तू तरी कोठे तशी हसतेस आता
बोलक्या मौनासही जपतेस आता
पालखी माथ्यावरी रुतलीच आहे
जोखडांना सौख्य तू म्हणतेस आता
कुंकवाचा भार ना होतो कपाळी
'भाग्य' म्हणुनी त्यास का फसतेस आता
कोडगा तो उंबरा हसतो मुक्याने
का स्वतःची वंचना करतेस आता
दांभिकांचे दंभ तू नाकार वेडे
तूच दुर्गा, कालिका असतेस आता
विशाल
प्रतिक्रिया
4 Jan 2016 - 5:24 pm | शार्दुल_हातोळकर
वाह.... मस्तच आहे!! आवडले!!
4 Jan 2016 - 5:26 pm | पालीचा खंडोबा १
वाह.... मस्तच
4 Jan 2016 - 6:30 pm | कैलासवासी सोन्याबापु
लोडेड आहे बे!!
4 Jan 2016 - 7:09 pm | विशाल कुलकर्णी
धन्यवाद __/!\__
4 Jan 2016 - 9:30 pm | विशाल कुलकर्णी
संपादक मंडळी, शेवटच्या द्वीपदीत
अर्ध्वयूंचे दंभ तू नाकार वेडे
अर्ध्वयूंचे हा शब्द चुकला आहे, तो 'अध्व र्यू' असा हवा, पण त्यामुळे वृत्तभंग होतोय, त्याऐवजी 'दांभिकांचे'हा शब्द टाकाल का? धन्यवाद.5 Jan 2016 - 11:20 am | सस्नेह
संपादक नाही पण साहित्य संपादकांनी केले आहे.
5 Jan 2016 - 12:27 pm | विशाल कुलकर्णी
धन्यवाद :)
4 Jan 2016 - 9:45 pm | प्रचेतस
सुंदर.
4 Jan 2016 - 9:54 pm | सटक
क्या बात!!
4 Jan 2016 - 10:53 pm | बोका-ए-आझम
का कुणास ठाऊक पण खालील ओळी आठवल्या -
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी ।
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी ।
हे असे कित्येक खेळ पाहते मराठी ।
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी ।
5 Jan 2016 - 7:56 am | विशाल कुलकर्णी
धन्यवाद देवा, मेहनत सार्थकी लागली.
5 Jan 2016 - 8:46 am | शैलेन्द्र
मस्त,
खल्लास कविता
5 Jan 2016 - 10:30 am | मित्रहो
मस्त कविता
5 Jan 2016 - 10:53 am | माहितगार
काही ओळींनंतर प्रश्नचिन्ह गृहीत असावे असे वाटते तसे 'कुंकवाचा भार ना होतो कपाळी' या ओळीनंतरही प्रश्नचिन्ह अभिप्रेत आहे का ?
5 Jan 2016 - 12:29 pm | विशाल कुलकर्णी
ते वाचकांवर सोडलेले आहे ...
5 Jan 2016 - 11:20 am | सस्नेह
सुंदर कविता.
6 Jan 2016 - 6:07 pm | प्राची अश्विनी
सुंदर कविता!
6 Jan 2016 - 7:11 pm | पैसा
सुरेख!
6 Jan 2016 - 8:29 pm | एस
छान कविता!