेव्ही च्या शास्त्रीनगर गेट न सायकलीनं अंदर शिरून शरद सरोवर ला रात्री ११ ११ वाजता जाऊ बसायचे पालथे धंदे केले आहेत. एकदम आठवले, बाकी ते बॉक्स काय अन बियर काय हिरवी चटनी काय एकंदर काहीतरी बिलाट आइटम दिसते लेक!

संदीप डांगे's picture

6 Jan 2016 - 10:57 pm | संदीप डांगे

शरद सरोवर... व्वा काय आठोन काळली राज्या तुह्मी...!!! नववी-दहावीत असतांना सायकल आणि पिकेव्हीचा बेज्या नाद हुता.. एकटाच फिराचो सकाळपासून संध्याकाळलोग...! रात्रीची मजा घ्याले नै जमलं, आता जमवतो.

गाववालो पीकेव्ही कि याद निकाल के मेरे जख्मो को न कुरेदो.... हाय तो शरद सरोवर ते त्याच्या आजुबाजुचे नारळाचे झाडे... ते होस्टेल साईड च महादेवाच एकदम निर्जन स्थळी असलेल मंदिर...त्या जांबाच्या (पेरु) बागा.... होस्टेल च्या पुढुन जाणारा तो नाला (ओढा) त्याला लागुन दोन्हि काठावर असलेले असंख्य बोराचे झाड...

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Jan 2016 - 10:27 pm | कैलासवासी सोन्याबापु

होबासराव,

शिवमंदिर आता शांत नाई रैले गाववाले, रोडग्याईचा स्पॉट होयल हाय तो सद्ध्याशिक, दर शनवार इतवारी कोणाचे न कोणाचे रोड़गे रायतेत तटिसा उरल्या दिवसात गावभरच्या शाळा तटी बालवाडी चे शेंबड़े पोट्टेपाट्टे घेऊन येतेत पिकनिक ले!!! तरी बरं आजकाल इद्यापीठानं कड़क केले येणेजाणे कैंपस च्या आंद्रे

संदीप डांगे's picture

7 Jan 2016 - 10:36 pm | संदीप डांगे

बापुसाहेब, रोडगेपार्ट्या बंद झाल्यात आता. लोकाइनं निरा कचरा करून ठ्योल्ता यवळ्या शांत जागेचा. पण तो रस्ता लय जबरी हाय राव. आयुष्यात एकांदा पिच्चर गिच्चर डायरेक कर्‍याले भेटला तं पीकेवी स्पॉट अशीनच...!

आदूबाळ's picture

7 Jan 2016 - 12:02 am | आदूबाळ

लंबर!

सुखी's picture

7 Jan 2016 - 2:52 pm | सुखी

.

मोहनराव's picture

7 Jan 2016 - 10:10 pm | मोहनराव

उस्तुकता ताणली गेली आहे. पुभाप्र.

pm kisan scheme's picture

13 May 2020 - 6:48 pm | pm kisan scheme

तुम्ही पुण्याचेत का हो ?

मी ,
pm kisan scheme

माझा ब्लॉग- https://kisansammanyojna.in/kisan-samman-nidhi-registration-online/