वटवृक्षाच्या सावलीत
खुरटी झालेली झुडपे
बघताना
उगाचच
हरीलाल समोर येतो
अन
सुर्वेमास्तरांच्या सावलीत
कोमेजलेली नासकी
फळे आठवतात.
जगणं हे असचं
असतं का ?
एक सूर्य
अन त्याचे ग्रह
त्यांचे असंख्य उपग्रह
काही शोधलेले तर
काही काळकुपीच्या
मागे दडलेले
पुढे कधीतरी
परप्रकाशित उजेडात
सामोरे येणारे.
संभाजीही असाच
होता का ?
सूर्याचा ग्रह
काहीच माहिती नाही
पण
सूर्यापासून सूर्यप्रकाश
घेवूनही
स्वप्रकाश पसरवून गेला,
काय वाटले असेल त्याला ?
मयूर सिंहासनाची
धूळदाण बघताना
कधीतरी सूर्यापोटी जन्म
घेतल्याचा त्यास
पश्चाताप झाला असेल का ?
सूर्यपुत्र कर्णही तसाच
दुर्दैवी
कवचकुंडलासह जन्माला
येवूनही त्याचे रथचक्र
धरणीत धासावे
काय हे
दुर्दैवविलास कि प्राक्तन ?
शाप आहे का हा
जगण्याच्या
सूर्याच्या सावलीत ?
विजयकुमार.........
१८/१०/२०१०, मुंबई
प्रतिक्रिया
28 Dec 2015 - 3:35 pm | पद्मावति
सुरेख लिहिलंय. आवडली.
पहिल्या परिच्छेदामधले हरिलाल आणि सुर्वेमास्तर हे संदर्भ मला कळले नाही पण एकूण कवितेचा आशय खूप सुंदर आहे.
28 Dec 2015 - 3:36 pm | पद्मावति
सुरेख लिहिलंय. आवडली.
पहिल्या परिच्छेदामधले हरिलाल आणि सुर्वेमास्तर हे संदर्भ मला कळले नाही पण एकूण कवितेचा आशय खूप सुंदर आहे.
28 Dec 2015 - 5:03 pm | चांदणे संदीप
+1
शीर्षक त्यामानाने तेवढ व्यापक वाटत नाही, जेवढी कविता खोलवर घेऊन जाते.
या विषयावरून माझ्या एका मित्रासोबत माझी मागे एकदा खूप सखोल चर्चा झाली आणि एका सुंदरश्या कवितेचा जन्म झाला. आश्चर्य म्हणजे माझ्याही कवितेत विजयकुमार यांनी ज्या व्यक्तींचा उल्लेख केला ते आलेत.
जवळपास त्याच अर्थाने, काहीशा तक्रारीनेच!
कविता सुंदर झालेली आहे!
माझीही कविता लवकरच टाकेन! :)
Sandy
28 Dec 2015 - 3:51 pm | पालीचा खंडोबा १
आभार ! सुर्वे मास्तर म्हणजे कविवर्य नारायण सुर्वे होय. त्यांच्या पत्नीचे आत्मचरित्र वाचा कळेल काय म्हयायाचे आहे मला ते. सुर्वे मास्तरांचा मुलगा अति मद्यपानाने गेला आणि हरीलाल हा महात्मा गांधीजींचा मुलगा त्यांचा इतका मोठा होऊ शकला नाही किंबहुना हरिलालचा हि अंत एकाकी अवस्थेत मुंबई मध्ये सायन हॉस्पिटल मध्ये झाला

28 Dec 2015 - 4:02 pm | पद्मावति
ओह..ओके. हरीलाल...बरोबर, मेक्स सेन्स.
नारायण सुर्वेन्च्या मुलाचं मात्र माहीत नव्हतं.
धन्यवाद. कविता आवडली.
28 Dec 2015 - 4:51 pm | पर्ण
वा वा खूपच छान!!
2 Jan 2016 - 12:07 pm | परेश जोशी
सुर्यशी जवलिक जालनरिच असते ना!खुपच छन लिहिलय!
3 Jan 2016 - 11:45 am | मयुरMK
तुमच्या सर्व कविता छान असतात . व विचार करायला भाग पाडनार्या .
4 Jan 2016 - 4:17 pm | विशाल कुलकर्णी
आवडली...